Skip to main content

काथ्थ्याकुट

सोंदर्य प्रसाधने आणि अपाय

लेखक हेमंत लाटकर यांनी रविवार, 03/01/2016 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
सौंदर्य उजळविण्यासाठी बाजारातील महागडी सौंदर्य प्रसाधने वापरण्याएेवजी सहज उपलब्ध होणारी मेंदी, खोबरेल तेल, डाळीचे पीठ, रिठा, काळी माती, ताक, हळद, फळांचा रस, मुलतानी माती यांचा उपयोग केल्यास पैशाची बचत हाईल. तसेच बाजारातील स्वस्तात मिळणारी सौंदर्य प्रसाधने वापरल्यामुळे फायदा होण्यापेक्षा नुकसान होण्याचीच शक्यता असते. खालील प्रसाधने नेहमी वापरली जातात आणि त्यांच्यापासून अपायही होण्याची शक्यता असते. 1. हेअर डाईज : आकर्षक आणि तरुण दिसण्यासाठी कलप वापरणारे बरेच जण असतात. या कलपांमध्ये फेनिल-अलानाईन-डायमाईन नावाचं द्रव्य वापरले जाते.

खरीच गरज आहे का?

लेखक हेमंत लाटकर यांनी मंगळवार, 29/12/2015 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
आनंदी समाधानी जीवन जगण्यासाठी.... पाच रूमचा वेल फर्निशर्ड फ्लॅट, महागडी कार, 40 इंची एलईडी टिव्ही, एेसी, मुलांना इंटरनॅशनल शाळेत अॅडमिशन. हे सगळे साध्य करण्यासाठी 8 ते 8 नौकरी. बायकोची नौकरी. एकत्र कुटुंब नसल्यामुळे मुलांना पाळणाघरात पाठविणे. सुट्टीच्या दिवशी बाहेर जायची इच्छा नसणे. त्यामुळे नवरा बायकोत चिडचिड. मुलांना मागितले ते मिळाल्यामुळे नाही ऐकायची सवय नसणे. काॅलेजात गेले की मुलांना आय फोन, स्कुटी किंवा बाईक. वयाच्या चाळीशीला हार्ट, बीपी, मधुमेह हे आजार होणे. मग त्यावर डाॅक्टरी इलाज.

संभाजीराजांच्या मुक्ततेसाठी एकही प्रयत्न ????

लेखक हेमंत लाटकर यांनी बुधवार, 09/12/2015 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांनो, मला एक प्रश्न सतावतोय, संभाजीराजे संगमेश्वर येथील मुख्य सरदारांची बैठक संपवून रायगडाकडे 1 फेब्रुवारी 1689 रोजी रवाना होत असताना औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने संगमेश्वरवर हल्ला करून संभाजी महाराजांना व कवी कलशांना पकडले व त्यांचा छळ करून 13 मार्च 1689 रोजी हत्या केली. पण या 40 दिवसाच्या काळात एकाही मराठी सरदाराने, वतनदाराने व मंत्र्याने शंभुराजांना सोडवण्याचा एकही प्रयत्न केला नाही अथवा तहाची बोलणी करायला व शंभुराजांना सोडवायला एकही वकील औरंगजेबाच्या दरबारी पाठवला नाही. जनतेनेही कसलाही उठाव केला नाही. यामागचे काय कारण असू शकेल ?

रामायणातील लंका म्हणजे श्रीलंका नव्हे.

लेखक हेमंत लाटकर यांनी शुक्रवार, 27/11/2015 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
दैनिक भास्कर मधील बातमी. 5 आक्टाेबर 1971 या वर्षी प्रख्यात इतिहासकार एच. डी. संकलिया यांचा एक रिपोर्ट अंग्रेजी दैनिक 'द स्टेट्समैन' मध्ये प्रकाशित झाला होता. या रिपोर्ट नुसार रामायणातील लंका म्हणजे "श्रीलंका" नसून झारखंड मधील छोटा नागपुर हे क्षेत्र आहे. अयोध्या ते कन्याकुमारी हे अंतर रस्त्याने अंदाजे 3000 किमी आहे, कन्याकुमारी ते श्रीलंका अंतर 290 किमी आहे. आता रस्ते असल्यामुळे इतके अंतर जाणे सोपे आहे. त्याकाळी रस्ते नव्हते, वाहने नव्हती, घनदाट जंगले होती. श्रीरामाने इतके पार केले असेल असे वाटत नाही. तुम्हाला काय वाटते......

क्रोमबुक घ्यायचा आहे, मार्गदर्शन पाहिजे.

लेखक हेमंत लाटकर यांनी सोमवार, 19/10/2015 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
क्रोमबुक घ्यायचा आहे. मार्गदर्शन करा. 1. chrome os की windows os चा घ्यावा. 2. engg. प्रोजेक्ट, प्रोग्रॅमिंगसाठी वापरता येईल का? 3. आॅनलाईन वर्क अॅट होम कामे करता येतील का? 4. कोणत्या कंपनीचा घ्यावा.

डिग्री नसलेले बिलिनिअर्स

लेखक हेमंत लाटकर यांनी शुक्रवार, 16/10/2015 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
काॅलेज डिग्री नसलेले बिलिनिअर्स 1. बिल गेटस - मायक्रोसाॅफ्ट 2. पाॅल अॅलन - मायक्रोसाॅफ्ट 3. मार्क झुकेरबर्ग - फेसबुक 4. डस्टिन माॅस्कोव्हिटस - फेसबुक 5. स्टिव्ह जाॅब्स - अॅपल 6. जाॅन कोम - व्हाॅटसअॅप 7. जॅक डोरसे - व्टिटर 8. इव्हान विल्यम - व्टिटर 9. मायकेल डेल - डेल काॅम्प्युटर 10. लॅरी इलिसन - ओरॅकल 11. अझीम प्रेमजी - विप्रो यावरून हे लक्षात येते की उच्चपदी पोहचण्यासाठी डिग्रीच असली पाहिजे असे नाही तर कुशाग्र बुद्धी, चिकाटी, ध्येय या गोष्टी आवश्यक असतात. यावर मिपाकरांचे मत काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा धागा टाकला. तरी प्रत्येकाने आपला अमुल्य प्रतिसाद द्यावा.

इच्छामरण

लेखक हेमंत लाटकर यांनी गुरुवार, 03/09/2015 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
इच्छामरण ह्याचा अर्थ ’युदेन्शिया’ (ग्रीक शब्द) "चांगले मरण" असा होतो. प्रत्येक व्यक्तीला आयुष्याची सुरवात आणि शेवट चांगल्या रितीने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते. ’इच्छामरण हवे’ असे अंथरूणाला खिळलेल्या आजारी व्यक्तीने सांगितले तरी घरातल्यांना ते पटत नाही. अंथरूणाला खिळलेल्या वृद्ध व रूग्णांची सेवा करणे अवघड असते. नवरा किंवा बायको असली तर त्यातल्या त्यात चांगले. परंतु नवरा किंवा बायको वृद्ध असली आणि मुलगा-सुन दोघेही नौकरी करणारे असतील तर मात्र अशा वृद्धाची किंवा रूग्णाची अवस्था खुप दयनीय होते.

भारतात वृद्धाश्रम वाढत आहेत.

लेखक हेमंत लाटकर यांनी बुधवार, 02/09/2015 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या भारत देशातील वृद्धांची अवस्था बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या देशात वेगाने वृद्धाश्रमांची संख्या वाढते आहे. भारता सारख्या देशात जिथे आई-वडिलांना देवासारखे समजले जाते, तिथे अशा प्रकारची वागणुक बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके पुढारलेले आहोत का आज आई-वडिल आपल्याला जड होत आहेत. ज्या घरात त्यांनी आपल्या रक्ताचे पाणी केलेले असते त्याच घराच्या एका कोपर्यात त्यांना पडलेले पाहून मन दु:खी होते. आई-वडिल अशी आशा करतात की त्यांची मुले म्हातरपणी त्यांचा आधार होतील.

चला चर्चेद्वारे महाभारताचे ज्ञान वाढवू......

लेखक हेमंत लाटकर यांनी गुरुवार, 27/08/2015 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वार्ध महाराजा प्रतीपने गंगेला दिलेल्या वचनानुसार आपला पुत्र शान्तनुला गंगेशी विवाह करण्याचा आदेश दिला व स्वत: स्वर्गाकडे प्रस्थान केले. वडिलांच्या आदेशानुसार महाराज शान्तनु ने गंगेशी विवाह केला. पण गंगेने महाराज शांन्तनु कडून एक वचन घेतले., कोणत्याही कामात हस्तक्षेप करायचा नाही. महाराज शान्तनु ला आठ पुत्रे झाली. त्यातील सात पुत्रांना गंगेने गंगेत सोडुन दिले. (हे सात पुत्र म्हणजे मानव लोकात राहण्याचा शाप मिळालेले अश्विनी कुमार, त्यांना गंगेने गंगेत सोडून शापमुक्त केले) पण आठव्या पुत्राच्या वेळेस महाराज शान्तनुने हस्तक्षेप केल्यामुळे गंगा आठव्या पुत्रासोबत गुप्त झाली.

पगार आठवड्याप्रमाणे मिळाला तर.......

लेखक हेमंत लाटकर यांनी गुरुवार, 20/08/2015 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
आठवड्याप्रमाणे पगार झाला तर...... भारतात पगार दर महिन्याला देण्याची पद्धत आहे, जर पगार आठवड्याला झाला तर 1 महिना जास्तीचा पगार मिळेल. आठवड्याप्रमाणे पगार केला तर वर्षात 52 आठवडे होतात. 4आठवड्यांचा एक महीना धरला तर वर्षामध्ये 13 पगार मिळायला हवेत. वर्षात (365/7) - 52.1428571 – 52 आठवडे महिन्यात आठवडे 4 च धरावे लागतील, उदा. महिन्याचा पगार ₹ 100 आठवड्याचा पगार ₹ 25 महिन्याप्रमाणे वर्षाचा पगार 100 x 12 – ₹ 1200 आठवड्याप्रमाणे वर्षाचा पगार 25 x 52 – ₹ 1300 बघा कोणाला बरोबर वाटते का? चुक वाटत असेल तर का वाटते?य