चला उठून आपण सारे पेटवुया
कसे काय करायचे ते ठरवूया
त्यासाठी आपल्याला आधी भेटावं लागेल
कुठं कुठं पेटवायचं ते ठरवावं लागेल
"आलोच, व्हा पुढं " असे बोलायचं नाही
पेटवायच्या आधीच कुणी पळायचे नाही
सर्वांचा सराव आपण करूया
सरावासाठी तरी निदान भेटूया
अशी लावू काडी मग टाकू त्यावर पेट्रोल
इथे आग लागली तर होणार नाही कंट्रोल
फोनवरच चालू आहेत मोठे मोठे किस्से
भेटायचे वांदे , मग पेटवायचे कुणी कसे ?
सरावासाठी सारे मैदानात जमले
गर्दी होईल कमी म्हणुन थोडावेळ थांबले
कुणीच कुठं गेले नाही , गर्दी होती तश्शीच
पावसाच्या सरीमध्ये मग भिजून गेले माचीस
सराव आता करणार कसा , यावर चर्चा झाली
पुन्हा रविवारी भेटण्याची तारीख पक्की झाली
किस्से चालू झाले, ते अजूनही चालू आहेत
सरावासही उसंत नाही आणि सर्व पेटवायला निघालेत
------------------------------
सिद्धेश्वर विलास पाटणकर लिखित आणि त्रिकाल हक्कित
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया