Skip to main content

आस्वाद

दास्तान एका (खरड) वहीची...

लेखक फटू यांनी बुधवार, 26/05/2010 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
हे लेखन पुर्णपणे काल्पनिक असून त्याचा वास्तवातल्या कुठल्याच गोष्टीशी कोणताही संबंध नाही. या लेखाचा शेवटचा बराचसा भाग वाचताना मिपाच्या कुणा सन्माननिय सभासदाची खरडवही जशीच्या तशी उचलून इथे चिकटवली आहे असे वाटल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. ही गोष्ट आहे आमच्या सोसायटीतल्या दोन लहान मुलांची. खरं तर एका लहान मुलाची आणि एका लहान मुलीची. मुलाचं नाव गणनायक आणि मुलीचं नाव सुखदा. गणनायक आमच्या सोसायटीच्या बी विंगमधल्या नातलग काकांचा मुलगा. तर सुखदा आमच्याच ए विंगमधल्या कुलकर्णी काकांची मुलगी. गणनायकला खरं तर सारी सोसायटी तसेच आमच्या शाळेतील मुलं गण्या म्हणूनच हाक मारतात.

पु्स्तक परिचय - 'आशावादी अनुमान' - एक निराशा

लेखक राजेश घासकडवी यांनी रविवार, 23/05/2010 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तकांचं पूर्ण नाव 'भारतीय लोकसंख्येचा शोध घेत केलेले माझे आशावादी अनुमान' लेखक : डॉ. वसंत गोवारीकर. अनुवाद : सुधा गोवारीकर. सत्तरीच्या दशकात लोकसंख्येच्या स्फोटाच्या प्रश्नाने भारतातल्याच नव्हे तर जगातल्या विचारवंतांना भेडसावलं होतं. माल्थसने ज्या संकटाचं भाकित केलं ते लवकरच खरं होणार की काय असं अनेकांना वाटत होतं. भारतात लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कुटुंबनियोजनाचा मोठा कार्यक्रम राबवला गेला. या पार्श्वभूमीवर डॉ. वसंत गोवारीकरांनी या समस्येचा अभ्यास करून नव्वदीच्या दशकात एक इंग्लिश पुस्तक लिहिलं, आय प्रेडिक्ट. त्या पुस्तकाचं हे संक्षिप्तीकरण. खूप आशेने वाचायला घेतलं.

सोनिया गांधी : एक चरित्र

लेखक ऋषिकेश यांनी शनिवार, 22/05/2010 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात अनेक व्यक्तींबद्द्ल लोकांना आकर्षण आहे, उत्सुकता आहे, पण जर याची क्रमवारी लावायची ठरवली तर सोनिया गांधींचा क्रमांक फार वरचा ठरावा. सोनिया स्वतः मिडीयासमोर फारच कमी येतात. त्यांनी दिलेल्या मुलाखतीही मोजक्या. जनतेला त्या दिसतात, त्यांचे विचार कळतात ते फक्त जाहीर सभांतून अथवा त्यांच्या निर्णयातून. अश्यावेळी देशातील एका प्रमुख पक्षाच्या अध्यक्षा व त्यांच्या मर्जीनूसार पंतप्रधानपदही ठरविण्याची ताकद असलेल्या महिलेविषयी कुतुहल नसेल तरच नवल. अश्या वेळी जेव्हा वाचनालयात "सोनिया" हे सोनिया गांधींचे चरित्र दिसल्यावर ते घेतल्याशिवाय रहावलं नाहि.

अनवट

लेखक स्पंदना यांनी शुक्रवार, 21/05/2010 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
अनवट भरलेल्या डोळ्यांसमोर सार अस्प्सष्ट ....पण तरीही श्रवण इंद्रिये तशीच तल्लख!! बाजूला तसे कधीही विशेष भावना प्रधान न होणारे माझे धनी ...हाताच्या ओंजळीत हनुवटी ठेवून स्तब्ध ..डोळ्यात भारलेले भाव. थोड स्पष्ट दिसाव म्हणून मी डोळे मिटते आणि माझ्या गालावर अश्रू ओघळले.

शिवाजी महाराजांवर ई-बुक

लेखक अस्मी यांनी शुक्रवार, 21/05/2010 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
सारंग माडगुळकर यांनी शिवाजी महाराजांवर King Shivaji -the spiritual quest म्हणून एक ई-बुक मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांत लिहिले आहे... शिवइतिहासामध्ये 'मिर्झाराजांची मोहीम' व 'आग्रा भेंट' ही दोन प्रकरणे चुकीची लिहिली गेली आहेत, असं त्यांच मत आहे. भाग १ मिर्झाराजे जयसिंह प्रकरणाचे सत्य स्वरूप ! ...

तुझी घागर नळाला लाव...

लेखक फटू यांनी बुधवार, 19/05/2010 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
छान झोप झाली. होणारच होती. सलग साडे तीन तास बाईक चालवून ताम्हीणी घाटातून कोकणात उतरल्याचा शीण होता. त्यातच संध्याकाळी एका कोंबडीला सद्गती देऊन तिचा मर्त्य देहही सत्कारणी लावल्यामुळे शरीर समाधी अवस्थेत जाणं स्वाभाविक होतं. जागे होताच एक छानसा आळस दिला. सुस्ती उडताच समोर घडयाळावर नजर टाकली. सकाळचे अकरा वाजले होते. छे ! खुपच लवकर जाग आली होती. आळोखेपिळोखे देत जाग का आली याचा विचार करू लागलो. आणि जाग येण्याचं कारण माझ्या खोलीत वाजणारं तुझी घागर नळाला लाव हे अप्रतिम गाणं आहे हे जाणवलं.