जगप्रसिद्ध दहशतवादी डेव्हिड हेडली हा अमेरिकेत कैदेत आहे. हा अतिरेकी २६/११ च्या भारतीय हल्ल्याचा आयोजक समजला जातो. हल्ल्याच्या आधी तो दोन तीन वेळा त्या त्या हॉटेलात येऊन टेह्ळणी करुन गेला होता. त्या माहितीचा उपयोग करुन पाकिस्तानी अतिरेक्यांनी आपला हल्ल्याचा बेत आखला.
अमेरिकन सरकार ह्या माणसाचे हस्तांतरण करु इच्छित नाही. भारतीय न्यायालयाने ह्याला माफीचा साक्षीदार बनवले आहे. त्याने असे म्हटल्याचे सांगितले जाते की इशरत जहान ही तरुणी आमच्या आत्मघातकी पथकाची (अर्थात सुसाईड स्क्वॉडमधली) एक बाई होती. ती काही साथीदारांच्यासह मोदींना मारण्याकरता गुजराथला गेली होती पण तिच्या दुर्दैवाने आणि देशाच्या सुदैवाने पोलिसांनी ह्यांना रोखले आणि गोळीबारात ते ठार झाले.
नंतर अनेक तथाकथित सेक्युलर लोक ह्या "निर्घृण" हल्ल्यावर खवळले होते. ह्या संतापातून इशरत आमची बहीण आहे पासून इशरत मला मुलीसारखी आहे असे अनेक राग आळवले गेले. मुंब्र्यातील सर्वधर्मसहभावसम्राट जितू आव्हाड ह्यात आघाडीवर होते. बाकी राष्ट्रवादीचे लोक त्यात होते. नंतर नितिश कुमारही ह्या इशरतप्रेम्यांच्या जथ्यात सामिल झाले. इशरतच्या नावे अनेक सामाजिक संस्था उघडण्यात आल्या आहेत.
आता ही नवी माहिती आल्यावर हे लोक पश्चात्ताप व्यक्त करतील का हा मोदींचाच नवा कट आहे असे म्हणतील ते बघू या.
हे इस्लामी दहशतवादाचे विष किती खोलवर भिनले आहे ते पाहून भीती वाटल्यावाचून रहावत नाही.
वर्गीकरण
वाचने
3378
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
विश्वास कोणावर?
नव्याने येत आहे
माफीचा साक्षीदार
वसंत पुरके..
डावखरे...
In reply to वसंत पुरके.. by योगी९००
बाटलीतले भूत बाहेर येणार काय?
हम्म
ब्रिंदा कारत यांनी या
वृंदा करात होय!! असो असो त्या
In reply to ब्रिंदा कारत यांनी या by अनुप ढेरे