Skip to main content

ति....

लेखक संध्यानंदन यांनी शनिवार, 11/04/2009 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा थकून भागून घरी येतो, स्वागतासाठी सज्ज असते ती सर्व थकवा दूर करते एकदम ताज़े होतो मी, पावसात जारी भिजून आलो, ठंडी ती दूर करते, जवल येऊन माझ्या,गर्मी माझ्यात भरते. खोडी करण्याची लहर आल्यास, कान तिचा धरतो, मग एकदम टीला उचलून ओठाला लावतो, गरम श्वास तिचा स्पष्ट जाणवतो, तिच्या सांगतीत मी स्वता:ला विसरतो. काय झाले असते जर जगत नसते एक कप
कॉफी.
Taxonomy upgrade extras

माझ्या आठवणी

लेखक संध्यानंदन यांनी शनिवार, 11/04/2009 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
कसे सांगू मानत माझ्या आठवणी किती? सांग कसे विसरू शकेन तुझी प्रेमळ मिठी. हातात हात गुंफून तू संगितलेले बोल, कसे सांगू त्या शब्दांचे आहे किती मोल? शब्दांना तोलाण्याची प्रेमात नसते नीति. सांग कसे विसरू शकेन तुझी प्रेमळ मिठी. माझ्या खांद्यावरचे तुझे डोके, वेगात घेतलेले उंच झोके, जगू शकेन का न मिळल्यास ही प्रीति? सांग कसे विसरू शकेन तुझी प्रेमळ मिठी. मोतीमाळ तुझ्या गळी , गालावर पडते नाजुक खळी , वसंत फुलवणारे हास्य तुझ्या ओठी. सांग कसे विसरू शकेन तुझी प्रेमळ मिठी. प्रेमात गाईलेले गोड गाने, तुझा निरोप आणणारी पाने, तळहाताच्या फोडा प्रमाणे जपणारी नाती, सांग कसे विसरू शकेन तुझी प्रेमळ मिठी. निरोप घ
Taxonomy upgrade extras

वाढत वय.....

लेखक jenie यांनी शनिवार, 11/04/2009 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
सार काही शिकवत वाढत वय समाज माणसे प्रसंग राहतात तेच ते पण आता चटकन सुटतात व्यवहारातील पेच जराही होऊ देत नाही हयगय खरच सार काही शिकवत वाढत वय.... घटना,प्रसंग, व्यवहार यांच्या जून्या आठवणी असते घडल्या चुकांची दिर्घ कहाणी पण आता कशाचेच उरत नाही भय कारण सामर्थ्य देते वाढते वय.. शब्दांमूळे बिनसलेली अनेक नाती कोणी सोबती तर कोणी संगती आता शब्दांशी स्वरांची जमती आहे अचूक लय खरच सार काही शिकवत वाढत वय...
Taxonomy upgrade extras

साडीखरेदीची गोष्ट

लेखक समीरसूर यांनी गुरुवार, 09/04/2009 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच वर्षांनी मला एका जवळच्या नातेवाईक कुटुंबासोबत पुण्याच्या कुमठेकर रस्त्यावर असलेल्या एका प्रसिद्ध साडी दुकानात जाण्याचा योग आला. बायकांची साडी खरेदी म्हणजे भल्या-भल्यांच्या सहनशक्तीची परीक्षा पाहणारी प्रक्रिया असते असा माझा समज असल्याने मी सहसा त्या वाटेला जात नाही. बायकोसोबत मी आतापर्यंत एकदाही साडी खरेदीला गेलेलो नाही यातच माझ्या ठाम निश्चयाचे यश दडलेले आहे. पण यावेळेस मी शक्य तेवढ्या थापा मारून देखील माझा नाईलाज झाला. आमची एक दूरची नातेवाईक, तिचा नवरा आणि त्या दोघांच्या दोन मुली अशा सगळ्यांनी मला येण्याचा आग्रह केला.

आमची पण समाजसेवा ..... (?)

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 08/04/2009 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
"अयाई गं......आयला सॉलीड दुखतंय बे विशल्या....." विन्याचं कण्हणं वाढतच होतं. "गप बे भ**, आम्ही काय फुलं झेलली नाहित!" इति अस्मादिक. "आयला, विशल्या, या पोलिसांना काही दयामाया नसती का बे ? असं लहान लहान पोरांवर लाठ्या चालवायला काहिच कसं वाटत नाही बे?"........सुध्या. (हा लहान मुलगा गेली दोन वर्षे एस. वाय. बी. एस. सी.

जेंव्हा तुझ्या बुटांना ...

लेखक बेसनलाडू यांनी बुधवार, 08/04/2009 02:37 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी अभ्यास केला नाही, पानातले सगळे विनातक्रार संपवले नाही, 'वेड्यासारखे' वागले की आई-बाबा यऽ यऽ बुकलायचे. स्वयंपाकाच्या ग्यासची हिरवी रबरी नळी, छडी, झाडू, कमरेचा पट्टा, लाटणे, सांडशी, कपडे वाळत घालायची काठी यांपैकी कशाकशाचाही काहीही उपयोग होत नाही, हे कळून चुकल्यावर चपलेने अगर बुटाने मार खाणे ठरलेले असायचे. "जोड्याने हाणले पाहिजे कार्ट्याला!"असे त्यांच्यापैकी एकानेही जरी म्हटले तरी त्याचा अर्थ आई-बाबा उभयतांनी हाणणे म्हणजे 'जोड्याने' हाणणे हाच होतो, अशी बालमनाची पक्की समजूत झालेली. सत्यनारायणाच्या पूजेला जसे मेहूण जेवते (जोडा जेवतो), तसाच प्रसाद 'जोड्याने' मिळायचा.

(सहा) हजार चौरासी की मां!

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 06/04/2009 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
तसा नेहमीचाच रविवार. सकाळी उशिरा उठल्यानंतर चहा कुणी करायचा यावरून भांड्याला भांडं (चहाच्या नव्हे!) लागलेलं. नंतर नाश्‍त्याला काट मारून थेट पावभाजीच्या जेवणाचाच बेत. पाव किती आणायचे, कुणी आणायचे, मीच का आणायचे, यावरून पुन्हा एक `लडिवाळ' संवाद! शेवटी घरचा कर्ता (आणि आठवडाभर नाकर्ता) पुरुष म्हणून जबाबदारी अस्मादिकांवरच! वर "फुकटचं गिळायला मिळतंय, हे नशीब समजा!' हा कृपाप्रसाद!! झक्‌ मारत पाव आणायला नि बाकी कचरापट्टी जमवायला बाजारात रवानगी. मग `जातोच आहेस, तर माझ्या बॅंकेतून पैसेही काढ' ही एक प्रेमाची गळ. मुंडी हलवून संमती देण्याव्यतिरिक्त दुसरा पर्यायच नाही!

"ती एक स॑ध्याकाळ.........!!!!!"

लेखक डोम्बिवली फास्ट यांनी सोमवार, 06/04/2009 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
"ती एक स॑ध्याकाळ.....!!!!" गेल्याच महिन्यात परिक्षा स॑पली आणि कामावर रूजू झालो. कामाचा ताण जरा जास्तच होता कारण १५ दिवसा॑चा गॅप पड्ला होता, त्यात आला तो मार्च एन्ड २००९ म्हणजे अजूनच काम........... तर असो काम स॑पता स॑पता अखेर एक दिवस लवकर निघालो. मनात खूप राग होता आता तो शा॑त कसा करायचा याचाच विचार करीत होतो. त्या दिवशी परिक्षा नूक्तीच स॑पली होती. पेपर देऊन एका OFFICE मध्ये गेलो होतो, तेथे जायला थोडा ऊशीर झाला.