कोकणात आता परत अणुभट्ट्या सुरु करणार असे दिसत आहे
कोकणाची वाट लावायचे सर्व प्रयत्न भाजप करत आहे
पण यात काँग्रेस हि मागे नव्हती हे खरे - भविष्यकाळात कोकणात रिफायनरी होणार यामुळे भारतविरोधी शक्तींना हाताशी धरून चाळीस वर्षांपूर्वी - हो चाळीस असावे - प्लॅन केला गेला आणि १९८९ मध्ये सुरु झालेल्या बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हरसिटी मध्ये कोठेही फारसा शिकवला न जाणारा पेट्रोकेमिकल इंजिनीरिंग कोर्स तेथे सुरु केला ! इतर ठिकाणी हा कोर्स नाही तर कोकणातच का याचा कोणी विचार केला आहे का ?
आता जो कोकणात औद्योगिकरणाचा धोका आहे त्यापासून वाचण्यासाठी हा १३ कलमी कार्यक्रम सुचवत आहे - जाणकारांनी अजून भर टाकावी
१. कोकणात आता रिफायनरी होणार नाही असे दिसते , कोकण वासी लोकांचे अभिनंदन! तरी पण रिफायनरी चा प्लॅन परत येत आहे असे दिसते , त्याला विरोध झालाच पाहिजे
२. आता आपली सर्व ताकद वाढवण बंदर आणि अणुऊर्जा प्रकल्प होणार नाही यावर लावा
३. कोकणात कोणतेही प्रकल्प येता कामा नयेत
४. कोकणातील सर्व इंजिनिअरिंग कॉलेज ताबडतोब बंद करावीत
५. Batu सारख्या कॉलेज मध्ये रिफायनरी यावी म्हणून अतिशय लबाडीने प्लॅन करून गेली ३० - ३५ वर्ष पेट्रो केमिकल विषय शिकवत आहेत. या कॉलेज ला बंद करून त्यांना तुरुंगात टाकावे
६. कोणीही कोकणचा कुपुत्र प्रदूषण करणाऱ्या इंडस्ट्री मध्ये काम करत असेल तरी त्याला गावबंदी करावी . तसेच त्याचे पैसे घेणे नाकारावे
७. कोकण मध्ये ज्याचे वास्तव्य आहे असले कोणी प्रदूषणकारी इंडस्ट्री मध्ये गेले तर त्याला गावातून बाहेर काढून बहिष्कृत करावे.
८. भविष्यकाळात कोकणात शाळेत फिजिक्स आणि केमिस्ट्री शिकवणे बंद करावे म्हणजे कोणीही इंजिनिअरिंग करणार नाही
९. कोकणात आता इंजिनिअरींग शिकणाऱ्या सर्व मुलांना शिक्षा करावी . त्यांचे इंजिनिअरिंग शिक्षण बंद करावे . तसेच काहींना तर तुरुंगात टाकावे
१९. कोकणात आता चालू असलेले सर्व प्रकल्प बंद करावे.
११. कोकणात प्रकल्प , रिफायनरी यांच्या बाजूने बोलणाऱ्या सर्व लोकांना तुरुंगात टाकावे
१२. कोकणातून मुंबईत कमला जाऊन प्रदूषण करणाऱ्या सर्व लोकांना कामावरून काढून टाकावे . त्यांना दंड करून परत कोकणात पाठवावे
१३ . सर्व उद्योगांसाठी कोकण ब्लॅक लिस्ट करून घ्यावा
वाचने
502
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान.
कोकणच नव्हे तर, विकासासाठी देश उजाड होणार आहे काळजी करु नका. कोकणात अदानी आणि रीलायन्स मिळून अणूउर्जा क्षेत्राचा विकास करणार आहेत. कोकणातील लोकांना रोजगार आणि राज्याची वीजनिर्मीती वाढणार आहे. 'शाश्वत अणुऊर्जेचा वापर आणि भारताच्या परिवर्तनासाठी तिचा विकास (शांती) विधेयक, २०२५' ला मंजुरी दिली आहे.
एकसंध कायदेशीर चौकट तयार करणे, त्याद्वारे नियामक स्पष्टता आणि गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढवणे, हे याचे उद्दिष्ट आहे. खाजगी कंपन्या, संयुक्त उपक्रम किंवा केंद्र सरकारने स्पष्टपणे परवानगी दिलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीला भारताच्या अणुक्षेत्रात सहभागी होण्याची परवानगी देते, सर्व गोष्टी कायदेशीर आणि सुरक्षित करुन घेतल्या आहेत.
स्थानिक लोकांनी कितीही विरोध करु द्या. कायदेशीर सर्व प्रकारचा ताबा विकासासाठी सरकारने मिळवला आहे. कोकणाचा कायापालट करायचा आहे तेव्हा आता अशा गोष्टींचं नवल वाटत नाही.
-दिलीप बिरुटे
चाकरमान्यांनी जायचो कुटे?
जत्रा उत्सवांना देणगी कोण देणार?
_______________
गोवा , कर्नाटक, केरळात फारच थोडे पेट्रोकेमिकल कारखाने आहेत. त्यामुळे मत्स्यजीव, समुद्रीजीव सुरक्षित आहेत.
किनाऱ्यावर वॉटर स्पोर्टस असले की डिझेल पसरते वाळूवर........
https://youtu.be/GBOcmiRC1ZE?si=BXSVL8CsQ3Ot8RF-
अंजूना बीच ब्लॉग.
माणसाचा भस्मासूर झालाय...आपण…
माणसाचा भस्मासूर झालाय...
आपण पुढच्या पिढीसाठी कोकणही वाचवू शकत नाहीये... देणार फक्त भकास काँकरीट इमारती 😔
कोकणात प्रकल्प यायलाच हवेत
जे कोणी अतिउत्साह विकासप्रकल्पाना विरोध करत आहेत त्यांनी कोकणात येऊन ग्राउंड रियलीटी चेक करावी आणि मग बोलावे
बाडिस
In reply to कोकणात प्रकल्प यायलाच हवेत by मंदार कात्रे
बाडिस
हे गळे काढणार.... आणि काढत …
हे गळे काढणार.... आणि काढत राहाणार.
कोकण वाचवा ? काही शिल्लक आहे का ?
हे असेच गळे ग्रेटर अंदमान निकोबार वरहि काढणार ... रडत आणि कुंथत रहा