Skip to main content

सायकलीशी जडले नाते ११: नव्या रस्त्यांवरील राईडस

लेखक मार्गी यांनी सोमवार, 21/12/2015 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

वॅली ऑफ फ्लॉवर्स : ४ : वॅलीमधला पहिला दिवस

लेखक आकाश खोत यांनी शनिवार, 19/12/2015 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ | भाग २ | भाग ३ व्हॅली ऑफ फ्लॉवर्स हे इंग्रजांनी दिलेले नाव आहे. भारतात अजिंठा, लोणार, हि व्हॅली अशा गोष्टींची महती लोकांना कळायला इंग्रज लोकच का लागतात काय कि? विसाव्या शतकात 1931 मध्ये काही इंग्रज गिर्यारोहक चुकून इथे आले आणि त्यांना या सुंदर जागेचा शोध लागला. त्यापैकी एकाने “व्हॅली ऑफ फ्लॉवर्स” याच नावाने पुस्तक लिहिले आणि या नावाने हि जागा प्रसिद्ध झाली. इंद्राची बाग असाही कुठे तरी उल्लेख वाचला मी. दर वर्षी इथे हिवाळ्यात पूर्ण बर्फ साचतो.

सायकलीशी जडले नाते १०: एक चमत्कारिक राईड- नर्वस नाइंटी!

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 18/12/2015 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

सोबत ... : अंतीम भाग

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 15/12/2015 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
थांब सुन्या.....! मी तुझ्याशी थोडं खोटं बोललोय ! मी तुला इथे वाघ बघायला नाही आणलय. इथे येण्याचं कारण काही वेगळं आहे. खरेतर मला कुणाचीतरी सोबत हवी होती कारण इथे एकट्याने यायची माझी हिंमत नव्हती, माझ्याकडे तेवढे धाडस नव्हते." सोबत भाग १ आता पुढे ... ****************** पक्या नरमाईच्या सुरात बोलला. तसा सुन्या थबकला.... "पॅक्स, आर यु क्रेझी? एकतर गेले दोन दिवस सॉरी दोन दिवस आणि एक रात्र मी तुझ्याबरोबर इथे सडतोय तो फडतुस वाघ बघण्यासाठी. साल्या काल शुक्रवार, २२ तारीख ना, बिप्सची नवीन मुव्ही रिलीज होणार होती. तुझ्यामुळे मी माझा फर्स्ट डे.

विश्वभरातील अन्याय्य विचार आणि वर्तन करणार्‍या 'त्या' पुरुषांनो- आणि 'त्या' स्त्रीया सुद्धा तुमचा जाहीर निषेध

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 11/12/2015 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
"वास्को -दा-गामा चे नामांतर आणि गोवेकरांची मानसिकता" या धागा लेखात गोवेकर महिलांनी " 'गोव्याची मुलगी' म्हटल्यावर समोरच्या (गोव्याबाहेरच्या) लोकांची दृष्टी जेव्हा बदलतात.." अशा स्वरुपाची नाराजी व्यक्त केली आहे; मी महाराष्ट्रातल्या ज्या भागतून येतो तेथे मी गोवेकर मुली अथवा स्त्रीयांबद्द्ल कोणतीही नकारात्मक अयोग्य भावना कधी ऐकली अथवा पाहिली नाही, परंतु एका स्त्रीला जेव्हा दुसरी स्त्री अनुमोदन देते आहे तेव्हा काही शहरातील काही समुह गटांकडून असा त्रास होत असला पाहीजे.

सायकलीशी जडले नाते ९: दुसरे शतक. . .

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 11/12/2015 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

सुहास शिरवळकरांची पुस्तके आणि मी

लेखक अजिंक्य विश्वास यांनी गुरुवार, 10/12/2015 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
मागे दिड-दोन वर्षांपूर्वी जेव्हा मला अंधारछाया आणि शिरवळकरांची बरीच जुनी पुस्तके मिळाली होती तेव्हाची ही गोष्ट आहे. त्यावेळेस मला अनपेक्षितरित्या हा खजिना मिळाला होता, आणि माझ्या संग्रहात आणि माहितीत नवीन भर पडली होती. त्यावेळेस मला असे वाटत होते, की शिरवळकर कुटुंबीय आणि ठराविक ४-५ लोक सोडले तर माझ्याइतकी माहिती कोणाही जवळ नाहीये. मी त्यांच्या ’थर्‌राट’ ह्या रहस्यकथेच्या १९८८ सालच्या आवृत्तीच्या शोधात काही दिवस अनेक ग्रंथालये आणि जुनी रद्दीची दुकाने पालथी घालत होतो.

सुटलेल्या पोटाची कहाणी -५

लेखक Anand More यांनी बुधवार, 09/12/2015 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-१ भाग-२ भाग-३ भाग-४ __________________________________________________________________________________ मुन्नाभाई पिक्चर मुळे आपल्या शरीरात २०६ हाडे असतात हे कळले होते पण आपल्या शरीरातील स्नायूंची संख्या माहिती नव्हती. पण तिसऱ्या दिवसा नंतरच्या रात्री असतील नसतील त्या स्नायूंनी बंड केले.

सुटलेल्या पोटाची कहाणी -४

लेखक Anand More यांनी मंगळवार, 08/12/2015 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-१ भाग-२ भाग-३ __________________________________________________________________________________ जिमच्या फीजमध्ये बराच खर्च झाला होता. म्हणून अनावश्यक खर्चाला काट मारायचे ठरवले होते. मनात असूनही नायके किंवा आदिदास ची झोळी, डोक्याला आणि हाताला बांधायचा पट्टा. नवीन बूट वगैरे थेरं न करता गुमान घरातली कुठल्याश्या दुकानाची प्लास्टीकची पिशवी उचलली, त्यात जुने बूट आणि मोठा रुमाल टाकला. आधी मुलाना शाळेत सोडले आणि मग वळणार इतक्यात पोरांनी हसून अंगठा दाखवला. तो शुभेच्छा दर्शक असावा, ह्या सर्वातून तुझ्या हाती मी ठेंगाच देणार आहे असे देव मुलांच्या हातून सुचवीत नसावा अशी मी स्वतःच्या मनाची समजूत करून घेतली आणि तिथून निघालो. माझा स्वभावंच तसा आहे. एकदम आशावादी.

आयपीओ काही अलिबाबा काही चोर

लेखक लॉरी टांगटूंगकर यांनी रविवार, 06/12/2015 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणास्थान- इंग्रजाळलेल्या भाषेसाठी आगाऊ माफी. फार पूर्वी पासून आयपीओना खात्रीशीर पैसे कमावण्याचा मार्ग म्हणून पाहिलं जातं. पण आधी घडलेल्या गोष्टींचा विदा काय सांगतो? या मागे काही डार्क सिक्रेट्स असू शकतात/आहेत? कोणत्याही व्यवसायाला कच्चामाला इतकीच किंबहुना त्याहून अधिक गरज पैशाची असते. पैशासाठी एक तर कर्ज घेता येऊ शकतं, किंवा व्यवस्थापन स्वतःकडचा काही हिस्सा तुमच्या आमच्यासारख्या काही गुंतवणूकदारांना विकून थोडा पैसा उभा करू शकतं.