ग्रह,नक्षत्रे आणि रत्ने!
ग्रह/नक्षत्रे
१. प्राचीन काळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला भरती येते हे लोकांना स्वत: पाहता येत होतं.त्यामुळे चंद्रामुळे मानवी जीवनावरसुध्दा काय परिणाम होतो याचा शोध घेण्यास चालना मिळाली असावी; पण अन्य ग्रह मात्र आकाशात चंद्राइतके स्पष्ट दिसत नाहीत,किंवा त्यांचं निरिक्षण करण्यासाठी,त्यांचे मानवी जीवनावरचे परिणाम तपासण्यासाठी त्यांचं सखोल निरिक्षण करणं गरजेचं होतं.पण प्राचीन काळी तितक्या सक्षम दुर्बिणी नव्हत्या.
हर्षल,नेपच्युन,प्लुटो हे तीन ग्रह तुलनेने अलिकडच्या काळातले म्हणता येतील.सूर्य,चंद्र सहज दिसतात.मंगळही थोडं बारिक निरिक्षण केलं असता दिसू शकेल पण गुरु,शनी,बुध,शुक्र हे तितक्या सहजपणे दिसत नाहीत.
मग या ग्रहांचे मानवी जीवनावरचे परिणाम त्या लोकांनी कसे शोधून काढले असावेत? त्यासंबंधीचे नियम कसे बनवले असावेत?
अशाच प्रकारे नक्षत्रांचे मानवी जीवनावर होणारे परिणाम प्राचीन काळी कसे शोधले गेले असावेत? कोणती साधनं या संशोधनासाठी वापरली गेली असावीत?
प्राचीन ग्रंथामंधे उदा. वराहमिहिरच्या पंचसिध्दांतिका या ग्रंथात ग्रहांची कार्यतत्वे दिली आहेत.ती आजही उपयुक्त आहेत.मग ती कोणत्या साधनाद्वारा शोधली गेली असावीत? हे शोधाशोधीचं काम नक्की कोणत्या कालखंडात झालं असावं?
बुध,शुक्र,गुरु,शनी यांचा शोध या प्राचीन संशोधकांना कसा लागला असावा? की हे काम एलियन्सचे असावे? त्यांनी मानवाला आयतंच हे ज्ञान दिलं असावं का?
तळटीप: इथे ग्रहांचा,नक्षत्रांचा मानवी जीवनावर परिणाम होतो हे गृहित धरले आहे.वरील ग्रहांचा शोध आणि त्यांचे मानवावरील परिणाम कसे शोधले गेले असावेत यावर चर्चा अपेक्षित आहे. ज्योतिष खरे की थोतांड यासाठी धागा काढलेला नाही.
रत्ने/स्फटीके
२. अंगठीत बसवलेला खडा किंवा रत्न हे स्फटीकाचेच रुप.याला Crystal म्हणू शकतो.अशा प्रकारे Crystal कोट्यावधी किमीवरुन येणार्या लहरी किंवा ग्रहांकडून जे काही येतं ते पकडू शकतो? घालणारी व्यक्ती कुठेही असली तरी?स्फटिकाची/रत्नांची लहरी इत्यादी स्विकारण्याची आणि त्या साठवण्याची ताकद किती असू शकते?
वर्गीकरण
वाचने
4870
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
http://www.misalpav.com/node
मंगळही थोडं बारिक निरिक्षण
१) बरंचसं ग्रहांचं कार्यकत्व
In reply to १) बरंचसं ग्रहांचं कार्यकत्व by कंजूस
धन्यवाद!
In reply to १) बरंचसं ग्रहांचं कार्यकत्व by कंजूस
कंजूसजी!
>>ग्रहांची कार्यतत्वे दिली
In reply to >>ग्रहांची कार्यतत्वे दिली by कंजूस
हो कार्यकत्वंच!
पण गुरु,शनी,बुध,शुक्र हे तितक्या सहजपणे दिसत नाहीत
In reply to पण गुरु,शनी,बुध,शुक्र हे तितक्या सहजपणे दिसत नाहीत by Nitin Palkar
अगदी बरोबर ..
एक अनुभव
In reply to एक अनुभव by दीपक११७७
अर्र्र् हे काय ...?
In reply to अर्र्र् हे काय ...? by चौकटराजा
गुड question
अरे यार....
महत्वाकांक्षा नसलेली माणसं