एक पैंजणाचा पाय चांदणे संदीप · Fri, 10/25/2019 - 06:00 · दिवाळी अंक मिपा दिवाळी अंक २०१९ अनुक्रमणिका एक पैंजणाचा पाय रुणझुणती चांदणी गुणगुणती पहाट पुरवेच्या आभाळास आता सुर्व्याचीच वाट नीज सोडून चालली रात घाबरीघुबरी वळुनिया पाही मागे जाग आली दारोदारी जणू सूर सतारीचे घुमती चारीठाय पडे अंगणी सड्याच्या एक पैंजणाचा पाय अनुक्रमणिका वाचन 4221 प्रतिक्रिया 0