नमस्कार मंडळी.
हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का?
मला तर तो अनेक वर्षांपासून भेडसावत आहे. म्हणजे असं की , लग्न -मुंजी, शुभकार्य, त्या निमित्ताने होणारी देवाणघेवाण, हौस, बघितल्यावर घ्यावीशी वाटली म्हणून, कुणाला तरी तेवढीच मदत होईल म्हणून...अशा अनेक कारणांमुळे साड्या जमा होतात. कपाटं ओसंडून वहातात.
तीच साडी पुन्हा कुठे नेसायची? यामुळे हजारो रुपये खर्च करून घेतलेल्या या साड्या पडून रहातात. इतक्या सुंदर आणि हौशीने घेतलेल्या साड्या द्यायच्या तरी कोणाला आणि किती? कारण आता दुसऱ्याचे कपडे कोण वापरतं?
घरी काम करणाऱ्या देखील नको म्हणतात! जुन्या बाजारात कवडी मोलाने विकत घेतात.