Skip to main content

प्रकटन माहिती चौकशी समाज जीवनमान

मदत हवी : birth certificate बीड

लेखक चिंटु यांनी शुक्रवार, 12/04/2024 06:54 या दिवशी प्रकाशित केले.
बीड मधून birth certificate हवे आहे. मी सध्या पुण्यात आहे. वय 40. SSC certificate, passport, aadhar, कॉलेज सोडतानाचा T C अशा साऱ्या साऱ्या documentsवर माझी जन्मतारीख आहे. काहींवर जन्मठिकाणही आहे. पण काही ठराविक कामासाठी birth certificate हवे आहे. ( जन्मानंतर बीडशी संबंध राहिला नाही. आणि बहुतेक शाळेत admission घेताना ते submit केल्याने सध्या माझ्याकडे नाही. अन योगायोगाने गरज पडली नव्हती आजवर) आपल्यापैकी कुणी बीड मध्ये आहे का? किंवा कुणाला ह्याबाबत माहिती आहे का? दुर्दैवाने घरगुती अडचणींमुळे मला स्वतःला आत्ता पुण्याहून बीडला नुसत्या चौकशीसाठी जमेल असे दिसत नाहीये.

भेट मागणारे व देणारे

लेखक केदार पाटणकर यांनी गुरुवार, 07/09/2023 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी एखाद्याला दुसरा एखादा माणूस स्वखुशीने भेट देत असे व घेणारा मिळेल ती भेट, कमी किंमतीची असली तरी, समाधानाने घेत असे. एखाद्या क्षेत्रातील यशामुळे अशी भेट दिली जात असे. कालांतराने भाऊबीज, दिवाळी पाडवा, वाढदिवस अशा प्रसंगानुरुप प्रत्यक्षात अनुभवास आले की, देणारा घेणाऱ्यालाच विचारतो," तूला काय पाहिजे माझ्याकडून ?" मागणाराही सांगतो, ""मला अमुक दिवशी अमुक पाहिजे." देणारा देतो. अशी दृष्ये चित्रपटातही पाहिली. आजकाल, खरे तर, कधीपासून कोण जाणे, भेटीतील निखळ संतोष गायब होऊन त्यात डिमांड आणि सप्लाय आलेले आहे की काय, असे वाटते. मागणाराच मोठा होऊन देणारा बिच्चारा झालेला आहे.

काय बोलावं सुचेना !

लेखक धर्मराजमुटके यांनी सोमवार, 18/07/2022 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आज युट्युब बघता बघता सहज एक चित्रफीत समोर आली. युट्युब वर अनेक लोक वेगवेगळे विषय घेऊन चित्रफिती बनवितात. कोणाला कशी प्रसिद्धी मिळेल ते सांगता येत नाही. मात्र आजची ही चित्रफीत बघीतल्यावर माझी मती गुंग झाली. ह्या चित्रफितीला तब्बल 249,018 वेळा भेट दिली गेली आहे. नक्की काय आहे यात ? एव्हढे बघण्यासारखे काय आहे यात ? अधिक खोदाखोद केला असता ह्या व्यक्तीचे युट्यूबवर काहि चॅनेल आहेत त्यांना धावती भेट दिली. एवढ्या Views मागील गणित अनाकलनीय आहे. चित्रफितींखालील बर्‍याच प्रतिक्रिया वाचल्यावर भारतीय पुरुष अजून स्त्रियांच्या शरीरापलीकडे जाऊन पाहू शकत नाही ही महत्वाची बाब अधोरेखीत झाली.

अवास्तविक प्रेरणा!

लेखक उपयोजक यांनी शुक्रवार, 26/11/2021 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
फेसबुक किंवा युट्यूब चाळताचाळता काही वेळा प्रेरणादायी विचारांचे लेखन केलेले किंवा चित्राला जोडून मजकूर असलेले किंवा युट्यूबवर विचारवंतांचे मार्गदर्शनपर व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. कधी कुतूहल म्हणून तर कधी बघुया तरी काय सांगतायत ते असे म्हणून आपण ते वाचतो किंवा ऐकतो/पाहतो. सगळेच काही आपल्याला पटतील असे नसतात. एखादा तथाकथित यशस्वी(विविध अर्थांनी) विचारवंत काहीवेळा दवणीय बोलतो किंवा व्यवहारात वापरल्यास अापल्याच अंगलट येईल असेही विचार मांडतो. किंवा काहीवेळा ज्यातलं फारसं कळत नाही त्या क्षेत्राबाबतही तो विचारवंत काही विधाने करुन जातो.

फसवून/जुलमाने धर्मांतर

लेखक उपयोजक यांनी सोमवार, 04/10/2021 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
योगींनी मागच्या वर्षी उत्तरप्रदेशात बेकायदेशीर धर्मांतराविरोधी अध्यादेश आणला. https://en.m.wikipedia.org/wiki/Prohibition_of_Unlawful_Religious_Conve… या विषयसंबंधाने काही शंकांचे निरसन व्हावे. १. एखाद्या अडचणीत सापडलेल्या हिंदूला भरपूर पैसे देऊन मुस्लिम किंवा ख्रिश्चन बनवले आहे हे एखादी हिंदू संघटना किंवा पोलिस ते कोर्टात सिद्ध कसं करणार? मुस्लिम/ख्रिश्चन धर्मप्रसारकाकडून लठ्ठ पैसे मिळाल्यावर तो धर्मांतरीत मुस्लिम/ख्रिश्चन ते कबूल करेल का? २.

हे कोणी सांगेल का?

लेखक उपयोजक यांनी शुक्रवार, 28/05/2021 07:10 या दिवशी प्रकाशित केले.
करोना आणि लॉकडाऊनसंबंधी या प्रश्नांची खात्रीशीर किंवा निदान बर्‍यापैकी तर्काला धरुन उत्तरे कोणी देईल का? १) १ जून २०२१ नंतर सर्व जीवनावश्यक नसलेले या गटात येणारे व्यवसाय पूर्ववत सुरु करण्यास परवानगी मिळू शकेल असे वाटते आहे का? समजा नसेल मिळणार तर १ जूननंतरदेखील जीवनावश्यक नसलेल्या व्यवसायांसंबंधीची दुकाने/आस्थापने खुली करण्यास असणारी मनाई ही त्यानंतर किती दिवस वाढवली जाऊ शकेल असे वाटते आहे? २) १ जूननंतर जीवनावश्यक नसलेले व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास परवानगी न दिल्यास व्यापारी काय करु शकतात? करोना पसरला तर त्याची जबाबदारी संबंधित व्यापारी घेणार आहेत का?

सामान्य माणूस काय करु शकतो?

लेखक उपयोजक यांनी रविवार, 28/03/2021 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो आपण बर्‍याचदा समाज माध्यमांवर विविध विषयांवर चर्चा करतो. काहीवेळा या चर्चा समाजात घडणार्‍या काही चुकीच्या किंवा दांडगाईने केल्या जाणार्‍या गोष्टींबद्दल असतात.

भिती का वाटत नाहीये? :(

लेखक उपयोजक यांनी सोमवार, 22/02/2021 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
करोनाची दुसरी लाट विदर्भात पसरते आहे. तिथे काही ठिकाणी लॉकडाऊन लावावा लागला आहे.पहिल्या लाटेत अनेक लोक मेले,कर्ता माणूस गेला असेल तर त्यांच्या कुटूंबियांना आर्थिक विवंचनेत जावे लागले.करोनावरील उपचार गरीबांना परवडणारे नाहीत.क्क्वारंटीन केले तर तितक्या दिवसांचा पगार, रोजगार,व्यवसाय बुडतो.इतके सारे नुकसान करोना पॉझिटिव्ह असल्यास होते. मग असं असूनही काही लोक करोना होऊ नये म्हणून आरोग्य संस्थानी सांगितलेले नियम का पाळत नसावेत?

चालू घडामोडी : फेब्रुवारी २०२०

लेखक धर्मराजमुटके यांनी शनिवार, 01/02/2020 19:52 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर! सन २०२० चे पहिला महिना अगदी २०-२० मॅचप्रमाणे भुर्र्कन उडून गेला आणी बघता बघता फेब्रुवारी महिना आला. नववर्षाचा पहिला घडामोडीचा धागा श्री. वामन देशमुख यांनी काढला तेव्हा खरे सांगायचे तर ही मालिका पुढे न्यायला अजून कोणीतरी पुढे आले हे बघून आनंद झाला. मात्र या महिन्यात आजचा दिवस संपत आला तरी कोणीही हा धागा काढला नाही म्हणून परत हा प्रपंच ! आज केंद्रीय अर्थसंकल्प जाहिर झाला. त्यातील काही तरतुदी चांगलया वाटल्या, काही कळाल्या नाहीत, काही वाईट देखील असू शकतील. अर्थात आज दिवसभरात बातम्या वाचायला वेळ मिळाला नाही त्यामुळे लगोलग मते मांडणे माझ्यासाठी अवघड आहे तरी काही मुद्दे मांडतो. १.

चालू घडामोडी : डिसेंबर २०१९

लेखक धर्मराजमुटके यांनी रविवार, 01/12/2019 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिसळपावकर, मागील महिन्यात चालू घडामोडी हा धागा काढला नाही. राज्याच्या सत्ताकारणात इतक्या घडामोडी घडल्या आणी त्यावर मिसळपाव वरच इतके धागे निघाले की चालू घडामोडीमधे त्याची दखल घ्यावीशी वाटली नाही. सर्वप्रथम राज्याचे नवीन मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देऊया. सध्याच्या वातावरणात सरकार चालवण्यासाठी त्यांना शुभेच्छांची खुप गरज आहे असे वाटते. बर्‍याच लोकांना वाटते कि हे सरकार लवकर कोसळेल मात्र मला असे वाटते की हे सरकार कमीतकमी ४ आणि जास्तीत जास्त ५ वर्षे पुर्ण करु शकेल. शिवसेनेने मागील सत्तेत असताना ५ वर्ष भांडणे केली मात्र ते तरीही दुय्यम दर्जाच्या सत्तेला चिकटून राहिले.