Skip to main content

अण्णामामा.

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 29/05/2009 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
३० मे २००८. मी ऑफिसला निघण्याची तयारी करत होतो. सकाळी सकाळी फोनची रिंग वाजली, नंबरात ९१ आकडा दिसत होता म्हणजे भारतातून फोन होता. शुक्रवारी सकाळी फोन? जरा चमत्कारिक वाटलं. "दादा, अण्णामामा गेला!" पलीकडून बहीण बोलत होती. "आं...कधी? कसा काय?" "आजच. मल्टिपल ऑर्गन फेल्युअर! हा फोन झाल्यावर आईला लग्गेच फोन कर. तिला खूप टेन्शन आलंय!" तिचा आवाज कापत होता. ऐकत होतो. शेजारच्या खुर्चीत खचलो. हार्ट ऍटॅक नंतर हॉस्पिटलमधे भरती केल्यावर एकेक सिस्टिम फेल होत गेली आणि शेवटी गेला. मुलगा स्वतःच डॉक्टर त्यामुळे काळजी घेण्याची परिसीमा असणार हे उघड होतं. अमेरिकेतून मुलगीही आलेली होती.

गीता, पुल, आणि कोसंबी

लेखक चित्रा यांनी शुक्रवार, 29/05/2009 02:06 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी मिपाच्या मुखपृष्ठावर गीतेत सांगितलेली "स्थितप्रज्ञाची" लक्षणे यावरून " तुझे आहे तुजपाशी "मधील काकाजींचा संवाद वाचला. या मराठी साहित्यातील अजरामर नाटकाने मराठी मनाला बरीच मोहिनी घातलेली आहे. पुल यांच्याबद्दल तर सांगणेच नको. पुल यांनी एक प्रकारे आपल्या व्यक्तिमत्वामुळे महाराष्ट्रातील एक मोठा लेखकवर्ग तर समाजातील एक बराच मोठा विचारी वर्ग (मध्यमवर्गीयही असेल कदाचित) घडवला असे म्हणता येईल. एक उदाहरण द्यायचे झाले तर लहानपणी मला मंगला गोडबोले यांचे "स्त्री" मासिकामध्ये येणारे "झुळूक" सदर आवडत असे, याचे कारण त्यांच्या विनोदी लेखनावर असलेला पुल यांचा प्रभाव.

आठवणींचा पाऊस

लेखक अनामिक यांनी बुधवार, 27/05/2009 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
बाविसाव्या मजल्यावरच्या माझ्या ऑफिसातून आज बाहेर बघताना खूप काळे ढग जमलेले दिसताहेत. तसं ऍटलांटामधलं वेदर फारच अनिश्चित असतं, आणि एवढ्यात तर ऊन आणि पाऊस अगदी पाठशिवणीचा खेळ खेळताहेत. पण आज न जाणो का खिडकीतून बाहेर जमलेले ढग बघताना मनातही आठवणींचे ढग जमून आले... खूप नॉस्टॅल्जीक वाटायला लागलं आणि मन कधी भूतकाळात गेलं ते कळलंच नाही. (भारतातही आता पावसाचं लवकरच आगमन होईल. वादळी पावसाने तर विदर्भात आधीच आपली वर्दी लावली आहे.) मे महिन्याचा शेवट झाला आणि जूनच्या सुरवातीला मृग नक्षत्राच्या आसपास पावसाची चाहूल लागली की घरोघरी एकच प्रकार सुरू असतो ..

जपान रिटर्न्ड

लेखक सुबक ठेंगणी यांनी सोमवार, 25/05/2009 04:55 या दिवशी प्रकाशित केले.
बाकी काहीही म्हणा पण जपानात राहिल्याचे फायदे आहेत बरं. म्हणजे बघा, जपानहून परत आल्यावर मुंबई किती स्वस्त आहे असं वाटतं; घरांची छतं उंच वाटायला लागतात; रस्ते लांब रुंद वाटायला लागतात; भारतातही रस्त्यांवर सिग्नल असतात ह्याचा साक्षात्कार होतो; आणि रस्त्यावरच्या गाडयांच्या आणि माणसांच्या प्रवाहातून प्रवाशांना लीलया नैयापार लावणा-या बेस्टच्या चालकांचा आणि वाहकांचा प्रचंड अभिमान वाटायला लागतो. पण त्याचबरोबर काही साईड-इफेक्टसही आहेतच.

`गाडी` घसरली, सावरली...

लेखक आपला अभिजित यांनी गुरुवार, 21/05/2009 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
साडेसाती एकदा मागे लागली, की तिचं समाधान होईपर्यंत पिच्छा सोडत नाही. गाडी बिघडण्याची साडेसाती अशीच गेले काही दिवस मागे लागली होती. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षणी पिडल्यानंतरच तिनं पाठ सोडली. आमची मारुती गाडी चालकासह घेऊन आई-वडील रत्नागिरीहून इथे पुण्याला आले होते. माझी मावशीही सोबत होती. त्यांच्यासाठी म्हणून मी रजा टाकली होती. दुसऱ्या दिवशी रांजणगावला जायचा बेत आखला. साधारण 11 वाजता निघालो. घरापासून निघून पुढच्याच चौकात आलो होतो, तर पोलिसांनी गाडी बाजूला घेण्याचा इशारा केला. मी तर सिग्नल तोडला नव्हता, की झेब्रा क्रॉसिंग तुडवले नव्हते.

उंदीरनामा

लेखक सुबक ठेंगणी यांनी मंगळवार, 19/05/2009 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी लहानपणी उंदीर मला आवडायचा. कारण तेव्हा जेरी किंवा मिकी माऊस हाच खरा उंदीर अशी उंदराची प्रतिमा भलतीच ग्लॅमरस होती. खरा उंदीर पाहिला तेव्हा अशा विध्वंसक आणि पाताळयंत्री प्राण्याला गोंडस रूप देताना वॉल्ट डिस्नेने किती कल्पकता खर्ची घातली असेल ह्याचा अंदाज आला. बहुतेक जो जेरीस आणतो तो जेरी असंही वाटलं. शाळा-कॉलेजात असतानाही माझ्या कित्येक स्वप्नांचा व्हिलन उंदीर (किंवा उडरं झुरळ) असायचा. घरची बेल वाजते आणि दरवाजा उघडावा तर शे दीडशे गलेलट्ठ उंदीरांची टॊळीच घरात शिरते किंवा एम. ए. चा पेपर आहे आणि माझ्या सगळ्या नोट्सचं उंदराने भुस्कट पाडलंय अशी स्वप्न मला कितीतरी वेळा पडायची.

पराच्या राज्याची भेट

लेखक क्रान्ति यांनी सोमवार, 18/05/2009 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
शीर्षक वाचून चमकू नका! क्रांतिबै बालकविता आणि ती पण जनातलं मनातलंमध्ये लिहितेय, झालंय काय तिला? असा विचारही करू नका! ही वार्ता आहे माझ्या अगदी अचानक झालेल्या पराच्या [मिपावरील परिकथेतील राजकुमाराच्या]राज्याच्या धावत्या भेटीची! [प-यांच राज्य पराच्या राज्याच्या समोर आहे. म्हंजे सौन्दर्य संवर्धन/संगोपन केन्द्र, शुद्ध मराठीत ब्युटी पार्लर!] त्याचं असं झालं, लेकीची तब्येत ऐन परीक्षेच्या सुरुवातीला बिघडली. इकडे मायचा जीव खालीवर! शेवटी पुण्याला जाऊन प्रत्यक्ष लेकीला भेटून यायचं ठरवलं.

जेवणा..शा

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 18/05/2009 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
माझी प्रेरणा कारुण्याशा... http://misalpav.com/node/7791 एका वरण भाताच्या थाळीसमोरचा तो मत्त भुकेला चॅपॅक चॅपॅक जिभल्या चाटीत भुरके मारी भुर्र भुर्र भुर्र भुर्र लोणच्याच्या फोडीच्या तहवैभवाने टाकलेले गारूड अन तोंडात डाविकडून उजविकडे खळाळणारा अन्नप्रवाह चॅपॅक चॅपॅक चॅपॅक चॅपॅक भाताच्या दलदलीत ओरपणारा स्निग्ध हात गुलगुलीत स्पर्षाने आणि सात्वीक चवीन जिवाचा खुळखुळा खुळा रे खुळा, खुळा रे खुळा... एका जेवणपानावरून पुनश्व हरि ओम क्षीण नळाखाली अनुमानात कडाडबूम मेघवर्षा धो धो धो... अन मग सारंच शांत.. पुढच्या जेवणपानापर्यंत...
Taxonomy upgrade extras