म्युच्युअल फंड - भाग २
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना दोन प्रकारचे खर्च असतात. पहिलं म्हणजे फंड विकत घेताना किंवा विकताना वजावट म्हणजेच लोड (load) घेतले जाते. आता सेबीच्या (SEBI) नियमामुळे फ्रंट लोड Front load (जो कमिशनचाच एक प्रकार होता आणि जे फंड खरेदी करताना घेतले जायचे), ते बंद झाले आहे. गुंतवणूकदारांच्या दृष्टीने ही अतिशय चांगली गोष्ट आहे. पण फंड विकताना जी वजावट घेतली जाते म्हणजे एक्झिट लोड (Exit load) ते अजूनही चालू आहे. फंड तुम्ही जर १ किंवा २ वर्षात विकलात तर Exit load कापून तुम्हाला पैसे दिले जातात. फंडाच्या स्कीमनुसार १-२ वर्षांनी exit load शून्य होते.
मिसळपाव