औद्योगिकरणाच्या विमानाचे कोसळणे टाळा. औद्योगिकरणाचे विमान मानवजातीला व जीवसृष्टीला विनाशाकडे वेगाने नेत आहे. ते कोसळणार हे तर निश्चित आहे. ते कोसळण्याआधी सुरक्षितपणे उतरवावे. थोडक्यात क्रॅशलॅडिंग टाळावे. ते, त्यातील प्रवासी म्हणजे मानवजात वाचवण्यासाठी आवश्यक आहे.
औद्योगिकरण थांबण्याबाबतची भीती अनाठायी आहे. आजही औद्योगिकरण कुणालाही जगवत नाही. इतर प्राणिमात्रांप्रमाणेच मानवही हवा पाणी व अन्नामुळे जगतो. औद्योगिक उत्पादनांमुळे नाही. औद्योगिकरणामुळे जीवन संपुष्टात येणार हे नक्की झाल्यावरही ते चालू ठेवणे यामागे औद्योगिकरण जगवते असा निर्माण झालेला गैरसमज कारण आहे. आपण करोडो वर्ष पृथ्वीवर आहोत. औद्योगिकरण बुडबुड्यासारख्या अत्यल्प कालावधीत आले.
दारिद्र्य ही संकल्पना नीट समजून घेतली पाहीजे. ज्या पृथ्वीवर करोडो वर्षे हत्ती, गेंडा, व्हेल सारखे महाकाय जीव व्यवस्थित जगले ती पृथ्वी माणुस नावाच्या तुलनेने टीचभर पोट असलेल्या प्राण्याला जगवू शकत नाही काय ? जीवन व जीवनशैली यात गल्लत करू नये. पृथ्वी जीवनासाठी आहे. जीवनशैलीसाठी नाही. बाकी सर्व प्राणिमात्र उदरनिर्वाह करतात. आधुनिक माणुस नाही. तो कार, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, फ्लॅट, बंगला, वीज इ. निर्वाह करतो. त्यासाठी पैसा लागतो. करोडो वर्षे व कृषियुगात हजारो वर्षे पैसा लागला नाही. तेव्हा माणुस जगत नव्हता काय?
हे माणसाचे भरकटणे झाले औद्योगिकरणामुळे. त्याच्या कृत्रिम जगण्यासाठी लागणारी वस्तुनिर्मिती व वापर पृथ्वीच्या पध्दतीच्या विरोधात आहे. ते केले गेले हीच मुळात चूक झाली.
पैशांचा अभाव म्हणजे दारिद्र्य काय ? मग ती गोष्ट मानवी व्यवस्थेशी संबंधित आहे. मानवी शोषण किंवा चूक त्याला कारण आहे. त्याचा पृथ्वी किंवा निसर्गाशी संबंध नाही.
१५० ते २५० वर्षात औद्योगिकरणाने दारिद्र्य दूर झाले नाही. उलट पृथ्वीची जीवांचे पोषण करण्याची क्षमता औद्योगिकरण शहरीकरण व अर्थव्यवस्थेमुळे नष्ट होत गेली. पृथ्वी बकाल होत गेली.
लढाया व युध्द ही मानवी मनातून घडतात. औद्योगिकरणामुळे कच्चा माल बाजारपेठांवरील ताबा इ. कारणांमुळे महायुद्धे झाली. तणाव वाढले. उदा. बंदुकनिर्मिती उद्योगाच्या हितसंबंधांमुळे अमेरिकेत दर वर्षी शाळा महाविद्यालयांतील हजारो तरूण गोळीबारात मरतात. अमेरिकेचे सुमारे ७५ ते ९० % उत्पन्न शस्त्रास्त्रांच्या निर्यातीतून येते. त्यामुळे जगात तणाव असण्यात त्या देशाचे व पर्यायाने औद्योगिकरणाचे हितसंबंध आहेत. हे फक्त एक उदाहरण आहे. यंत्र व तंत्रज्ञान जगात धुमाकूळ घालत आहे. धरणे, खाणी, वीजनिर्मिती, मोटार - वाहन निर्माण, सीमेंट, स्टील, रासायनिक खते, कीटकनाशके इ. यांच्यामुळे आपण जगतो काय ?
ही उत्पादने बनवणाऱ्या उद्योगांत नोकर्या करून चलन म्हणजे पगार मिळवणे व अशा व्यवस्थेसाठी मंत्रालये, महापालिका, काॅर्पोरेटस् चालवणे याचा खऱ्या जीवनाशी संबंध नाही. उलट हे कोट्यावधी वर्षे चाललेल्या जीवनाविरूध्द आहे. औद्योगिकरण सुरू होण्यापूर्वी कुणी बेकार नव्हता.
युनोच्या बाॅन येथे नोव्हेंबरमधे झालेल्या जागतिक वातावरण बदल परिषदेत हे जाहीर झाले की, यापृढे तापमान न थांबता वाढत राहणार आहे. मानवजात या शतकात नष्ट होत आहे. अशावेळी वातावरणातील साठलेला कार्बन पृथ्वीला निर्जीव करणार असल्याने नवे प्रकल्प तर सोडाच पण चालू औद्योगिकरण थांबवणे अनिवार्य बनले आहे. हा कार्बन शोषणारे हरितद्रव्य तात्काळ वाढू लागले पाहिजे. तरच जीवसृष्टी वाचण्याची शक्यता आहे.
अशावेळी नोकरी, उद्योग आपल्याला जगवतात या भ्रमामुळे ही समस्या कार्बनरहित तंत्रज्ञान वापरून सोडवता येईल असे वाटणे हे जीवनशैली व जीवन यात फरक न केल्याने घडत आहे. कोणतेही तंत्रज्ञान वाचवणार नाही.
मानवजातीला आता तातडीने अडीचशे वर्षे मागे जावे लागेल. मनात प्रगती व विकासाचे गंड बाळगले तर पृथ्वीवरून उच्चाटन अटळ आहे.
आजही सर्व औद्योगिक व इतर लोकसंख्या पृथ्वी जगवते. शहरे शेतीमुळे जगतात. पृथ्वी शेत पिकवते.
मात्र औद्योगिक जग क्षणोक्षणी पृथ्वीविरूध्द व तिच्या जीवन देण्याच्या क्षमतेच्या विरूद्ध वागते.
हे थांबवावे. शहरे विसर्जित करावी . प्रत्येकाने आपले अन्न स्वतः पिकवावे. तो पृथ्वीचा नियम आहे. त्याच्या विरोधात जाणारी आधुनिक मानवी व्यवस्था गुंडाळावी. ती भ्रामक व्यवस्था टिकवण्याच्या अट्टाहासाने पूर्ण विनाश ओढवेल.
धन्यवाद,
आपला
अॅड. गिरीश राऊत
निमंत्रक
भारतीय पर्यावरण चळवळ
९८६९०२३१२७ व्हाॅ. अॅप.
कृपया सर्वत्र पाठवा.
---------------------------
सदर लेख लेखकाच्या परवानगीने प्रसिद्ध केला आहे.
वाचने
7830
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
चू ** लेख
सहमत.
In reply to चू ** लेख by कपिलमुनी
शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात!
पर्यावरण क्षेत्रात काम करणारी अनेक मंड ळी हे करतात
अहो..
In reply to पर्यावरण क्षेत्रात काम करणारी अनेक मंड ळी हे करतात by nanaba
लेखाचे लेखक
In reply to अहो.. by अभिदेश
संपादक टीम
रोख चुकतोय !
प्रतिसाद आवडला मुतालिक साहेब.
In reply to रोख चुकतोय ! by सुधीर मुतालीक
छान प्रतिसाद
In reply to रोख चुकतोय ! by सुधीर मुतालीक
एकदम नेमका प्रतिसाद
In reply to रोख चुकतोय ! by सुधीर मुतालीक
+१००
In reply to रोख चुकतोय ! by सुधीर मुतालीक
१. हे थांबवावे. शहरे विसर्जित
In reply to +१०० by डॉ सुहास म्हात्रे
हे थांबवावे. शहरे विसर्जित करावी . प्रत्येकाने आपले अन्न स्वतः पिकवावे. तो पृथ्वीचा नियम आहे. त्याच्या विरोधात जाणारी आधुनिक मानवी व्यवस्था गुंडाळावी.हे बोलायला सोपे आहे. हे बोलणार्यांनी हातात केवळ लाकडी सोटा, तीरकमान किंवा (औद्योगीकरणाने दिलेली साधने सोडून) नैसर्गिकरित्या मिळणारे इतर कोणते साधन घेऊन जंगलात राहून, आधुनिक जगातील माणसांशी कोणताही संपर्क न ठेवता, "हंटर-गॅदरर" जीवनप्रणाली तीन महिने अनुभवून पहावी. मग, त्यांचे मत काय आहे हे सांगावे. २.प्रत्येकाने आपले अन्न स्वतः पिकवावे. तो पृथ्वीचा नियम आहे.हे पृथ्वीवर कोणत्या तरी काळात घडले होते काय, किंवा हे व्यवहारात शक्य आहे काय ??? हा विनोद कोणत्या पायावर उभा आहे ? त्यासंबंधीचा एखादा तरी पुरावा पहायला आवडेल. =)) लेखातला दर मुद्दा विचारात घेतला तर, "लेखापेक्षा प्रतिसाद मोठा असे होईल." ;) तेव्हा, असो.अतीव सहमत. स्वावलंबीकरणाचे
In reply to १. हे थांबवावे. शहरे विसर्जित by डॉ सुहास म्हात्रे
.......शहरे विसर्जित करावी .
दाभोळकर - प्रयोग परिवार
In reply to .......शहरे विसर्जित करावी . by माहितगार
पण पुण्यातच अनेक लोक गच्चीवर
In reply to दाभोळकर - प्रयोग परिवार by nanaba
पण पुण्यातच अनेक लोक गच्चीवर नारळांपर्यंत काहीही घेतायत."पुण्यातले गच्ची असलेले घर" हा औद्योगीकरणाचाच भाग/परिणाम नाही काय ? औद्योगीकरण पूर्णपणे टाळायचे तर ते "गच्ची असलेले घर" सोडावे, ही सर्वप्रथम करायची कृती असेल, नाही का ?दहा गुन्ठ्यात एका कुटुंबाची गरज पूर्ण हो ऊ शकतेऔद्योगीकरणाला खलनायक ठरवणार्यांपैकी किती जण, शहर सोडून दहा गुंठ्यांच्या शेतावर सकुटुंब रहायला तयार आहेत, याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे !दहा गुन्ठ्यात एका कुटुंबाची
In reply to दाभोळकर - प्रयोग परिवार by nanaba
दहा गुंते !
In reply to दहा गुन्ठ्यात एका कुटुंबाची by अभिजीत अवलिया
कुलकर्णी द हा गुंठे वाले नाहीत
In reply to दहा गुंते ! by manguu@mail.com
शिरीष पवार
In reply to दहा गुन्ठ्यात एका कुटुंबाची by अभिजीत अवलिया
त्यामुळे तुम्ही गेलात आणि ते
In reply to शिरीष पवार by nanaba
पिंपळाच्या पानावर लिहिलेलं पत्र
In reply to त्यामुळे तुम्ही गेलात आणि ते by मराठी कथालेखक
गावाचे नाव सांगा ना.
हे बरय राव.
आणि
In reply to हे बरय राव. by यशवंत पाटील
मूळ प्रश्न औद्योगीकरणाचा नाहि...
प्रतिसाद खूप अावडला
In reply to मूळ प्रश्न औद्योगीकरणाचा नाहि... by अर्धवटराव
स्पायरल व्यवहार
In reply to प्रतिसाद खूप अावडला by स्वधर्म
लेख बराच एकांगी असला तरी