Skip to main content

द फॉगी माउंट्न बॉईज उर्फ (जाने कैसे सपनों में खो गई अखियाँ...)

लेखक पहाटवारा यांनी शुक्रवार, 20/12/2019 04:18 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला मेलं त्या संगीतातलं काही कळत नाही. एक सरगम सोडली तर रागांच्या सुरावटी कळत नाहीत, आरोह-अवरोह कळत नाही, आॅर्केस्ट्रेशनच्या ज्ञानाचीही बोंबच पण आपल्याला गाणी ऐकायला आवडतात.

Use Dipper at Night: हाय बीम लो बीम, अप्पर- डिप्पर बीम बाबत चर्चा

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 12/12/2019 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
Use Dipper at Night: हाय बीम लो बीम, अप्पर- डिप्पर बीम बाबत चर्चा मिसळपाव.कॉम म्हणा किंवा शेजारचे मराठी सोशल फोरम म्हणा, त्यात महत्वाचे चर्चेचे विषय लिहीले जातात की जे समाजाला उपयोगी पडू शकतात. मागे वाहनांसंदर्भात हेल्मेटचा विषय आला असता, त्यातील विचार बरेच इतर ठिकाणी कॉपी केले होते. इतर ठिकाणी ज्यांनी वाचले ते त्यांच्या उपयोगी आले असेल तर आपल्या या सोशलीझमचा फायदाच म्हणायचा.

आठवणीतील घरं -- नानी का घर -- भाग २

लेखक अहम्_लिखामि यांनी गुरुवार, 12/12/2019 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला भाग प्रकाशित केलेला आहे तर हे माझ्या आजीचं घर नेहमी गजबजलेले असायच, मामा, मामी, २ मामे भाऊ असा सतत वावर असायचा. मी आणि धाकटा भाऊ citizens नसलो तरी permanent residency visa वर असायचो. मामी आणि आई दोघीही नोकरी करत असल्यामुळे, दिवसभर आमचा पसारा उचलायला आजीच असायची. आम्ही चौघेही वेगवेगळ्या कारणांमुळे आजी च्या fav लिस्ट मध्ये होतो. मोठा मामे भाऊ पहिला "नातू" म्हणून कौतुकाचा, मग मी काळी बेंद्री असली तरी शांत आणि खूप पुस्तकं वाचते म्हणून, धाकटा मामे भाऊ मृदू स्वभावाचा म्हणून (मोठ्यानि नाकात नऊ आणले कि हा भाऊ देव वाटायचा मला पण) आणि माझा भाऊ शेंडेफळ नातू, म्हणून भाव खाऊन जायचा.

आठवणीतील घरं -- नानी का घर -- भाग १

लेखक अहम्_लिखामि यांनी गुरुवार, 12/12/2019 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
तितली रानी तितली रानी मुझको दे दो अपने पर पर लगाके उड जाऊंगी अपनी नानी के घर मुलगी हे म्हणायला लागली आणि मला आईच्या घराच्या ऐवजी माझ्या नानीचं घर आठवायला लागलं. लहानपणीच्या खूप आठवणी या औरंगाबाद मधल्या घरा भोवती आहेत हे जाणवल. माझ्या आजीचं नाव विमल आणि आजोंबांचं नाव वासुदेव म्हणून घराचं नाव गोकुळ असा ठेवलेलं आणि नाव पुरक असायला पाहिजे म्हणून कि काय पण वासुदेवांना ८ नातवंड. (या हिशोबानी माझ्या दुसया आजोंबांच्या घराचं नाव हस्तिनापूर असायला पाहिजे होतं कारण तिकडे आम्ही ५ जण. असो.) तर गोकुळ हे त्या वेळेस च्या पद्धती प्रमाणे मोठ्या जागेवर बांधलेलं ऎसपैस घर.

मंतरलेले दिवस – ३ : शास्त्रीय संगीत समारोह

लेखक सुधीर कांदळकर यांनी बुधवार, 04/12/2019 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
नोव्हेंबर आला की येणार्‍या थंडीची चाहूल लागते. सहलींचे मनसुबे रचले जातात. त्याचबरोबर संगीत समारोहांचे देखील वेध लागतात. भारतात ठिकठिकाणी शास्त्रीय संगीत समारोह भरतात. गेल्या आठवड्यात केव्हातरी चित्रवाणीवर वाहिन्या चाळता चाळता एका समारोहातल्या मैफिलीचे दृश्य आले आणि अशा कार्यक्रमांच्या आठवणी जाग्या झाल्या. शास्त्रीय संगीत हे भारताच्या संस्कृतिक अस्मितेचे एक प्रतीक. गणेशोत्सवातील शास्त्रीय संगीताच्या मैफिलीवरून आठवले होते पं. गामेखां पुण्यतिथी, पं पलुस्कर पुण्यतिथी अशा निमित्ताने चालणारे शास्त्रीय संगीताचे समारोह, सोहळे. परंतु विस्तारभयास्तव ते लिहीले नव्हते. ते इथे सादर करतो.

ओढ समुद्राची

लेखक मालविका यांनी शनिवार, 23/11/2019 23:30 या दिवशी प्रकाशित केले.
ओढ समुद्राची आमच्या चिपळूण पासून समुद्र तसा लांबच. म्हणजे समुद्र बघायला जायचं तर जवळच्या जवळ म्हणजे गुहागर गाठायला हवं. नाहीतर जरा लांब रत्नागिरी किंवा दापोली जवळचे बीच. त्यामुळे लहानपणी समुद्रावर जाणं खूपच कमी होतं. हां पण ओढ मात्र नक्की होती. लहान असताना आमच्या बिल्डिंग मधले शेजारी एखाद्या शनिवारी त्यांच्या मुलीबरोबर मलादेखील घेऊन जायचे. दोन तीन तास समुद्रावर घालवल्यावर त्यांच्या गाडीतून येताना दमून सॉलिड झोप लागायची. वर्षातून साधारण एकदा आमची कौटुंबिक म्हणजेच आम्ही चौघे आणि अप्पा काकांचं कुटुंब, ते चौघे असे आमच्या कुलदैवताला जायचो.

मुंबईचे धडे - ४

लेखक मालविका यांनी सोमवार, 18/11/2019 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईचे धडे - ४ मुंबईचे धडे - १ http://misalpav.com/node/43794 मुंबईचे धडे - २ http://misalpav.com/node/43805 मुंबईचे धडे - ३ http://misalpav.com/node/43868 हळू हळू मुंबई मध्ये रुळायला सुरवात झाली. नोकरी मिळाली होती. ठाण्याला राहून विक्रोळीला जायचे होते. पण कंपनीची बस असल्याने ट्रेनच्या गर्दीचा त्रास नाही झाला. एकूणच रिलॅक्स होत सगळं. ठाणे - दादर - पार्ले प्रवास अंगवळणी पडला.

दिवाळी सेलिब्रेशन !!!

लेखक मालविका यांनी रविवार, 03/11/2019 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी सेलिब्रेशन !!! साधारण दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील मी भाऊबीजेला दादाकडे गेले होते. दादा, माझ्या चुलत बहिणीला आणि तिच्या दोन मुलांना पण घेऊन आला. बरेच दिवसांनी घरात खूप जण जमलो होतो. नेहमीप्रमाणे गप्पा गोष्टी चालल्या होत्या. एक एक भाऊ येत होता ओवाळणी होत होती, गोडाधोडाचं जेवण जेवून भेटीगाठी होऊन तृप्त होत होतो. दुसऱ्या दिवशी काय डोक्यात आलं माहित नाही, आज जेवण बाहेरून मागावूया म्हणून ठरलं. आता दादाच घर हे मुंबई गोवा हायवेला जरी असल तरी आहे ते खेडेगावचं. शहरात झोमॅटो नि स्वीगी वरून ऑर्डर करतात तसं काही शक्य नाही. गावात जरा बरं असं हॉटेलदेखील नाही.

मला भेटलेले रुग्ण - २०

लेखक डॉ श्रीहास यांनी शुक्रवार, 01/11/2019 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळीच पहीला फोन आला तो मोठ्या भावाचा , नुकताच श्रीलंका दौरा आटोपून आला होता आणि घरी परत आल्यावर कळलं की गेल्या चार दिवसांपासून कामानीमित्त ज्या व्यक्तीच्या संपर्कात होता त्याला टिबी झाल्याचं कळलं होतं !! हा मुळापासून हादरला होता .... मी सगळं ऐकून घेतलं आणि समजावलं की टिबी होण्याची शक्यता जरी असली तरी टिबी होईलच असं नाही ... कारण तुझी प्रतिकारशक्ती पुरेशी आहे जेणेकरून काळजीचं कारण नाही !! तरीसुद्धा पुढले काही महीने चांगला प्रथिनेयुक्त आहार व पुरेशी झोप एवढंच सांभाळलं तरी झालं ....