Skip to main content

चतुरभ्रमणध्वनीच्या (स्मार्टफोन) कॅमेर्‍याचे नाविन्यपूर्ण उपयोग

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी रविवार, 18/03/2018 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या घडीला चतुरभ्रमणध्वनी (स्मार्टफोन) बाळगणे ही नेहमिची गोष्ट झाली आहे. यात संभाषण आणि संदेश पाठवणे या सर्वसामान्य सोईबरोबर फोटो काढण्यासाठी कॅमेरा ही एक आकर्षक सोय असते, हे सांगायची गरज नाहीच. किंबहुना, जेथे जातो तिथला फोटो आणि सेल्फी फेबुवर टाकली नाही तर तो अक्षम्य अपराध असावा असा हल्ली फोनकॅमेर्‍याचा उपयोग होऊ लागला आहे.

मला भेटलेले रुग्ण - १४

लेखक डॉ श्रीहास यांनी बुधवार, 07/03/2018 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/42101 “आपके बेटे को अस्थमा है।” बस् एवढं म्हणायचा अवकाश आणि त्या आईच्या डोळ्यातून धारा सुरू झाल्या.... खरं तर त्या ३ वर्षाच्या मुलाला गेल्या दिड वर्षांपासून हा त्रास आहे पण ॲलर्जीचा खोकला आहे , असं सांगीतल्या गेल्यामुळे फार काही वाटलं नव्हतं पण दमा आहे म्हटल्या म्हटल्या लगेच पालकांच्या चेहेऱ्यावरचे भाव बदलतात ....

सरसगडची सुरस सहल

लेखक नरेंद्र गोळे यांनी मंगळवार, 06/03/2018 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
सरसगडाच्या ९६ पायरी जिन्याच्या पायथ्याशी आम्ही अडलो होतो. छे! हा तर अवघड रॉक पॅच होता. हा काही आपल्याला जमणार नाही. चला परत. कारण पालीत राहणार्‍या एका अनुभवी माणसाने आम्हाला सांगितलेलेच होते की साठीच्या वरील लोकांसाठी सरसगड काही सोपा नाही. त्यांनी तर जाऊच नये तिथे.

टी.सी.

लेखक तिमा यांनी शनिवार, 03/03/2018 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
अपडाऊनच्या दिवसांतली गोष्ट आहे. मुंबईहून बोईसरला जाण्यासाठी त्यावेळी फक्त लांब पल्ल्याच्या गाड्याच उपलब्ध असत. त्यामधे रोज प्रवास करणार्‍या, माझ्यासारख्यांना, बसायला मिळणे मुष्किल असायचे. त्यावर पर्याय म्हणजे, विरारपर्यंत लोकलने जाऊन तिथून सुटणारी शटल सर्व्हिस पकडणे. आमच्यासारखे, वेळाचे फारसे बंधन नसलेले, हा पर्याय स्वीकारीत. हे शटल प्रकरण फार गंमतीदार होते. रेल्वेच्या लांबच्या प्रवासासाठी अयोग्य झालेल्या जुन्या पुराण्या बोग्या, स्क्रॅप यार्डात पाठवण्याआधी, या शटल साठी वापरत. सहाजिकच मग, प्रथम वर्गातही सीटस्,पंखे,बर्थ, ट्रे, आरसे इत्यादि गोष्टी मोडकळीला आलेल्या असत.

एका सायन्स प्रोजेक्टची गोष्ट

लेखक बाजीप्रभू यांनी गुरुवार, 01/03/2018 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
"अहो बाबा, तुमचे प्रोजेक्ट्स आजी ने बनवले... माझे तुम्ही बनवताय आणि माझ्या मुलांचे मीच बनवणार आहे कि भविष्यात!! ओपन सिक्रेट आहे हो हे, जजेसनाही माहित असतं कि पॅरेन्ट लोकच बनवतात सायन्स प्रोजेक्ट्स, कशाला भाव खाताय? बनवा कि माझा सायन्स प्रोजेक्ट". आमचं कॉन्सेप्ट, तुमचं लेबर वर्क आणि स्नेहा आणि मी प्रेसेंटेशन करणार, म्हणजे डिमांड-प्रोडक्शन आणि मार्केटिंग असं टिमवर्कचं वर्तुळ पूर्ण होईल सिम्पल. अश्या आर्ग्युमेंट्स करत माझ्या आळशी लेकीने माझ्या गळ्यात एक सायन्स प्रोजेक्ट अडकवला त्याची हि गोष्ट, मी :- बरं विषय काय आहे? ती :- ते माहित नाही तुम्हीच ठरवा. मात्र वर्किंग हवं मी :- ऑ!!

मला भेटलेले रुग्ण - १३

लेखक डॉ श्रीहास यांनी मंगळवार, 27/02/2018 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/42057#new हि बाई नवऱ्यासोबत येते गेल्या ३ वर्षांपासून आणि आजही ही दोघं आले .... तब्येतीत चांगला फरक आहे म्हणून औषधं कमी करत करत आता फक्त एकच नियमीत आणि एक गरजेप्रमाणे असं प्रिस्क्रीपशन वर लिहून दिलं आणि पुढची व्हिसीट ३ महिन्यांनी सांगीतली, पण त्या पेशंटच्या चेहेऱ्यावरचा ताण जाणवत होता म्हणून परत विचारलं की सध्या अजून काही त्रास नाही ना ? झोप लागते का बरोबर ? .....

नाईस टू मीट यू

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शनिवार, 24/02/2018 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
सायंकाळ उलटून गेली होती, अंधार पडायला लागला होता. चंद्रगडाच्या किल्ल्यावर जायचं त्याचं निश्चित झालं होतं. भिल्लाच्या एका वस्तीवर प्रशांत पोहचला. एका भिल्लानं रानातल्या झोपडीत प्रशांतची राहण्याची जुजबी व्यवस्था केली. उघड्यावर झोपण्यापेक्षा बरं म्हणून प्रशांतही खूश झाला होता. शाल अंथरून बॅगेची उशी करुन बराच वेळ प्रशांत लोळत पडला होता. थकल्यामुळे त्याला एक हलकीशी डुलकी लागून गेली होती. डोळे उघडले, बाहेर पाहिलं तर अंधार अंगावर येत होता. दुरवर झोपड्यामधून धपं धपं असा एका तालात भाकरी थापल्याचा आवाज येत होता. कुत्र्यांच्या भूंकण्याचा आवाज सुरुच होता.

मला भेटलेले रूग्ण - १२

लेखक डॉ श्रीहास यांनी गुरुवार, 22/02/2018 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/41320 ओपिडी संपत आली होती, आज फारसे पेशंट नव्हते मी रिलॅक्स मुड मध्ये होतो आणि तेवढ्यात एकजण केबिन मधे शिरला .... हातात भली मोठी पिशवी , बरेच रिपोर्ट्स असावेत असा अंदाज आला.

एसटी कार्यशाळा भेट-चिखलठाणा औरंगाबाद

लेखक आलमगिर यांनी बुधवार, 21/02/2018 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर मंडळी , आज थोड्या वेगळ्या विषयावर लिहिणार आहे. दिनांक १६ फेब्रुवारी २०१८ रोजी एसटी लव्हर्स ग्रुप तर्फे केंद्रीय बस बांधणी आणि दुरुस्ती कार्यशाळा चिखलठाण औरंगाबाद ला दिलेल्या भेटीचा हा वृत्तांत. औरंगाबाद शहराबाहेर सिडको बस स्टॅन्ड वरून बाहेर पडला कि चिखलठाना मध्ये आपल्याला दिसते ती एसटीची विभागीय कार्यशाळा. एसटीच्या प्रचंड कारभाराची ती जणू प्रतिनिधीच. ह्याच कार्यशाळेत आम्ही म्हणजे MSRTC LOVERS GROUP च्या सदस्यांनी भेट दिली. कार्यशाळेमध्ये असलेल्या विविध विभागांची माहिती आपण आता घेऊ.

वेदांग शिरोडकर

लेखक arunjoshi123 यांनी शनिवार, 17/02/2018 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
प्रारंभ: एच् ब्लॉक, रुम नंबर ११७. हॉस्टेलच्या ४-५ मजली इमारतीच्या तळमजल्यावर लोखंडी जाळीच्या गेटपासून पहिलीच रुम मी पसंद केली होती. भूकंप झाला तर सर्वात अगोदर इमारतीपासून शक्य तितक्या दूर धूम ठोकता यावी असा माझ्या लातूरकडच्या भूकंपकंपित मनाचा हिशेब त्यामागे होता. पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठवाड्याचा कोटा कमी असल्यानं त्यामानानं चांगले मार्क असूनही मला उशिरा, म्हणजे दुसर्‍या यादीत, १-२ महिन्यांनी, हॉस्टेलरुम अलॉट झाली होती. रुमच्या लोकेशनवर मी खुष असलो तरी मात्र तिथला व्यत्यय नि वर्दळ यांच्यामुळं शिरोडकरला ती आवडत नसे.