1917 : रेस अगेंस्ट टाईम
90च्या दशकातल्या तरुणांना कॉल ऑफ ड्युटी ww 1 हा गेम माहितीच असेल.
भाग १० अंधारछाया प्रकरण ९ - आत्ता पर्यंत मेलेले जर मानगुटीवर बसायचे म्हणाले, तर प्रत्येकाला एक एक तरी घ्यावा लागेल उरावर!
अंधारछाया
नऊ दादा मंगला आत बेबीकडून जप करून घेत होती. पडल्या पडल्या मी विचार करत होतो. आता यापुढे काय होईल? या संबंधी. भूत-पिशाच निकट नहीं आवै । महाबीर जब नाम सुनावै ।। हनुमान चालिसातील चरण आठवला! वाटले की ही भूत पिश्शाच योनी आपण मानतो! एखाद्याचा आत्मा अतृप्त राहिला की त्याची वासनापूर्ती होईतो आत्मा फिरत राहातो अंतरिक्षात. आपण पुनर्जन्मावर विश्वास ठेवतो. या जन्माची फळे पुढच्या जन्मात भोगायची असे आपले शास्त्र सांगते. पुर्वीचे बारा जन्म आपण कोण कोण होतो याची स्मृती बहिणाबाई सारखी अडाणी संतबाई ही सांगते! इंग्लंड-अमेरिकेतही लोक आहेत बरेच ते ही आठवतात आपला पुर्वजन्म!भाग ९ अंधारछाया प्रकरण ८. समजा मीच या फुल्या काढायचे ठरवले, घरात कोणी नसताना! तर मी काय करेन? ठीक आहे, काजळाची डबी घेतली. कशाने काढेन मी अशा फुल्या? काहीतरी काडी बिडी हवी! येस काड्यांची पेटी हवी!
अंधारछाया भाग ९ - प्रकरण ८
अंधारछाया
आठ मंगला कॅलेंडरचा नोव्हेंबर महिना फाडला. बेबीला येऊन आता दोन आठवडे झाले. डिसेंबरचे एकतीस दिवस. डिसेबर महिन्याचे पान फाडून नवे कॅलेंडर लावीन तेंव्हा काय झाले असेल? करायला घेतलंय हे आपण, पण निभेल ना असे मनात सारखे वाटे! मग ह्यांनी सांगितल्याचे आठवे. ‘मंगला, एक लक्षांत ठेव आपण तिच्या चांगल्यासाठीच करायला जातोय ना मग होऊ दे काहीही. तू सर्व भार स्वामींच्यावर सोपव. जपावर विश्वास ठेव.भाग ८ अंधारछाया प्रकरण ७. नकळत हात जोडले गेले. ‘स्वामी मार्ग सुचवा आम्हाला.
अंधार छाया
सात शशी आज शुक्रवार म्हणजे एच व्ही सर दाढी करून येणार आणि चिडणार! मग स्पेलिंग चुकलं की बसणार पट्ट्या हातावर! विचार करत मी एकनॉलेजमेंट म्हणजे पोच असे पाठ करत होतो. मनात येई दाढी करणं आणि रागावणं याचा काही संबंध असेल तर मी दाढी करणार नाही मोठेपणी! आत आई, बेबी बोलत होत्या. लती काहीतरी दौत पेनाशी चाळे करत होती. आजी दुर्वा तोडायला फिरत होत्या बाहेर फुलझाडांपाशी. दादा सायकलवरून गेलेले पाहिले ऑफिसला, मग मी सकाळ घेतला हातात. ‘क्रीडा विषयक बातम्या हे पुढच्या पानावर का देत नाहीत?भाग ७ अंधारछाया प्रकरण ६ कुटून कुटून मारीन पन सोडनार न्हाई.
अंधार छाया
सहा बेबी गुरूजींनी जे सांगितलं त्याच्यावर माझा विश्वासच बसेना! काय मला कोणी झपाटलय? कस शक्य आहे? मी तर माझी मीच आहे. खातेय पितेय, आणखी कोण असणार माझ्या शरीरात? गुरूजी म्हणाले, ‘हिचा पत्रिका जरा विचित्र आहे. अनिष्ट ग्रहयोग मान आहे. शिवाय सध्या साडेसातीही चालू आहे. तिच्या राशीला. तेंव्हा त्रास हा होणारच.’ ते ठीकच होत. माझी तब्बेत ही अशी लुकडी सुकडी. शिक्षणाचे असे तीन तेरा वाजलेले. तेंव्हा कुंडलीच्या भविष्यावर माझा विश्वास बसला. पण पुढे लागिराबद्दल म्हणताना मला काही खरंच वाटेना.भाग ६ अंधारछाया प्रकरण ५ - पोलक्यावर काळ्या फुल्या! काळ्या कुळकुळीत! डिजाईन सारख्या फुल्या! मी पटकन तिचा पदर पाठीवरून ओढून घेतला.
अंधारछाया
पाच मंगला सदासुखला तीनचा शो पाहिला. तिथेच कॅफे रॉयलमधे आंबोळ्या, टॉमॅटो आम्लेट खाल्ले. परत टांग्यातून येता येता साडे आठ झाले. काकू वाट पहातच होत्या आमची. अंथरुणे घालून पडलो. मुलं झोपल्यावर हे दारांना कड्या कुलुपं लावून आले. उशी खाली किल्ल्या ठेवून झोपलो. पण कालचा प्रकार आठवून झोप थोडीच येत्येय? रात्र अस्वस्थेतच गेली. हे ऑफिसातून संध्याकाळीच एकदम येणार असा निरोप तातोबा घेऊन आला. मग आम्ही तिघींनी जेवणं उरकून घेतली. पडलो मधल्या खोलीत मासिकं वाचत. इतक्यात दारावरची बेल वाजली. जरा त्रासातच दार उघडले, तर दोन अनोळखी बायका दारात. म्हणाल्या, ‘आम्ही सांगलीहून आलोय.भाग ५ अंधारछाया प्रकरण ४ - मी हिला धरतो. आता हित मटनाचं जेवान बिवान देतो म्हनत्यात. तू फक्त सोड तिला. मी बघतो तिच्याकडं. बघ कसा बकाबका खातो ते.’
अंधारछाया
चार मंगला गेले चार रात्री काही माझा डोळ्याला डोळा नाही. ह्यांनी सांगितलं, ही बेबी अशी कड्याकाढून बाहेर जाते म्हणून. मी हबकलेच. हे रात्री जागे झाले म्हणून बरं. गेली असती पुढे चालत एकटी तर शोधायची कुठे तिला ? आधीच ही नवीन गावात. रस्ते माहित नाहीत. काही म्हणता काही होऊन बसलं असतं बरं. मी यांना सांगितलं, ‘आधी सगळ्या दारांना कुलुपं घाला रात्रीची. मगच मला झोप येईल.’ हे म्हणाले मला, ‘विचार तिला काय होतय झोपल्यावर म्हणून. पण ती म्हणते, ’काही नाही मी झोपते छान. इथे आल्यापासून झोप छान लागतेय ’. मला पुढे काही सुचेना विचाराव कसं ते.फेंगशुई,कासव आणि चिरंजीव
D mart मध्ये खरेदी करत असताना चिरंजीवांची भुणभुण सुरू होती. त्याला एक काचेचे पारदर्शक रंगाचे कासव आवडले होते. ते त्याला खेळायला हवे होते. मी पाहिले, त्या ठिकाणी फेंगशुईच्या अनेक वस्तू ठेवल्या होत्या. त्यातच ते कासवपण होते. मी नाक मुरडूनच तिथून पुढे निघून गेले. माझा अश्या गोष्टींवर विश्वास नाही मात्र नवरोबांचा आहे. घरी आल्यावर सामान भरून ठेवताना पाहते तो काय! चक्क ते कासव सामानाच्या पिशवीत दिसले. मग लक्षात आले,हा उद्योग चिरंजीव आणि त्याच्या पप्पांचा आहे. दोघांनी मला नकळत खरेदी करून ते घरी आणले होते.
मग दोन दिवस ते कासव कुठे ठेवायचे यावर बापलेकांत वाद सुरू होता.
मिसळपाव