वेळ- मावळतीची
स्थळ- पुण्यातील एक गर्दीचा रस्ता (कोणता ते महत्वाचा नाही)
मुंगीच्या पावलांनी दुचाकी पुढे पुढे रेटत असताना आपला नेहमीचा छंद सुरु होता, हो अशा गर्दीत सुद्धा पुणेकरांची छंद जोपासण्याची हातोटी जगावेगळी आहे, गाडीचा वेग जरी मंद असला तरी नजरेचा वेग काही मंद झालेला नसतो,बाजूची कार कोणती आहे त्यामध्ये कितीजण आहेत, आजूबाजूच्या दुचाकी कोणत्या मोडेल ची आहे,त्या दुचाकीवरील व्यक्ती च्या चेहऱ्यावरचे हावभाव कसे आहेत(हे निरीक्षण अतिशय जिकीरीचे असते कारण पुण्यात दुचाकीवरचे चेहरे नव्व्याण्णव टक्के वेळा दिसतच नाहीत, स्कार्फ, रुमाल , मास्क आणि गॉगल ने शंभर टक्के झाकलेले असतात) इत्यादी निरीक्षणाचा छंद सतत सुरु असतो..
अशातच माझ्या शेजारी एक नवी कोरी KTM ड्युक थांबली , सिग्नल नुकताच लाल झाला होता, KTM वर अर्थातच कपल आणि मागे चक्क चेहरा न झाकलेली ललना (खरच सुंदर होती )... काय झाल कुणास ठाऊक एक गिरकी घेऊन KTM वरून ती उतरली (अशा प्रकारे KTM वरुन सफाईदारपणे उतरण ही एक कलाच आहे), चालवणारा बॉयफ्रेंड पण गोंधळून गेला आणि काहीतरी बडबडला (मला काहीच समजल नाही भाषा तमिळ किंवा तेलगु असावी, म्हणजे पोरगी पुण्यातली नव्हती आणि म्हणून चेहरा दिसला होता, परत सांगायला हरकत नाही खरच सुंदर होती ती). त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून पुढच्या क्षणात ती बाजूच्या फूटपाथ वर गेली.... खाली वाकली !!
तिच्या समोर एक जक्ख म्हातारी पुढ्यात कोणत्यातरी पालेभाजीच्या गड्ड्या घेऊन बसली होती..तिने हातवारे करून त्या म्हातारीला काहीतरी विचारलं...त्या म्हातारीन त्या हातवार्यांना बोटाने पाच अस उत्तर दिलेलं दिसलं! त्या पोरीन म्हतारीच्या पुढ्यातल्या सगळ्या गड्ड्या उचलल्या आणि म्हातारीच्या मुठीमध्ये जबरदस्तीने एक नोट दाबली (पाचशेपेक्षा कमी नसणार तेव्हा त्या नोटेला किंमत होती). या सगळ्या प्रकारान म्हातारीला पण काहीच झेपल नाही...एव्हाना ती पोरगी ज्या सफाईन KTM वरून उतरली त्याहीपेक्षा सफाईन KTM वर जाऊन बसली... आणि सिग्नल हिरवा झाला होता, KTM रेस करून माझ्यापुढे निघाली होती ... मी माझ्या गाडीचा Starter दाबत गाडी सुरु करता करता स्ट्रीट लाईट च्या प्रकाशात त्या म्हातारीचे डोळ्यात एक चमक पाहिली, आनंदाशृ !! माझी गाडी सुरु झाली पण KTM काही नजरेच्या टप्प्यात नव्हती! आणि म्हातारी पुढ्यातल सर्व आवरून बहुधा घरी निघायच्या बेतात होती!!
आणि हे सगळ बघून मलाच उगीच आनंद झाला होता ! अशी घटना नुसती बघून सुद्धा आनंद होतो !!
तर मित्रांनो share करा तुम्ही अनुभवलेला किंवा केलेला Random Act ऑफ kindness!!
वर्गीकरण
याद्या
4330
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुमचा आयडी...लय भारी
धन्यवाद पाटीलभाऊ
In reply to तुमचा आयडी...लय भारी by पाटीलभाऊ
जब्रा लेख आणि काडी दोन्ही ;)
In reply to धन्यवाद पाटीलभाऊ by डिस्कोपोन्या
Kaheehee
In reply to धन्यवाद पाटीलभाऊ by डिस्कोपोन्या
लेख व तुमची ताजीतवानी शैली आवडली
मारवाजी,
In reply to लेख व तुमची ताजीतवानी शैली आवडली by मारवा
मारवाजी,
In reply to लेख व तुमची ताजीतवानी शैली आवडली by मारवा
माझ्यासकट ३ वर्षेहुन अधिक
In reply to लेख व तुमची ताजीतवानी शैली आवडली by मारवा
माझ्यासकट ३ वर्षेहुन अधिक झालेल्या सर्व जुन्या आयडींना लेखनबंदी करावी. बाकीच्या आयडींचे जाउद्या पण तुम्हाला प्रतिसादबंदी केली पाहिजे याच्याशी सहमत.माझ्यासकट ३ वर्षेहुन अधिक
In reply to लेख व तुमची ताजीतवानी शैली आवडली by मारवा
माझ्यासकट ३ वर्षेहुन अधिक
In reply to लेख व तुमची ताजीतवानी शैली आवडली by मारवा
प्रतिसादाबद्दल खुप खुप धन्यवाद
In reply to लेख व तुमची ताजीतवानी शैली आवडली by मारवा
प्रतिसादाबद्दल खुप खुप धन्यवाद !!
In reply to लेख व तुमची ताजीतवानी शैली आवडली by मारवा
प्रतिसादाबद्दल खुप खुप धन्यवाद !!
In reply to लेख व तुमची ताजीतवानी शैली आवडली by मारवा
प्रतिसादाबद्दल खुप खुप धन्यवाद !!
In reply to लेख व तुमची ताजीतवानी शैली आवडली by मारवा
वाव!
प्रतिसादाबद्दल खुप खुप धन्यवाद !!
In reply to वाव! by निओ१
वॉव
प्रतिसादाबद्दल खुप खुप धन्यवाद !!
In reply to वॉव by धर्मराजमुटके
प्रतिसादाबद्दल खुप खुप धन्यवाद !!
In reply to वॉव by धर्मराजमुटके
भारी आहे हे!!
मस्त... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kiiara - Gold (Official Video)व्हिडिओ आवडले बाणराव
In reply to मस्त... :) by मदनबाण
आजची स्वाक्षरी
In reply to मस्त... :) by मदनबाण