Skip to main content

अँक्झायटी

दुध 'उतू' गेले .....

लेखक कर्नलतपस्वी यांनी मंगळवार, 12/05/2026 18:29 या दिवशी प्रकाशित केले.

 

पिशव्या शोधून काढून चावी घेतली...

येताना दोन किलो 'एक्स्ट्रा गोल्ड' घेऊन या...आणि हो, कारमधेच जा, ऊन खूप आहे. नाहीतर पेट्रोल वाचवायचे म्हणून जाल (बोंबलत) स्कुटीवर...

मी समजलो, ती सफोला गोल्ड तेला बद्दल बोलत होती. लोणचे घालायचे दिवस आहेत ना... 

लिफ्टमधे दहाव्या माळ्यावरच्या आजी भेटल्या. मोबाईलवर कुठलीतरी चित्रफित बघत होत्या. मला न बघता म्हणाल्या, "बरे झाले आगोदरच म्हाताऱ्यासाठी गुंजभर घेऊन ठेवलय!"

"ऑं?",  माझा प्रश्नार्थक चेहरा बघून पुढे म्हणाल्या, "आहो, मेल्यावर तुळशीपत्रा बरोबर तोंडात गोल्ड घालायला लागते ना! 

२-५-१०-१५ मिनीटे एकटेच थांबण्याच्या प्रसंगातील अँक्झायटी आणि वेळ व्यवस्थापन

लेखक माहितगार यांनी सोमवार, 21/12/2015 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या वेळ व्यवस्थापन विषयक धागा मालिका चालू केलेली आहे त्यातील पहिली चर्चा उशीरहोणार्‍यांसाठी (चांगल काही) (दुवा: http://www.misalpav.com/node/34159) सध्या चालूच आहे त्या चालू चर्चेला अजून २-४ दिवस फारस डिस्टर्ब न करता ह्या विषयावरील चर्चाही समांतर चालू राहू शकेल या अदमासाने हा विषय हातात घेतो आहे. काही जणांना काही विशीष्ट प्रसंगी तर बर्‍याच जणांना कोणत्याही प्रसंगी २-५-१०-१५ मिनीटे एकट्याने थांबण्याचा/ वेळ काढण्याचा प्रसंग -इथे एकटेच म्हणजे आपल्याशी वेव्हेलेंथ जुळणारी व्यक्ती सोबत नसणे एवढेच- आलातर कळत नकळत बरीच अस्वस्थता अँक्झायटी होत असावी.