Skip to main content

काहीतरी दिसलेलं लिहावसं वाटलेलं

आजीचं पुस्तकांचं हॉटेल

लेखक नपा यांनी बुधवार, 24/06/2026 15:52 या दिवशी प्रकाशित केले.

काही महिन्यांपूर्वी नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावरील  'आजीचं पुस्तकांचं हॉटेल' या पुस्तकालय-कम-भोजनालयाला योगायोगाने भेट देता आली. 

नावाप्रमाणे या हॉटेल मध्ये तुम्हाला अनेक पुस्तके छान मांडून ठेवलेली दिसतील. हॉटेलची जागा अत्यंत प्रशस्त आहे आणि त्यात पुस्तकांनी व्यापलेल्या जागेने हॉटेलच्या भव्यतेत वाढ होते. 

Random Act ऑफ kindness

लेखक डिस्कोपोन्या यांनी शुक्रवार, 09/12/2016 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
वेळ- मावळतीची स्थळ- पुण्यातील एक गर्दीचा रस्ता (कोणता ते महत्वाचा नाही) मुंगीच्या पावलांनी दुचाकी पुढे पुढे रेटत असताना आपला नेहमीचा छंद सुरु होता, हो अशा गर्दीत सुद्धा पुणेकरांची छंद जोपासण्याची हातोटी जगावेगळी आहे, गाडीचा वेग जरी मंद असला तरी नजरेचा वेग काही मंद झालेला नसतो,बाजूची कार कोणती आहे त्यामध्ये कितीजण आहेत, आजूबाजूच्या दुचाकी कोणत्या मोडेल ची आहे,त्या दुचाकीवरील व्यक्ती च्या चेहऱ्यावरचे हावभाव कसे आहेत(हे निरीक्षण अतिशय जिकीरीचे असते कारण पुण्यात दुचाकीवरचे चेहरे नव्व्याण्णव टक्के वेळा दिसतच नाहीत, स्कार्फ, रुमाल , मास्क आणि गॉगल ने शंभर टक्के झाकलेले असतात) इत्यादी निरीक्षणाचा