अभिषेक, आमीर खान आणि ऐश्वर्या मराठी चित्रपटामध्ये !
आज सकाळी सकाळी 'सकाळ ' मधिल एका बातमी णे लक्ष वेधले !
अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि आमीर खान एका मराठी चित्रपटामध्ये काम करणार आहेत. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नसले तरी साधारण दिवाळीच्या आसपास हा चित्रपट सेटवर जाणार आहे. त्याची निर्मिती ए. पी. कॉर्प या बॅनरखाली केली जाणार आहे.
खरे तर बच्चन कुटुंबीय आणि त्यांचे मराठी प्रेम तसे काही नवीन राहिलेले नाही. अमिताभ बच्चन-जया बच्चन यांनी "अक्का' या चित्रपटामध्ये पाहुणे कलाकार म्हणून काम केले होते. त्यानंतर ए. बी. कॉर्प या बॅनरखाली अमिताभ बच्चन यांनी "विहीर' या चित्रपटाची निर्मिती केली होती.
मिसळपाव

नाना पाटेकरसारख्या बुलन्द अभिनेत्याला सुद्धा याची दखल घ्यावी लागली. आणि एखादा क्षुद्र जीव प्रबळ माणसाला सुद्धा हिजडा बनवतो असे म्हणावे लागले.