मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझी कविता

संध्याराणी

शार्दुल_हातोळकर ·
लेखनविषय:
काव्यरस
निष्पाप कळी तुटताना गहिवरली संध्याराणी हलक्याच प्रकाशामध्ये डोळ्यांतुन झरले पाणी पानांची सळसळ नाही थिजलेली अवघी सृष्टी अन् उनाड वेडा वारा निमिषातच झाला कष्टी थरथरल्या दुःखी फांद्या भ्रमरांची खंडीत गाणी संध्येच्या ह्रदयामधली अगतिकता पानोपानी अनिवार बुडाल्या शोके लतिकाही लेकुरवाळ्या कोमेजुन झुकल्या खाली सुंदरशा उंच डहाळ्या फुललेली हजार पुष्पे आक्रंदती मुक बिचारी नटलेल्या वनराईच्या ही कशी अवकळा दारी विणलेली अपार स्वप्ने संध्येने कळीच्याभवती दुष्टांच्या पुरवित मोहा नियतीला पर्वा नव्हती गतिमान परि काळाची अविरत धावती चाके सारुन पुन्हा तिमिराला तेजोमय प्रकाश फाके संध्येची बनली रजनी उधळीत तमाच्