Skip to main content

चित्रपट

बायोस्कोप... पाहिला का?

लेखक शब्दबम्बाळ यांनी शुक्रवार, 24/07/2015 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या आठवड्यात बायोस्कोप हा चित्रपट प्रदर्शित झाला. एकाहून एक सरस कवी आणि दिग्दर्शकांनी मिळून केलेल्या या चित्रपटाबद्दल फार उत्सुकता आहे. ४ कवितांपासून कथानक तयार करून चित्रपट बनवणे हि संकल्पना देखील छान वाटली पण बजरंगी भाईजान या चित्रपटासोबत हा का प्रदर्शित केला गेला कोणास ठाऊक! आठवड्याभरात काही कुठे बातमीच दिसली नाही बायोस्कोपबद्दल... आपल्यापैकी कोणी हा चित्रपट पहिला का? पहिला असेल तर कसा आहे सांगावे. ४ कथा असल्याने एखादी खूप छान आणि एखादी यथा तथा असे होऊ शकेल त्यामुळे त्यावर इथे चर्चा झाली तर आवडेल.