Skip to main content

योगायोगाने झालेली कलाकृती

लेखक sanjivanik१ यांनी शनिवार, 26/10/2013 21:16 या दिवशी प्रकाशित केले.
चहा गाळताना गाळणीवर मिळालेला हृदय सदृश्य आकार a
लेखनविषय:

वाचने 93144
प्रतिक्रिया 144

प्रतिक्रिया

In reply to by पैसा

ज्योतायचं कंपूचं स्वप्न साकारलं तर.... आता मी सुखानं डोळे मिटायला मोकळा! ;) बाकी नवलेखकांच्या निमित्तानं संपादकांमधली ही लुटुपुटूची लढाई पाहून ड्वाळे पाणावले... ड्वाळ्यावरुन आठवलं अरे तो स्पावड्या कुठंय ? :)

धाकाकर्त्याला कुठुन चहा गाळला आणि हृदय सदृश्य आकाराचा फोटो मिपावर शेअर केला असं झालं असेल! आता ह्यापुढे काहिहि गाळताना (चहा/कॉफि बरं!) तो फोटो म्हणुन काय घेणार नाहि :D

In reply to by दिपक.कुवेत

आता ह्यापुढे काहिहि गाळताना (चहा/कॉफि बरं!) तो फोटो म्हणुन काय घेणार नाहि एवढंच नाही तर चहा गाळताना लेखकाला नेहमी त्यांत मुवि, वल्ली, धन्या, बॅटमन, अआ, गिरीजा इ चे व्हर्चुअल आकार दिसू लागतील... मोंगलांना पाण्यात धनाजीसंताजी दिसत असत तसे... काय्हा छ्ळ्वाद न्विन मेंब्राचा ! टीव्र णीषेढ ! (मनोगत: पुढचा धागा: "मिपाकरांचे डोके ठिकाणावर आहे काय?" :) ;) )

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

(मनोगत: पुढचा "लोकमान्य" धागा: "मिपाकरांचे डोके ठिकाणावर आहे काय?" ) असे वाचावे :)

In reply to by sanjivanik१

sanjivanik१ यास, तुम्ही प्रत्येक प्रतिक्रियेला उत्तर देवून स्वत:चा धागा 'शतकी' करायच चंग बांधला आहे का? ;) (कृ.ह.घे) :)

In reply to by किसन शिंदे

किसन यास, शतकी करायची हौस मला अजिबात नहि. लोकांनी प्रतिक्रियाच अशा दिल्या आहेत कि त्याला प्रतिक्रिया द्याविशीच वाटते . मी प्रत्येकाला नाही तर ठराविक प्रतिक्रियांनाच उतारे दिली आहेत आपण जर लक्ष पूर्वक बघितले तर. मुख्य धागा बाजूला ठेवून माझ्या प्रतिक्रिया वर तुमच लक्ष केंद्रित झाल याच मात्र हसू येत.

In reply to by sanjivanik१

मुख्य धागा बाजूला ठेवून माझ्या प्रतिक्रिया वर तुमच लक्ष केंद्रित झाल याच मात्र हसू येत.
त्यांच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही. सभ्यपणाचा बुरखा पांघरुन अशा गोष्टी करायची त्यांना सवय आहे.

In reply to by sanjivanik१

कधी कधी मिपावर पोस्ट केल्याचे वाईट वाटते काही काही प्रतिक्रिया वाचुन.
मग तुम्ही हे मुक्तपीठवर टाकुन पहा ना जरा =))

एका पेल्यात होते, गाळणे सुबक सुरेख , होती विरत थोडी , मलई तयात एक . मलईस दुख: भारी , भोळी वीरे कपाशी , पिण्यास चहा जाता, तीच येते मिशाशी . सारून दूर तिजला , म्हणती चिडून लोक होती विरत थोडी , मलई तयात एक . एके दिनी परंतु ,सायीस त्या कळाले, भय दुख पार तिचे, गाळणीतुनी गळाले , भिंगातूनी पाहता , संजीवनी क्षणैक , तिजला कसे कळाले, शतकीच धागा एक.

In reply to by शैलेन्द्र

लय भारी.... लवकरच आम्ही एक धागा काढायचा विचार करत आहोत. "मिपाची तर्री" त्यात ह्या कवितचा नक्की समावेश करु.

In reply to by शैलेन्द्र

भिंगातूनी पाहता , संजीवनी क्षणैक , तिजला कसे कळाले, शतकीच धागा एक . >>> मान गए उस्ताद! :) मस्स्स्स्स्स्तं!!! :)

In reply to by शैलेन्द्र

लैच भारी ! टाळ्या !!  मिपावर शिघ्रकवींची इतकी मांदियाळी आहे की गेलाबाजार एक शिघ्रकवीसंमेलन होऊ शकते :)

In reply to by शैलेन्द्र

भिंगातूनी पाहता , संजीवनी क्षणैक , तिजला कसे कळाले, शतकीच धागा एक.
खिक्क! =)) =)) क्या बात है शैलेन्द!

In reply to by मृत्युन्जय

मुकेशच जावुद्या हो.. राज कपुरला लाभलेल्या इतर व्यक्ती जरी आम्हाला "लाभल्या", तरी आम्ही रचना करु :)

sanjivanik१ मिपाकरांच्या काही प्रतिक्रियेंकडे तुम्ही लक्ष देऊ नका. हृदय सदृश्य आकारात आपल्याला रमतांना पाहुन आनंद वाटला. अजून येऊ द्या. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काय येवु द्या? चा, गाळणी की नवकला? बाकी, संजीवनीजी, जसा तुम्ही हलका धागा टाकलाय, तसेच आम्हीही हलके प्रतिसाद देतोय.. त्यामुळे राग नसावा, लोभ असावा. धन्यवाद.. :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यास, अशा हलक्या मानसिकतेच प्रदर्शन मांडणार्या आणि त्यातच स्वताला हुशार समजणाऱ्या काही मिपा करांकडे दुर्लक्ष करणच योग्य आहे.तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. तेवढच त्यांना मला निरुत्तर केल्याच समाधान द्याव म्हणते .

In reply to by प्रचेतस

@ वल्ली कलाक्रुती फारच अप्रतिम आहे. एक एक क्ल्यु जोडतांना ३०/३५ वेळा चहा गाळून आणि पिवून झाला.शेवटी बायकोने तंबी दिली म्हणून दुसरेच काहीतरी गाळत ( आपले ते अश्रु हो...तुम्हाला भलतेच काहीतरी वाटायचे) बसलो आहे. येत्या १/२ दिवसांत सुटेल कोडे.... बाकी ही कलाक्रुती, म्हणजे मिपावरची मोनालिसाच...वादच नाही....

In reply to by प्रचेतस

नैतर काय. मोनालिसानंतर यासम हीच. वल्ली मला सांग इतके फिरलास पण अशी कलाकृती मला नाही वाटत तुझ्या पाहण्यात आजवर आली असेल.

In reply to by sanjivanik१

पण अशा दुष्ट प्रव्रुत्ती विरुद्ध आवा़़ज उठवायचा सोडून तुम्हाला त्याकडे दुर्लक्ष करणं सोईस्कर वाटत?. हे नाही आवडलं बुवा...

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यास, तुम्ही फक्त मला योगायोग ने मिळालेल्या कलाकृती वरच लक्ष केंद्रित केल्या बद्दल धन्यवाद .

In reply to by sanjivanik१

त्या बिरुटे सरांना (त्यांनी फक्त कलाक्रुती वर लक्ष केंद्रीत केले म्हणून) धन्यवाद... आणि आम्ही मात्र, गाळणी,भांडे, वॉटरमार्क आणि कॉपीराईट बघीतले तर आम्हाला धन्यवाद नाही. अरेरे पुर्वीचे मिपा राहिले नाही.

In reply to by मुक्त विहारि

मुक्त विहारि, तुम्ही माझ्या फोटोचा जसा गहन अभ्यास केला त्याल मी उत्तर दिले आहे. नीट बघा. आता वाटत आहे ते पण द्यायला नको हव होत, धन्यवाद देण्या सारखी तुमची प्रतिक्रिया कुठलीच नव्हति.

In reply to by खेडूत

खेडूत यास, तुम्ही पाठवलेल्या धाग्यात ती कलाकृती दिसत नहि. इथे डकवा म्हणजे सगळ्यांनाच त्याचा आनंद घेता येईल

In reply to by sanjivanik१

ओ तै ! त्यांच्या धाग्यावरची कलाकृती मी कुठून देणार? प्रतिक्रिया पहाण्यासाठी दुवा दिला होता - म्हणजे तुम्हाला इथल्या प्रतिक्रिया सौम्य वाटतील! चित्र मिळालं तर पेस्टवतो. मला ते पेंटिंग आवडलं होतं. धागाकर्ती च्या 'कुहू' या काव्य संग्रहाचं ते मुखपृष्ठ आहे!

In reply to by खेडूत

खेडूत यास, प्रतिक्रिया वाचून करमणूक करायला मला वेळ नसतो. तशी इतर मंडळी आहेत मिपावर मजा घेणारी . पण तुम्ही सुचवलं म्हणून नक्की वाचेन वेळ काढून . इथल्या प्रतिक्रिया सौम्य वाटतील!!! बापरे म्हणजे अशा काही मिपा करांनी तिथे पण यापेक्षा आपली हुशारी दाखवली आहे का?? अशा लोकां मुळे मिपा ची प्रतिमा बिघडते आहे अस मला वाटत . असो , तुम्हाला धन्यवाद

In reply to by sanjivanik१

"अशा लोकां मुळे मिपा ची प्रतिमा बिघडते आहे अस मला वाटत . " खरयं तुमच म्हणनं.. तुम्हांला बरोबर वाटतयं..

धागा उघडला पण बगळा गेला बाजार त्याची पिसं पण काय दिसेना! ईथे ड्कवता येईल का म्हणजे सगळे पुनर्प्रत्ययाचा आनंद घेउ शकतील

फोटो बघितला, प्रतिसाद वाचले, करमणूक झाली. चित्रकलाविषयक काही धागे: चित्रकाराच्या नजरेतूनः जाणिजे चित्रकर्म (भाग १) http://www.misalpav.com/node/18741 चित्रकला (१) : देवादिकांच्या तजबिरीतील चित्रांची कहाणी http://www.misalpav.com/node/25414 संग्रहालायातील कलाकृती आणि त्यांचे विविध विषय http://www.misalpav.com/node/23441 एका तैल-चित्राची जन्मकथा (भाग २ -संपूर्ण) http://www.misalpav.com/node/21954

In reply to by धन्या

हा धागा फोटोग्राफीचा आहे.
अरेच्च्या, असे आहे होय? धागाकर्त्याने 'कलाकृती' म्हटल्यामुळे प्रतिसाद कर्त्यांच्या प्रतिभेला बहर आला म्हणायचा. याचे शीर्षक 'मी काढलेला चहाच्या गाळण्याचा एक फोटो' असे अधिक वास्तवदर्शी असते तर ? अर्थात त्यापेक्षा 'योगायोगाने झालेली कलाकृती' असे शीर्षक देणे, हा धागाकर्त्याच्या प्रतिभेचा पुरावा, हेही खरेच.

संजिवनी प्रत्येक प्रतिसाद मस्त मजेशिर आहे , त्याला तसेच घ्या सरळ थँक्स ले ऑ वट्टक्ले म्हणायचं आणि पूढे जात रहायचं

आज बायको चहा गाळताना सारखा बघत होतो (गाळण्याकडे......) पण छे! ह्र्दय काय साधा बाण पण तयार झाला नाहि. सबब आमच्या चहातुन अशी अजोड कलाकॄती जन्म घेत नाहि हे बघुन ड्वॉले पाणावलेत.......

एका गाळणीत दिसते ह्रुदय एक त्यावरी तुटून पडती खंदे वीर अनेक काही करीती चेष्टा, काही करिती चर्चा सह्याद्रीवर पहा सपट परिवार महाचर्चा

In reply to by मी-सौरभ

गाळणी म्हणाली हृदयाला गाळणी म्हणाली हृदयाला अरे तू रे एव्हढा पांढरा कसा हृदय म्हणाले गाळणीला हृदय म्हणाले गाळणीला अभिजाततेचा मी घेतलाय वसा

क्रुपया, फोटो दिसत नाहि.... बघणे जरुरि झाले आहे परत डकवणे

आमचाही डबल सेंच्युरीसाठी थोडा सहभाग ;)