अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत निरंजन घाटे यांचे विचार
एक जुना किस्सा आठवतो.
अंनिसच्या मिटींग मध्ये आमच्या एका कार्यकर्ता मित्राला निरंजन घाटे हे शनिपाराला तेल घेउन जाताना दिसले. त्याने लगेच मिटींगमध्ये टीकेची झोड उठवली . " निरंजन घाटे तुम्ही सुद्धा?" स्टाईलने. मग स्यूडो सायंटिस्ट, भंपक विज्ञानवादी अशी विशेषणे लावायला सुरुवात केली. थोडक्यात सगळ्यांनी त्यांना वाळीत टाकले. मी खालील मुद्दे मांडले
१) निरंजन घाटे हा ही माणूसच आहे
२) त्यांची त्या मागील भूमिका विचारुन न घेताच टीका करणे वैज्ञानिक दृष्टिकोनात बसत नाही व ते मला योग्य वाटत नाही.
३) एवढ्या एका कारणामुळे त्यांनी मराठी विज्ञान साहित्यात दिलेले योगदान लगेच विसरलात काय?
४) कुटुंबातील कुणाच्या तरी वतीने ते प्रतिनिधी या नात्याने पण आले असतील तर?
परिणामी मी निरंजन घाट्यांची वकिली करतो म्हणून मलाच वाळीत टाकायला सुरुवात केली. त्यानंतर बर्याच वर्षांनी मी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यावर एकदा निरंजन घाट्यांकडे भेटायला गेलो.गप्पांमधे त्यांना हा किस्सा सांगितला. मला त्यांचे मत जाणून घ्यायचे होते.त्यांचे लहानपण त्या भागात गेले होते. अनेक सुख दु:खाच्या स्मृती तिथल्या गोष्टींशी निगडीत होत्या. त्याच मनोव्यापाराचा भाग म्हणून ते शनिपाराला जात असत. हाच तो सर्वसामान्य माणूस असल्याचा भाग होता. नंतर एकदा पुस्तक पेठेत ते भेटले होते. त्यावेळी ही गप्पात अंधश्रद्धा निर्मूलन हा विषय निघाला त्यावेळी ते म्हणाले कि.समाज बदलायला पुरेसा वेळ दिला पाहिजे. मी त्यावर लिहिल आहे.
वाचत सुटलो त्याची गोष्ट या पुस्तकात ते म्हणतात," गार्डनर चे पुस्तक आणि जॉन ग्रँट च ‘ बोगस सायन्स ऑर व्हाय पिपल रियली बिलीव्ह दीज थिंग्ज ‘ हे पुस्तक वाचताना मला नरेंद्र दाभोळकर आणि श्याम मानव यांच्या पुस्तकांची आठवण झाली. मी या दोघांचीही बरीच पुस्तके वाचली आहेत. श्याम मानव यांची आणि माझी 1978 च्या सुमारास नागपूर मध्ये ओळख झाली. त्यांच्या कार्याचे महत्व मी जाणतो. नरेंद्र दाभोळकरांची आणि माझी ही ओळख होती. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे व्रत प्राणपणाने घेतलं होतं आणि त्यातच त्यांचा बळी गेला. पहिल्या अंधश्रद्धा निर्मूलन संमेलनात त्यांची माझी भेट झाली तीच शेवटची. त्यानंतर महिन्याभरातच त्यांचा मृत्यू झाला. संमेलनातल्या माझ्या भाषणातील मुद्दे आणि त्यांचे विचार जुळणारे नव्हते, तरी त्यांच्या कार्याबद्दल मला आदर होता. त्यांनी माझे विचार ऐकून घेतले. त्यावेळी त्यांनी निरोप देताना ‘आपले विचार एकाच प्रकारचे आहेत,पण आपले मार्ग भिन्न आहेत’ असे म्हटले होते.
कुठलीही चळवळ पुढे रेटायची तर नेता आक्रमक असावा लागतो, तरच चळवळ पुढे जाते. मात्र बऱ्याचदा या आक्रमकपणाला, क्रियेला तितकीच आक्रमक प्रतिक्रिया अशा स्वरूपाचं उत्तर मिळतं. दोन्हीही पक्ष अधिक कडवे होत जातात. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीने पुढे देवाला विरोध करायचे सोडले आणि बुवाबाजीला विरोध सुरू केला. मग अनेक बुवा उघड केले . पण बुवांकडे जशी अमाप संपत्ती जमली होती तशी चळवळीकडे नव्हती हे एक, आणि या चळवळीच्या नेत्यांच्या पुस्तकांची भाषा अगदी कोरडी होती. त्यात एक प्रकारची भावना शून्यता असे. तुलनेने मला मार्टिन गार्डनर , जॉन ग्रँट यांची पुस्तके आदर्श वाटतात.ती वाचकाला आपलं करतात.
अंधश्रद्धेबाबत माझ म्हणण थोडं वेगळं आहे.ती गेली कित्येक शतकं समाजात रूढ आहे.ती एका दिवसात जाणार नाही. अशाश्वत जीवन, दारिद्र्य आणि सततची चिंता यामुळे अंधश्रद्धा वाढीस लागते.’ गप्पी मासे पाळा आणि मलेरिया पळवा’अशी घोषणा देता येते. अंधश्रद्धा पळवणारे गप्पी मासे मिळत नाहीत. त्यापेक्षा हळूहळू अंधश्रद्धेच्या पाईकांना फितूर करता आले तर आपोआपच अंधश्रद्धेला म्हणजे मूलतः बुवाबाजीला भगदाड पडतील असे मला वाटते. अंधश्रद्धेचा आणि विज्ञानाचा तसा जवळचा संबंध नाही. अंधश्रद्धा हा मानसशास्त्राचा भाग आहे. ती दूर करायची तर त्यासाठी भक्तांची मनोधारणा बदलणं महत्त्वाचं ठरतं. माझे हे विचार मी स्पष्टपणे मांडत आलोय आणि हळूहळू अंधश्रद्धेवर सतत सौम्य हल्ले चढवत आलोय. मी भू शास्त्राचा विद्यार्थी असल्याने वाहतं पाणी खडकांवर कसा कसा परिणाम करते याची मला कल्पना आहे. विज्ञान लेखन हेच काम करतं .श्रद्धा मानवी जीवनाला घातक असती तर ती उत्क्रांतीत कधीच नष्ट झाली असती.पण ती टिकली. मात्र, ‘अति सर्वत्र वर्ज्ययेत’ या न्यायाने श्रद्धेचा अतिरेक होण्यापासून समाजाला वाचवण हे महत्त्वाचं ठरतं . मार्टिन गार्डनर आणि जॉन ग्रँट यांनी हे काम लेखणीद्वारे कसं करावं याचा आदर्शच घालून दिला आहे ."
वर्गीकरण
याद्या
57139
प्रतिक्रिया
119
मिसळपाव
प्रतिक्रिया
अनेक सुख दु:खाच्या स्मृती
बाकी घाटेंनी दिलेले
In reply to अनेक सुख दु:खाच्या स्मृती by जॉनविक्क
तुमचे वेगळे मत मान्डु शकता ना
In reply to बाकी घाटेंनी दिलेले by जॉनविक्क
हो. आणि वेगळं मतं असलेल्यांचा
In reply to तुमचे वेगळे मत मान्डु शकता ना by प्रकाश घाटपांडे
http://misalpav.com/node
In reply to हो. आणि वेगळं मतं असलेल्यांचा by जॉनविक्क
पका काकांकडे
In reply to तुमचे वेगळे मत मान्डु शकता ना by प्रकाश घाटपांडे
बघितला पाहिजे.
In reply to पका काकांकडे by शशिकांत ओक
चांगल्यात वाईट
In reply to बघितला पाहिजे. by प्रकाश घाटपांडे
विचारा बर त्यांना. कदाचित
In reply to चांगल्यात वाईट by शशिकांत ओक
कुबेरांना नव्हे
In reply to चांगल्यात वाईट by शशिकांत ओक
जॉनी लिव्हर आणि पका काका
In reply to पका काकांकडे by शशिकांत ओक
मै वही कहता हु मै आपकी तरफ हू
In reply to जॉनी लिव्हर आणि पका काका by शशिकांत ओक
ओह आप उस तरफ होक्या
In reply to मै वही कहता हु मै आपकी तरफ हू by प्रकाश घाटपांडे
+१ सहमत.
In reply to बाकी घाटेंनी दिलेले by जॉनविक्क
वाचत सुटलो त्याची गोष्ट यातील
In reply to +१ सहमत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अंधश्रद्धा निर्मूलन
यावरुन
अंनिसच्या कार्याचा आदर आहेच.
अन्धश्रद्धा म्हणजे पिवळा
In reply to अंनिसच्या कार्याचा आदर आहेच. by राघव
श्रद्धा
In reply to अंनिसच्या कार्याचा आदर आहेच. by राघव
माणसाच्या आयुष्यात जेंव्हा
पहिल्यांदा सहमत.
In reply to माणसाच्या आयुष्यात जेंव्हा by सुबोध खरे
चोख प्रतिसाद.
In reply to माणसाच्या आयुष्यात जेंव्हा by सुबोध खरे
अगदी सहमत आहे. माझ्या
In reply to माणसाच्या आयुष्यात जेंव्हा by सुबोध खरे
जगातली सर्वात मोठी अंधश्रद्धा
सहमत आहे. काही लोक
In reply to जगातली सर्वात मोठी अंधश्रद्धा by डॉ सुहास म्हात्रे
जगातली सर्वात मोठी अंधश्रद्धा
In reply to जगातली सर्वात मोठी अंधश्रद्धा by डॉ सुहास म्हात्रे
मुळात "मी विज्ञानवादी" किंवा
नक्कीच. आजच्या ज्ञात
In reply to मुळात "मी विज्ञानवादी" किंवा by बोलघेवडा
निर्मूलन?
आपले म्हणणे पटणारे आहे.
In reply to निर्मूलन? by स्वधर्म
चांगली चर्चा
हे खोटे आहे
In reply to चांगली चर्चा by जालिम लोशन
अंधश्रद्धा ही देशापुढील
In reply to हे खोटे आहे by रविकिरण फडके
अवांतर : नरेंद्र दाभोलकर फ्रॉड आहे
तुम्ही सनातनचे साधक का ? रे
In reply to अवांतर : नरेंद्र दाभोलकर फ्रॉड आहे by गामा पैलवान
Nishapariआपल्या माहितीतली एखादी चांगली संघटना सुचवा!
In reply to तुम्ही सनातनचे साधक का ? रे by nishapari
मनःशांती आणि स्वउन्नतीसाठी -
In reply to Nishapariआपल्या माहितीतली एखादी चांगली संघटना सुचवा! by जालिम लोशन
साधकांची साधकांनी साधकांसाठी चालवलेली संस्था
In reply to तुम्ही सनातनचे साधक का ? रे by nishapari
दाभोलकरांनी केलेल्या
In reply to साधकांची साधकांनी साधकांसाठी चालवलेली संस्था by गामा पैलवान
एखाद्या महासभेचा चष्मा लावलेला असेल.
In reply to दाभोलकरांनी केलेल्या by nishapari
जिथे विचार थांबतो
In reply to तुम्ही सनातनचे साधक का ? रे by nishapari
गा पेै निरंजन घाटे म्हणतात
गा पेै निरंजन घाटे म्हणतात
गा पेै निरंजन घाटे म्हणतात
गा पेै निरंजन घाटे म्हणतात
चूक दाखवल्याबद्दल आभार
In reply to गा पेै निरंजन घाटे म्हणतात by प्रकाश घाटपांडे
माझ्या मते चळवळ, संस्था, आणि
In reply to चूक दाखवल्याबद्दल आभार by गामा पैलवान
अवांतर
In reply to माझ्या मते चळवळ, संस्था, आणि by आनन्दा
सहमत नाही.
In reply to अवांतर by आनन्दा
गांधींच्या अनुभवानंतर माझ्या
In reply to सहमत नाही. by प्रकाश घाटपांडे
व्यक्तिशः मला सनातन चे विचार
In reply to माझ्या मते चळवळ, संस्था, आणि by आनन्दा
अवांतर १)
हे बदल मेंदुतील जैवरासायनिक
In reply to अवांतर १) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मेंदुतला माणुस
In reply to हे बदल मेंदुतील जैवरासायनिक by प्रकाश घाटपांडे
असंच असेल तर..
In reply to हे बदल मेंदुतील जैवरासायनिक by प्रकाश घाटपांडे
मला स्वत:ला मात्र हे सगळे
In reply to असंच असेल तर.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शनिला तेल वाहणे आणि
नक्की काय
निसर्गाने(देवाने) माणसाला प्रगत मेंदू दिला आहे
कर्मकांडाला विरोध हवा
सहमत आहे. पुरोगाम्यांची
In reply to कर्मकांडाला विरोध हवा by सुबोध खरे
शब्दखेळ करत आहात
In reply to सहमत आहे. पुरोगाम्यांची by प्रकाश घाटपांडे
कर्मकांड म्हणजे ते वाईटच वा
In reply to शब्दखेळ करत आहात by Rajesh188
मला भेद व्यक्त करणारा शब्द सापडला नाही
In reply to कर्मकांडाला विरोध हवा by सुबोध खरे
कर्मकांड का करायचं? हेतू काय?
In reply to मला भेद व्यक्त करणारा शब्द सापडला नाही by Rajesh188
खरे बुवा ,
In reply to कर्मकांडाला विरोध हवा by सुबोध खरे
काही गोष्टी वर चर्चा टाळण्याचा कल असतो
दाभोलकरी घपल्यांची धारिका
ओह माय गॉड...
In reply to दाभोलकरी घपल्यांची धारिका by गामा पैलवान
ओके मी कोणी मोठा व्यक्ती नाही की अधिकाराने मी बरोबरच असे म्हणेन
In reply to ओह माय गॉड... by जॉनविक्क
एकाच धर्मावर टीका
आमचे घाटपांडे काका वस्ताद
हा हा हा
In reply to आमचे घाटपांडे काका वस्ताद by गवि
मीच होतो तो. लहानपणी
In reply to हा हा हा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
.
In reply to मीच होतो तो. लहानपणी by प्रकाश घाटपांडे
बायनरी तुन सुटका
In reply to आमचे घाटपांडे काका वस्ताद by गवि
तेल हा महत्वाचा मुद्दा नाही.
In reply to बायनरी तुन सुटका by प्रकाश घाटपांडे
तर्कनिष्ठ आणि विज्ञानवादी
In reply to तेल हा महत्वाचा मुद्दा नाही. by गवि
मला पुस्तकातून जेव्हढे घाटे
In reply to तेल हा महत्वाचा मुद्दा नाही. by गवि
वाचत सुटलो त्याची गोष्ट हे
In reply to मला पुस्तकातून जेव्हढे घाटे by आनन्दा
गविसेठशी सहमत.
In reply to तेल हा महत्वाचा मुद्दा नाही. by गवि
मुद्दा महत्वाचा आहे>>>>
In reply to तेल हा महत्वाचा मुद्दा नाही. by गवि
प्लिज कन्फ्युजन क्रिएट करू
In reply to मुद्दा महत्वाचा आहे>>>> by प्रकाश घाटपांडे
मी फक्त प्रतवारीचा मुद्दा
In reply to प्लिज कन्फ्युजन क्रिएट करू by गवि
कुणी घराबाहेर पडताना डावा
ती व्यक्ती सार्वजनिक भूमिकेत
In reply to कुणी घराबाहेर पडताना डावा by कंजूस
काही श्रद्धेमुळे इतरांना
काही जण तर असे वाहिलेले तेल
श्रद्धाळु लोकांना एकमेकांचे
दृढ श्रद्धा
ते धारण करायची मनाची क्षमता
In reply to दृढ श्रद्धा by गामा पैलवान
न डळमणाऱ्या श्रध्देला “निष्ठा
In reply to दृढ श्रद्धा by गामा पैलवान
हिंदुस्थान time
त्यांचे लहानपण त्या भागात
लाईनीत उभे होते ना? मग झाल.
In reply to त्यांचे लहानपण त्या भागात by सुबोध खरे
परंतु जर तुम्ही सार्वजनिक
In reply to त्यांचे लहानपण त्या भागात by सुबोध खरे
आपल्या कथेत सूर्याने विरोधाभासी भूमिका घेतलेली नाही
In reply to परंतु जर तुम्ही सार्वजनिक by प्रकाश घाटपांडे
आपल्या मताचे्ही स्वागत आहे.
In reply to आपल्या कथेत सूर्याने विरोधाभासी भूमिका घेतलेली नाही by जॉनविक्क
पुण्यात काही लपून राहात नाही.
काही गंभीर शंका
https://youtu.be/e5bCVPlXP3Y
In reply to काही गंभीर शंका by Rajesh188
पांडुला हा धागा फारफार आवडेल.
अनिसवरचे आरोप
न्यायालयात खटला सरकारने दाखल
In reply to अनिसवरचे आरोप by गामा पैलवान
न्यायालयात खटला सरकारने दाखल करायला हवा (बहुतेक).(बहुतेक) आपणही जनहित याचिका दाखल करू शकता.कारण सरकारी कायद्यांचा भंग झाला आहे. मात्र तिथनं अशी काही हालचाल दिसून येत नाही.सर्व कायदे सरकारीच असतात, खाजगी कायदा हा प्रकारही सरकारच्या कायद्याशिवाय बेकायदेशीरच. सबब आपण हे करू शकता.अनिसचं यावर काही मत असेलसं वाटंत नाहीत्यांना स्टॅन्ड तर घ्यावाच लागेल. बाकी तज्ञ बोलतीलच तो पर्यंत आरोप ठेवले जाणं म्हणजे गुन्हा सिद्ध होणं न्हवे असं समजून सत्य जनते समोर येईलच व आलेच पाहिजे याची खात्री बाळगूया.एक गोम आहे ....
In reply to न्यायालयात खटला सरकारने दाखल by जॉनविक्क
ठीक आहे.
In reply to एक गोम आहे .... by गामा पैलवान
हि मोठी कामाची गोष्ट केली
In reply to ठीक आहे. by जॉनविक्क
धन्यवाद मंदार
In reply to हि मोठी कामाची गोष्ट केली by महासंग्राम
श्रद्धा मानवी जीवनाला घातक
श्रद्धा या गोष्टीचा संबंध काय
In reply to श्रद्धा मानवी जीवनाला घातक by नगरीनिरंजन
सर्वोच्च न्यायालयात माझा
घड्याळ = श्रद्धा !
In reply to सर्वोच्च न्यायालयात माझा by सुबोध खरे
मानवी मन हे अत्यंत जटील अशी
In reply to सर्वोच्च न्यायालयात माझा by सुबोध खरे
माई साहेब मोड ऑन
"सगळ्यात सुंदर श्रद्धा हि
In reply to माई साहेब मोड ऑन by महासंग्राम
"सगळ्यात सुंदर श्रद्धा हि कपूरांची, बाकी सब झूठ असे आमच्या ह्यांचे ठाम मत आह !"हे मत म्हणजे, ही माई मोडमध्ये गेल्यावर असणारी, तुमची श्रद्धाच आहे. ;)हे पटले. कुठ श्रद्धा
In reply to माई साहेब मोड ऑन by महासंग्राम
तिसरी गोष्ट म्हणजे आमच्याच
म्हणजे यातला मी हा जीए आहे का
In reply to तिसरी गोष्ट म्हणजे आमच्याच by महासंग्राम