Skip to main content

प्रकटन माहिती चौकशी समाज जीवनमान

दोघे जुळे भाऊ

लेखक mrcoolguynice यांनी मंगळवार, 05/11/2019 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
आटपाट नगर होतं. तिथं दोघे जुळे भाऊ, आपआपल्या बायकापोरांसोबत नांदत होते. म्हाताऱ्या बापाच्या निधनानंतर, वडिलोपार्जित संपत्तीचे समसमान वाटप होईल, असे ठरलं होतं. म्हाताऱ्याची एक दुध देणारी गाय, एवढीच काय ती तुटपुंजी संपत्ती होती. एक गाय दोघांत कशी वाटावी ?

आव्हान स्वीकारणार काय ?

लेखक धर्मराजमुटके यांनी शुक्रवार, 04/10/2019 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर ! आजकाल आंतरजालावर विविध प्रकारची चित्रविचित्र आव्हाने येत असतात आणि ती काही प्रसिद्ध व्यक्तींनी स्वीकारल्यामुळे अजून प्रसिद्ध होत असतात. मलादेखील मिपावर असाच काहीतरी उपक्रम व्हावा असे वाटते म्हणून हा प्रपंच. आव्हान आपल्या सोयीच्या वेळेनुसार, दिवसानुसार पार पाडायचे आहे. आव्हान स्वीकारणे आणी पार पाडणे यास अंतिम मुदत नाही पण तरी सोयीखातर ३१ ऑक्टोबर २०१९ ही तारीख ठरवुया. आव्हान स्वीकारण्यासाठी काही अटी आहेत. त्या खालीलप्रमाणे. १. कोणते आव्हान स्वीकारले आहे याची नोंद प्रतिसादात करायची आहे. २. आव्हान स्वीकारल्यानंतर ते पुर्ण केले काय ?

चालू घडामोडी : ऑगस्ट २०१९

लेखक धर्मराजमुटके यांनी गुरुवार, 01/08/2019 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
राजकीय वार्ता : राष्ट्रवादीतून भाजपात इनकमिंग मोठ्या प्रमाणवर सुरु झाल्यामुळे राष्ट्रवादी पक्ष काही जिल्ह्यांपुरताच मर्यादित राहिल की काय असे वाटू लागले आहे. या निवडणूकीचे निकाल लागल्यावर राष्ट्रवादी, मनसे या पक्षांचे भवितव्य काय असेल याची स्थिती स्पष्ट होईल. भाजपात आता आनंदाचे वातावरण असले तरी एव्हढ्या मोठ्या लोकसंख्येला खायला काय घालायचे यावरुन भविष्यात संकटे उभी राहू शकतील असे वाटते. शिवाय पोटच्या पोरांच्या तोंडचा घास काढून घेऊन दत्तक घेतलेल्या पोरांचे पोट भरावे लागणार आहे की देवाने चोच दिली आहे तर चाराही तोच देईल याचाही निकाल काय लागतो ते बघणे रोचक ठरेल.

"तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरक्षितपणे करता येतोय का?"

लेखक उपयोजक यांनी मंगळवार, 16/07/2019 21:42 या दिवशी प्रकाशित केले.
ही आजची बातमी. https://www.loksatta.com/pune-news/german-companies-warned-district-col… यातल्या भौगोलिक सुविधांबाबत सुधारणांना करायला वाव आहे.पण यातला शेवटचा मुद्दा "गुंडगिरी आवरा जिल्ह्यातील चाकण, रांजणगाव भागातील औद्योगिक पट्ट्यातील गुंडगिरीने पुन्हा डोके वर काढले आहे. कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मारहाण करणे, धमकावणे यांसारखे प्रकार घडत आहेत.

चालू घडामोडी : जूलै २०१९

लेखक धर्मराजमुटके यांनी बुधवार, 03/07/2019 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
१. भारतात शाकाहारी भोजनालये आपल्या नावामागे / पुढे वेगवेगळ्या पदव्या लावतात. उदा. प्युअर व्हेज / शुद्ध शाकाहारी / वैष्णव रसोई इ. इ. जसजसे दक्षिणेकडे जावे तसतसे ही पदवी हाय क्लास / हाय क्वालिटी व्हेज अशी बदलत जाते. एका ठिकाणी तर चक्क प्युअर व्हेज आणि नॉनव्हेज अशीही पाटी बघीतल्याचे आढळते. अशाच एका हाय क्वालिटी भोजनालयाची अखेर होणार काय ? बातमी : अर्श से फर्श तक: भारत के 'डोसा किंग' के पतन की कहानी २.

यातून मार्ग काय?

लेखक उपयोजक यांनी मंगळवार, 25/06/2019 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
ही पोस्ट फेसबुकवरुन घेतली आहे.पोस्ट लिहिणारे लेखक व्यवसायानं पत्रकार आहेत.त्यांनी खेडेगावे,छोटी शहरे इथे कामानिमित्त फिरताना आलेला अनुभव मांडला आहे. तो एमकॉम झाला.मोठ्या मुश्किलीनं नोकरीला लागला.एका पतसंस्थेत महिना सात हजार पगारावर मॅनेजर म्हणून काम करतोय.त्याच्या कामाचं स्वरूप आहे,हरकाम्या. दुसरा ...तो एम.ए.बी.एड्.झाला.दहा वर्षांपूर्वी एका संस्थाचालकाला दहा लाख रूपये देऊन तो शिक्षक बनला.दहा वर्षे झाली खिशातनं पेट्रोल घालून त्यानं शाळा केली.उरलेल्या वेळेत पानपट्टी चालवली म्हणून त्याचं घर भागलं.आता त्यांची शाळा २५ टक्के अनुदानात आलीय.त्याच्या आयुष्यातला उमेदीचा काळ फुकट नोकरी करण्यात गेला.तरी

खराडी ... कुठं रहायचं? कसं रहायचं?

लेखक चिंटु यांनी शनिवार, 17/11/2018 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
लोकांनो, जरा मदत कराल का. खराडीमधल्या इऑन मध्ये इथून पुढे काम करावे लागणार आहे. त्यासाठी कुटुंबासहित शिफ्ट व्हायचे आहे. तर कोठे राहणे सोयीचे पडेल ते सांगाल का. जमेल तितक्या जवळ राहता यावे असा उद्देश आहे. पण आर्थिक क्शमता मर्यादित आहे. टू बी एच के नसला तरी चालेल. वन बी एच के अथवा अगदी वन आर के असला तरी चालेल पण शक्यतो ऑफिसाच्या जवळ हवाय. वाघोली, केशव नगर, विमान नगर वगैरे एरिया काही लोकांनी सुचवले आहेत. पण मला वाटतं वाघोलीतला बहुतांश भाग दहा बारा किलोमीटर तरी दूर पडेल. विमाननगरचेही तेच. बहुतेक केशव नगर जास्त जवळ आहे. शिवाय सोसायटी फार काही हाय फाय नसली तरी चालेल.