गुडबाय मि. चिप्स
नुकतेच जेम्स हिल्टनचे गुडबाय मि. चिप्स वाचुन संपवले. जेम्स हिल्टनचे वगैरे फक्त म्हणायला. भारदस्त इंग्लिश नावे फेकली की "आम्ही ब्वॉ इंग्रजी अभिजात साहित्य वाचतो" असे म्हणायला आपण मो़कळे. प्रत्यक्षात मी आपला योगेश काण्यांनी त्याचा केलेला अनुवाद वाचला. पण खरे सांगायचे तर कुठल्याही भाषेतुन वाचले तरी आपल्याच मातीतल्या वाटणार्या काही दुर्मिळ साहित्यकृतीत गुडबाय मि. चिप्सची गणना करता येइल.
छोट्या आकारातली शे - सव्वाशे पाने वाचायला असा कितीसा वेळ लागणार. एका बैठकीतच संपवले. इतका मंत्रमुग्ध झालो की लगोलग दुसर्यांदा वाचले आणि मग जाणवले की कथानायकाचे नावच संपुर्ण पुस्तकात नाही. गुडबाय मि.
मिसळपाव
आज बहुचर्चित आणि हाऊसफुल चाललेला दुनियादारी हा सिनेमा बघितला. हा चित्रपट आल्या आल्या बर्याच ब्लॉग्सवर आणि मराठी संस्थळांवर ह्या सिनेमाविषयीच्या उलट सुलट चर्चा वाचल्या होत्या. बर्याच निःसीम सुशि (सुहास शिरवळकर) प्रेमींना हा सिनेमा आवडला नाही आणि त्यांनी त्या विषयी भरभरून लिहिले. सिनेमात बदललेल्या कथा आणि पटकथेबद्दल त्यांनीअसंतोष व्यक्त करण्यासाठी रकानेच्या रकाने लिहिले होते.
मीही निःसीम ‘सुशि-भक्त’. माझी वाचक म्हणून सुरुवात सुशि-साहित्यानेच झाली.