चालू घडामोडी : फेब्रुवारी २०२०
नमस्कार मिपाकर!
सन २०२० चे पहिला महिना अगदी २०-२० मॅचप्रमाणे भुर्र्कन उडून गेला आणी बघता बघता फेब्रुवारी महिना आला. नववर्षाचा पहिला घडामोडीचा धागा श्री. वामन देशमुख यांनी काढला तेव्हा खरे सांगायचे तर ही मालिका पुढे न्यायला अजून कोणीतरी पुढे आले हे बघून आनंद झाला. मात्र या महिन्यात आजचा दिवस संपत आला तरी कोणीही हा धागा काढला नाही म्हणून परत हा प्रपंच !
आज केंद्रीय अर्थसंकल्प जाहिर झाला. त्यातील काही तरतुदी चांगलया वाटल्या, काही कळाल्या नाहीत, काही वाईट देखील असू शकतील. अर्थात आज दिवसभरात बातम्या वाचायला वेळ मिळाला नाही त्यामुळे लगोलग मते मांडणे माझ्यासाठी अवघड आहे तरी काही मुद्दे मांडतो.
१. बँकेतील ठेवीवरील संरक्षण १ लाखावरुन ५ लाखापर्यंत वाढवले ही चांगली गोष्ट झाली. अर्थात त्यामुळे आता बँकाना राखीव निधीचे प्रमाण वाढवावे लागेल त्यामुळे व्याजदरात कपात, मासिक सरासरी रकमेत वाढ होते काय ते पहावे लागेल.
काही खाजगी बँका तंत्रस्नेही असल्यामुळे त्यात वर्षवर्षभर जावे लागत नाही तर काहीमधे कागदी घोडे नाचविण्यासाठी रोज चक्कर मारावी लागते. बँकींग सिस्टम मधे आमुलाग्र बदल करण्याची गरज आहे. यावर एक वेगळा लेख होऊ शकतो. पेटीएम पेमेंट बँकेचे उदाहरण डोळ्यासमोर ठेऊन बँका आपल्या खर्चात बचत करुन चांगल्याप्रकारे सेवा देऊ शकतात काय ? याचा विचार नक्कीच व्हावा.
२. प्रिपेड वीज मिटर : भारतात अनेक भागात वीजचोरीचे प्रमाण प्रचंड आहे. प्रिपेड मिटर लागले तर पहिले रिचार्ज करा मग वीज वापरा यामुळे वीज कंपन्या आपला तोटा कमी करू शकतील पण ग्राहकांना चांगली सेवा मिळण्यासाठी काही पाऊले उचलली गेली आहेत हे ही दिसणे गरजेचे आहे. शिवाय हे प्रिपेड मिटर ३०-३१ दिवसांच्या रिचार्जवर उपलब्ध असणार, की प्रति युनिट प्रमाणे हे कळाले नाही. काही असले तरी त्यांनी मोबाईल कंपन्यांसारखे स्त्रियांच्या मासिक धर्मासारखे २८ दिवसांचे वेळापत्रक पाळू नये ही अपेक्षा. मोबाईल कंपन्यांबरोबर ह्या २८ दिवसाच्या वैधतेसाठी लढा कसा द्यावा यावर मी बरेच दिवस विचार करतोय पण अजून काही उपाय सुचत नाहिये.
३. आयकर : आयकरात जुन्या पद्धतीप्रमाणे आणि नवीन पद्धतीप्रमाणे आयकर भरता येणार हे समजले. मात्र कोणत्या पद्धतीने कर भरल्यास करदात्यास कमी कर द्यावा लागेल याचे गणित बघावे लागेल. मात्र नवीन पद्धतीप्रमाणे कर भरल्यास सीए / अकाऊंटंट ची मदत घ्यावी लागणार नाही इतकी ती पद्धत सुलभ असेल असे सांगीतले जाते आहे ते कितपत शक्य आहे ते बघावे लागेल.
४. एलआयसी मधील सरकारी हिस्सा कमी होणार, एअर इंडीया भारत पेट्रोलियम मधून सरकार हात काढून घेत आहे ही माझ्या मते चांगली गोष्ट आहे. सरकार ने कंपन्या चालवणे बंद करणे ही काळाची गरज होती. उशीरा का होईना हा निर्णय घ्यावा लागणारच होता.
५. सरकारी नोकर्यांसाठी वेगवेगळ्या परीक्षांऐवजी नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सीद्वारे ऑनलाईन परीक्षा - हे एक चांगले पाऊल आहे.
६. एप्रिलपासून जीएसटी चे नवीन व्हर्जन लाँच होईल. नवीन मोड्यूल कसे असेल, सोपे, सुटसुटीत असेल काय याबद्दल मी उत्सुक आहे. मेलमधे ट्रायलसाठी लिंक आली आहे. वापरुन बघीतल्यावरच कल्पना येईल.
अजून जसे मुद्दे माहित होतील तसतसी भर घालावी. बाकी इतर मुद्दे हळूहळू चर्चेत येतीलच.
वर्गीकरण
आयकर
अर्बन जिहादी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Haan Main Galat... :- Love Aaj Kalहम्म
हे मांडलेले मुद्दे ठीक आहेत
In reply to हे मांडलेले मुद्दे ठीक आहेत by शकु गोवेकर
विधानांतर्गत विरोधाभास?
सध्या 'चालू घडामोडी'
In reply to सध्या 'चालू घडामोडी' by प्रसाद_१९८२
खरे असावे तुमचे म्हणणे बहूतेक
शाहीन्बाग
In reply to शाहीन्बाग by माईसाहेब कुरसूंदीकर
माईसाहेब, कार्यसम्राट नितिन गडकरींना भेटून घ्या
मला वाटतं अर्थसंकल्प सादर
- अर्थसंकल्प सादर व्हायच्या आठवडाभर अगोदर, आधल्या वर्षीच्या अर्थसंकल्पातले मुद्दे आणि त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्याचे तपशील हे अर्थमंत्री/अर्थ राज्य मंत्री/सेक्रेटरीज यांनी/यापैकी कोणीही, संसदेत ओव्हरव्यू [मराठी प्रतिशब्द?] स्वरूपात सादर करावेत.
- या मुद्द्यांचे झालेले परिणाम/होऊ घातलेले परिणाम यावरही याच लोकांनी प्रकाश टाकावा.
- हे झाल्यानंतर अर्थसंकल्प सादर करावा. त्यातले तांत्रिक मुद्दे सेक्रेटरीजनी, संसदेतील विद्वज्जनांना समजतील अशा, सोप्या भाषेत सोदाहरण समजावून सांगावेत.
हे फार लांबलचक वाटलं तरीही, या गोष्टी संसदेत सांगणं बंधनकारक असल्यास, संसदेतील संभाषणाचा कायदेशीर उपयोग करता येत असल्यामुळे, इतक्या महत्त्वाच्या मुद्द्यावरून अफवा उडवणे कमी होऊ शकेल. किंवा किमान संयुक्तिक तरी अफवा उडतील. :-) अर्थसंकल्पात जे सांगतात/मांडतात त्यातील विविध विभागांचे एकमेकांवरील दृष्य/अदृष्य परिणाम न समजणे, हे सामान्य माणसाच्या दृष्टीकोनातून फार हानिकारक आहे. सरकार जर लोकसहभाग मागते, तर लोकांपर्यंत शक्य तेवढी माहिती योग्य व्यासपीठावरून आणि सोप्यातल्या सोप्या भाषेत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. Lack of knowledge creates Fear. Seeking knowledge creates Courage! बाकी कर भरण्याच्या पद्धतीत दिलेल्या निवडीच्या स्वातंत्र्यामुळे करबचतीसाठी गुंतवणूक हा दृष्टीकोन बदलून, गुंतवणूकीतून मिळणार्या परताव्याकडे बघून गुंतवणूक करण्याच्या प्रवृत्तीत वाढ झाली तर चांगलंच होईल! :-)In reply to मला वाटतं अर्थसंकल्प सादर by राघव
ओव्हरव्ह्यूस प्रतिशब्द
In reply to मला वाटतं अर्थसंकल्प सादर by राघव
मला काय वाटतं
In reply to मला काय वाटतं by इरसाल
ते होईलच!
कुठल्याही प्रकाराने मिळालेला
In reply to कुठल्याही प्रकाराने मिळालेला by तेजस आठवले
हे बरोबर आहे
In reply to हे बरोबर आहे by शा वि कु
उदबोधक माहिती !
In reply to उदबोधक माहिती ! by चौथा कोनाडा
बरोबर
In reply to बरोबर by शा वि कु
+१
In reply to कुठल्याही प्रकाराने मिळालेला by तेजस आठवले
फ्रँकिंग क्रेडिट
In reply to फ्रँकिंग क्रेडिट by चौकस२१२
हो
जीएसटी चे नवीन मोड्युल
योग्य विष्लेशन.
In reply to योग्य विष्लेशन. by गोंधळी
पुढचा भाग
स्वतःच्याच पक्षाच्या
In reply to स्वतःच्याच पक्षाच्या by चौथा कोनाडा
नक्कीच
In reply to नक्कीच by शा वि कु
हम्म
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
सहमत
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
एकदम बैलाचा डोळा
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
बरोबर
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
ना कर्त्या लोकांच्या भाषा
एन पी आर
एक देश एक भाषा
ओह नो ! येस :)
पाच दिवसांचा आठवडा रद्द......
कमलनाथ सरकार पडणार?