ही आजची बातमी.
https://www.loksatta.com/pune-news/german-companies-warned-district-col…
यातल्या भौगोलिक सुविधांबाबत सुधारणांना करायला वाव आहे.पण यातला शेवटचा मुद्दा
"गुंडगिरी आवरा
जिल्ह्यातील चाकण, रांजणगाव भागातील औद्योगिक पट्ट्यातील गुंडगिरीने पुन्हा डोके वर काढले आहे. कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मारहाण करणे, धमकावणे यांसारखे प्रकार घडत आहेत. काही कंपन्यांमध्ये कामगार पुरवठा, स्वच्छता, भंगारमाल खरेदी अशा कामांचा ठेका मिळवण्यासाठी आणि कामगार भरतीसाठी सातत्याने दबाव आणला जातो. याबाबतही शिष्टमंडळाने या बैठकीत तक्रारी केल्या."
याबाबत किती लवकर हालचाली होतील? आणि हा गुंडांचा बंदोबस्त पुन्हा 'किती काळ टिकेल' हा प्रश्नच आहे.की हा भारतातल्या उद्योग-व्यवसायाचा अविभाज्य भागच समजावा?
शिवाय या कंपन्यांनी महाराष्ट्रातून दुसर्या राज्यात स्थलांतर नव्हे तर थेट दुसर्या देशातच जाण्याचा निर्णय घेतलाय याचा अर्थ त्यांना पूर्ण भारतच उद्योगधंद्यांसाठी सुरक्षित वाटत नाहीये असा घ्यावा का?
हे फक्त मोठ्या उद्योगांबाबत होतंय असं नाही तर हातगाडीवर खाद्यपदार्थ तयार करुन विकणार्या साध्याशा व्यावसायिकाला जरी विचारलंत तर तिथेही हप्ता,स्थानिक गुंड टोळीला फुकट खाऊ घालायला लागणं असे ताप आहेतंच.
इथेच एका धाग्यावर वाचलं होतं की पुण्यातल्या पुण्यात आपणच आपलं सामान हलवणार असलो तरीही स्थानिक माथाडी नेत्याला लाच/खंडणी द्यावी लागते.
याबाबत दोष पोलिसांनाच द्यावा का याबाबत साशंक आहे.कारण पोलिसांवर राजकारण्यांचा दबाव आहे,पोलिसांची संख्या गरजेपेक्षा कमी आहे अशी बरीच कारणे देता येतील.अगदी सगळेच पोलिस भ्रष्टाचारी नाहीत हो.काही चांगले,मदत करणारेही आहेत ही नेहमीची टेपही लावता येईल.
पण ही कारणे दिल्याने,सारवासारव केल्याने सामान्य लोक आणि उद्योगांना,व्यावसायिकांना गुंडाकडून दिला जाणारा त्रास कमी होणारेय का? जाणारे जीव,मोडले जाणारे हातपाय यांचं काय?
गुंडांना पोलिसांची भिती हवी ही अपेक्षा असते.पण इथे गुंडांना पोलिसांची भितीच न वाटण्याचं कारण काय असावं? पोलिस नेमके करतात तरी काय? की हा प्रश्नच विचारायचा बंद करावा?
मोठे उद्योग त्यांची उलाढाल मोठी असल्याने दुसर्या एखाद्या सुरक्षित देशात जातीलही.पण जे जाऊ शकणार नाहीत अशा उद्योजकांचं,व्यवसायिकांचं,स्वयंरोजगारी लोकांचं काय? की त्यांनी मार खात,हप्ते देत,गुंडगिरी सोसतच स्वत:चा व्यवसाय करायचा? हाय बिपी,लो बिपी सोसतंच कधीतरी ढगात जायचं?
सिंघम या हिंदी सिनेमात एक संवाद अजय देवगणच्या तोंडी आहे. "पुलिस से ना दोस्ती अच्छी,ना दुश्मनी" पण तो जयकांत शिक्रेसारख्या 'गुंडासाठी' आहे.तोच संवाद आता सामान्य माणसाने आपल्यासाठीदेखील आहे असं समजून 'शहाणपणानं' वागायला सुरुवात करावी?
वर्गीकरण
वाचने
8117
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
महत्वाचा मुद्दा
चला किमान एक प्रतिसाद आला...
In reply to महत्वाचा मुद्दा by माहितगार
ऑडीटमध्ये बाब समोर आल्यास
ही समस्या फक्त पुण्यासह पिंपरी चिंचवड, चाकण या औद्योगिक भागातील
हा एक economy चा भाग आहे
बापरे!
In reply to हा एक economy चा भाग आहे by जालिम लोशन
दुर्दैवाने
हे तर जवळपास सगळ्याच ठिकाणी आहे. ..
केरळ!
In reply to हे तर जवळपास सगळ्याच ठिकाणी आहे. .. by मुक्त विहारि
नाही, महाराष्ट्रात सुध्दा आहे
अवघड आहे!
आमच्या व्यवसायामध्ये सर्व
छोटा व्यावसाईक म्हणून गेली
चितळे स्वीट्स बाहेर बोर्ड वाचला होता (शनीपाराजवळचे)
In reply to छोटा व्यावसाईक म्हणून गेली by उपेक्षित
तरी बरं दुपारी 12.55 ते 13.00
तरी बरं दुपारी 12.55 ते 13.00