Skip to main content

संस्कृती

दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १८: तंजावूर- कुंभकोणम- श्रीमुशनाम ९४ किमी

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 02/06/2026 16:16 या दिवशी प्रकाशित केले.

✪ कुंभकोणमची मंदिरं आणि कावेरी नदी! 

✪ शांत गावं आणि रमणीय रस्ते 

✪ निवृत्त कॅप्टन आनंदनजींसोबत भेट 

✪ “अगर शिवाजी महाराज नही होते तो...” 

✪ “कमकुवत युवा पिढी" हासुद्धा देशाचा शत्रू 

✪ श्रीमुशनामचं वेलुनाव्हियार केंद्र – वेगळी संस्था 

✪ “रगड़ा बनाएगा तगड़ा" 

श्रीगणेश लेखमाला २०२१

लेखक साहित्य संपादक यांनी मंगळवार, 20/07/2021 21:31 या दिवशी प्रकाशित केले.
१० सप्टेंबर २०२१. भाद्रपद शुद्ध चतुर्थी, शके १९४३. अर्थात गणेश चतुर्थी. आणि मिपाचा वर्धापनदिनदेखील! 2 दरवर्षी आपण गणेशोत्सवामध्ये अकरा दिवस श्रीगणेश लेखमालेचे आयोजन करतो. यंदाही आपण श्रीगणेश लेखमाला आयोजित केलेली आहे.

ग्रंथपेटी

लेखक अनुप देशमुख यांनी शुक्रवार, 05/04/2019 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, पुस्तक प्रेमातून एक कीडा डोक्यात वळवळत आहे, म्हटलं आपल्या माणसात पहिल्यांदा सांगावा न जाणो ही कल्पना कुठपर्यंत जाईल. सध्या सर्वजण (लहान, थोर, मध्यमवयीन) कुठल्या ना कुठल्या कारणाने हरतऱ्हेच्या स्क्रिन समोर आपला दिवस घालवतात आणि बघत/वाचत रहातात. यामुळे स्क्रिन पलीकडच्या साहित्याला (कंटेंट)अनन्यसाधारण महत्व आलेलं आहे. साहित्य मालक आपल्याला पाहिजे ते आपल्या नजरेस आणून डोक्यात भरत रहातो. कधी कधी आपण आपल्या आवडत्या कधी काळी वाचायचं ठरवलेल्या गोष्टी / पुस्तकं सुद्धा वाचत नाही. डोळ्यांचे दुष्परिणाम आहेत ते वेगळेच. या सगळ्या धबडग्यात खूप मोठा वारसा हरवत चाललेला आहे तो म्हणजे वाचनसंस्कृती.

गीता नामक एक पंचिंग बॅग

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 14/06/2017 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
गीता तत्वज्ञान : काही प्रश्न भाग -1 1 काही विषय हे वैचारिक पंचिंग बॅग म्हणून अनेकांना उपयोगी पडतात असे म्हणतात. पैकी एक विषय ‘फलज्योतिष’ आहे. तसा दुसरा विषय गीता नामक काव्यात्मक अध्यात्मिक तत्वज्ञान सुनावणारा महाभारतातील भाग असावा... शरद सोवनीं यांनी लिहिलेल्या लेखाला या 16 पानी पुस्तिकेच्या रुपात सुगावा प्रकाशनाने मार्च 2001 मधे छापले. त्या आधी हे विचार एका नियतकालिकातून प्रसिद्ध झाले होते. काही काळानंतर सहज हे पुस्तक हाती आले.

सार्वजनिक सणांचे करायचे तरी काय?

लेखक स्वामी संकेतानंद यांनी गुरुवार, 25/08/2016 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
दहीहंडी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात पण लोक गेलेत. सर्वोच्च न्यायालयाला न जुमानता लोकांनी मनोरे रचले( माणसांचे आणि डीजेचे पण) आपण तरी का मागे राहा म्हणून काही लोकांनी निळी हंडी पण साजरी केली! निळी हंडी साजरी करून आपण बाबासाहेबांनी ज्या कर्मकांडापासून आपल्याला स्वतंत्र करायचा प्रयत्न केला त्यांच्यातच गुरफटून जात आहोत का? (निळ्या हंडीच्या आयोजनाला कुणी गेले असतील तर त्यांनी ती पण डीजेच्या तालात झाली काय हे सांगावे. ) आपण वाईट गोष्टी उचलायला एवढे उत्सुक का असतो? सार्वजनिक जीवन शांत सुस्थिर असावे असे वाटते. घरात काय करायचे ते करा.

४७ डोकी मारली!

लेखक हुप्प्या यांनी रविवार, 03/01/2016 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
२०१६ सुरु होते न होते तोच सौदी अरेबियाने ४७ लोकांचा एकाच दिवशी शिरच्छेद करुन त्यांना मृत्यूदंड दिल्याचे जाहीर केले. इतकी पराकोटीची रानटी शिक्षा जाहीरपणे चौकात देणारा आणि तरीही सुसंस्कृततेचा टेंभा मिरवणारा सौदी हा एकमेव देश असेल! कमालीची श्रीमंती असल्यामुळे त्यांची ही दादागिरी सगळे चुपचाप सहन करतात. तशात इस्लामचे हेडक्वार्टर असल्याचाही तोरा ते मिरवतात कारण मक्का आणि मदीना ही दोन इस्लामी तीर्थक्षेत्रे त्यांच्या ताब्यात आहेत. त्यातूनही ते भक्कम पैसे मिळवतात. ह्या ४७ लोकांमधे एक शिया धर्मगुरू आहे ज्याला शिया लोकांमधे बराच आदर होता त्यामुळे त्या पंथाचे लोक आता आंदोलन करत आहेत.

काय होणार मिपाचे??

लेखक नीलमोहर यांनी शनिवार, 21/11/2015 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: काय होणार आपले?? मिपावर नुकत्याच घडलेल्या काही घटनांमुळे मिसळपाव हे एक वादग्रस्त संस्थळ झाले होते. त्यात काही मिपा-कंटक लोकांनी निर्माण केलेल्या विध्वंसक डू-आयडींबाबत माहिती वाचून प्रश्न असा पडतो, की भविष्यात नेमके काय होईल?