Skip to main content

धर्म, लोकशाही आणि आग

लेखक अनुस्वार यांनी गुरुवार, 23/07/2026 18:02 या दिवशी प्रकाशित केले.

मी 'मुलगा' आहे. मी भारतीय आहे. मी 'हिंदू' आहे. मी 'मराठी' आहे. मी 'एका' राजकीय पक्षाचा पाठीराखा आहे. माझ्यात थोडा माणूसही बाकी आहे. तो माणूस आता संपत चालला आहे...

यातले मुलगा, हिंदू आणि मराठी या ऐवजी जे तुम्हाला लागू होतील असे शब्द टाकले की वरील उतारा ही तुमची सुद्धा ओळख असू शकते.

ही ओळख तुम्हाला लागू होत असेल तर राजधानीत शिरस्त्राणधारी शस्त्रसज्ज पोलिसांनी देशाचे भविष्य असणाऱ्या युवक युवतींना पिसाळल्यासारखे काठ्यांनी रक्तबंबाळ केल्याच्या चित्रफीती पाहिल्यावर तुम्हाला हळहळ वाटण्यात काहीच अडथळा नाही. मात्र पहिल्या उताऱ्यात 'एका' ऐवजी विशिष्ट पक्षाचे नाव टाकले तर ही हळहळ वाटलेल्यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी होईल, हे आजचे वास्तव आहे.

तो पक्ष भारतीय जनता पक्ष आणि त्याचे बगलबच्चे पक्ष आहेत हे नमूद करायला हवे. आताच्या राजकारणाबद्दल जरा उशिराने बोलू. त्याआधी थोडं मागे जाऊ. २०१४ मध्ये मोदींनी देशाला अक्षरशः संमोहित केले होते, हे नाकारण्यात अर्थ नाही. त्यांच्यासोबत संपूर्ण देशाने विकासाची खूप सारी स्वप्ने पाहिली. त्यातली काही निर्विवादपणे प्रत्यक्षातही आली. सत्तेसारखी दुसरी नशा नाही म्हणतात. मोदी त्याला अपवाद कसे ठरतील.‌ त्यांच्या विकासाच्या घोड्याने अंगावर भगवी वस्त्रे कधी टाकली आणि आणि स्वातंत्र्यानंतर स्वतःला उघडपणे हिंदू म्हणवणारे सरकार सत्तेत असताना चक्क "हिंदूच खतरे में" कसा आला हे कुणालाच कळले नाही. आजच्या काळात राजकारण हा लबाडांचा धंदा आहे, हे सत्य स्वीकारले की एक वेळी निवडणुका जिंकण्यासाठी धर्माचा आधारही तितकासा चुकीचा वाटत नाही. मग पुन्हा सत्ताही येते. पुन्हा काही चांगली कामे होतात.

पण पुढच्या निवडणुकांपर्यंत गेली दहा वर्षे हिंदू सरकार सत्तेत असूनही हिंदू इतका 'खतरे में' येतो की अक्षरशः काँग्रेसचे नेते फोडून भाजपात घ्यावे लागतात. हिंदू रक्षणासाठी! 'आदर्श' घोटाळ्यात ज्या अशोक चव्हाणांना राजीनामा देण्यास भाजपने भाग पाडले, त्यांनाच स्वतःच्या मुली सहित उमेदवारी देऊन निवडून आणले जाते. ज्यांच्या विरोधात बैलगाडी भरून पुरावे होते त्या अजितदादांचा वाढदिवस शासकीय कार्यालयांतून थोरपुरुषांची जयंती म्हणून साजरा होतो! पण हिंदूंचा धोका काही संपत नाही. धोकाच तितका मोठा आहे. तोच धोका सध्या सत्तेत आहे. आणि सत्ता म्हणजे भाजप नाही. सत्ता म्हणजे सर्वपक्षीय नेते. त्यांची खरी सत्ता म्हणजे आपल्या मनातले त्यांचे स्थान. आणि जोपर्यंत आपण मनातून घाबरत राहू तोपर्यंत तुम्ही ज्या धर्माचे असाल तो धर्म तुम्हाला धोक्यातच वाटेल. हिंदूंना हिंदू, मुसलमानांना मुसलमान आणि ख्रिस्तींना ख्रिस्ती धोक्यात वाटत राहील.

राजकारण कधी खराब होत नाही. समाज खराब होतो. आपले नेते म्हणजे फक्त आपला आरसा आहे. आपण स्वतः सुधारल्याशिवाय नेते बदलण्याची अपेक्षा धरू नका. आपण समाज म्हणून अत्यंत दुय्यम... नाही कदाचित सातव्या आठव्या दर्जाचे नागरिक झालो आहोत. जोपर्यंत स्वतःच्या गळ्याशी काही येत नाही तोपर्यंत आपण कशावर व्यक्त व्हायला सुद्धा दहादा विचार करतो. "मला काय त्याचे?"

भाजप म्हणते हिंदू धोक्यात आणि आपण माना डोलावतो. भाजप म्हणते "हिंदू राष्ट्र करू" आणि आपण हो म्हणतो. या देशात स्वतः श्री राम कृष्णांचे अवतार झाले, तेव्हा सुद्धा भारत भाजपच्या व्याख्येतला 'हिंदू राष्ट्र' झाला नाही. या पृथ्वीवर स्वतः येशू ख्रिस्त, अल्लाचे प्रेषित मुहम्मद पैगंबर अस्तित्वात होते, तेव्हा सुद्धा 'हिंदू धोक्यात' आला नाही. मग २०१४ नंतर हिंदू धर्माला अचानक असा कोणता जीवघेणा आजार झाला की तो धोक्यात आला? तो आजार म्हणजे हिंदूंनी हिंदू म्हणजे काय, हा विचार करायचे सोडून दिले.  हिंदू हा उच्चतम विचार आहे. एक श्रेष्ठ जीवन पद्धती आहे. तुलनात्मक दृष्ट्या मला तो नेहमीच अतुलनीय, आधुनिक आणि चिरंतन भावतो. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंसारखा माणूस भगवे कपडे घालून 'हिंदूहृदयसम्राट' होऊ शकत नाही, आणि कालपरवाचे टुकार नेते 'हिंदूरक्षक' होऊ शकत नाहीत, हे मी उघडपणे बोलू शकतो. कुणी हिंदूंचे सम्राट व्हावे किंवा रक्षण करावे एवढा लेचापेचा हा धर्म नाही‌. तो स्वयंभू आहे. तो आपण विसरलो आहोत. घरांतून धर्म शिकवला जात नाही... ज्या मंत्रोच्चारात लग्ने लागली, राहत्या घराची वास्तुशांती झाली त्यातला एक मंत्रही आपल्या लक्षात राहत नाही आणि आपण धर्मरक्षणासाठी मतदान करणार का? काय मोठा विनोद आहे! आपण तेवढेच धार्मिक आहोत जेवढे आत्ताचे तिकीट-भिकमागे छत्रपती, छत्रपती आहेत.

धर्माच्या बाबतीत लोक थोडे भावनिक असतात. त्याचा पुरेपूर फायदा समाजातील नतद्रष्ट लोक नेहमीच घेतात. जेव्हा पाकिस्तानात एखादं लेकरू जन्माला येतं तेव्हा त्याच्या आईला काय असं वाटत असेल का, की याने मोठा होऊन भारतावर बॉम्ब टाकावा? पण त्या बॉम्ब टाकण्यात कुणाचा तरी प्रचंड आर्थिक फायदाही असतो. या बॉम्बचे कारखाने दोन्हीकडच्या धार्मिक लोकांचे असतात. आपण इतके स्वतंत्र आहोत की त्याची थोडीशी जाणीव झाली तरी काही क्षण आपल्याला प्रचंड मोठा शक्ती-संसर्ग होऊन आता याचे काय करावे हा प्रश्न पडेल. राजकीय पक्ष तुम्हाला याच विचारापर्यंत पोहोचू देत नाहीत. तुम्ही पोहोचायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला जात-धर्म-प्रदेश यांची भिती दाखवली जाते.

ज्ञानेश्वर माऊलींच्या आई-वडिलांना जिवंत देहदंड देणारा समाज हिंदूच होता. तोच समाज आता माऊलींच्या नावे वाऱ्या करतो. चंद्रभागेच्या वाळवंटात सगळं काही विसरून समोर जो दिसेल त्याला 'माऊली' म्हणत त्याच्या पाया पडतो. तोच समाज पुन्हा घरी आला की जातीत रमतो. तो मराठा असेल तर भोसले राजघराण्याच्या वंशजांवरती टीका त्याला सहन होत नाही, माळी भुजबळांसाठी ढाल घेतो आणि वंजारी धनाभाऊसाठी काहीही करायला तयार होतो. याचा फायदा फक्त नेते घेतात. तुम्ही मरेपर्यंत पिढीजात कार्यकर्ते. हाडाचे कार्यकर्ते, ज्याने 'हाड' म्हटलं तर गल्लीतलं कुत्रंही ढुंकून पाहत नाही. दिल्लीत ती अनोळखी पोरं कुत्र्यासारखा मार खाताना पाहिली आणि काळीज पिळवटून निघालं. त्यांच्यापेक्षा जास्त त्यांच्या आईबापासाठी. दोन दिवस सर्दीने नाक फुरफुरलं तर तिसऱ्या दिवशी घरचे आपल्याला बळजबरी दवाखान्यात नेतात. इथे या तरुणांच्या पालकांनी आपल्या हृदयाचे तुकडे देशासाठी दिल्लीकडे पाठवून दिले. देशाच्या सुरक्षेची शपथ घेतलेले हात या तरूणांचा जीव घेण्यासाठी तुटून पडले. मारता मारता सत्तेचे हात तुटले पण तरुणांची एकसाथ सुटली नाही. आपला महान नेता काही वर्षांनी 'भारतरत्न' सुद्धा शंभर टक्के होणार. किंवा 'भारतरत्ना'लाच मोदी दिले जातील. आपण फक्त एक लक्षात ठेवायचं. आग लागली असेल तर ती विझवायची. माणूस असो की लोकशाही!


वाचने 711
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

देशाच्या सुरक्षेची शपथ घेतलेले हात या तरूणांचा जीव घेण्यासाठी तुटून पडले. 

 

हे अत्यंत बेजबाबदार विधान आहे. 

 

कोणत्या ही पोलीसाला  मुळात कुणालाही बेदम मारहाण करून आंनद  मिळत नाही. पोलीस काय उगाच उठतात आणि कुणालाही मारहाण करतात असे असते का?

संसदेवर चालून जाणारे तरुण हे आपण काय करत आहोत  याचा विचार न करता तेथे चालून गेले.

संसदेवर चालून जाणे हे देशाशी युद्ध छेडण्यासारखा गंभीर गुन्हा आहे हे त्यांना त्यांच्या नेत्यांनी सांगितले नाही.

Yes, an attack on the Parliament of India is an extremely serious offense. It threatens national security, challenges the sovereignty of the state, and targets the supreme symbol of Indian democracy.

Legal Gravity and Charges Acts of Terror: Such an assault falls directly under strict anti-terror laws and provisions criminalizing acts that threaten the unity, integrity, and security of India.

Waging War: It amounts to waging war—or conspiring to wage war—against the Government of India, which is one of the highest penal offenses.

Severe Punishment: Convictions for these acts carry maximum penalties, including capital punishment (the death penalty) or rigorous life imprisonment.

आणि या झुरळांनि सर न्यायाधीशाच्या वक्तव्याचा आधार घेऊन हा झुरळ हा शब्द उपयोजला आहे.  मग त्यांना न्यायालयाकडून सहानुभूती मिळण्याची सुत राम  शक्यता नाही  

अडथळे पडून पोलिसांवर  हल्ला करून हे तरुण पुढे जाऊ लागले तर किमान बळाचा वापर करून त्यांना थांबवायचे असे आदेश पोलिसांना दिलेले होते.

या तरुणांच्या असून जर दोन दहशतवादी आत घुसले असते आणि एखादा बॉम्बस्फोट घडवला असता तर देशभर आग लागली असती. 

आपणसुद्धा सुरक्षा संस्था काय झोपल्या होत्या का असे आरोप करायला पुढे आला असतात.

अगदी दहशवादी नाही पण एखाद्या तरुणाने डॉ आंबेडकरांच्या महात्मा गांधी यांच्या तसबिरीची विटंबना केली असती तर भारतभर दंगे  झाले असते. 
 
याना थांबवले नसते तर तरुण कोणत्या थराला जाऊ शकले असते हे सांगता येत नाही.

मोर्चाची सरासरी अक्कल ती त्यातील सर्वात बेअक्कल माणसाच्या इतकी असते.            

एकदा एक तरूण  दगडफेक करायला लागला कि इतरही त्यात सहज गम्मत म्हणून सामील होतात .

 

मारता मारता सत्तेचे हात तुटले पण तरुणांची एकसाथ सुटली नाही. 

 

यासाखे भंपक वाक्य दुसरे नसेल.

 

किती मोर्चे करी होते?  तीन साडे हजार? याना नियंत्रणात आणायला काही लष्कराची गरज पडली नसती. नुसते उत्तर प्रदेशच्या पोलिसासारखे पायावर गोळ्या घातल्या असत्या तर अर्धे लोक आयुष्यभरासाठी पांगळे झाले असते.

( उत्तर प्रदेश पोलीस आता अनेक गंभीर गुन्हे असलेल्या गुंडानी गुंडगिरी केली तर पायावर  गोळ्या मारून दोन चार वर्षांसाठी त्यांना जायबंदी करायचा उपाय योजला आहे.) 
माणूस मरत नसल्याने मानवी हक्क संघटना त्यात लक्ष देत नाहीत  आणि त्याच्या बातम्या पेप्रात येत नाहीत. सामान्य माणूस याबद्दल अत्यंत समाधानी आहे.    

उगाच अशी बेफाट विधाने करू नका. कुणीही उठावे नि पोलिसांना शिव्या द्याव्या.

 

११८  पोलीस जखमी झाले त्याबद्दल कोणीही बोलत नाही. कशासाठी? तर आपले कर्तव्य बजावताना?   २० पोलिसांच्या गाड्याची नासधूस केली ती कशासाठी?  

त्यांना ज्या तर्हेने शिव्या देणे चालू होते ते पाहिले तर  आपले पण डोके फिरेल.  झुरळांच्या नेत्यांचा तोच तर डाव होता. तरुणांची माथी भडकावून पोलिसानं हिंसा करण्यासाठी उद्युक्त करायचे आणि त्यावर देशभर असंतोषाचा आगडोंब उठवायचा,

जरा जपून विधाने करा अशी विनंती  आहे  
   

 

 


In reply to by सुबोध खरे

आपणसुद्धा सुरक्षा संस्था काय झोपल्या होत्या का असे आरोप करायला पुढे आला असतात.

 

 

डॉक्टर साहेब.. हे तर अनेक जण आताही म्हणत आहेतच. लोकसत्ता अग्रलेखात पहिल्या अर्ध्या भागात सुरक्षा व्यवस्था झोपली होती काय असाच टोन आहे. तिसऱ्या आतल्या बॅरिकेडपर्यंत आंदोलक पोचलेच कसे..असं. आणि त्याच अग्रलेखात पुढे मग मारहाण आणि चुकीची हाताळणी यावर नेहमीची टीका आहेच. विरोधाभास कळण्याच्या पुढे गेले आहे. विद्यार्थ्यांची गर्दी जमाव बनून कडे तोडून घुसू लागली तर त्याचा फायदा घेऊन टपून बसलेले कोणी अतिरेकी निश्चित फायदा घेऊ शकतात. आणि तसे झाले नाही तरी संसदेत अनधिकृत प्रवेश यासाठी एक रेड लाईन आहे. ती बळेच ओलांडू गेल्यास विद्यार्थी, तरुण, महिला, वृद्ध इतकेच काय लहान मुले असली तरी सुरक्षा व्यवस्थेला निर्णायक पावले उचलावीच लागतात. अशा वेळी लाठीमार किंवा अश्रुधूर वापरला त्यावर आक्षेप अनाकलनीय. अर्थात त्यात खिळे वगैरे क्रूर झाले आहे यावर आक्षेप ठीक. पण त्यांना अश्रुधूर किंवा लाठीमार न करता आवरावे कसे याविषयी कोणीच काही बोलताना दिसत नाही. पहिल्याच दिवशी बोलणी करून किंवा मागण्या मान्य करून हे चिघळू न देणे हाच उपाय सगळे सांगत आहेत. पण तसं केलं तर आर्म ट्विस्टिंग टॅक्टिक्सला सरकार बळी पडते असा पायंडा पडेल. सरकारने आगोदर किमान चर्चा सुरू करायला हवी होती हे पटते मात्र.


In reply to by गवि

सरकारने आगोदर किमान चर्चा सुरू करायला हवी होती हे पटते मात्र.

हि गोष्ट सर्वाना मान्य आहेच.

मुळात श्री सोनम वांगचुक यांचे उपोषण झाले नसते तर CJP ला एवढा पाठिंबा मिळाला असता का हि शंकाच  आहे.

येथे सरकारचा हिशेब चुकला असे म्हणावे लागते.

अर्थात पश्चात दृष्टी हि ६/६ इतकी उत्तमच  असते.      


नमस्कार सुबोधजी,

कृपया लेखातील एक 'अत्यंत बेजबाबदार' आणि एक‌ 'भंपक' वाक्य वगळून उर्वरित लेख वाचा.


In reply to by अनुस्वार

😂😂😂😂😂😂

 

सॉलिड अप्रोच आहे तुमचा, लगे रहो मुन्नाभाई मधील रोज घराबाहेर पानाची पिंक साफ करणारा तो दादा आठवला, तुम्ही पण आठवा बऱ्याच पिका साफ कराव्या लागणार आहेत 


शिरस्त्राणधारी शस्त्रसज्ज पोलिसांनी देशाचे भविष्य असणाऱ्या युवक युवतींना पिसाळल्यासारखे काठ्यांनी रक्तबंबाळ केल्याच्या चित्रफीती पाहिल्यावर तुम्हाला हळहळ वाटण्यात काहीच अडथळा नाही.

११८ पोलीस जखमी झाले. त्यांचे व्हिडीओ काढायला कोणी येत नाही. यातला एखादा जायबंदी झाला आणि नोकरीतून बडतर्फ झाला तर त्याची जबाबदारी कोण घेतं? सरकार पैसे आणि निवृत्तीवेतन देतं. (हां आता तुम्ही म्हणाल कि पोलीस मध्ये भरती व्हायला कुणी सांगितलं होतं?).

एकतर्फी बाजू घ्यायला मला तरी जमणार नाही. जंतर मंतर वर लाठीचार्ज का झाला नाही? कि तेंव्हा पोलीस पिसाळलेले नव्हते?  

 

या पृथ्वीवर स्वतः येशू ख्रिस्त, अल्लाचे प्रेषित मुहम्मद पैगंबर अस्तित्वात होते, तेव्हा सुद्धा 'हिंदू धोक्यात' आला नाही. 

 

अटके  पासून ते लाहोर आणि श्रीनगर पर्यंत चे हिंदू कुठे गेले आणि कालकात्यापासून आगरताला पर्यंतचे हिंदू कुठे गेले?    

बांगला देश मध्ये २३ टक्के असलेले हिंदू आता ८ टक्क्यावर कसे आले?        


In reply to by सुबोध खरे

प्रणाम सुबोधजी,

मी एकतर्फी बाजू घेतली नाहीये आणि कधी घेतलीच तर बलाढ्य सरकार विरोधात मी आपल्यासारख्या जागरूक नागरिकाचीच बाजू घेईल. श्रीकृष्णाने 'सर्वधर्मान्परित्यज्य' (गीता १८:६६) हा संदेश दिला त्यात हिंदू धर्मही आलाच ना, की योगेश्वराने सुद्धा अर्जूनाला काही भंपक सल्ला दिला?

ता.क. कोकणस्थ म्हणून एक दुय्यम दर्जाचा परंतु उत्कृष्ट विषय निवडलेला मराठी चित्रपट पाहा. कदाचित माझे म्हणणे अधिक स्पष्ट होईल.


In reply to by सुबोध खरे

नोकरीतून बडतर्फ झाला तर त्याची जबाबदारी कोण घेतं?

 

एकंदरीत सरकारी नोकरीत शिरणे जितके कठीण तितके तिथून हाकलून लावणे सरकारला कठीण ! मला वाटले हे आपणास माहिती असावे ?


In reply to by वृषभ खोंडे

नोकरीतून बडतर्फ वैद्यकीय कारणांमुळे/ कायमचे जायबंदी झाल्यामुळे ( ते लिहायचं राहिलं). 

 

बेदम मारहाणीमुळे मूत्रपिडे निकामी होऊ शकतात किंवा डोक्याला इजा झाल्यामुळे नोकरी करण्यास अपात्र झाल्यास.  

  


अनुस्वारजी,

सध्या हे आंदोलन चालले आहे त्यात धर्मेन्द्र प्रधान यांचा राजीनामा हीच मूळ मागणी आहे जी केवळ प्रतीकात्मक आहे. आम्ही सरकारला नमवले म्हंणून हे लोक स्वतःवर खुश होतील.  

मूलभूत प्रश्नाकडे जेन झी यांचे लक्ष नाही असेच दिसते.

सार्वजनिक न्यासांवर मोदी विरोधक केवळ आपला कंडू शमवण्यासाठी मोठ्या मोठ्या आरोळ्या देताना दिसत आहेत.  धर्मेन्द्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यावर ते स्वतः;चा जयजय कार करून घेताना दिसतील.

पण त्यातून मूळ २० कोटी तरुणांना रोजगार कसा मिळेल किंवा शिक्षण महर्षींनी या क्षेत्रात माजवलेली बजबजपुरी कशी दूर होणार?

२२ लाख नीट चे इच्छुक यापैकी केवळ ६६ हजार मुलांना सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे. बाकीच्यांनी काय करायचे याचा हिशेब नाहीच.  

 

आत तरुण शिक्षण घेत आहेत ते उद्योगाभिमुख नाही.  अभियंते शिकून बाहेर पडतात त्यांना उद्योगात शिरल्यावर समजून येते कि  आपण शिकलो त्याचा व्यवहारात/ आपण करतो आहोत त्या नोकरीत फारसा  काही उपयोग नाही.

 

 केवळ ४० % गुण मिळवले कि विषय "सुटतो."

तो समजला का? यावर उत्तर नसतेच.

मी १५ वर्षे अध्यापन केलेले आहे. त्यातील ७ वर्षे ए एफ एम सी सारख्या उच्च गुणवत्तेच्या महाविद्यालयात आणि नंतर ८ वर्षे  डीम्ड (doomed) युनिव्हर्सिटी                मध्ये. पेपर सेट करण्यापासून पेपर तपासणे पर्यंत सर्व गोष्टी केल्या आहेत. दोन्ही महाविद्यालयात इतकी प्रचंड तफावत जाणवली कि दुसऱ्या संस्थेतून पास झालेल्या डॉक्टरकडे जायला भीती वाटावी.

 

आजकाल वैद्यकीय क्षेत्रात येत असलेले विद्यार्थी संगणकावर रुग्ण पाहतात आणि नीट देऊन पदव्युत्तर शिक्षणासाठी येतात. रुग्ण तपासायचा कसा या ज्ञानाचा नीट मध्ये गुण मिळवण्यासाठी काहीही उपयोग नाही.  मग पदव्युत्तर अभ्यासक्रमात श्रीगणेशा पासून सुरुवात करावी लागते. ज्यांना खरोखर आंच असते ते  विद्यार्थी कष्ट घेऊन शिकतात. आणि जे २ कोटी रुपये भरून आलेले होते त्यांनाही शिकवण्याचा मी प्रयत्न केला.  त्यांना केवळ एम डी हि पदवी हवी होती. त्यानंतर पिढीजाद पैशाचा उपयोग करून रुग्णालय काढणे किंवा इतरच उद्योग करणे यात रस होता.  यामुळे मी त्या संस्थेचा ११ वर्षांपूर्वी राजीनामा दिला.      

 

गुणवत्ता सुधारणे, पदवी हि व्यवसायाभिमुख बनवणे, मूलभूत शिक्षणा चा दर्जा कसा उंचवावा यांच्याकडे जेन झी कसे पाहतात हे पाहणे जास्त आवश्यक आहे.
मूळ प्रकृति सुधारण्यापेक्षा चेहऱ्याची रंगरंगोटी लिपस्टिक लावणे हेच त्यांना या आंदोलनात अपेक्षित दिसते.  

अर्थात दिपके सारखा पुढारी असल्यावर  आणखी काय अपेक्षा करणार?

CJP चा मूळ जाहीरनामा पाहिलात तर केवळ सवंग मागण्या सोडून कोणताही मूलभूत विचार त्यात नाही.  

असो.

मी जे जे मूलभूत प्रश्न सार्वजनिक न्यासावर उपस्थित केले त्याबद्दल लोकांनी मला मोठ्या प्रमाणावर ट्रॉल केले. अर्थात त्याने मला शष्प फरक पडलेला नाही. 


पण एकाकडेही या मूलभूत प्रश्नांचे उत्तर नव्हते.  केवळ मोदी सरकारवर आपला राग काढण्यासाठी लोकांनी सार्वजनिक न्यासाच्या उपयोग केलेला दिसतो.

उगाच जेन झी किती हुशार आहे इ सवंग विधानांचा व्यवहारात काहीही उपयोग नाही. 

मोर्चात आलेल्या बहुसंख्य मुलांची स्थिती अर्धवट ज्ञान आणि प्रचंड उत्साह अशीच होती. 

या प्रचंड ऊर्जेचा विधायक कार्यासाठी वापर केला तर उपयोग आहे अन्यथा हि ऊर्जा सर्वत्र विध्वंस निर्माण करू शकते.  याचाच  त्यांच्या  नेत्यांना  वापर करून  आपली पोळी भाजून घायची आहे.   

श्रीलंका  नेपाळ बांग्लादेश येथे हेच झाले पण त्यातून निष्पन्न काय झाले? तरुणांची स्थिती सुधारली का किंवा देशाची परिस्थिती सुधारली का?

The 2024 student-led July Uprising in Bangladesh cost the nation an estimated $10 billion in economic losses during the peak unrest, hundreds of lives, and major supply chain disruptions.

Nepal’s September 2025 youth-led anti-corruption uprising cost the nation 77 lives, over 2,000 injuries, and an estimated $587 million (84.5 billion Nepali rupees) in direct economic and structural damage    

The mass protests have subsided, but the new president is trying to deal with a huge financial crisis.
Sri Lanka owes about $7bn (£5.7bn) to China and around $1bn to India.

 

असो.                        


मी अण्णा-केजरीवाल ह्यांच्या काळांत सुद्धा सरकारची बाजू उचलून धरली होती आणि आता सुद्धा मी सरकारची बाजू इथे उचलून धरेन. मी नेहमीच सरकारच्या विरोधांत राहिले आहे. पण, लोकशाहीच काही किमान बाबींची काळजी घेतली पाहिजे. ती म्हणजे कुठल्याच घोळक्याला विना-निवडणूक सत्तेतील निर्णय घेण्याचा अधिकार नसला पाहिजे.

इथे जो पोरांना मार पडला माझ्या मते तो योग्य होता.

- धर्मेंद्र प्रधान ह्यांनी राजीनामा द्यावा म्हणून म्हणे आंदोलन. नीट पेपर फुटला हा म्हणे त्यांचा गुन्हा. त्यासाठी १२वी कलाशाखेत ५२% पडलेली सान्वी आणि कॉमर्स प्रथम वर्षांत शिकून Youtuber बनू पाहणारा कियान करतोय आंदोलन.

-  धर्मेंद्र प्रधान हि व्यक्ती Argon पेक्षा जास्त inert आहे. फोटोला तोंड आणि हाराला गळा म्हणून हि व्यक्ती खुर्ची गरम करतेय. ह्यांचे कर्तृत्व शून्य. ह्यांना हाकलले म्हणून कुठेच काहीही काडीचा फरक पडणार नाही. मग नक्की हि मागणी का ? मुलांत ह्या व्यक्तीवरून आंदोलन करणे म्हणजे ह्या व्यक्तीची औकात वाढविण्यासारखे आहे. ह्यांची स्वतःची मुलगी टुफ्ट मध्ये शिकून अमेरिकेत स्थायिक झाली आहे.

- पेपर फूट समजताच सरकारने बहुतांशी चांगली पावले उचलली. अनेकांना अटक झाली. ह्यांत जी मंडळी गुंतली आहे ती नेहमी प्रमाणे देहात राजकारणातील मंडळी आहे ज्यांची राजकीय किंमत शून्य. त्यामुळे गोबीच्या इशाऱ्यावर ह्यांचा बळी देणे सहज शक्य होते आणि तो दिला सुद्धा गेला. पूर्ण शक्यता आहे कि दर वर्षी हा पेपर लीक होत होता पण कदाचित सत्य समोर ह्याच वर्षी आले.

- नीट परीक्षा भविष्यांत JEE प्रमाणे संगणकीय करण्यात येत आहे. हि सुद्धा चांगली गोष्ट आहे.

एकूण सरकार अकार्यक्षम असले तरी किमान काहीच केले नाही किंवा काहीही पर्वा नाही किंवा मधांद प्रमाणे वागले असे म्हणू शकत नाही.

--

एकूणच आंदोलन हे लोकशाहीस पूरक नाही. कुठल्या मंत्र्यांनी कधी राजीनामा द्यावा हा प्रधानमंत्र्यांचा निर्णय आहे. त्यांत वांगचुक किंवा कुणा आंदोलनजीवी माणसाला ढवळा ढवळ करण्याचा अधिकार नाही. जर इतका विरोध आहेच तर ह्या मंडळींनी इलेक्शन लढून हरवून दाखवावे. पाहू मग सान्वी आणि कियांश मत देतात कि नाही.

धर्मेंद्र प्रधान ह्यांनी जर काही गुन्हा केला होता किंवा ह्या पेपर फुटीत त्यांचा थेट सहभाग होता आणि प्रधानमंत्री त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत असते तर कदाचित आंदोलनाला काही नैतिक अधिकार होता असे मी म्हटले असते पण इथे तसे नाही.

--

धर्मेंद्र प्रधान सारख्या wet pillow माणसाला टार्गेट करण्याचे काम उगाच नाही केले. एकूण आंदोलन आणि त्यातील काही efficient गोष्टी पाहता हे नेहमीच्या आंदोलनजीवी माणसांनी केले आहे असे वाटत नाही. असे आंदोलन निर्माण करण्याची क्षमता काँग्रेस आणि इतर देहाती पक्षांत नाही. त्यामुळे ह्या आंदोलनाच्या मागे आणखी कुणाचा तरी हात आहे असे वाटते. आणि ज्यांचा हात आहे त्याच्याकडे गोबी आणि गुंदेशाह ह्यांचा हात पोचत नाही असे वाटते.  

प्रधान हा टेस्ट बलून आहे. प्रधान ह्यांनी राजीनामा दिला तर आता "गोबी झुकता है" हे सिद्ध होईल. मग हीच टेम्प्लेट इतर विषयावर वापरली जाईल.

गोबी चतुर आहेत. म्हणूनच त्यांनी अजून तरी धर्मेंद्र प्रधान ह्यांना बळीचा बकरा केलेला नाही. 
--- 


In reply to by Vichar Manus

नाहीत ! गोबीजी झुकले त्यामुळे आता  आंदोलनजीवी दुसरे टार्गेट शोधतील माझ्या मते पुढील टार्गेट रोडकरी असतील. 


जर इतका विरोध आहेच तर ह्या मंडळींनी इलेक्शन लढून हरवून दाखवावे. पाहू मग सान्वी आणि कियांश मत देतात कि नाही.

काय बोलता ! राहूल गांधी सातत्याने पेपरफुटीवर जनजागृती करत आहेत ते निवडूण आलेले आहेत. त्यांना पाठींबा आहे का ?  

 


In reply to by आग्या१९९०

राहूल गांधी सातत्याने पेपरफुटीवर जनजागृती करत आहेत ते निवडूण आलेले आहेत. त्यांना पाठींबा आहे का ?  

राहुल गांधींना ह्या विषयावर नक्कीच पाठिंबा आहे. संसदेत विषय उचलून धरण्यासाठी रस्त्यावर हाणामारी करण्यासाठी नाही. 


या बॉम्बचे कारखाने दोन्हीकडच्या धार्मिक लोकांचे असतात.

मुस्लिम आणि काफिर यांना एकाच पातळीवर लावण्याचा प्रयत्न शरियाला मान्य नाही, भारतीय घटनेलाही मान्य नाही. 
आधी हे शिकून घ्या.

बाकी पूर्ण लेख वाचून -

तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. 
 


झुरळांनि  विरोधी पक्षांचा सर्वात मोठा पोपट केला.

 

ते आंदोलनात उडी मारतात तोवर आंदोलनच संपलं.

हे म्हणजे मंदिरात गेले तोवर प्रसाद संपला आणि बाहेर आले तोवर चप्पल चोरीला गेली.

 

बसा बोंबलत     


In reply to by सुबोध खरे

प्रसाद वाटणाऱ्याने मागे बघितले.

.

देवासहित मंदिर गायब.

.

आता कशी वाजवायची ....

घंटा ...


In reply to by सुबोध खरे

हे सगळे एकंदरीत विरोधकांची गोची करायला केले गेले होते तर ! पण त्यासाठी पार मोदींची आयमाय, मेलनीचे नको ते, इत्यादी सगळे ऐकून घेतले ? ह्याच्यासाठी पोरांची डोकी फोडली होय ? हे म्हणजे नवरा मेल्याचे दुःख नाही फक्त सवत रंडकी व्हायला हवी झाले 😭😭😂😂


झुरळं  शब्द म्हणाले सरन्यायाधीश

 

आंदोलन मोदींविरुद्ध

 

विरोधी पक्ष बेगानी शादी मी अब्दुल्ला दिवाना होते.

 

मग असं होणारच!

 

चालू द्या!

 

 


In reply to by सुबोध खरे

झुरळ किंवा कॉक्रोच हे नाव सरन्यायाधीश स्टेटमेंट वरून आले होते. आंदोलन नीट पेपर लीक बद्दल होते/ आहे. मी नाही त्यातला अप्रोच बरा नाही असा !


In reply to by वृषभ खोंडे

आजच्या दिवस त्यांच्या हो ला हो म्हणा. तेव्हढीच त्यांना शांत झोप लागेल. आपण मस्त रात्रभर सेलेब्रशनचा आनंद घ्यायचा. 

उद्यापासून जोमाने झोडपा . 


In reply to by सुबोध खरे

टिनपाट मानून का होईना ! 

 

धापा टाकत नहले पे दहला मारल्यागत प्रतिसाद द्यायला आलात ते एक बरंय