Skip to main content

माझे जगावेगळे? छंद

लेखक पाऊसवेडी यांनी बुधवार, 15/07/2009 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
साप पकडायला आणि त्यांना हाताळायला शिकायचे आहे असे मी म्हणल्यानंतर घरात महाभारत,रामायण आणि पानिपत सगळे एकत्रच झाले होते आणि मीच त्याला कारणीभूत होते >:) कारण मुळातच मागच्या दहा पिढ्यान मध्ये कोणीही असेले काहीतरी छंद (आईच्या भाषेत नसते उद्योग) केलेले नव्हते. आणि मुळातच अशा काही गोष्टी करून काय सध्या होणार त्यापेक्षा साप जंगलात आणि मी घरी सुखी राहू शकते ना ? ;) असे आईचे म्हणणे होते. खूप दिवसांपासून माझी साप पकडायला शिकायची इच्छा होतीच 8> आणि आवश्यक तेवढ शिकूनही झाले होते :?

काळ आला होता पण .......

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 15/07/2009 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
रामनाम सत्य है... हरि का नाम सत्य है... पक्या एक सिगरेट दे ना बे ! हल बे, एकच पाकीट राहिलंय आता, उद्याचा सगळा दिवस काढायचाय तेवढ्यावर...! याला कुणी आणला रे इथे, कंजुस मारवाडी साला..... भुसनाळीचांनो, मघापासुन दोन तासात माझी साडे तीन पाकिटं संपवलीत ब्रिस्टोलची आणि मलाच कंजुस म्हणताय. हुडुत..आता तर थोटुक पण देणार नाय, बसा आधाशासारखे माझ्याकडे बघत....! बरोबर, चार दिवसांपुर्वी बादशाहीसमोरच्या कट्ट्यावर खिशात हात घालुन बसलो होतो. हं हं हं...खिसे रिकामे आहेत हे कुणाला कळु नये म्हणुन हात घालुन खिशाला फुगीरपणा आणण्याचा केविलवाणा प्रयत्न, बाकी काही काही नाही हो ! २२ किंवा २३ तारिख असेल.

जातपंचायत

लेखक प्रसन्न केसकर यांनी सोमवार, 13/07/2009 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
२००३च्या मे महिन्यातली दोन तारखेची ती दुपार. टळटळीत उन्हामुळे घराबाहेर पडुच नये असे वाटायला लावणारी. भरदुपारी मी मात्र बातम्या शोधत फिरत होतो. माझ्या धंद्याला अन संपादकाला शिव्या घालत अन अश्या उन्हात छानपैकी पंखा, एसी वगैरे लावुन एखाद्या थंड खोलीत बसुन काम करणार्‍या किंवा घरीच बसुन वामकुक्षी करणार्‍या सार्‍या जगाच्या नावाने मनोमन खडे फोडत. असाच फिरता फिरता गेलो क्राईम ब्रँच मधे अन समोर दिसली एसीपी शिंदेंची केबिन. एसीपी शिंदे बरोबर माझे तसे चांगले संबंध. त्यांनी कंजारभाट समाजातल्या लोकांना दारु गाळणे वगैरे बेकायदा धंदे सोडुन द्यावे म्हणुन त्यांनी केलेले काम मी पाहिले होतेच.

आठवणी पावसाळ्याच्या

लेखक विमुक्त यांनी शनिवार, 11/07/2009 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाळ्यात, रेवदंड्याच्या पावसाची आणि लहानपण ची खुप आठवण येते. रेवदंड्यात असताना, विहीरीत पोहण्याची, शाळा सुटल्या वर छत्री असुन सुद्धा भिजत घरी येण्याची, पोखरण कीती भरलीय हे रोज बघण्याची आणि पावसात भीजत समुद्रावर हुंदडायची जाम मजा होती. आमचं घर नारळा-पोफळीच्या वाडीत होत. वाडीत एक बय्रापैकी मोठ्ठी विहीर होती. पावसाळा सुरु झाला की रोज विहीरत डोकवुन ती कीती भरलीय हे मी बघायचो. पाऊस पडत असताना विहीरीतल्या पाण्याला एक वेगळाच रंग आलेला असायचा, गढुळ नाही पण एकदम गुढ असा रंग असायचा.

गुगल नावाची पुस्तकाची खाण

लेखक विकास यांनी शनिवार, 11/07/2009 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल फास्टनॉलेज चा जमाना तेजीत आहे. कुठलीही माहीती हवी असली तर गुगलवर लगेच त्यासंदर्भातील शब्द टाकून पाहीले जाते. कधीकधी ऐतिहासीक/सामाजीक/राष्ट्रीय माहीती शोधायला या शोधामधे बहुतांशी येणार्‍या विकीपिडीयाचा उपयोग होतो. तरी देखील कधीकधी याहून अधिक माहीती हवी असते. अशी वेळ जशी काही कामानिमित्त संशोधन करताना येते तशीच ती मिपा अथवा इतरत्र काही चर्चा करताना योग्य संदर्भ करताना पण येते. अशा वेळेस नेहमीच्या गुगलच्या उपयोगापेक्षा अधिक काहीतरी हवे असते. जिथे ठाम संदर्भ मिळू शकतील. त्याला परत उत्तर तेच आहे - गुगल! फक्त नुसते गुगल नसून ते गुगलबुक्स म्हणून आहे.

खुळ्या भिंगोर्‍या

लेखक नीधप यांनी बुधवार, 08/07/2009 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
मगाशी एका पुस्तकाची माहीती टाकली त्या धाग्यावर आणि माझी एक जुनी कविता आठवली. माझ्या ब्लॉगवर आहे. ती परत इथे डकवतेय.
Taxonomy upgrade extras

पैशाने पैसा वाढतो.

लेखक सदानंद ठाकूर यांनी रविवार, 05/07/2009 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
पैशाने पैसा वाढतो. जर पैसे मिळवणे हा जन्मसिध्द हक्क प्रत्येकालाच प्राप्त आहे हे तुम्हाला मान्य असेल तर तुम्हाला हेहि मान्य करण्यास हरकत नसावी कि एका सर्टन स्टेज नंतर पैसा सुध्दा पैसे मिळविण्याचे काम करु शकतो. आता हेच पहाना प्रथमतः आपण पैसे ममळवण्यासाठी काय काय करतो ते वेगळ सांगावयाची जरुरि नाही तुम्ही ते केलेलेच आहे व अनुभवले सुध्दा आहे. आता तुम्हि थोडे स्टेबल झाला आहात. थोडी बचतहि करु लागला आहात.

हमने उनको भी छुप छुप के आते देखा इन गलियोमे..!

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 02/07/2009 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
"तात्यासेठ, अभि ये महिनेमे मेरे बँकमे रख्खे हुए ३०००० रुपये मिलेंगे ना?" "हा. क्यू नही मिलेंगे? जरूर मिलेंगे. डबल ढक्कनको बोल दुंगा!" शबनम मला विचारत असते. तिला आता तिच्या मुलीकरता काही चांगले कपडे घ्यायचे असतात, ती चाहेल तो खाऊ द्यायचा असतो, कपडे घ्यायचे असतात, मायलेकींना मुंबैत जरा मजा करायची असते. शबनम..! मुंबैच्या कॉग्रेस हाऊस मधली एक मुजरेवाली, एक डान्सर. १९९०-९१ च्या सुमारास मी फोरास रोडवरच्या बारमध्ये जो नौकरीला लागलो त्या नौकरीतून एकाच्या ओळखीने दुसरा, दुसर्‍याच्या ओळखीने कुणी तिसरी या पद्धतीने त्या विभागातले स्त्रीपुरुष माझ्या संपर्कात आले, आजही येत आहेत.