Skip to main content

आस्वाद

'सेक्स डॉल्स'- प्रत्यक्षाहूनी प्रतिमा उत्कट!

लेखक टर्मीनेटर यांनी सोमवार, 05/06/2023 या दिवशी प्रकाशित केले.
'सेक्स डॉल्स'- प्रत्यक्षाहूनी प्रतिमा उत्कट!

साधारण अडीच वर्षांपूर्वी मिपावर चार भागांत लिहिलेल्या "दुबई : मरूभूमितले नंदनवन" ह्या प्रवास वर्णनाच्या पहिल्या भागात दुबईतल्या एका सुपर मार्केट मध्ये, तो पर्यंत ऐकून-वाचून माहिती असलेला 'चायनीज सेक्स डॉल' हा प्रका

भोला चित्रपट...भोळा प्रेक्षक.....

लेखक कर्नलतपस्वी यांनी रविवार, 28/05/2023 या दिवशी प्रकाशित केले.
अविभाज्य अमेझोनचा (Amezon Prime) सन्माननीय सदस्य म्हणून कंपनीने सुचना पाठवली की भोला सिनेमा आपण चकटफू बघू शकता. हल्ली ही कंपनी सुद्धा भारी लब्बाड झालीयं.सिनेमे भाड्या ने(मुळ शब्द भाडे याचे ब.व.,घराचे भाडे,बसचे भाडे सारखे) किंवा विकतही देतात. पहिल्यांदा असे काही नव्हते.अ.प्रा वर पुर्व प्रकाशित २१ सरफरोश मी फुकट पाहीला पण आता मात्र पैसे मोजावे लागतात.(बरे झाले मी लवकर पाहीला) साX, विपणन तज्ञ (Marketing Expert) सुद्धा एक भारीच जमात आहे.आपला ढोल आणी ग्राहकाचा बॅण्ड कसा जोरात वाजवायचा यांना बरोबर समजते. खुल्या चित्रपटगृहाची सवय, बंद चित्रपटगृहांत बसवत नाही.आता अंतरजालावर सोईस्कर वाटते.

‘एव्हरीथिंग,एव्हेरीव्हेअर ऑल at वन्स’

लेखक Bhakti यांनी गुरुवार, 18/05/2023 या दिवशी प्रकाशित केले.
जर तुम्हांला बुद्धीला ताण द्यायला आवडतं असेल.आऊट ऑफ बॉक्स साय –फाय सिनेमा आवडतं असेल तर ‘एव्हरीथिंग,एव्हेरीव्हेअर ऑल at वन्स’ हा सिनेमा तुमच्यासाठी आहे. मी हा सिनेमा बघण्याचे कारण म्हणजे सात ऑस्कर या सिनेमाने खिशात घातले आहे.तेव्हा पाहायला सुरुवात केलीच.

“ही चोळी कोणाची?”: सुखद दृश्यानुभव

लेखक हेमंतकुमार यांनी गुरुवार, 18/05/2023 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपट पाहताना सतत मध्येमध्ये येणारे कर्कश्य संगीत नकोसे झालेय ? घिस्यापिट्या आणि ‘फ’कारयुक्त संवादांचा कंटाळा आलाय ? तोच तोच मसाला पण नकोसा वाटतोय? आणि शांतपणे एखादी निव्वळ दृश्यमालिका बघावीशी वाटते आहे काय? वरील सर्व प्रश्नांना तुमचे उत्तर ‘होय’ असेल.. तर मग खास तुमच्यासाठीच आहे हा चित्रपट: The Bra. ok विदेशी चित्रपट असल्याने त्याची भाषा कोणती हा महत्त्वाचा मुद्दा.

यू -ट्युबवरील मराठी नाटके: दृष्टीक्षेप

लेखक हेमंतकुमार यांनी गुरुवार, 04/05/2023 या दिवशी प्रकाशित केले.
नाटक ही जिवंत कला आहे आणि ती प्रत्यक्ष अनुभवण्यातच खरी मजा असते हे अगदी मान्य. परंतु गेल्या दहा पंधरा वर्षात महाराष्ट्रातील विविध रंगमंदिरांमध्ये होणाऱ्या नाट्यप्रयोगांवर एक नजर टाकल्यास बरेच असमाधान जाणवते. अनेक शहरांमधल्या रंगमंदिरांच्या दुरवस्थेबद्दल वारंवार माहिती प्रसारित होत आहे. नाट्य कलाकारांपासून ते प्रेक्षकांपर्यंत सर्वच घटक या दुरवस्थेमुळे मनातून नाराज आहेत. मध्यंतरी पुण्यातील तीन महत्त्वाच्या रंगमंदिरांच्या दुरवस्थेबाबत विस्तृत अहवाल ‘सकाळ’मध्ये वाचण्यात आला.

कानात “बसलेले” संगीत

लेखक हेमंतकुमार यांनी बुधवार, 12/04/2023 या दिवशी प्रकाशित केले.
मनाला रिझवणाऱ्या गोष्टींमध्ये संगीताचे स्थान फार वरचे आहे. व्यक्तीगणिक संगीताची आवड वेगवेगळी असते, परंतु कुठलेच संगीत न आवडणारा माणूस मात्र विरळाच. वेगवेगळ्या ठिकाणी आणि अनेक प्रकारे आपण संगीत ऐकत असतो - मग ती विविध संगीतप्रसारक श्रवणमाध्यमे असतील किंवा प्रत्यक्ष संगीताची मैफिल. कधी आपण शुद्ध वाद्यसंगीत ऐकतो तर बऱ्याचदा गीत आणि संगीताचा सुरेख संयोगही ऐकतो. यांच्या जोडीला अजून एक संगीताचा प्रकार आपल्या कानावर वारंवार पडतो आणि तो म्हणजे संगीतमय जाहिराती.

बेलग्रेडचा जुना राजप्रासाद

लेखक पराग१२२६३ यांनी सोमवार, 03/04/2023 या दिवशी प्रकाशित केले.
माझे आजोबा नोकरीच्या निमित्ताने 60 वर्षांपूर्वी तत्कालीन युगोस्लाव्हियाची राजधानी असलेल्या बेलग्रेडमध्ये काही वर्ष राहत होते. त्यामुळं माझ्या आजी-आजोबांकडून आणि माझ्या आईकडून युगोस्लाव्हियाविषयी मी बरंच ऐकत आलो आहे. बेलग्रेड शहर आणि युगोस्लाव्ह जनतेबद्दल ते कायमच भरभरून सांगत आले आहेत. त्या काळात भारत आणि युगोस्लाव्हियाचे संबंध अतिशय घनिष्ठ होते. त्यामुळं सामान्य युगोस्लाव्ह जनतेमध्ये भारत-भारतीयांविषयी अतिशय उत्सुकता आणि आदर असल्याचं त्यांना त्यांच्या वास्तव्यात जाणवत होतं.

चर्चबेल –लेखक ग्रेस (ऐसी अक्षरे... मेळवीन ९)

लेखक Bhakti यांनी रविवार, 26/03/2023 या दिवशी प्रकाशित केले.
चर्चबेल –लेखक ग्रेस (लघुलेखसंग्रह) a शब्दयात्री असल्याने शब्द कधी अलगद कुशीत येतात तर कधी दूर दूर वाळवांटामध्ये तप्त होत असतात.अलगद कुशीत येण्याचे दोर म्हणजे ग्रेस यांच्या कविता रसग्रहण! सांजवेळा,थरथरती कातर संध्याकाळ,सूर्याच्या सांज रंगवेली,पापणीचा ओलसर वाळवंट,ह्रुदयाचा आर्त कावळा,मधेच ज्ञानेश्वर यांचा लख्ख प्रकाश ,पाउसाच्या थेंबओळी,गर्द झाडी- सूर्याचे किरणांचे खेळ,झाडांच्या पानांच्या –पक्ष्यांच्या गळाभेटी,माणसाच्या आत्म्याच्या संवेदना, अनुभूतीची हाक आणि आणखिन व्यापक सर्व लाभत राहते ग्रेस

कलासक्त, संगीतप्रेमी, सौंदर्यासक्त रसिकांना 'बघण्याजोगे' बरेच काही... (भाग १)

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 13/03/2023 या दिवशी प्रकाशित केले.
काही काळापासून चित्रकला, संगीत, प्राचीन वास्तुरचना वगैरेंबद्दल यूट्यूबवर अनेक उत्तमोत्तम विडियो मी बघत आलेलो आहे. रसिकांकांसाठी ते हळूहळू इथे देत रहाण्यासाठी हा धागाप्रपंच करीत आहे. रसिक मिपाकरांनी त्यात आपापली भर टाकत राहून हा धागा समृद्ध करत रहावे, अशी विनंती करतो. सुरुवात पंडित मुकुल शिवपुत्र यांनी गायलेल्या 'जमुना किनारे मेरो गाव' या पारंपारिक रचनेने (ठुमरी ?) करतो. पं. कुमार गंधर्व, प्रभा अत्रे, राहुल/वसंतराव देशपांडे इ.

मोगरा फुलला (ऐसी अक्षरे ..मेळवीन -८)

लेखक Bhakti यांनी सोमवार, 27/02/2023 या दिवशी प्रकाशित केले.
m एका निळाशार डोहात बुडून जावं,तळाशी माउलीची भेट घ्यावी.शिंपला हाती घेत काठाशी यावं.त्यात चमचमता निळा मोती असावा.तो मोती मोगराच्या फुलांच्या राशीत अलगद ठेवावा.असा भास मुखपृष्ठ पाहील्यापासुनच होतो. लेखक गोपाल नीलकंठ दांडेकर (गोनीदां) ह्यांचे ज्ञानेश्वर चिंतनाचे फलित ‘मोगरा फुलला’ हे पुस्तक १९७५ साली प्रथम प्रकाशित झाले. ज्ञानेश्वरकालीन काळाचा मागोवा ,कावेरी (रुक्मिणीची सखी),भट्टदेव (साऱ्या कुटुंबाचे हितचिंतक)या काल्पनिक पात्रांचे स्वगत माध्यमातून कोमल,संवेदनशील ,काव्यशब्द लयीनी यात साकारले आह