मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बुलेवार्ड ऑफ ब्रोकन ड्रिम्स....

निखिल देशपांडे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
ट्रिगरः अर्थातच.. मकीने लिहिलेलं चाँद तनहा!!! रोज ऑफीसमध्ये होणारा तोच तो उशीर. सकाळी ९ ते रात्री ११ पर्यंत मरमर करायची.. त्यानंतर माजिवाड्याला उतरून पुन्हा घरी जायचं अगदी जीवावर येतं.. एकदा का घराकडच्या रस्त्यावर वळलं की रहदारी तशी तुरळकच. कधी कधी तर साथ द्यायला कुत्रंही नसते.. रस्ता मस्त शांत असतो.. मधूनच गार हवेची झुळूक शरीराला गारवा देऊन जाते.. खरेतर हा रस्ता चालण्याचा खूप कंटाळा आलेला असतो.. दिवसभराचा शीण तर असतोच, त्यात कुणाला फोन करावा अशी वेळ पण नसते. अशा वेळेला कंटाळलेल्या जीवाला सोबत एकच.... आवडती गाणी!!! Alone!!! [चित्र जालावरून साभार!!] तसे गाण्यातले मला कळतेच असे काही नाहीए, पण काही गाणी मनात घर करुन जातात. त्याला भाषा, संगीताचा प्रकार यांचे काही बंधन नसते. आणि हो, त्यासाठी गाणे "यमनातलेच" पाहिजे असाही काही नियम नाही. त्याच रात्रीच्या एकटेपणात काही गाणी पुन्हापुन्हा ऐकावीशी वाटतात. त्यातलेच हे एक: "बुलेवार्ड ऑफ ब्रोकन ड्रिम्स"!!! पहिल्यांदाच हे गाणं कधी ऐकलं ते आठवत नाही.. पण जेव्हा ऐकलं, तेव्हापासून माझ्या मोबाईलमध्ये नेहमीच राह्यलंय. काही खास वेळेला सर्व मित्र एकत्र बसून रात्र जागवताना या गाण्याचा कमीतकमी दोन-चार वेळेला तरी उल्लेख झालाच पाहिजे असा अलिखित नियमच झालाय.
My shadow's the only one that walks beside me My shallow heart's the only thing that's beating Sometimes I wish someone out there will find me 'Til then I walk alone
हे गाणं एकटेपणावर तर आहेच आणि एकटेपणाच्या भीतीबद्दलही आहे. आपली स्पदनं हीच एकमेव जिवंतपणाची खूण आणि तिला फक्त सावलीचीच सोबत असणं यापरतं एकटेपण ते काय असेल? पण सुदैवाने तो निराशावादी नाही.. त्याला असेच कुढत, कण्हत जगायचं नाहीय.. आणि म्हणूनच तो त्याच्यासाठी "चलते चलते.. यूँही कोई" भेटण्याची वाट पाहात आहे... [धोक्याचा इशारा: प्रस्तुत गाणे रॉक या प्रकारात मोडते. तेव्हा ते स्वत:च्या जबाबदारीवर ऐकावे व पाहावे.. नंतर हा का केकाटत होता अशा प्रतिसादांना विवक्षित ठिकाणी मारले जाईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी. ;) ]
"Boulevard Of Broken Dreams" I walk a lonely road The only one that I have ever known Don't know where it goes But it's home to me and I walk alone I walk this empty street On the Boulevard of Broken Dreams Where the city sleeps and I'm the only one and I walk alone I walk alone I walk alone I walk alone I walk a... My shadow's the only one that walks beside me My shallow heart's the only thing that's beating Sometimes I wish someone out there will find me 'Til then I walk alone Ah-ah, Ah-ah, Ah-ah, Aaah-ah, Ah-ah, Ah-ah, Ah-ah I'm walking down the line That divides me somewhere in my mind On the border line Of the edge and where I walk alone Read between the lines What's f**ked up and everything's alright Check my vital signs To know I'm still alive and I walk alone I walk alone I walk alone I walk alone I walk a... My shadow's the only one that walks beside me My shallow heart's the only thing that's beating Sometimes I wish someone out there will find me 'Til then I walk alone Ah-ah, Ah-ah, Ah-ah, Aaah-ah Ah-ah, Ah-ah I walk alone I walk a... I walk this empty street On the Boulevard of Broken Dreams Where the city sleeps And I'm the only one and I walk a... My shadow's the only one that walks beside me My shallow heart's the only thing that's beating Sometimes I wish someone out there will find me 'Til then I walk alone...
गाणं जितक्या वेळा ऐकावं, तितक्या वेळा ते नव्यानेच भेटतं.. एक नवीन अर्थ सांगून जाते.. नि प्रत्येक नवा अर्थ पटतोच पटतो.. पहिल्यांदा ऐकलं, तेव्हा ते एका मनातून खचलेल्या व्यक्तीचं वाटलं.. पुन्हा ऐकलं, तर ते "मी आहे असाच एकटा एकटाच राहणारा.. सर्वांत असूनही नसल्यासारखाच असणारा" अशा विचारांच्या मनस्वी माणसाचं वाटतं!! कधी ते प्रेमभंग झालेल्या माणसाचं वाटतं तर कधी वाटतं, त्याला त्याचं ध्येय कुठं आहे ते गवसलंय.. आणि त्याला आयुष्याच्या वाटेवर त्या ध्येयापर्यंत चालायचंय.. आणि वाटेवरती कुणाची तरी विश्वासाची, प्रेमाची सोबत मिळावी हे तर आहेच!!!! अधिक काय बोलू??? ऐका.... आणि एंजॉय करा!!!

वाचने 2962 वाचनखूण प्रतिक्रिया 16

शिल्पा ब 05/06/2010 - 00:24
I'm walking down the line That divides me somewhere in my mind On the border line Of the edge and where I walk alone मस्त गाणे आहे...२-३ वर्षानी परत ऐकले... :-) *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

टारझन 05/06/2010 - 00:24
एक्सलंट !!!! निदे निदे ... हा लेख "आज तक" वर छापुन येण्याच्या क्वालिटीचा आहे .. णिष्चित !! - (निदेच्या दर्दी लेखणाचा फ्याण) आळंदीयात्री

प्रियाली 05/06/2010 - 00:28
चांगले आहे. आवडते. उच्चार बुलावर्ड असा आहे की बुलेवार्ड असा? मला बुलेवार्ड वाटतो. मी तसाच उच्चारही करते. ;-) असेच आणखी आवडते गाणे.

In reply to by प्रियाली

निखिल देशपांडे 05/06/2010 - 00:33
बुलेवार्ड हाच उच्चार योग्य वाटतो... बदल करत आहे. चुक निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

In reply to by निखिल देशपांडे

३_१४ विक्षिप्त अदिती 05/06/2010 - 00:54
राणी काय उच्चार करते boulevard चा? ;-) निख्या, तुझा लेख बोर्डावर पाहूनच परम संतोष झाला! आता पुन्हा एकदा नीट वाचते आणि ते इंग्रजी कळायला अंमळ वेळ लागतो, त्यामुळे खर्राखुर्रा प्रतिसाद नंतर देते. ही फक्त पोच. अदिती

वारा 05/06/2010 - 00:51
लिन्कन पार्क ,,,, आय ट्राईड सो हार्ड...ईन द एन्ड ईट डसंट ईव्हन मॅटर....

नंदन 05/06/2010 - 02:35
सुरेख लेख. ह्या बँडची इतर काही गाणीही आवडतात, पण हे गाणं सर्वात अधिक. अवांतर - हे एकाकीपणाचं ज्यात फक्त सावलीच आपली सोबत करते (किंवा सावलीदेखील सोबत करत नाही), हे अर्थातच अनेक ठिकाणी वापरलं गेलंय. 'My shadow's the only one that walks beside me' ह्या उपमेवरून काही हिंदी गाण्यांचे शब्द आठवले. जसे की - साया ही अपने साथ था, साया ही अपने साथ है (जाने कहाँ गये वो दिन); गम के मारे पुकारे किसे हम, हमसे बिछडा हमाराही साया (दिल अपना और प्रीत परायी); मेरे साथ जाये ना मेरी परछाई रे (यारा सीली सीली). जाणकारांनी कृपया अजूनही या यादीत भर घालावी.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

In reply to by नंदन

परिकथेतील राजकुमार 05/06/2010 - 11:24
नंदनभौ शी सहमत आहे. ह्या गाण्यामुळे "साया भी साथ जब छोड जाये ऐसी है तनहाई" ह्या नुसरत फतेह अली खान ह्यांच्या गाण्याची फार आठवण झाली. अप्रतिम लेखन निखुभौ, आता कायम लिहिते रहा हेच मागणे आहे. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

शुचि 05/06/2010 - 03:24
लेख आणि गाणं आवडलं. प्रियालींचही गाणं मस्त आहे. मला "पेंट माय लव्ह" हे एम एल टी आर चं गाणं खूप आवडतं. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

मेघवेडा 05/06/2010 - 03:37
मस्तच रे निखिलशेट! मस्त आहेच गाणं. 'वेक मी अप व्हेन सप्टेंबर एण्ड्स' आणि टाईम ऑफ यॉर लाईफ ही अशीच आणखी मस्त गाणी ग्रीनडेची!! "बूलिवार्ड"बद्दल काय बोलावं.. सगळं तू मोजक्या शब्दांत व्यवस्थित लिहिलंयस!! :) आणि तो धोक्याचा इशारा दिलायस ते बरं केलंस. ;) अवांतरः टीवायला असताना अ‍ॅन्युअलला परफॉर्म केलं होतं हे गाणं. त्या आठवणी ताज्या झाल्या. आमचा कीबोर्ड प्लेयर होता थोडा काण्या.. तर एकदा मुद्दाम त्याला चिडवायला म्हणून प्रॅक्टिसच्या वेळी .... Sometimes I wish someone out there will find me 'Til then I walk alone हे झाल्यानंतर Ah-ah, Ah-ah, Ah-ah, Aaah-ah Ah-ah, Ah-ah याच्याऐवजी मी मुद्दाम "काण्या.. काण्या.. काण्या.. काऽऽऽण्या.." असं म्हटलं होतं!! =)) =)) चार पाच मिनिटं नुसते हसत होतो सगळे!! निदे.. कॉलेजच्या दिवसात परत घेऊन गेलास यार!! मस्त!! :) -- मेघवेडा! भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

सहज 05/06/2010 - 07:59
लेख व प्रतिसाद दोन्ही छान. बाकी सध्यातरी युट्युबवर फक्त नॅन्सी अजरमतै व क'न्ननभौ ठेका धरतात..

आनंदयात्री 05/06/2010 - 10:09
छान ! पण इंग्रजी अजिबातच कच्ची असल्याने लेखाचा आनंद घेउ शकलो नाही :( - (पापी पापी .. पापी चुलो ऐकणारा) आंद्या पापी

मदनबाण 05/06/2010 - 12:06
ह्म्म...छान गाणं... आता मला आठवलेल गाणं... मदनबाण..... "Intelligence is what you use when you don't know what to do." Jean Piaget

शानबा५१२ 05/06/2010 - 14:24
अरे मी पण ह्या विषयावर लिहणार होतो पण हली मनस्ताप खुप आहे. हल्ली मी हे गाण एकतो हल्ली बर का ..............माझे इतर all time favorite नंतर..........
मला 'जास्तकरुन' ह्याच श्रेणीतली गाणी आवडतात.