नेमेची येतो पावसाळा तसे आम्ही विमा पॉलीस्या काढतो, आता एकदम मुद्यावर उडी मारतो, आधीच्या पिढ्यांचा विम्याचे हप्ते चुकण्याचा अनुभव पाहून, मी अगदी पहिली विमा पॉलीसी उतरवताना पासून; हप्ते वेळेवर न भरल्याने पॉलीसी बंद पडेल एवढा विमा न काढणे तसेच प्रिमीअम भरण्याच्या तारखेच्या आधीच्या तारखेला संपेल असे फिक्स डिपॉझीट आणि इतर गुंतवणूकीच्या व्यवस्थाही करण्याची दक्षता घेतली; तरीही विम्याच्या हप्त्याच्या तारखा चुकल्यावाचून राहील्या नाहीत.
असे का होते ? तुमचेही विम्याचे हप्ते कधी चुकले आहेत का ? आणि ज्यांचा हप्ता आजतागायत एकदाही चुकला नसेल ती मंडळी त्यांचे आर्थीक व्यवस्थापन कसे करतात ? किंवा वेळ ठरलेली देणी चुकू नयेत म्हणून आर्थीक व्यवस्थापन आणि आर्थिक शीस्त पाळण्यासाठी काय करावे ? या काथ्याकुटाचा उद्देश विमा पॉलीसींची चर्चा करणे नाही तर काढलेल्या विम्याच्या हप्ते असोत वा विशीष्ट वेळी परतफेड करावयाची देणी असोत, ती वेळेवर भरण्यासाठी लागणारे आर्थीक व्यवस्थापन आणि आर्थीक शीस्त विषयक प्रश्नांची दखल घेणे आहे.
या विषयावर चर्चा लावली असली तरीही मी इंश्युरन्स एजंट नाही, (आणि हितसंघर्षाचा मुद्दा नको म्हणून इतर सक्रीय इंश्युरंस एजंटांनी चर्चेत सहभागाचा मोह टाळल्यास आभारी असेन). मी मागे एका वेगळ्या धाग्यात खेळते भांडवल या विषयासंबंधाने आर्थीक शीस्त विषयक चर्चा केली होती; घरगुती आर्थीक व्यवस्थापन चुकण्याचा व्यवसायांवरचे परिणाम अप्रत्यक्ष असतात, आर्थीक कोंडी झालेली कर्मचारी असंतुष्ट होणे आणि मॅनपॉवर टर्नओव्हर वाढणे हे अप्रत्यक्ष परिणाम असू शकतात.
एकुण काढलेल्या विम्याचे असोत अथवा इतर विशीष्ट कालावधीने परतफेड करावयाची देणी असोत त्या कमीटमेंट्स यशस्वीपणे पार पाडण्याच्या गुरुकिल्लीचा शोध मिपाकरांच्या अनुभवाच्या बळावर घेणे हा या काथ्याकुटाचा विषय आहे.
प्रतिसाद टाईम मॅनेजमेंटच्या अनुषंगानी येताहेत, लेखाचा उद्देश अधिक स्पष्ट करावयाचे तर आर्थीक अडचणींमूळे हप्ते चुकू नयेत म्हणून करावयाच्या आर्थीक व्यवस्थापना बद्दल आहे.
या विषयावर पुर्वी चर्चा झाली असेल आणि कुणासाठी पुर्नउक्ती होत असेल तर क्षमस्व. अनुषंगिका व्यतरीक्त अवांतर टाळण्यासाठी आणि चर्चा सहभागासाठी आभार.
वर्गीकरण
वाचने
1972
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
विमा कंपन्यांचे ग्राहक सेवा
+१
In reply to विमा कंपन्यांचे ग्राहक सेवा by सतिश गावडे
एव्हढे मरणाचे एसएमएस आणि इमेल
=))
In reply to एव्हढे मरणाचे एसएमएस आणि इमेल by एस
एक मार्ग म्हणजे
मोबाईलवर हप्त्याचा दिवसाचा