नुकताच डोंबिवलीच्या एम आय डी सी च्या क्षेत्रातील एका कारखान्यात प्रचंड स्फोट होऊन डझनभर लोक मरण पावले आणि शेकडो जखमी झाले. शिवाय अनेक इमारतींना भेगा पडून मोठे नुकसान झाले आहे.
एकेकाळचे रम्य, सुसंस्कृत शहर आज रासायनिक ज्वालामुखीच्या जवळ जाऊन बसले आहे. खुद्द एम आय डी सीत पाहिले तर घरांच्या आसपास कारखाने आहेत का कारखान्यांच्या आसपास घरे आहेत ते कळत नाही. घातक रसायने, वायु वगैरे वापरले जातात अशा कारखान्यांकरता कडक नियम असतात. त्यांच्या आसपास पुरेशी मोकळी जागा, प्रशिक्षित कामगार असणे वगैरे. पण डोंबिवलीची एम आय डी सी केवळ पैसे खाऊन हवी ती कागदपत्रे बनवते. तपासणी करणे, नियमन करणे वगैरे कामे हा विभाग आजिबात करत नाही. छोटे मोठे स्फोट होतच असतात. ते झाले की आपले हप्ते वाढवून घेणे इतकेच काम हा विभाग करतो. असे ऐकून आहे.
ह्या मोठ्या स्फोटामुळे ह्यात काही बदल होईल का? भाजपाचे सरकार आल्यामुळे परिस्थिती सुधारेल का जैसे थे रहाणार?
मागे हिरवा पाऊस झाला तेव्हाही प्रदूषणाची थोडी चर्चा झाली होती. आताही होईल पण दीर्घकाळाकरता उपाय होईल का?
लोकांना घाणेरडा वास येणे ह्या गोष्टी तर रोजच्याच आहेत. त्याबद्दलही काही होताना दिसत नाही.
इथे कुणी डोंबिवलीकर आहेत का? त्यांचे काय अनुभव आणि मत?
वर्गीकरण
वाचने
4376
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
पश्चाच्चिकित्सा
आपण प्रमाणपत्र प्राप्त
In reply to पश्चाच्चिकित्सा by गामा पैलवान
वेगळे मत
हे पटण्यासारखे आहे! एकंदरीत
In reply to वेगळे मत by हुप्प्या
मूळ प्रश्न
अशीच एक घटना आमच्या अम्बरनाथ मध्ये २००८ ला झाली
गुजराथ कनेक्शन!
आपल्याकडे काहीही शक्य आहे
मालकापैकी एकजण केमिकल
थोडी अधिक माहिती
ओ पैलवान,
In reply to थोडी अधिक माहिती by गामा पैलवान
सब गंदा है पर धंदा है ये..
दुर्दैवी
rahi +1
In reply to दुर्दैवी by राही
अगदी अगदी
In reply to दुर्दैवी by राही
औद्योगीक आस्थापना ( इस्टाब्लिशमेंट ) आणि फॅक्टरी अॅक्ट