ओम जय जगदीश
सुरूवातीलाच अटलांटामधे रस्त्याच्या डावीकडून गाड्या जाताना दाखवल्याने हा चित्रपट वास्तववादी नाही याची आपल्याला खात्री होते. वास्तववादी, आर्ट फिल्म वगैरे समजून लोक लगेच पळून जाउ नयेत म्हणून अनुपम खेर ने (दिग्द.) हे प्रीएम्प्टिव्ह टेक्निक वापरले असावे. पण तरीही मी खात्री केली की मी मैदानात उलट्या बाजूला बसून हे पाहात नाहीये. पूर्वी मैदानात पिक्चर्स दाखवत तेव्हा गर्दी असेल तर आम्ही उलटीकडून पाहायचो तसे.
तर ही तीन भावांची कथा. थोरला अनिल कपूर म्यूजिक संबंधी एका कंपनीत कामाला असतो. मधला फ़रदीन हा तो अमेरिकेत शिकायला असतो, तर धाकटा अभिषेक जबरी हुषार असतो व कॉम्प्युटर मधे काहीतरी करत असतो.
मिसळपाव