Skip to main content

काथ्याकूट; राजकारण; ताज्या घडामोडी; बातम्या; चर्चा

ताज्या घडामोडी - एप्रिल २०२३

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी मंगळवार, 04/04/2023 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुक प्रचारादरम्यान कर्नाटकात कोलार जिल्ह्यात एका प्रचारसभेत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे गुजरातमधील भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी त्यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला. राहुल म्हणाले होते- " नीरव मोदी, ललित मोदी .. अच्छा .एक छोटासा सवाल आहे . या सर्व चोरांचे नाव मोदी कसे ?" यावरून सर्व मोदींचा अपमान केला म्हणून पूर्णेश मोदींनी खटला दाखल केला. माझ्या माहितीप्रमाणे अशाप्रकारच्या खटल्यात संबंधित आरोपीला 'माझा उद्देश सगळ्या मोदींना चोर म्हणायचा नव्हता पण तसा अर्थ निघत असला तर त्याबद्दल माफी' असे म्हणून सोडून द्यायचा पर्याय देत असते.

पण कधीतरी अमेरिकेच्या / पाश्चिमात्यांच्या दुसर्‍या बाजूवर देखील चर्चा व्हायला हवी

लेखक चौकस२१२ यांनी शुक्रवार, 20/01/2023 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
उपयोजक यांन्च्य्या धाग्यात :" पण कधीतरी अमेरिकेच्या (पाश्चिमात्यांच्या " दुसर्‍या बाजूवर देखील चर्चा व्हायला हवी" असे होते , त्यातून हि विचार मांडत आहे आधीच क्षमा मागतो कि हे अमेरिके बद्दल नाही .. याच कारण कि "पाश्चिमात्य देश म्हणजे काही फक्त अमेरिका नव्हे " कानडा , ऑस्ट्रेल्यात , न्यू झीलंड इत्यादी देश याशिव्या जुने इंग्लंड आणि आजकाल बरेच जण आयर्लंड ला हि स्थलांतरित होतात ... याशिवाय इंग्रजी भाषा ना बोलणारे काही इयूरोप मधील देश आणि सिंगापोर आणि जपान सारखया प्रगत देशात हि लोकं कायमचे राहायला गेले आहेत ...

ह्या दोन बातम्यांमध्ये एवढा विरोधाभास का आहे?

लेखक शानबा५१२ यांनी मंगळवार, 27/12/2022 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
नोंद : 'चर्चा' ह्या लेखन प्रकाराखाली दीलेले हे खालील आवाहन, सुचना वाचली आहे. व ते लक्षात ठेऊन लिहत आहे.
केवळ कुठल्यातरी बातमीचा दूवा (लिंक) देवून याविषयी तूमचे मत काय? असे प्रश्न विचारू नये. त्याचर्चे बाबत तुम्ही गंभीर आहात किंवा किमान तुम्ही त्याबाबत विचार करताय हे लोकांना कळल्यास त्यांना त्याचर्चेत सहभागी व्हायला आवडेल.
नमस्कार मिपाकरांनो, मी विओन (WION) ह्या युट्युबवरील बातमी देणा-या चॅनलचा फॅन आहे म्हणजे मला ते चॅनल फार आवडते. त्यातल्या पल्की शर्मा ह्या आता ते चॅनल सोडुन गेल्या.

ताज्या घडामोडी - ऑगस्ट २०२२ (भाग १)

लेखक क्लिंटन यांनी सोमवार, 01/08/2022 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
ऑगस्ट २०२२ हा महिना सुरू झाला असल्याने ताज्या घडामोडींचा नवा धागा काढत आहे. ६ ऑगस्टला उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान होईल. या निवडणुकीत भाजपकडून बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनकड आणि तृणमूल काँग्रेस सोडून इतर सगळ्या विरोधी पक्षांकडून काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा हे उमेदवार आहेत. मार्गारेट अल्वांची उमेदवारी जाहीर करताना आपल्याला विश्वासात घेतले नाही या कारणाने तृणमूल काँग्रेस हा एक प्रमुख विरोधी पक्ष मतदानात भाग घेणार नाही. तसेच बिजू जनता दलानेही जगदीप धनकड यांना समर्थन दिले आहे. त्यामुळे ते देशाचे पुढचे उपराष्ट्रपती बनतील हे जवळपास नक्की आहे.

ताज्या घडामोडी- डिसेंबर २०२१ (भाग २)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी गुरुवार, 16/12/2021 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मागच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा भाग काढत आहे. गोव्यात विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. कुठ्ठाळीच्या (Cortalim) आमदार अलिना सालढाना यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पक्ष सोडायचा निर्णय घेतला आहे. अलिनांचे पती मथानी सालढाना युनायटेड गोअन्स डेमॉक्रॅटिक पार्टी या ख्रिश्चनांच्या पक्षाचे आमदार होते. २००५ मध्ये या पक्षाने मनोहर पर्रीकरांच्या सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतल्यावर मथानींनी पक्षातून बाहेर न पडता पर्रीकरांची साथ दिली होती. पुढे २०१२ मध्ये ते भाजप उमेदवार म्हणून कुठ्ठाळीतून निवडून आले.

ताज्या घडामोडी नोव्हेंबर २०२१- भाग २

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी बुधवार, 17/11/2021 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात १५० प्रतिसाद झाल्यामुळे नवा भाग काढत आहे. गोव्यातील पोरी (Poriem) मतदारसंघातून २०१७ मध्ये माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणेंविरूध्द निवडणुक लढवून पराभूत झालेले भाजपचे विश्वजीत राणे यांनी भाजप सोडून आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. प्रतापसिंग राणेंच्या चिरंजीवांचे नावही विश्वजीतच आहे. ते भाजपमध्ये आहेत आणि राज्य सरकारमध्ये मंत्रीही आहेत. नामसाधर्म्यामुळे सुरवातीला वाटले होते की त्यांनीच आपमध्ये प्रवेश केला की काय. पण दुसर्‍या विश्वजीत राणेंनी पक्ष सोडला आहे. एकंदरीत गोव्यात भाजपचे तितके सोपे दिसत नाही.

चालू घडामोडी - जून २०२१ (भाग १)

लेखक वामन देशमुख यांनी बुधवार, 02/06/2021 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
जून महिन्याच्या चालू घडामोडींचा पहिला धागा काढतोय. गिधाडी_पत्रकारिता की गिधाडी_रुग्णसेवा जिथे रुग्णांच्या नातेवाईकांना प्रवेश करू दिला जात नाही, प्रवेश मिळालाच तर मोबाइल बाहेर ठेवावे लागतात, तिथे माइक, कॅमेरे, लाइट्स इ घेऊन ही बाई मोकाट फिरते.