मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता.....

हर्षद प्रभुदेसाई · · कलादालन
कविता कराव्या लागत नाहीत, त्या नकळतच होत असतात । मनातल्या भावनांना जसे, शब्दांचे आधार मिळत असतात । जुळवायचीच म्हणून, वाक्यांतील यमके जुळवायची नसतात । वरच्या ओळींची खालच्या ओळींशी, ओढून ताणून नाती जोडायची नसतात । सरळ सोप्या शब्दात भावना मनातल्या, कवीतेतून ह्या मांडायच्या असतात । शब्द असतात भावनांसाठी कवीतेत, भावना शब्दां साठी नसतात । हर्षद प्रभुदेसाई.....(डोंबिवली)
लेखनविषय:

वाचने 1878 वाचनखूण प्रतिक्रिया 7

नगरीनिरंजन 14/03/2011 - 11:14
>>कविता कराव्या लागत नाहीत, >>त्या नकळतच होत असतात । वा! ओळी मनाला भिडल्या. (तुम्हाला एकदम चार-चार झालेल्या दिसताहेत. डायरेक्ट मिपावर करण्यापेक्षा आधी एकदा कागदावर का नाही करत? ) - अलगद डायपरभाई.
किती दिवसांनी लिहीलंत हर्षद भाऊ. आहो तुमची कवीता पहायला डोळे आसुसलेले असतात हो आमचे. जबरदस्त काव्य आहे हे .. तोडंच नाही . लाखात एक ! -हार्डिक प्रभुकेभाई

In reply to by टारझन

Nile 14/03/2011 - 12:49
=)) =)) हाण तेज्यायल्या, इथुन पुढे हर्षदराव दहावेळा विचार करुन मगच करायला बसतील आणि नीट होत नसेल तर करणार नाहीत इतका हाणलाय! =)) -जोर लगारेभाई

नरेशकुमार 14/03/2011 - 12:13
कोनी काहिहि म्हनो, आपल्याला आवडले हे जे काय लिहिले आहे ते.
शब्द असतात भावनांसाठी कवीतेत, भावना शब्दां साठी नसतात ।
हे असमतेचे राजकारन सगळिकडेच थैमान घालते आहे