पातेलीभर खिरीची गोष्ट!
गेल्या आठवड्यात एके दिवशी कधी नव्हे तो संध्याकाळी घरी होतो. काम करूनही कंटाळा आला होता. थोडंसं (कथित) पाककौशल्य दाखविण्याची खुमखुमी आली. शिवाय, मुलीच्या आवडीचा पदार्थ करून तिची मर्जी संपादन करण्याची संधीही होतीच. म्हणून मुदपाकखान्याकडे वळलो.
काय करावं, काही ठरलं नव्हतं. नेहमीचं पोहे-उप्पीठ-भजी प्रकरणांनी कन्येला जिंकणं म्हणजे दीपिका पदुकोनला आपल्या पगाराची स्लिप दाखवून लग्नाची मागणी घालण्यासारखंच होतं! त्यामुळं वेगळा बेत आखला. कधीकाळी आजी रव्याची खीर करायची. तेव्हा मीही शिकलो होतो. बऱ्याच वर्षांत तिच्याकडे (म्हणजे, खिरीकडे) ढुंकून पाहिलं नव्हतं. म्हटलं, करून बघूया आज!
मिसळपाव