मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फोटोशॉप -बुडबुडे

चौकटराजा · · कलादालन
फोटोशॉप प्रेमी मिपाकरानो, या लेखातून मी आपल्याला फोट्शॉप सीएस ३ च्या साह्याने अ‍ॅनिमिशन कसे करायचे ते समजावून देण्याचा प्रयत्न करतो आहे. प्रथम आपण जालावरून एखादे रेखाचित्र ( स्केच) आपल्या संगणकावर उतरवून घ्या. मी या धड्यासाठी माझे लहानपण ज्याने भारावून टाकले त्या भारा भागवतांच्या मानसपुत्राचे चित्र अडोब फ्लॅश मधे रेखाटून घेतले आहे .या रेखाटनाला तीन एक मिनिटे लागतात. प्रथम फोटीशोप च्या मधे फाईल भागात ओपन की कमांड वापरून असे चित्र सोफटवेअरच्या चौकटीत आणा. नंतर जो लेअर निर्माण होतो तो बॅकग्राउंड लेअर असतो. त्याचे लेअर शून्य मधे रुपांतर करा. त्या लेअरला राइट क्लिक करून डुप्लिकेट लेअर ही कमांड वापरा. आता तुम्हाला लेअर क्र शुन्य व अन्य लेअर असे दोन लेअर झालेले दिसतील . त्यात वरचा लेअर अनविजिबल करा ( लेअर पेन मधे त्या लेअरच्या पट्टीतील डोळ्याचे चिन्ह नाहीसे होणे म्हणजे तो लेअर दिसेनासा होणे होय) लेअर शून्य क्लिक करून एरेजर टूल वापरून चित्र पूर्ण पुसून टाका . फिल टूल वापरून या शून्य क्र लेअरला रंग द्या . मी पांढरा रंग दिला आहे. हा आता माझ्या चित्राचा पांढरा कागद तयार झाला. आता वरचा लेअर व्हिहिबल करा . राईट क्लिक करून त्याचा एक ड्युप्लिकेट लेअर तयार करा. आता सर्वात वरचा लेअर पूरे झालेले चित्र दाखवणार तर सर्वात खालचा लेअर कोरा कागद दाखविणार. मधले लेअर्स चित्रकारी दाखविणार. आता वरचा लेअर व्हिहिबल करा . राईट क्लिक करून त्याचा एक ड्युप्लिकेट लेअर तयार करा. आता सर्वात वरचा लेअर पूरे झालेले चित्र दाखवणार तर सर्वात खालचा लेअर कोरा कागद दाखविणार. मधले लेअर्स चित्रकारी दाखविणार. त्यातील वरून दुसरा लेअर निवडा .यात काहीतरी भाग इरेझरने खोडा व त्याचा द्युप्लिकेट लेअर तयार करा, मग तो असा तयार झालेला लेअर निवडा व त्यातून आणकी काही भाग खोडा. अशा रितीने सर्व चित्र खोडून फकत लहान रेखाटन शिल्ल्क राहीपर्यंत लेअर त्यार करीत रहा. आता विंडोज मेनूतून अनिमेशन ला क्लिक करा . हा अ‍ॅनिमेशन चा स्क्रीन आला त्यात या ठिकाणी दोन पर्याय आहेत . १) फ्रेम अ‍ॅनिमेशन २) ट्वीन अ‍ॅनिमेशन यातील फ्रेम हा पर्यात निवडा. हा फ्रेम अ‍ॅनिमेशन चा स्क्रीन आला . त्यात फ्रेम ची कॉपी करण्याची सोय इथे आहे . ती सोय वापरून आपल्या लेअरच्या संख्ये एवढे फ्रेम्स तयार करा. आता अनिमेशन मधील एक फ्रेम व त्या फेमला जोडलेला एक एक लेअर विझीबल करीत जा. ही फ्रेम व लेअर यांचे नाते सांगण्याची प्रक्रिया येथे संपली. आता फाईल मेनुमधे सेव फॉर बेब ही कमाड निवडा. आता हा सेव्ह सेटींगचा स्क्रीन आला. त्याचा वापर करा. या फाईल सेव्ह चा स्क्रीन आला . ही फाईल बेव एनेबल जी आय एफ फाईल म्हणून सेव होईल. ही तयार झालेली फाईल विंडोज ब्राउजर मधे पहाल तर अ‍ॅनिमेशन दिसेल. इथे ती लोड होत नाही. काही तरी गोची आहे. पुढील भागात आपण फ्रेम अ‍ॅनिमेशनच्या जागी ट्वीन अनिमेशन पाहू .
लेखनविषय:

वाचने 8709 वाचनखूण प्रतिक्रिया 26

प्रचेतस Wed, 05/09/2012 - 23:29
चला, आता वर्गात बसूया, प्रकाशचित्रदुकान शिकूयात. मन्या बोका आणि चौराकांकाचे वर्ग सुरु झालेत. चांगली माहिती काका. खालून ४ फोटो नीट दिसत नाहीत. ते दुरुस्त करता येतील काय?

चौकटराजा गुरुवार, 05/10/2012 - 07:50
मला वाटते ते सोर्स ला लोड होत असतानाच मी इथे पेस्ट करण्याची घाई केली. पण मिपात आपला धागा दुरुस्त करता येतो का ? तशी सोय असल्यास करतो दुरुस्त .

In reply to by चौकटराजा

प्रचेतस गुरुवार, 05/10/2012 - 09:59
क्लास घेताना अशी घाई करून कशी चालेल हो काका? असो संपादकांना व्यनि अथवा खरड करून फोटू दुरुस्त करून घेता येतील.

In reply to by प्रचेतस

चौकटराजा गुरुवार, 05/10/2012 - 11:13
वल्ली, माझा तर्क चुकीचा दिसतो कारण सोर्स मधे फोटो क्लिअर आलेले आहेत. घाईचा व त्याचा काही संबध नसावा ही दुसरीच काहीतरी चूक आहे. दुसरे असे की जी आय एफ फाईल दाखविल्या शिवाय या धाग्याची मजा नाही. ती लोड होत नाहीय . नेटवर शोधून बघतो काय गोची आहे ती. माझ्या संगणकातील फॅक्स व्हूअरवर रिझल्ट मस्त दिसत आहे.

In reply to by कवितानागेश

प्यारे१ गुरुवार, 05/10/2012 - 11:30
वरील प्रतिसादाची कॅटॅगरी कुठली????? अत्यंत गंभीर / अत्यंत वात्रट / अत्यंत अवांतर/ अत्यंत निरर्थक / अत्यंत मौलिक बाकी मन्याची विनंती मान्य करुन लगेच क्लासेस सुरु केल्याबद्दल चौकटराजाकाकांचे हार्दिक आभार.... बाकी शिकवलेलं समजलं नाही. प्यार्‍या लेका तू मठ्ठ तो मठ्ठ्च राहायचास.

५० फक्त गुरुवार, 05/10/2012 - 11:29
एक मुळ प्रश्न तुम्ही जे सॉफ्टवेअर वापरुन क्लास घेत आहात ते तुमच्याकडं लायसन्स्ड आहे का पायरेटेड वर तुम्ही क्लास घेत आहात ?

परिकथेतील राजकुमार गुरुवार, 05/10/2012 - 11:48
अजून एक्सपी वापरता तुम्ही ? आणि AVG Antivirus चे फ्री व्हर्शन दिसते आहे ते. असो... बाकी फटू अतिशय धुरकट आणि सकाळच्या धुक्यात काढल्यासारखे आले आहेत हो काका. अरे स्पावड्या ह्या चित्रांना क्लिअर करता येईल का बघ रे जरा. आमचा स्पावड्या म्हणजे साला जिनिअस माणूस हाये.

गवि गुरुवार, 05/10/2012 - 12:01
मन्या फेणेची सीरीज चालू असतानाच तुमचा पुढचा धडा हजर.. कालरा शुक्ला वगैरेसारखे कंबाईन्ड क्लासेस आहेत वाटते.. मला वाटते तुम्ही परस्परांशी चर्चा करुन एकमेकांचे टॉपिक एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी / एक्स्क्लुझिव्ह लिहायचे ठरवले असेल.. तसं असेल तर उत्तमच. अन्यथा तुम्ही देत असलेली माहितीही उत्तमच आहे पण त्यामुळे मन्या फेणेचे पुढचे येऊ घातलेले धडे आधीच येऊन त्याची सीरीज हायजॅक होऊ नये अशी इच्छा..

In reply to by गवि

चौकटराजा गुरुवार, 05/10/2012 - 13:54
ओपन फोरम असल्याने मी मला जे माहित झाले आहे ते देत आहे. परवा पर्यंत मला मिपावर चित्र लोड करता येत नव्हते. आजही मी केलेली अनिमेटेड जी आय एफ लोड होण्यात अडचण आहे. अनेक ओपन फोरमवर अशा बाबतीत अतिशय दिलदारी चालते. अज्ञान व्यक्त करणे म्हणजेच ज्ञानाची मागणी करणे. तिथे प्रतिसादांपेक्शा मूळ विषयाला लागून अतिरिक्त ज्ञान आणाण्याला अधिक पसंती वाचक देतात. उदा. या धाग्यामधे एखादा माणूस खालील प्रमाणे लिहू शकतो- वरील लेअर ची फक्त व्हिजिबेलीटी ऑन ऑफ करण्याबरोबरच लेअर फील, लेअर ओपॅसिटी, लेअर स्टाईल ( अथांग विषय) लेअर कलर बद्ल ई. परम्योटेशन वापरून आपण अ‍ॅनिमेशन मध्ये आणखी रंगत आणू शकता. येथे कोणताही धागा कुणाच्या मालकीचा असणे अपेक्षित नाही त्यामुळे हाय़जॅकिंगचा मुद्दा अस्थानी वाटतो.( गंमत म्हणून असल्यास ठीक)

In reply to by चौकटराजा

गवि गुरुवार, 05/10/2012 - 14:12
मन्याने आधीच लिहून ठेवलेला एखादा टॉपिक नॉन अ‍ॅप्लिकेबल ठरु नये किंवा उलट तुमच्याही बाबतीत असंच होऊ नये, आणि एकत्रित परिणाम म्हणून वाचकांची विषय वाचण्यातली मजा भविष्यात कमी होऊ नये, यासाठी एकत्रपणे एक्स्क्लुझिव्ह लिहीत आहात का? अशी फक्त इच्छा कम चौकशी केली.. एकाच विषयावर आहे म्हणून..त्यात आमचा फायदाच आहे आणि विषय उत्तमच आहे.. म्हणून. काहीवेळा सीरीज लिहिणार्‍याने काही एक क्रम ठरवलेला असतो.. उदा. मी विमान अपघातांची सीरीज लिहित असताना आधी अपघातांमागची मानसिकता, मग काही तांत्रिक इंट्रोडक्शन, मग उदाहरणादाखल एका प्रकारच्या अपघात कॅटेगरीवर दोन भाग .. असे.. समजा असे तीनचार भाग झाले आणि तितक्यात कोणी एक वेगळा अपघात घेऊन त्यावर लेख लिहीला, .. किंवा सोत्रींचा कॉकटेलमालिकेचा पहिला भाग बारमधल्या उपकरणांवर, उदा ग्लासचे प्रकार, स्टरर्स, ब्लेंडर्स. जिगर्स, स्ट्रेनर्स इत्यादि, आणि मग एकेक मद्यप्रकाराची ओळख, त्यानंतर त्यांचे मिश्रण करुन कॉकटेल्स, अशी पाच सहा कॉकटेल्स लायनीत आली की त्या लाईनीला मोडणारा एक कॉकटेलवरच लेख येणं, अशावेळी नवा लेख लिहीणार्‍यांनी शक्य झाल्यास एकमेकांशी सल्लामसलत करणे उचित ठरु शकते (विशेषत: अशी मालिका ऑलरेडी चालू आहे हे माहीत असल्यावर..) यात लिखित असा काही नियम नाही.. फक्त दोघांपैकी कुणाचेच कष्ट वाया जाऊ नयेत इतकेच कन्व्हेन्शन. विषयाची ठरलेली अशी लाईन स्किप झाली असं मन्याच्या वरील प्रतिसादावरुन वाटतंच आहे तसंही. बाकी धागा कोणाच्या मालकीचा नसतो ही तर अगदी वस्तुस्थितीच आहे.. तस्मात, असे पूरक लिखाण दोघांकडूनही येईल, अशी सदिच्छा करतो आणि माझे चार शब्द संपवतो.

In reply to by गवि

चौकटराजा गुरुवार, 05/10/2012 - 17:26
मी व अ आ यानी एकाच कार्यक्रमाचे दोन धागे टाकले . एकात माहिती, फोटो तर दुसर्‍यात आस्वाद व ऑडिओ क्लिप्स आल्या. काही ठरवून झाले नाही . यातून दोन मने एकाच घटनेकडे कशी पहातात याचेच दर्शन झाले. व त्रिमिती प्राप्त झाली. याच पध्द्दतीने ऑरकुट वर एक विषय घेऊन भरीव माहिती मिळत असे. फोट्शॉप काय थ्रीडी एस मॅक्स काय अथांग विषय आहेत. शंभर धागेही अपुरे पडतील असे. मन्या यांनी फोटोशॉपच्या किती एपोसोड गेल्या दोन तीन वर्षात झालेल्या आहेत. त्यावर ते किती पध्द्दतशीरपणे सर्वाना पुढे नेत आहेत याची माहिती दिलीत तर बरे होईल. मग मी जरा बदल करू शकतो पुढील भागात.

स्पा गुरुवार, 05/10/2012 - 12:02
अहो चौरा एकदम पुढेच उडी घेतलीत... आधी बाराखडी तर क्लीअर करा , सोप्प्या सोप्प्या tutorials आधी घ्या हवंतर असो.. माझ काम सोप्प केलात.. मी पण आता क्लास ला हजेरी लावणार तुमच्या ;)

In reply to by स्पा

चौकटराजा गुरुवार, 05/10/2012 - 13:38
मन्या , तू जिनियस असल्याने अवघड काम मी तुझ्याकडे दिले आहे. स्वरांचा लगाव , पलटे हेच खरे अवघड . जाता जाता अ आ ची क्षमा मागून आगामी विषयाची घोषणा- मार्केट यार्डला न जाता फुलांच्या रांगोळ्या फोट्शॉप मधे. बर मन्या गुर्जी, ते काही फोटो इथे भुरकट का झाले असावेत ? साईज ८०० बाय ६०० असा दिला होता तो या फोटोंना दुसरा दिला असावा काय? सगळे स्नॅपशॉट सोर्स मधे व्यवस्थित आले आहेत. जिनियस ला साजेसे काही तरी कर.

In reply to by चौकटराजा

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 05/10/2012 - 15:46
@जाता जाता अ आ ची क्षमा मागून आगामी विषयाची घोषणा- मार्केट यार्डला न जाता फुलांच्या रांगोळ्या फोट्शॉप मधे.>>> व्वा...व्वा... झाली का तयारी...? लगे रहो... आंम्ही हातानी केलेला मातीचा गणपती, थर्माकोल मधे कसा दिसतो...? ते बघायला अवडेल...

अमृत गुरुवार, 05/10/2012 - 12:18
फायदा हा वाचकांचाच होणार. या विषयावरील ज्ञान सोप्या आणि सरळ भाषेत समजावून सांगून इतरांना त्याचा उपयोग व्हावा या विचाराने सूरू केलेला (चौराकाका आणि स्पा उर्फ मन्या फेणे यांनी) हा उपक्रम नक्कीच स्तुत्य आणि स्वागतार्ह आहे यावर दुमत नसावे. अमृत

In reply to by ५० फक्त

सूड गुरुवार, 05/10/2012 - 13:49
>>हुवा छोकरा जवां रे, या गाण्यातलं स्टिल फटु वाटतंय हे चित्र. छे !! कै च्या कै हा. त्याने टीशर्ट तोंडात कुठे धरलंय. हे फारतर हल्ली ते सप्लिमेंटच्या गोळ्यांच्या अ‍ॅड नाय का येत, त्यातलं बीफोर हेडिंगखाली शोभेलसं चित्र वाटतंय.

In reply to by कुंदन

सूड गुरुवार, 05/10/2012 - 14:16
ज्या गाण्यावर नाच चालू आहे ते गाणं बहुधा, 'मोटे घरचा पोकल वासाऽऽ आये मी संवसार कऽऽरु कऽऽसा' हे असावं. ;)

वपाडाव गुरुवार, 05/10/2012 - 17:27
चौरा काका, फोटो व्हिव्हिबल नाहीत की? -फोटो चांगले अस्ल्यास गणेशाज्वराने पिडित -नसल्यास गणेशाज्वरामुळे आनंदित

In reply to by वपाडाव

चौकटराजा गुरुवार, 05/10/2012 - 17:32
मूळ जागी फोटो सगळेच क्लिअर आलेत कारण ते कॅमेर्‍याने काढलेलेच नाहीत. स्नॅपशॉट आहेत ते. पण इथे वाचले जात असताना काही भुरकट दिसताहेत .ते दुरुस्त करणारा जिनियस सकाळपासून मला भेटलेला नाही. की कारण काय असावे हे ही कुणी सांगितलेले नाही.

परिकथेतील राजकुमार गुरुवार, 05/10/2012 - 17:44
धाग्यात अजून २/४ प्रतिसाद राहिले आहेत, ज्यांना तुम्ही उपप्रतिसाद दिलेले नाहीत. चेक करता का जरा ? का ते धागा खाली गेला तर गरज लागेल म्हणून ठेवले आहेत ?

चौकटराजा Fri, 05/11/2012 - 06:41
धाग्यात प्रतिसादापेक्शा ज्ञानाचे आगमन महत्वाचे. मी नाईलाजाने इथे एवढ्यासाठीच प्रति प्रतिसाद देत आहे की. धागा कसा पसरावा याबद्दलची माझी कल्पना एका हून अनेकाना कळावी. धागा भरकटणे हे दु: ख कारक आहे , पण मुक्त लेखन संस्कृतीचा तो नको असलेला पण अपरिहार्य भागआहे. त्यासाठी तर मिपा नावाजलेले आहे ना ?