मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जलरंग - स्टोरी ऑफ अ हाउस...

एस · · मिपा कलादालन
Story of a House माध्यम : जलरंग (वॉटरकलर्स ऑन पेपर) आकार : २५ × ३६ सेंमी अंदाजे (हे चित्र काढायला जेवढा त्रास नाही झाला तेवढा मोबाइलवरून अपलोड करून, त्याची लिंक धाग्यात देऊन धागा काढायला झाला. हुश्श्श! रंगवलंय आपलं काहीतरी. गोड मानून घ्या देवा! एक गोष्ट मात्र कळली, आपल्याला पेंटिंगसुद्धा येत नाही...! :-) )

वाचने 7007 वाचनखूण प्रतिक्रिया 76

पद्मावति Sun, 09/13/2015 - 18:42
आहा! सुपर्ब. ह्या चित्रातले घर खूप छान वेलकमिंग vibes देतंय. मस्तं जमलं आहे. पाहताक्षणीच आवडलं.

कंजूस Sun, 09/13/2015 - 18:46
आवडलं.खिडकी आणि छपराखालचा काळोख मस्त. दर महिन्याला एक चित्र माहित असलेल्या जागेचं हवं. वाई,बनेश्वर,कात्रज,पुणे युनिवर्सिटी,आयुका,शिंदेछत्री,शेतकी कॅालेज इमारत,पणे स्टेशन,मंडई.

In reply to by एक एकटा एकटाच

सुबोध खरे Mon, 09/14/2015 - 09:07
या न्यायाने मला डॉक्टरकि पण येत नाही. दुसरं काहीहि येत नव्हतं/ नाही. ( चरितार्थासाठी काय करावे या विचारात असलेला सुबोध?)

मारवा Sun, 09/13/2015 - 19:21
एक्स्टसी !!!!!!! अत्यंत सुंदर चित्र ! ते छत जिथे उतरत दिसतं तिथे दुर वर बघितलयं असा भास होतो तो कसा साधला जातो हो इत्कुश्या जागेत ? हा डायमेन्शन चा खेळ कसा असतो हो फार जादु असते नाही तुम्ही रॉब गोन्सालविस ची चित्रे बघितलीय का हो स्वॅप्स तो ही असाच डायमेन्शन्स चे भन्नाट प्रयोग करतो. हे जरा खुलवुन गावठी भाषेत सांगा बर

In reply to by मारवा

एस Sun, 09/13/2015 - 21:54
धन्यवाद! पर्स्पेक्टिव्ह आणि डेप्थ दाखवण्यासाठी जवळच्या विषयवस्तू अधिक स्पष्ट व गडद रंगवतात, तर दूरच्या वस्तू अस्पष्ट आणि फिकट रंगवतात किंवा फक्त सूचित करतात. अधिक सविस्तर प्रतिसाद नंतर देतो.

मस्तं आहे चित्र ! जलरंग हे कठीण माध्यम आहे. त्यावर इतपत हुकुमत असून "आपल्याला पेंटिंगसुद्धा येत नाही...!" असं म्हणणं हे विनयाचे लक्षण आहे !

मारवा Sun, 09/13/2015 - 19:25
त्या डौलदार स्वाक्षरीच्या शेवटाला तो लव्हर्स लोकांचा बदाम दिसतोय तसच दिसणं अपेक्षीत आहे की मी काही चुकीच पाहतोय. स्वॅप्स तुमच्याशी काही चित्रकारांविषयी गप्पा मारायला आवडेल तुमची मत जाणुन घ्यायला आवडॅल तुमची अजुन चित्र असतील तर टाका ना प्लीज

In reply to by मारवा

एस Sun, 09/13/2015 - 21:57
होय, तो बदामच आहे माझ्या स्वाक्षरीतला. :-) बादवे, 'ग्राफॉलॉजी' मध्ये तुम्हांला रस आहे का? ;-)

आदूबाळ Sun, 09/13/2015 - 19:26
माशाल्ला! कोणते रंग वापरता? छपराखाली आणि खिडक्यांना कोणता रंग दिला आहे? एकदा स्टेप बाय स्टेप पण अपलोड करा. मला शिकायाला मिळेल.

In reply to by द-बाहुबली

एस Sun, 09/13/2015 - 21:31
धन्यवाद, हा हॅण्डमेड पेपर आहे. रफ फिनिशिंगचा, अ‍ॅसिडफ्री. जलरंगात कागद हाच पृष्ठभाग वापरावा लागतो. इतकेच नाही, तर कागद कशा दर्जाचा आहे ह्यावर चित्र कसे होईल हे बर्‍याच प्रमाणात अवलंबून असते. कागद व जलरंग यांच्यात होणार्‍या क्रीडेमध्ये कलाकार फक्त आपला थोडासा हातभार लावत असतो.

In reply to by आदूबाळ

एस Sun, 09/13/2015 - 21:50
या चित्रासाठी एकूण सात रंग वापरले आहेत. (याच क्रमाने पॅलेटमध्ये घेतले - ) प्रशियन ब्लू, कोबाल्ट ब्लू ह्यू, सॅप ग्रीन, गॅम्बोज ह्यू, पर्मनंट ऑरेंज, लाइट रेड आणि रॉ अ‍ॅम्बर. या चित्रात पर्स्पेक्टिव्ह फार महत्त्वाचा होता. तो थोडासा चुकलाय. आधी एक 'ब्लॉक' रेखाचित्र काढून मग बेसिक वॉशेस दिले. उजव्या भिंतीवरील ब्रशवर्क ब्लॉक केले. मग डाव्या भिंतीवरील दारे व खिडक्या ब्रशच्या फटकार्‍यांनी दाखवल्या. हे सगळे वाळू दिले. नंतर छपराखालची सावली काढली. शेवटी ओट्याचे दगड रंगवले. नंतर ड्राय ब्रश टेक्निकने हवे तेथे वॉशेस फिकट केले. मग गडद रंगाचे छप्पर रंगवले व खिडक्यांचे गज काढले. घर पूर्ण होईस्तोवर डावीकडील झाडी काढण्यासाठी वेट-इन-वेट वॉशेस दिले. ते वाळल्यावर स्प्रिंकल पद्धतीने झाडी रंगवली व पुन्हा त्यात थोडेथोडे पाण्याचे थेंब उडवले. अशा रीतीने सर्व चित्र पाच ते सहा पायर्‍यांमध्ये पूर्ण करून सही केली! ;-) हे सर्व रंग जसेच्या तसे न वापरता एकमेकांत रंगछटा मिसळून वापरलेत. छपराच्या गडदपणासाठी प्रशियन ब्लू व रॉ अ‍ॅम्बर मिसळले. सावली ही तीन वॉशेस मध्ये केली. हे सर्व वॉशेस देताना आधी फिकट व क्रमाने गडद रंग दिले. खिडक्यांच्या आकाशी निळ्या लाकडी चौकटींसाठी दोन्ही निळे रंग व थोडा अ‍ॅम्बर मिक्स केलेत. त्यातही तीन वॉशेस आहेत.

नाव आडनाव Sun, 09/13/2015 - 21:38
मस्तं. एक-एक करून बाकी चित्रं (आणि नंतर फोटू) पण येऊ द्या. हे लई दिवसांपासून सांगणार होतो पण "आप कि फर्माईश" चा ऑप्शन नाही :) आता चानस गावलाय तं सांगतो :)

In reply to by नाव आडनाव

एस Sun, 09/13/2015 - 22:20
धन्यवाद. याआधीही मिपावर मी जलरंग आणि पेन्सिलशेडिंगमधली चित्रे टाकली आहेत. माझ्या प्रोफाइलमध्ये दुवे सापडतील. इथे देणे जाहिरात केल्यासारखे वाटते! :-)

In reply to by एस

नाव आडनाव Mon, 09/14/2015 - 10:11
त्यातले दोन / तीन धागे बघितले आणि आवडले होते, म्हणून तर सांगितलं (फर्माईश केली :) ) अजून येऊ द्या म्हणून :)

In reply to by पैसा

एस Sun, 09/13/2015 - 23:10
तुमच्याच प्रतिसादाची वाट बघत होतो. :-) होप, आय कॉट द स्टोरी वेल... (पाहिजे का? व्यनि करा पत्ता. देतो धाडून. पण थोडे दिवस लागतील.)

In reply to by एस

प्रीत-मोहर Mon, 09/14/2015 - 08:36
बघताक्षणीच ओळखल की पैसाक्काच रतागिरीतल घर आहे , आणि पैसाक्क्काच्या प्रतिसादाने त्याच्यावर शिक्कामोर्तब झाल. स्वॅप्स खुपच सुंदर झालय चित्र!!!!

एस Sun, 09/13/2015 - 23:43
पद्मावति, कंजूस, मित्रहो, मारवा, पियुशा, द बाहुबली, डॉ सुहास म्हात्रे, आदूबाळ, नीलमोहर, खटपट्या, अभ्या, चाणक्य, प्यारे१, रातराणी, स्नेहाताई, पैतै, वल्ली आणि चुकून कोणी राहिले असल्यास, सर्वांना प्रतिसादांबद्दल धन्यवाद. सर्व वाचकांचेही आभार. सविस्तर उत्तरे उद्या-परवा देतो.

किसन शिंदे Mon, 09/14/2015 - 01:19
चित्र प्रचंड आवडलं! बाकी प्रत्येक कलाकार जाता जाता 'ह्यॅ..आपल्याला काय एवढी कला अवगत नाय' असंच का म्हणतो? ;) स्वॅप्ससाहेब हलके घ्या.

चित्रगुप्त Mon, 09/14/2015 - 06:42
डावीकडील झाड एकदम मस्त. उजवीकडील घराचं पर्स्पेक्टिव्ह पार गंडलंय राव. अश्या प्रकारच्या चित्रात प्रत्येक स्ट्रोकचा काहीतरी 'अर्थ' असायला हवा असतो. म्हणजे फांदी, ढग, विटा, जमीन, पाने वगैरे काहीतरी दर्शवण्यासाठी रंग लावलेला असतो. तर चित्राच्या वरील भागात झाड आणि आकाश यांच्या मधे जो एक मोठासा मातकट रंगाचा आकार आहे, तो निरर्थक पणे आलेला वाटतो. त्यात थोडा हिरवा रंग टाकून तो झाडाचा भाग आहे, असे दाखवता येईल. खास पर्स्पेक्टिव्हच्या दृष्टीने खूपशी रेखाटने केली, की अगदी सहजपणे ब्रश वा पेन्सिल चालवली, तरी अचूक पर्स्पेक्टिव्हच येते, तसा सराव करावा, असे सुचवतो. नुस्ती झाडे, डोंगर, आकाश, पाणी वगैरे रंगवताना पर्स्पेक्टिव्हचा फारसा संबंध येत नाही, मात्र एकादी लहानशी वस्तू, घर, इमारत वगैरे चित्रात असेल, तर पर्स्पेक्टिव्ह अचूक हवेच. माझ्याकडून तरी तुम्हाला लै भारी, अल्टिमेट, मार्व्हलस वगैरे प्रतिसादाची अपेक्षा नसेल, असे गृहित धरून हे लिहीत आहे, ... क्षमा केली पाहिजे. खालील पुस्तके अभ्यासनीय वाटतील: .

In reply to by चित्रगुप्त

स्रुजा Mon, 09/14/2015 - 09:26
स्वॅप्स आणि चित्रगुप्त, चित्रातला पर्स्पेक्टिव म्हणजे काय? आमच्यासारख्यांना ज्यांना यातली तात्रिक बाजु समजत नाही त्यांच्यासाठी हा पर्स्पेक्टिव बदलल्याने अथवा सुधारल्याने काय दिसेल? म्हणजे आमचा अनुभव कशा प्रकारे वेगळा असेल तेंव्हा?

In reply to by स्रुजा

अभ्या.. Mon, 09/14/2015 - 10:54
स्रुजातै, ईडी झाले असेलच अभ्यासाला. ओर्थोग्रफिक अन आयसोमेट्रिक व्ह्यु पण अभ्यासले असत्तील असे ग्रुहीत धरुन सांगतोय. अ‍ॅक्चुअल असते ते आयसोमेट्रिक अन आपल्या नजरेला दिसते ते परस्पेक्टीव्ह. आपल्या नजरेला एक बिंदू असतो त्यापलिकडे आपण पाहू शकत नाही. त्या काल्पनिक बिंदूला व्हॅनिशिंग पॉईंट म्हणतात. परस्पेक्टीव्ह त्यावर अवलंबून असते. p आता खाली दिलेले चित्र पाहा. p2 माझ्या मते अंदाज आला असेल. अवांतरः स्वॅप्सबुवांची कलाकारी लाजवाब आहे यात संशय नाही पण मला चित्र पाहताच वाटले होते की हे फोटोवरुन केलेले आहे. पैकाताईने टाकलेला फोटो पाहून खात्री पटली. अगदी सुरुवातीलाच मी अन चित्रगुप्त साहेबांनी सुचवल्याप्रमाणे परत सांगू ईच्छितो प्लीज फोटोवरुन लँडस्केप करणे सोडा. त्यात मज्जा नाही. कसेही येऊ द्या पण अ‍ॅक्चुअल पाहून करा. कुठल्याही चित्रकला महाविद्यालयाचा प्राथमिक नियम आहे तो. एखादा छंद म्हणून आपण करताय म्हणून ठिक आहे पण निसर्गचित्राची मजा निसर्गातच. मी अजून खूप लहान आहे या क्षेत्रात तरी औध्दत्याबद्दल क्षमा असावी.

In reply to by अभ्या..

स्रुजा Mon, 09/14/2015 - 17:24
झेपलं, धन्यवाद. चांगलं उदाहरण निवडलंत. ईडी झालंय अभ्यासाला, पण रीफ्रेशर हवा होता (असं मनाची लाज आहे म्हणुन म्हणते ;) )

In reply to by चित्रगुप्त

एस Mon, 09/14/2015 - 15:36
धन्यवाद! म्हणूनच तर म्हटलंय की मला पेंटिंगसुद्धा येत नाही. :-) संदीप खरेंच्या शब्दांत, माझ्या कलेत 'पवित्र व्यभिचार' आहे! :-) :-)

भाऊ and u say u don't know how to paint!! तुमचा मोठेपणा झाला तो भाग, देवा गॉड गिफ्ट आहे हे! अजुन मोकळे व्हा खुप खुप रंगवा चित्रे आम्हाला आनंद द्या! कसले पेंटिंग आहे राव! तबियत से दिल खुश हुआ