मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सामाजिक

या साड्यांचं काय करायचं?

नूतन ·
नमस्कार मंडळी. हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? मला तर तो अनेक वर्षांपासून भेडसावत आहे. म्हणजे असं की , लग्न -मुंजी, शुभकार्य, त्या निमित्ताने होणारी देवाणघेवाण, हौस, बघितल्यावर घ्यावीशी वाटली म्हणून, कुणाला तरी तेवढीच मदत होईल म्हणून...अशा अनेक कारणांमुळे साड्या जमा होतात. कपाटं ओसंडून वहातात. तीच साडी पुन्हा कुठे नेसायची? यामुळे हजारो रुपये खर्च करून घेतलेल्या या साड्या पडून रहातात. इतक्या सुंदर आणि हौशीने घेतलेल्या साड्या द्यायच्या तरी कोणाला आणि किती? कारण आता दुसऱ्याचे कपडे कोण वापरतं? घरी काम करणाऱ्या देखील नको म्हणतात! जुन्या बाजारात कवडी मोलाने विकत घेतात.

आले अंबानीच्या मना

स्वधर्म ·
नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने एक निकाल दिला. या निकालाचा संबंध कोल्हापुर जिल्ह्यातील जयसिंगपूर जवळच्या नांदणी गावाशी आहे. तर झाले असे की या गावात जैन धर्मीयांचा एक मोठा आहे. या मठा गेली ते 30 वर्ष एक हत्तीण राहत होती. महादेवी तिचे नाव. गावकर् यांमध्ये माधुरी या नावाने पण ती प्रसिद्ध आहे. जैन धर्मीयांमध्ये हत्ती या प्राण्याला अत्यंत पवित्र मानले जाते. त्यामुळे या महादेवीचा जैन धर्मियांच्या सर्व धार्मिक उत्सवांमध्ये समावेश होता. गावकर् यांसाठी एक अभिमानाची बाब होती. 2019 साली पेटा या नावाच्या एका संस्थेने या हत्तीची दुरावस्था आहे असा आरोप केला.

रूढी, समजुती, परंपरा व त्यामागची संभाव्य शास्त्रीय, तार्किक कारणे

सौन्दर्य ·
मला नेहमीच असे वाटत आले आहे की आपल्या हिंदू धर्मातील कित्येक श्रद्धा, समजुती, रितीरिवाज, रूढी, परंपरा ह्यांना शास्त्रीय बैठक होती. कालांतराने त्यातील शास्त्रीय किंवा तार्किक बैठक विस्मृतीत गेली व पुढील पिढी त्या गोष्टी एक परंपरा किंवा श्रद्धा, समजुती म्हणून पाळत आली. अशी शास्त्रीय बैठक विस्मृतीत जाण्यामागचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे, फारसे प्रश्न विचारलेले पूर्वी आवडत नसत. दुसरे कारण हे ही असू शकते की समोरच्याचे समाधान होईल असे उत्तर त्यांच्याकडेही कदाचित नसावे.

गावाला शाळेत लोकसहभागातून ग्रंथालय सुरू करायची योजना आहे

dhanraj205 ·
वर सांगितल्याप्रमाणे मला माझ योगदान द्यायचे आहे तरी स्वस्त आणि स्पर्धात्मक परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके कुठे मिळतील मार्गदर्शन करावे

मिपावर अजून काय हवे?

दशानन ·
काही अनुभव पाठीशी आहेत संकेतस्थळ चालवायचे. त्याचा उपयोग करून काही गोष्टी / चर्चा आपण करू या उद्देशाने हा धागा आहे. १. लेखन विभागाची मुद्देसूद मांडणी. अनेकगोष्टीची सरळमिसळ झाली आहे, त्याला व्यवस्थित नीट फाटे फोडावेत. २. नवीन प्रतिसाद अनेकवेळा १-२-३ अनुक्रमणिका असलेले धागे मिपाला नवे नाही आहेत, पण कोणीतरी अश्याच धाग्यावर पहिल्या पानावरील धाग्यावर प्रतिसाद दिला, आणि त्याच धाग्यावर शेवटी नवे १०-२० नवे प्रतिसाद असतील... तेव्हा जर सदस्य नव्या प्रतिसादावर टिचकी मारेल तो सरळ पहिल्या पानावरील नवीन उप प्रतिसादाकडे जाईल. आणि पुढील नवीन प्रतिसाद पुढील पानावर असतील तर ?

वृद्धाश्रमाबद्दल माहिती

विमल ·
नमस्कार! विषय थोडा गंभीर आहे. माझ्या ओळखीत एक वृद्ध आणि विधवा बाई आहेत. अगदी तरूणपणातच वैधव्य आल्यानंतर अत्यंत गरिबीत कष्ट करून बाईंनी मुलांना सांभाळलं, मोठं केलं. परंतु आता त्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर असताना मुलं-सुना नीट सांभाळत नाहीत. घरातली नक्की कारणं मला माहिती नाहित पण बाईंशी अनेक दिवस कोणी एक शब्दही बोलत नाही हे मात्र खात्रीने माहिती आहे. औषधीसुद्धा आणून दिली जात नाहीत. बाई आर्थिक दृष्ट्या परावलंबी नाहीत, पुरेसं पेन्शन आहे. बाईंची या वयात अशी स्थिती माझ्याने बघवत नाही पण त्यांना माझ्या घरी आणणंही शक्य नाही.

स्त्री, बलात्कार आणि पुरुषांची मानसिकता : भाग-१

आदित्य कोरडे ·
(हा लेख लिहिताना मी सुझान ब्राऊन मिल्लर हिच्या “Against our will- Men Women and Rape” ह्या पुस्तकाचा तसेच You tube वरील BBC च्या “Documentary on Women’s liberation movement.” चा प्रामुख्याने आधार घेतला आहे. शिवाय इतर अनेक Documentaries, articles ,मराठी लेख,फेस बुक वरील बातम्या, पोस्ट आणि त्यांवरच्या प्रतिक्रिया- थोडक्यात इंटरनेट वर उपलब्ध माहितीचा उपयोग केलेला आहे. त्यामुळे ह्या विवेचनाला काही मर्यादा पडल्यात ह्याची मला जाणीव आहे. वाचकांनी वाचताना ह्याचे भान ठेवावे ही विनंती) नुकतंच नववर्ष सुरु झालं.

माझ्या अतिशय भित्रट आणि अतिहळव्या स्वभावाचे काय करावे???

टर्बोचार्जड फिलॉसॉफर ·
माझं व्यवहार ज्ञान खूप कमी आहे ,आणि माझं डोकं चालत नाही या विषयी मी मागच्या लेखात लिहीले होते.माझ्या व्यक्तीमत्वातले दोष मी जेव्हा शोधतो तेव्हा मला माझा बिंडोकपणा जास्त खटकतो.त्यानंतर मला माझ्या व्यक्तीमत्वात जास्त खटकणारी गोष्ट आहे ती म्हणजे माझा अतिशय भित्रट स्वभाव व अतिशय हळवेपणा. झाडाचं पान अंगावर पडल्यावर ' आभाळ कोसळलं ' म्हणून जंगलभर सैरावैरा पळणारा गोष्टीतील ससाही माझ्यापेक्षा धीट असेल इतका मी भित्रट आहे.आधीचाच असलेला ठार बिंडोकपणा त्यात हा भित्रट स्वभाव माझ्या दैनंदीन व्यवहारातील अडचणीत भरच टाकत असतो.या भित्रट स्वभावामुळे मी एकदा अडचणीत सापडलो होतो.एका गुंड स्वभावाच्या व्यक्तीशी पार्की

स्साला... रोच्ची कटकट

मन ·
---स्पष्टीकरण --- " रोजची कटकट" ह्या लिखित शब्दांचा प्रत्यक्ष उच्चार "स्साला... रोच्ची कटकट" असा केलाय. ---स्पष्टीकरण समाप्त-- तर सांगायचं म्हणजे मी मनोबा. माझं टोपण नाव मनोबा. माझं त्या "तारे जमीनपर" पिच्चरमध्ये तो लहान मुलगा आहे ना "इशान अवस्थी"... त्याच्यासारखं होतं. बुटाची लेस झटकन् बांधता येत नाही. फार प्रयत्न केल्याशिवाय लेस बांधली जात नाही. पिशवीची बांधलेली गाठ सोडवता येत नाही. रस्त्यानं जाताना फक्त समोरच लक्ष असतं. आजूबाजूला फारसं नाही. (पेरिफेरल व्हिजन नसणे बहुतेक ह्यालाच म्हणत असावेत.)रस्ते लक्षात रहात नाहित. अगदि रडकुंडिला आलो. खुप प्रयत्न केले.

चान्गल्या इन्टरनॅशनल स्कूल सुचवा

चिंटु ·
नमस्कार मिपाकरान्नो. मदत हवी आहे शाळा शोधायला. आधी दोन चार वाक्यात बॅक्ग्राउण्ड सान्गतो आणि मग पुढच बोलतो. माझा मित्र आता कायमचा राहण्यासाठी पुण्यात येतो आहे.मित्र म्हणजे तसा माझ्याहून वयाने बराच मोठा आहे. तो त्याच्या कंपनीत बर्‍याच वरिष्ठपदावर आहे. प्रेसिडेण्ट वगैरे आहे. वहिनीही मोठ्या पदावर कार्यरत आहेत. बारावीनन्तर माझा मित्र पुण्याबाहेरच होता. नंतर बाहेरच इन्जिनिअरिन्ग केलं. एम बी ए अत्यन्त नामान्कित ठिकाणाहून.बाहेरच लग्नही केलं नि तिकडेच त्याला पुत्ररत्नही प्राप्त झालं.आता त्याला पुण्यात हवी तशी ऑफर मिळालेली आहे. तो येणार आहे. त्याचे चिरन्जीव तिसरीत आहेत.