Skip to main content

अनुभव

आज तुझा वाढदिवस

लेखक निखिल देशपांडे यांनी गुरुवार, 26/03/2009 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
आज तिचा वाढदिवस......... काल सकाळी उठुन ऑफिसला पोहचायचे होते, पण सोमवार रात्रीच्या बियर मुळे उशिरच झाला. धावत पळत माझ्या जागेवर पोहचलो तर आजुबाजुचा जागेवरचे सगळे गायब, मरुदे म्हण्त त्तसेच जागेवर बसलो व मि पा उघडले. थोड्या वेळाने आमचे साहेब प्रकटले, आमची मि पा ची खिडकी उघडिच होती. त्याकडे रागाने बघत म्हणाले "आज तारिख काय माहिती आहे तुला???" (आमचे साहेब व आम्ही शुद्ध मराठी मधे बोलतो सगळ्या भैयांसमोर) माझ्या चेहेर्‍यावर एक खुप मोठे प्रश्नचिन्ह जे मला पण दिसत होते.

वक्तृत्वाचे कथन..

लेखक प्राजु यांनी बुधवार, 25/03/2009 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
प्रमोद काकांच्या कडून प्रेरणा घेऊन.. नमस्कार मंडळी, सगळे जण बालपणीच्या आठवणी सांगताहेत. जुने दिवस सांगताहेत. मग आम्हीही होतोच की लहान.. आम्ही ही बालपण अनुभवलेलं आहेच. भलेही ते व्हेळ्यातल्या दिवसांइतकं थ्रिलिंग नसेल किंवा प्रमोद काकांच्या गीतापठणा इतकं सुरेल आणि खणखणीत नसेल.. पण म्हणून काय आम्ही आमच्या बालपणाच्या आठवणी सांगूच नये की काय्..(पु.लंच्या असामी असामी तल्या "आत्मचरित्र लिहूच नये की काय" च्या चालीत) असो.. !!! तर मंडळी मी एकदा लहान होते.. म्हणजे लहान होते तेव्हा मी नेहमी शाळा-शाळा खेळताना शिक्षिका असायचे आणि बाकी मित्र मंडळ विद्यार्थी. म्हणजे तसा तो अलिखित्(मीच केलेला) नियमच होता.

पोपट झाला रे ..........!

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 25/03/2009 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
परवा दिवशी सकाळी ऑफीसमध्ये आलो तेच एकावर एक धक्के खात. नेहमीप्रमाणे गेटवर बाईक थांबवली आणि एकदा हॉर्न देवुन वाट बघत बसलो. आमचा सिक्युरिटी गार्ड गेट सोडुन कुठेही असु शकतो. त्यामुळे रोजची सवय झालीय आता , हॉर्न द्यायचा आणि गाडी बंद करुन त्याची वाट बघत बसायचे. परवा दिवशी मात्र हॉर्न वाजवला आणि साहेब हजर.... मी अवाक वगैरे झालो..., " किशनजी आज तबियत तो ठिक है आपकी?" तो आपला उगीचच हसला.. " का करे साहब, हम तो नामका सिक्युरिटी गारड हु, बाकी काम तो सब करने पडत है हिया!

संभा

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 24/03/2009 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
"संभा...या दोन पेपर्सच्या झेरॉक्स आणुन दे बाबा.....!" संभा..ही फाईल अकाउंट्मध्ये नेवुन दे रे..............! संभा......काल बाईंडिंगसाठी दिलेला प्रोजेक्ट रिपोर्ट आणलास का परत.........! संभाजी.....अरे, त्या एसी सर्व्हिसींगवाल्याला फोन करायला सांगितला होता तुला, तो अजुन उलथला नाही...! संभा....दोन चहा...............! संभा......तो कालचा ड्राफ्ट चेक केलास....प्रत्येक गोष्ट किती वेळा सांगायची रे तुला...? संभा.............? हे रोजचंच होतं तेव्हा, हि वाक्ये कानावर आल्याशिवाय आमचा दिवसच मुळी जात नसे. आणि स्वतः संभालाही त्याशिवाय ऑफीसला आल्यासारखं वाटत नसेल.

माझे महान प्रयोग - २

लेखक दशानन यांनी मंगळवार, 24/03/2009 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
माझे महान प्रयोग - १ मागील भाग. सकाळ : ७.१५ मिनिटे नंतर टाईम आसपास ग्रहीत धरा. सतबीरला काल सुट्टी घे म्हणून सांगतले होतेच, त्यानुसार तो सकाळ पासूनच गायब होता + फ्रिज मधील बियर चे कॅन पण. चहाची तलफ होती, त्यामुळे उठल्या उठल्या सरळ किचन मध्ये प्रवेश केला, वरुन कोणीतरी फुले टाकत आहे.. दुरवर कुठे तरी जय हो जय हो चा घोष चालू आहे, कोणी तरी सुगंधी द्रव्य शिपंडत आहे असा काही तरी भास मला जेव्हा मी प्रथम काहीतरी निर्माण करण्यासाठी किचन मध्ये प्रवेश करताना झाला ! माझ्या मते चहा ही एक सोपी कृती आहे, चहा पावडर, साखर व दुध !