✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भारत पाक संधी,ओपरेशन सिन्दूर थांबले?

स
स्वरुपसुमित यांनी
Sat, 05/10/2025 - 19:32  ·  लेख
लेख
भारताने पाक हवाई तळांवर केलेल्या शेवटच्या हल्ल्यानंतर युद्धबंदी स्वीकारली. • पाक डीजीएमओने दुपारी ३:३० वाजता युद्धबंदीची विनंती केली, पुढील हल्ले न करण्याचे आश्वासन दिले • अमेरिकेने आयएमएफच्या १ अब्ज डॉलर्सच्या निधीचा तात्काळ युद्धबंदीशी संबंध जोडून पाकिस्तानवर दबाव आणला. • सिंधू पाणी कराराची माहिती सामायिकरण स्थगित आहे; भारत उत्तर नदी प्रकल्पांसह पुढे जाईल. • अमेरिकेने भारताच्या सुधारित युद्ध सिद्धांताचा औपचारिकपणे स्वीकार केला: भविष्यातील कोणताही दहशतवादी हल्ला = युद्धाची कृती. आणि मिपा वरुन काही आयडी उडाले ते परत येणार नाहीत पण पाक कुरापत काढल्याशिवाय राहणार नाही,भारत तयार असेल पण विनाकारण १०० पाक मारायला खर्च लाखो येत होता तो वाचेल
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
23944 वाचन

💬 प्रतिसाद (98)

प्रतिक्रिया

ऑपरेशन सिंदूरने २६ हिंदूंच्या हत्येच्या बदला घेऊन आपले उद्दिष्ट

वामन देशमुख
गुरुवार, 05/15/2025 - 11:16 नवीन
१. ऑपरेशन सिंदूरने २६ हिंदूंच्या हत्येच्या बदला घेऊन आपले उद्दिष्ट साध्य केले हे मोदींच्या संरक्षण धोरणाचे यश आहे. तथापि, २. ऑपरेशन सिंदूर बाबत भारताचा शब्द अंतिम नसून अमेरिकेचा शब्द अंतिम आहे असे चित्र जगभर उभे राहिले हे मोदींच्या परराष्ट्र धोरणाचे अपयश आहे.
  • Log in or register to post comments

बदला म्हणजे काय?

स्वधर्म
गुरुवार, 05/15/2025 - 15:29 नवीन
>> १. ऑपरेशन सिंदूरने २६ हिंदूंच्या हत्येच्या बदला घेऊन आपले उद्दिष्ट साध्य केले हे मोदींच्या संरक्षण धोरणाचे यश आहे. ज्या अतिरेक्यांनी त्या निरपराध हिंदूंना मारले, त्यांना पकडून किंवा मारून टाकल्याचा पुरावा मिळाला असता तर बदला घेतला असे म्हणणे योग्य वाटले असते. सध्या तरी तसा काही पुरावा मिळालेला नाही. आपण पाकच्या काही ठिकाणांवर हल्ला केला आहे आणि त्यांनी काही राफेल विमाने पाडल्याचा दावा केला आहे. त्यात कुणाचे किती नुकसान झाले त्यावरून कोणाला जास्त यश मिळाले याबाबत नेमके वस्तुनिष्ठ सत्य शोधणे अवघड आहे, कारण प्रत्येकजण आपल्याला सोईचे तेवढेच सांगत आहे, किंवा कबूल करत आहे. माई तेच म्हणत आहेत असे वाटते. एक नागरिक म्हणून आपल्याला यशच मिळाले असे माणणे मनुष्यस्वभावाला धरून होईल परंतु सत्य मात्र कधी कळेल असे वाटत नाही. >> २. ऑपरेशन सिंदूर बाबत भारताचा शब्द अंतिम नसून अमेरिकेचा शब्द अंतिम आहे असे चित्र जगभर उभे राहिले हे मोदींच्या परराष्ट्र धोरणाचे अपयश आहे. सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

ऑपरेशन सिंदूरने ने भारताने

रात्रीचे चांदणे
गुरुवार, 05/15/2025 - 15:52 नवीन
ऑपरेशन सिंदूरने ने भारताने पाकिस्तानला निसंशय धडा शिकवला आहे. ९ अतिरेक्यांचे तळ आणि नऊ दहा एअर बेस उध्वस्त करून भारताने नक्कीच काही प्रमाणात तरी बदला घेतला आहे. ह्या दरम्यान राफेल पाडले असेल तर तो एक लढाईचाच भाग आहे. शत्रू वर हल्ला ही करायचा आणि आपले काहीच नुकसान होऊ द्यायचे नाही हे फक्त बॉलीवूड मध्येच शक्य आहे नाहीतर इस्राईल पॅलेस्टन सारख्या लढाईत. ज्या अतिरेक्यांनी निरपराध हिंदूंना मारले त्यांना मारून किंवा शक्य झालं तर जिवंत पकडले तर मात्र बदला पूर्ण झाला म्हणू शकतो. त्यातही ते आतमध्ये कसे आले, हत्यार कोणी दिली कांय त्रुटी राहिल्या ह्याचा अभ्यास झाला पाहिजे.
  • Log in or register to post comments

ज्या अतिरेक्यांनी निरपराध

सुबोध खरे
गुरुवार, 05/15/2025 - 19:51 नवीन
ज्या अतिरेक्यांनी निरपराध हिंदूंना मारले त्यांना मारून किंवा शक्य झालं तर जिवंत पकडले तर मात्र बदला पूर्ण झाला म्हणू शकतो हे अतिरेकी म्हणजे प्यादी होती. त्यांना फिरवणारे वझीर मारले गेले आणी ते वझीर जिथे राहत होते ते किल्ले जमीनदोस्त केले हे कुणी लक्षातच घेत नाहीये. हवाई तलावर हल्ला झाला आणि रनवे वर बॉम्ब टाकले या अतिशय गौण गोष्टी आहेत. रनवे दोन तीन दिवसात दुरुस्त होतात. तुमच्या खिडकीची काच कुणीतरी फोडली ती काच दुरुस्त होते पण काच फाडणारा तुमच्या समोर उघड माथ्याने फिरतो आहे आणि परत कधीही काच फोडून घरात घुसेल हि धमकी देत असेल तर तुमची स्थिती काय होईल? त्यात अब्जावधी रुपयांची हवाई रडार नष्ट केली हि उपलब्धी मोठी आहे. काही F १६ विमाने हँगर मध्येच नष्ट झालेलीआहेत याबरोबर त्यांची ड्रोन मेन्टेनन्स सुविधा नष्ट झाली आहे. याची किंमत कोट्यवधी रुपये आहे. याही पेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानला जबरदस्त धक्का बसलेला आहे कारण सध्या असलेली त्यांची हवाई संरक्षण प्रणाली भारताने सहज भेदलेली आहे. चीनची S ३०० ची नक्कल असलेली प्रणाली HQ ९ हि निरुपयोगी ठरली आहे म्हणजेच पाकिस्तानला ती संपूर्ण बदलणे आवश्यक झालेलं आहे. यासाठी त्यांना अब्जावधी रुपये खर्च करावे लागणार आहेत. एवढे पैसे कुठून आणायचे हा प्रश्न जास्त मोठा आहे. आणि चीनच्या प्रणालीवर विश्वास तर नाही पण चीन शिवाय दुसरं कोणी च कर्ज देणार नाही आणि चीन कर्ज देईल ते फक्त त्यांची रडार प्रणाली विकत घेण्यासाठी. हे म्हणजे जावई आंबे विक्री करतो आणि त्याचे आंबे रद्दड आहेत पण सासरा दुसरीकडून आंबे घेऊ शकत नाही अशी स्थिती आहे. पाकिस्तानने स्वतःचे दूर पल्ल्याचे रडार निर्माण केले ते पण कुचकामी ठरले आहे त्याबद्दल कुठेच वाच्यता होत नाहीये. AM ३५०५ गुगलून पहा https://www.firstpost.com/world/pakistan-unveils-am3505-radar-to-monitor-indian-military-activity-across-land-and-air-13885950.html एवढा खोल विचार कोण कशाला करतो ? सगळे डावे मोदी कसे फेल गेले हेच सांगण्यात गर्क आहेत. आणि मोदी पाकिस्तानी लष्कराची स्थिती पाहून गालातल्या गालात हसताहेत. मग शस्त्रसंधीचे श्रेय तात्यांनी घेऊ दे कि चीनला. आपल्याला जे हवं होतं ते मिळवलं. हे भारतीय जनतेला समजावण्यात अपयश आलं हि एक दुर्दैवाची बाब आहे. बाकी इतर कोणताही देश तुम्ही जिंकलात हे जाणून घेण्यात मुळीच रस घेत नाही. अमेरिका आपली लॉकहीड मार्टिन कंपनीची F १६ आणि AN/TPS-77 रडार कुचकामी ठरली हे कोणत्या तोंडाने सांगणार आहे? त्यांचा बाजार उठेल ना AN/TPS-77 गुगलून पहा आपण तीन रडार निकामी केली आहेत यांची एकाची किंमत $828 million (६५०० कोटी भारतीय रुपये) इतकी आहे. म्हणजेच केवळ हि तीन रडार विकत घेण्यासाठी त्यांना आय एम एफ कडे तीन वेळा भीक मागावी लागेल आणि चीनची JF १७ विमाने, चेंगदू J १० आणि PL १५ क्षेपणास्त्रे किती कुचकामी ठरली हे कशाला आपले तोंड उघडून सांगणार आहे? आपले लोक सुद्धा बाहेरचे लोक जे सांगतील त्यावरच विश्वास ठेवतात. बाकी कुणी ही ९ दहशतवादी तळ उध्वस्त केले याबद्दल बोलत नाहीये. कारण त्याबद्दल कोणताही वाद नाहीये. मूळ हेतू तर तोच होता. असंच असतं. मोदी द्वेषाची कावीळ झाली कि काहीच स्पष्ट आणि शुभ्र दिसत नाही.
  • Log in or register to post comments

पूर्णपणे त्रयस्थ स्त्रोतांकडून

स्वधर्म
गुरुवार, 05/15/2025 - 22:19 नवीन
तुंम्ही माझ्या प्रतिसादातले वाक्य उचलून लिहिल्यामुळे... तुम्ही जे सर्व लिहिले आहे, ते १. काय झाले असते तर तुंम्हाला आवडले असते ते आहे की २. प्रत्यक्षात काय घडले ते आहे? तुमची सगळी माहिती मला टाईप १ ची वाटते आहे. कारण त्यात अत्यंत ढोबळ विसंगती आहेत. केवळ एक उदाहरणः >> एवढे पैसे कुठून आणायचे हा प्रश्न जास्त मोठा आहे. आणि चीनच्या प्रणालीवर विश्वास तर नाही पण चीन शिवाय दुसरं कोणी च कर्ज देणार नाही... आय एम एफ ने पाकिस्तानचे कर्ज ऐन हल्ल्यांच्या धामधुमीत मंजूर केल्याचे संपूर्णपणे विसरणे किंवा मुद्दामहून अनुल्लेख करणे भानावर असलेल्यास अशक्य आहे. इथे भारताने विरोध करण्याच्या ऐवजी तटस्थ भूमिका का घेतली हे अनाकलनीय आहे. दुसर्‍यांचा पाकला विरोध करण्यासाठी प्रभाव टाकणे तर सोडा, आपणही साधा विरोध नोंदवू शकत नाही. हे कसले धडा शिकवणे आहे? खरे तर याआधी मोदींच्या अगदी जवळचे अर्थसल्लागार असलेले सुब्रमणियम यांनी केलेला एक घोटाळा बाहेर आल्यानंतर वरील कर्ज मंजूरीच्या तीन दिवस आधी त्यांना आंतरराष्ट्रीय नाणे निधीत असलेली नियुक्ती रद्द करून परत बोलावले आहे. तिथेच आपल्या सरकारची पुरेशी शोभा झाली आहे. https://youtu.be/XcmdrtjRE0E?si=H0I7E8JT2gTadioh बाकी तुंम्ही इतके काय काय लिहिले आहे त्याचा त्रयस्थ विश्वासार्ह स्त्रोत दिल्याशिवाय काहीच बोलता येणार नाही. खालील एक व्हिडिओ मला एका भाजप समर्थकाने पाठवला होता. https://youtu.be/08Xcnxpx_wQ?si=qx0KCOebsyisPPp0 निवृत्त मेजर जनरल नारायणन यांचा. ते एखाद्या गल्लीत राडा झाल्यावर सर्किट लोक जसे भाईची यशोगाथा गातात तशी आपली यशोगाथा गात आहेत. अर्थात त्यांनी केलेले अण्वस्त्रांना धोका पोहोचवल्यामुळे पाक हादरला वगैरे दावे ताबडतोब संबंधीत विभागाने ( जयस्वाल यांनी ) खोडून काढले आहेत. https://youtu.be/oZCP5Z-RxP4?t=683 तसेच इकॉनॉमिक टाईम्सनेही ते दावे खोडले आहेतः https://economictimes.indiatimes.com/news/international/world-news/epicentre-of-pak-earthquake-near-geological-faultline-national-center-for-seismology/articleshow/121112728.cms माझे मत असे होते व आहे: >> कुणाचे किती नुकसान झाले त्यावरून कोणाला जास्त यश मिळाले याबाबत नेमके वस्तुनिष्ठ सत्य शोधणे अवघड आहे, कारण प्रत्येकजण आपल्याला सोईचे तेवढेच सांगत आहे, किंवा कबूल करत आहे. बाकी तुंम्हाला मोदी गालातल्या गालात हसत असल्याचे दिसते जे आंम्हाला दिसत नाही तेंव्हा आपण आपल्या जगात मजेत असा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

इथे भारताने विरोध करण्याच्या

सुक्या
गुरुवार, 05/15/2025 - 22:58 नवीन
इथे भारताने विरोध करण्याच्या ऐवजी तटस्थ भूमिका का घेतली हे अनाकलनीय आहे. माझ्या माहीतीप्रमाणे आय एम एफ मधे मतदान प्रक्रियेत नकार नोंदवण्याची सोय नाही. खरे तर आय एम एफ मधे अमेरिका , चीन, फ्रान्स ह्या देशांची एकाधीकारशाही आहे. त्यातही मतदान प्रक्रियेत कोटा सिस्टीम आहे. एकट्या अमेरिकेला १६% व चीन ला ६% कोटा दिलेला आहे. भारत व ईतर देश २% वगेरे कोट्यात येतात. नकार नोंदवण्याची सोय नसल्यामुळे मतदान प्रक्रियेत भाग न घेणे किंवा मित्रदेशांना मतदान प्रक्रियेत भाग घेण्यापासुन पराव्रुत्त करणे ईतकेच आपण करु शकतो. त्यातही अमेरिका व चीन ह्या देशांना वेटो पावर आहे. त्यामुळे कुणी कीतीही आदळाअपट केली तरी हे दोन देश करतील तेच होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

तुमची माहिती बरोबर आहे

स्वधर्म
गुरुवार, 05/15/2025 - 23:26 नवीन
तुमची माहिती बरोबर आहे विरोधी मत टाकता येत नाही. पण फक्त मत देणे किंवा ते न देणे एवढीच भूमिका भारताच्या हातात होती? अमेरिकेत 'माय फ्रेंड' असताना त्यांना आपल्या बाजूला करून घेता आले नसते? किमान हे प्रकरण संघर्ष मिटेपर्यंत पुढे ढकलण्याएवढा तरी वट जगातल्या पाचव्या क्रमांकाच्या अर्थसत्तेला पाहिजे का नाही? नसेल तर ती दोस्ती, ती जगात वाढलेली किंमत काय कामाची?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

अमेरीकेची दोस्ती ही

सुक्या
Fri, 05/16/2025 - 04:04 नवीन
अमेरीकेची दोस्ती ही मॄगजळासारखी आहे. दुरुन दिसते पण प्रत्यक्षात ती त्यांच्या सोयीची असते. अमेरीका हा आजवर कुणाचाही मित्र म्हणुन वागला नाही. फक्त जिथे फायदा आहे तिथे तो मित्र. काम झाले की तू कोण नी मी कोण? जगात ईतरत्र काहीतरी उचापती करुन राजकीय प्रश्न करुन तो भाग अस्थीर करुन शस्त्र विकणे / आपल्याला वरचढ होइल अशा देशांना काहीतरी कुरापत करुन त्यांची डोकेदुखी वाढवुन ठेवणे असल्या कुरापती ते करत असतात. चीन व अमेरिकेची विचार सरणी एकच आहे. त्यामुळे शहाण्याने ह्या दोन्ही देशांवर जास्त अवलंबुन राहु नये हेच खरे. आशियायी देशांमधे चीन वर तसेच भारतावर वरचढ होण्यासाठी पाकीस्थान हा एक प्यादा आहे. त्यामुळे त्याचा बंदोबस्त ना चीन करतोय ना अमेरिका. त्यातही भारताची आजवर असलेली "बनाना रिपब्लिक" ही छबी अजुनही तशीच आहे. भारतीय नेते आजही अगदी कडक, आर या पार निर्णय घेत नाहीत. आता तुर्किये चे बघा, आम्हाला कीतीही नुकसान झाले तरी चालेल पण आम्ही पाकीस्थान ची साथ देउ असे ते म्हणत आहेत. म्हणजे तुम्ही आमच्यावर कितीही बहिष्कार टाका आम्हाला शष्प फरक पडत नाही. ही बाब भारतीय नेते अजुनही करत नाही. याला बहुअंशी भारतीय जनता जबाब्दार आहे. म्हणजे समजा एखाद्या नेत्याने असा निर्णय घेतला तर त्याचे समर्थन १० लोक करतील पण ९० लोक त्याला विरोध करतात. त्यावर जर त्यानिर्णयामुळे अंगावर शेकले तर त्या नेत्याची उचल्बांगडी झाली म्हणुन समजा. त्यामुळे आपले नेते असले धाडसी निर्णय घ्यायला घाबरतात. त्यामुळेच जरी ५ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलो तरी जगात अजुनही वट नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

अमेरिकेत 'माय फ्रेंड' असताना

सुबोध खरे
Fri, 05/16/2025 - 09:34 नवीन
अमेरिकेत 'माय फ्रेंड' असताना हा एक मूलभूत गैरसमज आहे. अमेरिका कुणाचाही मित्र नाही. मुळात रशिया आणि चीन वर वर्चस्व ठेवण्यासाठी पाकिस्तानला ते "प्यादं" म्हणून वापरतात. तेंव्हा पाकिस्तानची बाजू घेऊन ते भारताला मदत करतील हि अपेक्षा करणे हेच बालबुद्धीचे (NAIVE) लक्षण आहे. सुदैवाने भारताच्या लष्करी आणि राजकीय धोरण कर्त्यांना ( कोणत्याही पक्षाचे असोत ) अमेरिकेवर भरवसा ठेवता येणार नाही हे माहिती आहे. त्यामुळेच कोणतीही शस्त्रास्त्रे घेताना अमेरिकेला आपण खड्यासारखे बाजूला ठेवलेले आहे. जी शस्त्रास्त्रे अमेरिका भारताला स्वतःच्या फायद्यासाठी देऊ करते तेवढीच आपण घेतलेली आहेत. उदा P ८ I पोसायडॉन हे पाणबुडी विरोधी विमान चीनवर लक्ष्य ठेवण्यासाठी अमेरिकेने आपल्याला देऊ केले. "माय फ्रेंड" म्हणताना श्री मोदी यांनी ट्रम्प याना सुद्धा व्यवस्थित फाटा मारलेला आहे हे आपण लक्षात घेत नाही. यात S ४०० हि क्षेपणास्त्र प्रणाली असो कि रशिया कडून तेल घेणे असो किंवा आताची ताजी बातमी म्हणजे विक्रांत आणि विक्रमादित्य या विमानवाहू नौकांसाठी अमेरिकी F १८ HORNET सोडून फ्रान्स ची RAFALE M विकत घेणे. आपले अमेरिकेशी संबंध केवळ व्यवहार आणि व्यापारापुरते आहेत. श्री मोदी यांनी पुतीन यांची मैत्री अजिबात तोडलेली नाही हे अमेरिकेस पसंत नाही. राजकारणी तुम्ही समजत तितके भोळे किंवा निरागस नसतात( नसायला पाहिजेत). अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष फार तर चार वर्षे असेल, त्याच्या वर भरोसा ठेवून पुढच्या चाळीस वर्षाचे भविष्य अंधारात ठेवता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

आय एम एफ ने पाकिस्तानचे कर्ज

सुबोध खरे
Fri, 05/16/2025 - 09:39 नवीन
आय एम एफ ने पाकिस्तानचे कर्ज ऐन हल्ल्यांच्या धामधुमीत मंजूर केल्याचे संपूर्णपणे विसरणे किंवा मुद्दामहून अनुल्लेख करणे भानावर असलेल्यास अशक्य आहे. Pakistan receives 2nd IMF payout that India had objected to This payment is part of the second instalment of a $7 billion IMF loan deal that began in September 2024 and will run for 37 months. With this latest inflow, the total funds given to Pakistan so far under the EFF have reached $2.1 billion. https://www.indiatoday.in/business/story/pakistan-receives-2nd-imf-payout-as-india-raises-concerns-2724656-2025-05-14 याचा युद्धाशी काहीही संबंध नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सोयिस्कर

स्वधर्म
Fri, 05/16/2025 - 16:27 नवीन
>> याचा युद्धाशी काहीही संबंध नाही - आहे ना? म्हणून तर भारताने आक्षेप घेतला होता. तुंम्ही दिलेल्या लिंकमधेच ही दुसरी लिंक आहे: https://www.indiatoday.in/india/story/india-international-monetary-fund-imf-voting-13-billion-bailout-package-for-pakistan-2722734-2025-05-10?utm_source=global-search&utm_medium=global-search&utm_campaign=global-search "Debt, terror and reputational Risk India’s most serious concern was that IMF funds could be misused to sustain state-sponsored cross-border terrorism. Citing a UN report on military-run businesses in Pakistan and the IMF’s own Evaluation Report, India warned that continued bailouts pose a moral hazard and reputational risk for international donors." - मोदींनी जगातील जास्तीत जास्त देशांना भेटी देण्याचा विक्रम केला आहे. त्यासाठी तुमच्यासारख्या करदात्यांचे हजारो कोटी रूपये खर्च केले आहेत. त्याचा काय उपयोग? - मोदी व भाजप समर्थक सतत मोदी व भारताचे वजन आंतरराष्ट्रीय पातळीवर कसे वाढले आहे, मनमोहन सिंग यांच्या काळात ते किती कमी होते इ. वल्गना करत असतात. जर हे वाढलेले वजन/ शब्दाला किंमत स्पष्टपणे दहशतवादाला पाठिंबा देणार्‍या व आपल्याला त्रास देणार्‍या देशाला मिळणार्‍या आंतरराष्ट्रीय कर्जाला निदान काही काळ प्रलंबीत सुध्दा करू शकत नसेल, तर नक्की याचा उपयोग काय? आर वी ओन्ली द टेकर्स? मताला काहीही किंमत नसलेले? त्यामुळे वर वामन देशमुख म्हणतात ते अगदी पटण्यासारखे आहे: २. ऑपरेशन सिंदूर बाबत भारताचा शब्द अंतिम नसून अमेरिकेचा शब्द अंतिम आहे असे चित्र जगभर उभे राहिले हे मोदींच्या परराष्ट्र धोरणाचे अपयश आहे. हे दुर्दैवाने खरे आहे. खरे म्हणजे पाकची अर्थव्यवस्था महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेपेक्षा छोटी असून, आजे जग पाकला भारताच्या बरोबरीचा देश मानू लागले आहेत. भारताच्या विरोधाला न जुमानता पाकने हवे ते मिळवले असा संदेश गेला आहे. तुमच्यासारखे मोदी समर्थक श्रेय देण्याच्या बाबतीत मोदींशिवाय दुसरे नांव घेत नाही, पण काही जबाबदारी घेण्याची वेळ आली की ती त्यांच्यावर जराही पडू देत नाही. पण आता विश्वगुरुंची कितीही आरती केली तरी देशासाठी हे एक अपयशच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

हेनरी किसिंजर

चंद्रसूर्यकुमार
Fri, 05/16/2025 - 10:33 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

बरोबर पण...

स्वधर्म
Fri, 05/16/2025 - 16:40 नवीन
>> अमेरीका हा आजवर कुणाचाही मित्र म्हणुन वागला नाही. बरोबर मोदी कितीही मित्र म्हणत असले तरी ट्रंप त्यांना शपथविधीला बोलावत नाही. तसेच आपल्या नागरिकांना हातकड्या घालून अत्यंत अपमानास्पद रितीने पाठवतो त्यावर आपले महानेते चिडीचूप! नेपाळच्या नागरिकांनासुध्दा त्यांनी हातकड्या न घालता पाठवले. खरोखरच असे नेतृत्व देशासाठी .... आहे. >> त्यामुळे आपले नेते असले धाडसी निर्णय घ्यायला घाबरतात. न घाबरल्याचीही उदाहरणे आहेत. पण वस्तुनिष्ठपणे पाहिली तर दिसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

आत्तापर्यंतच्या अनेक विश्लेषणामध्ये

गौरांग
Fri, 05/16/2025 - 00:19 नवीन
आत्तापर्यंतच्या अनेक विश्लेषणामध्ये हा लेख दोन्ही बाजुंचा लेखाजोखा अतिशय संयमित आणि संतुलित पद्धतीने मांडत आहे. https://www.brookings.edu/articles/lessons-for-the-next-india-pakistan-war/ भारताच्या दृष्टिकोनातून कोणीही पाकिस्तानचा पहेलगाम हल्य्यात सहभाग होता कि नाही हा प्रश्न सुद्धा विचारत नाहीत आणि सर्वजण पाकिस्तानचा सहभाग आहेच, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष, हे धरूनच चालत आहेत हा एक महत्वाचा बदल आहे.
  • Log in or register to post comments

युद्धविरामवर खूपच उथळपणे मते मांडली आहेत अनेक जणांनी.....

विअर्ड विक्स
Fri, 05/16/2025 - 23:16 नवीन
युद्धविरामवर खूपच उथळपणे मते मांडली आहेत अनेक जणांनी..... १. डोनाल्ड ने सामाजिक माध्यमावर शस्त्रसंधी चे पोस्ट टाकून त्यांचा अवखळपणा दाखवला असे माझे स्पष्ट मत आहे , यापूर्वीच्या युद्धात सुद्धा कारगिल ला कोणी मध्यस्थी केलेली हे जरा स्मरणात ठेवा. टॅरिफ युद्धातील चीन विरुद्धच्या कोलांट्या उड्या वरून आधीच हसे करून घेतले आहे अश्या माणसाच्या बोलण्यावर कितपत विश्वास ठेवावा. २. १९७१ च्या युद्धानंतर सुद्धा भुत्तोंचे व्हिडीओ पहा, असा कांगावखोरपणा त्या देशात ठासून भरलेला आहे त्यामुळे त्यांचे विडिओ पाहून आपली मते ठरवणे थोडे धाडसी ठरेल. आपण तहात का हरतो वा कोणत्या दबावाखाली येतो हेय आपल्या नपुंसक अहिंसा धोरणाचा परिपाक आहे. ७१ साली सुद्धा काश्मिरातील भूभाग आपण परत केला कारण ते आपले लक्ष्य नव्हते. ते आता किती भारी पडतंय त्याचा विचार करा. ३. अमेरिका आणि पाक यांचे संबंध भारतापेक्षा जुने आहेत सध्याचा सिपेक चा मुद्दा सोडला तर दरवेळी पाकला आपल्या कह्यात ठेवले आहे. आताची ट्रम्पची प्रतिक्रिया आल्यावर चीनची तात्काळ प्रतिक्रिया का आली याचा विचार करा ४. escalation ladder ची एक पायरी आपण वर चढलोय म्हणूनच आत्ता फक्त चर्चा हि पाकव्याप्त काश्मीरवर असे सरकार म्हणताय ५. सरकार कमळाचे असो वा हाताचे, आपले स्वकीयांचे हित जाणणे महत्त्वाचे आहे. ६. परराष्ट्र संबंधात कोणीकोणाचा मित्र वा शत्रू नसतो , हे वाक्य सध्याच्या राजकारणात सुद्धा लागू आहे त्यामुळे या युध्दविरामासंदर्भातील चर्चा पक्षभेद विसरून करणे गरजेचे आहे. ७. पाक हा अमेरिकेकडॆ जाऊन रडला नि युद्धविराम झाला पण त्या दोन दिवसात किती अनेकांची भीतीने त्रेधा तिरपीत उडालेली हे जरा आठवा , माझ्या ओळखीतले ब्लू कॉलर लोकसुद्धा दुबईत जाऊन युद्ध बचाव करण्याचे स्वप्न बाळगून होते , त्यामुळे ऑल आऊट वॉर हे बोलण्यास चांगले वाटले तरी जेव्हा वेळ स्वतःवर येते तेव्हा भान येते ( जी यावेळेस ब्लॅकआउट ने अनेकांस जाणवली ) ८. जो स्वतःच इहलोकी लवकर पोहचणार आहे त्याचा गळा दाबून खुनाचा आरोप घेऊन तुरुंगात जावे कि त्याच्या प्राणवायू नलिकेस हलका छेद करून नामनिराळे व्हावे हे ज्याने त्याने ठरवावे.
  • Log in or register to post comments

आपण तहात का हरतो वा कोणत्या

सुक्या
Sat, 05/17/2025 - 01:16 नवीन
आपण तहात का हरतो वा कोणत्या दबावाखाली येतो हेय आपल्या नपुंसक अहिंसा धोरणाचा परिपाक आहे. +१ एकुणातच (बहुतेक) भारतीय लोकांची (यात हुच्च मध्यमवर्गिय जास्त येतात) देशसेवा / देशप्रेम सोयिप्रमाणे बदलते. शिवाजी शेजारच्या घरात जन्माला यावा माझ्या घरात नाही हीच त्यांची विचारसरणी असते. बघा मालदीव ने कीतीही ईंडीया हटाओ केला तरी तिथे जाउन सुट्टी एंजोय करणारच. काश्मीरात कितीही लोक मेले तरी "यहा सब ठीक है" बोलणारच. आतंकवादाला धर्म नसतो हे बरळ्नारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विअर्ड विक्स

यथा

माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 05/20/2025 - 11:09 नवीन
काश्मीरात कितीही लोक मेले तरी "यहा सब ठीक है" बोलणारच. आतंकवादाला धर्म नसतो हे बरळ्नारच. यथा राजा(माजी आणि आजी..सगळेच आले) तथा प्रजा.९० च्या दशकापासुन कश्मीरवर पाकिस्तान पुरस्कृत हल्ले होत आहेत. पण तरीही दोन्ही देशांचे राजदूत ब्रुसेल्स्/लंडनमध्ये हास्तांदोलन करताना दिसायचे. एके ठिकाणी एकमेकांवर गोळीबार करायचा आणी वाघा बॉर्डरवर 'लेफ्ट-राईट' करत दोन्ही बाजुला गर्दी जमवायची. नुसती ढोंगबाजी. "कश्मिर प्रश्न चर्चेनेच सुटेल" हे वाक्य राजकीय नेतेच करत होते. 'त्याग' करणारा मध्यमवर्ग केव्हाच 'वर' गेला आहे. सध्याचा मध्यम वर्ग वस्ताद आहे. तो राजकीय नेत्यांचे अनुकरण करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

भारताने पाकिस्तान विरोधात

विवेकपटाईत
Tue, 05/20/2025 - 09:42 नवीन
भारताने पाकिस्तान विरोधात युद्ध पुकारले नव्हते. युद्धासाठी कारण ही नव्हते. भारताने फक्त पाकिस्तान येथील आतंकी मुख्यालये नष्ट केली. त्यात मसूद आजहरच्या परिवारा समेत अनेक प्रमुख आतंकी मेले. किती मेले याचे प्रमाण पाक मीडिया ने दिले त्यामुळे हा प्रश्न यावेळी कोणी विचारणार नाही. आपले मिशन पूर्ण झाले. या शिवाय अज्ञात दर महिन्यात किमान एक तरी आतंकी मारतात, ते सत्र सुरूच राहणार. पाकिस्तान ने द्रोण आणि मिसाईल हल्ला केला नसता तर पुढे युद्ध झालेच नसते. पण आपण पाक हल्ल्याचा लाभ घेऊन आपण त्यांची हवाई सुरक्षा यंत्रणा नष्ट केली. या शिवाय त्यांची विमान तळांवर उभी 30-50 विमाने किंवा जास्तीही नष्ट झाली असेल. आपल्या तिन्ही सैन्याने बॉर्डर क्रॉस केली नाही. त्यामुळे आपले विमान इत्यादि पडण्याचा प्रश्नच येत नाही. युद्ध विराम हा प्रश्न भारतासाठी कधीच नव्हता. कुणाला ही माहीत नाही आपले वेगवेगळ्या ठिकान्यांचे मिसाईल हल्ले जमिनीवरून, समुद्रातून किंवा विमानाने भारतीय सीमेत राहून केले. एकदा बलुचिस्तान वेगळा झाला की सिंधु देश ही वेगळा होईल, पख्तून भाग अफगाणिस्तान घेईल. उरलेला पंजाब फक्त पाकिस्तान मध्ये उरेल. पीओके घ्यायला आपल्याला युद्ध करण्याची गरज पडणार नाही. बाकी मोदी विरोधात लोक मानसिक विकृत झाले आहेत भारताचे नुकसान झाले पाहिजे होते असे त्यांना वाटते. सैन्यावर आणि सैन्य प्रवक्ता, प्रेस कोन्फ्रेंस वर त्यांच्या विश्वास ही नाही.
  • Log in or register to post comments

मिपा प्रवक्ते...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 05/20/2025 - 10:48 नवीन
भारताने पाकिस्तान विरोधात युद्ध पुकारले नव्हते.
अच्छा.
युद्धासाठी कारण ही नव्हते.
अच्छा.
पीओके घ्यायला आपल्याला युद्ध करण्याची गरज पडणार नाही.
=)) अरे देवा. आपोआप सोडतील वाटतं तो भुभाग. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

काहीतरी चूक होतेय.

सौन्दर्य
Fri, 05/23/2025 - 23:28 नवीन
भारतातील दहशतवादास पाकिस्तानी सेनाच कारणीभूत आहे, सेनाच त्यांना ट्रेनिंग, पैसे, संरक्षण पुरवते असे जर आपण म्हणतो तर फक्त दहशतवादी तळांवर हल्ले करून , ते नष्ट करून, दहा - बारा दहशतवादी मारून आपण आपले ध्येय साध्य कसं केलं हे कळले नाही. ज्यावेळी आपण आपल्या आसपासाचे डास मारतो त्यावेळी, साचलेलं पाणी, कचरा, गटारं वगैरेत औषध फवारून डासांच्या मूळ पैदाईशी जागांना देखील नष्ट करतो. त्यामुळे आपल्याकडे युद्धाचे सयुक्तिक कारण होतेच .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

पहिल्या दिवशी आपण दहशतवादी तळ

रात्रीचे चांदणे
Sat, 05/24/2025 - 10:30 नवीन
पहिल्या दिवशी आपण दहशतवादी तळ तर उध्वस्त केलेच पण त्याबरोबर रडारही उडीवले. आणि शेवटच्या दिवशी एअर बेसेस वर मिसाईल टाकले. म्हणजेच पाकिस्तानी एअर फोर्स वरचं हल्ला केला होता. पण तरीही ही कारवाई पाकिस्तानच्या ड्रोन हल्लाच्या उत्तर म्हणूनच केलेली दिसतेय. मोदींनी त्यांच्या भाषणात स्पष्ट केलं की हिथुन पुढचे दहशतवादी हल्ल्यांकडे युद्धाची कृती म्हणूनच बघितले जाईल. ह्या वेळी पाकडे घाबरले पण पाकिस्तानी सेने वरचा हल्ला म्हणजे जवळ जवळ युद्धच. म्हणजे त्या दृष्टीनेच आपल्याला तयारी करावी लागेल. प्रत्येक वेळी प्रत्येक मिसाईल इंटरसेप्ट केलेच जाईल याची शाश्वती नसेल. सैनिक शाहिद होतील, सामान्य नागरिकांचाही जीव जाईल. युद्धात काहीतरी उद्धीष्ट असावं लागतंय. ह्यावेळी दहशतवादी तळ उद्वस्थ करणे हे आपले उद्धीष्ट होते.आणी ते साध्यही झाले. पण युद्ध चालूच करायचं तर उद्धीष्ट कांय असेल आपलं.मला तरी वाटत नाही की POK ताब्यात घेण्याचा आपला विचार आहे किंवा ते व्यावहारिकाही आहे. त्यात POK ताब्यात घेणं म्हणजे CPEC ला धोका, म्हणजे चीनच्या गुंतवणूकीला धोका. उदा समजा चीन ने नुसत्या त्यांच्या फौजा सीमेवर जमवल्या तर आपल्यालाही त्यांना match करावे लागेल. पाकड्यांसाठी काश्मीर हे फक्त सांगायचं कारण आहे खरं तर त्यांना हिंदू शेजार नकोच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौन्दर्य

भारताविरुद्ध कार्यरत असलेल्या

रामचंद्र
Sat, 05/24/2025 - 18:07 नवीन
भारताविरुद्ध कार्यरत असलेल्या विविध धार्मिक तोंडावळ्याच्या दहशतवादी संघटना, तालिबान या पाकिस्तान सरकार, सैनादल आणि आयएसआय यांनीच खतपाणी घालून वाढवल्यात हे सर्वांनाच माहीत आहे. मग फांद्यांवर घाव घालत बसण्यापेक्षा मुळावरच घाव घालण्याचे थोरल्या बाजीरावाचे धोरण आपण अवलंबत आहोत काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौन्दर्य

आपल्या पैकी किती लोकांचो

सुबोध खरे
Sat, 05/24/2025 - 19:28 नवीन
आपल्या पैकी किती लोकांचो मुंबई वर किंवा दिल्लीवर अणू बॉम्ब टाकला जाईल हि शक्यता स्वीकारण्याची तयारी आहे? युद्धखोरी सोपी असते. मुळा वर घाव घालायचा म्हणजे काय? सर्वनकष युद्ध करून पाकिस्तानची सर्वचं सर्व लष्करी ठाणी उध्वस्त करायची? असे केल्यास पाकिस्तान नक्कीच तुमच्या वर अण्वस्त्र हल्ला करेल. पाकिस्तान संपूर्ण बेचिराख होईल पण तुमची तीन चार शहरे नष्ट होऊन दोन चार कोटी लोकसंख्या मृत्युमुखी पडेल. हि तयारी आहे का? आज लोकांना दोन महिने अर्धाच पगार मिळेल म्हणून सांगितले तर बाप मेल्यासारखे सुतकी चेहरे होतील. मग एवढे सर्वंकष युद्ध तयारी किती लोकांची असेल. आपण पाकिस्तानच्या ९ दहशतवादी तळांवर हल्ला केला आणि नंतर ११ वायुदलाच्या तळांवर ब्रह्मोस क्षेपणास्त्राने जबर हल्ला चढवला. या अगोदर पाकिस्तानची अमेरिकेने दिलेली TPS ७७ हि किमान तीन रडार प्रणाली ध्वस्त केली. शिवाय चीनने दिलेली HQ ९ या क्षेपणास्त्र प्रणाली नष्ट केल्या. मुळात याचा अर्थ असा आहे कि पाकिस्तान उघडा पडला आहे आणि आता भारताने लगेच प्रतिहल्ला केला तर त्याविरुद्ध त्यांच्याकडे सक्षम अशी हवाई संरक्षण प्रणालीच अस्तित्वात नाही. हि प्रणाली आणि नष्ट झालेली विमाने परत उभी करण्यासाठी पाकिस्तानला तीन ते चार सकल उत्पन्न ( जीडीपी) खर्च करावे लागणार आहे. म्हणजेच पुढच्या चार वर्षाचे सकल उत्पन्न यात खर्च होणार आहे. या खर्चासाठी पैसे/ कर्ज कोण पुरवणार? अर्थात चीन. पण त्याबदल्यात पाकिस्तानला चीनचीच हत्यारे विकत घ्यावी लागणार. मुळात आपण आपल्या अचूक क्षेपणास्त्रे प्रणाली ने चिनी शस्त्रास्त्रे कुचकामी ठरवली आहेत. त्यामुळे हि शस्त्रे विकत घेतल्यावर पाकिस्तानी लष्करशहा कायमच भीतीखाली राहणार कि परत भारताने हल्ला केला तर हि शस्त्रास्त्रे आपले संरक्षण करू शकणार नाहीत. हा मानसिक आघात प्रत्यक्ष विध्वंसापेक्षा जास्त भीतीदायक असेल. एवढे असले तरी पाकिस्तान यातून फार काही सुधारेल हि आशा नाहीच. शांती मिळवण्याचा सर्वात उत्तम उपाय म्हणजे पुढच्या युद्धाची तयारी हाच आहे. तेंव्हा आपल्याला पाकिस्तान भविष्यात काय करेल हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे तजवीज करावी लागेल. इथे केवळ पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घाला सांगितले कि आपले डावे लोक कलेवर घाला म्हणून आई मेल्यासारखे रडायला लागतात. तुर्की आणि अझरबैजान वर संपूर्ण बहिष्कार टाका म्हटले तर ५० % लोकच तयार होतात. बाकी १५ ऑगस्ट / २६ जानेवारीला गाडीवर झेंडा फडकावला कि आपली देशभक्ती सिद्ध होतेच.
  • Log in or register to post comments

त्रयस्थ स्त्रोताकडून माहितीचा दुवा

स्वधर्म
Wed, 05/28/2025 - 15:45 नवीन
युद्धाबाबत आपण व्यक्त केलेल्या मतांशी सहमत. >> नंतर ११ वायुदलाच्या तळांवर ब्रह्मोस क्षेपणास्त्राने जबर हल्ला चढवला. या अगोदर पाकिस्तानची अमेरिकेने दिलेली TPS ७७ हि किमान तीन रडार प्रणाली ध्वस्त केली. शिवाय चीनने दिलेली HQ ९ या क्षेपणास्त्र प्रणाली नष्ट केल्या. दावे तर दोन्ही बाजूंनी केले जातात पण दोन्ही देशातील नागरिकांना त्यांचे सरकार सांगेल त्या माहितीवरच अवलंबून रहावे लागते. अशा परिस्थितीत वरील माहिती पडताळून पाहण्याबाबत त्रयस्थ स्त्रोताकडून माहितीचा दुवा मिळू शकेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

भरतीय सेनेच्या पत्रकार

रात्रीचे चांदणे
Wed, 05/28/2025 - 17:30 नवीन
भरतीय सेनेच्या पत्रकार परिषदेत वेळोवेळी त्यांणी satelite फोटो दाखवलेलेच आहेत. पण त्यावर विश्वास नसेल तर पाकिस्तानच्या वायुदलाच्या तळांचे before-and-after फोटो newyork times आणि washington post ने फोटो पब्लिश केले आहेत. ते बघू शकता. HQ-9 रडार आणि TPS ७७ चे फोटो मात्र नाहीत. ब्रह्मोस क्षेपणास्त्रानेच हल्ला चढवला ह्याचे मात्र पुरावे कुणाकडे नसतील. म्हणजे भारतीय सेनाआणि पाकिस्तानी सेना सोडून सोडून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

आधीचे व नंतरचे फोटो न्यूयॉर्क

स्वधर्म
Wed, 05/28/2025 - 22:17 नवीन
आधीचे व नंतरचे फोटो न्यूयॉर्क टाईम्सने दिले आहेतः https://www.nytimes.com/interactive/2025/05/14/world/asia/india-pakistan-attack-damage-satellite-images.html त्यापैकी दोन ठिकाणे भोलारी आणि नूर खान एअर बेस असून तिथे दोन इमारतींचे नुकसान झाल्याचे दिसत आहे. बाकी रन वेचे नुकसान झाल्याचे फोटो आहेत, जे फार गंभीर नसावे. मी पाहिलेल्या लेखात दोन्ही बाजू परस्परांचे नुकसान आधिकचे सांगत आहेत असेही म्हटले आहे. But satellite imagery indicates that while the attacks were widespread, the damage was far more contained than claimed पाकचे भारतापेक्षा जास्त नुकसान झाले असे म्हटले आहे. त्यामुळे पाकला हादरा तर नक्कीच बसला असणार. परंतु हा ११ वायुदलाच्या तळावर *जबर* हल्ला आहे किंवा नाही ते तज्ञच सांगू शकतील. तसेच आपण म्हणता तसे 'HQ-9 रडार आणि TPS ७७ चे फोटो मात्र नाहीत.' त्यामुळे 'पाकिस्तानची अमेरिकेने दिलेली TPS ७७ हि किमान तीन रडार प्रणाली ध्वस्त केली. शिवाय चीनने दिलेली HQ ९ या क्षेपणास्त्र प्रणाली नष्ट केल्या.' या दाव्याला त्रयस्थ स्त्रोताकडून आधार अपेक्षित आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

मी पाहिलेल्या लेखात दोन्ही

रात्रीचे चांदणे
गुरुवार, 05/29/2025 - 07:52 नवीन
मी पाहिलेल्या लेखात दोन्ही बाजू परस्परांचे नुकसान आधिकचे सांगत आहेत असेही म्हटले आहे New york times ने कदाचित आज तक सारखे चॅनेल्स बघितले असतील. ती त्यांची चूक आहे. भारतीय सेनेची ११ में ला झालेली प्रेस ब्रिफींग परत बघा. त्यांनी कुठेही म्हंटलेल नाही की पाकी एअर बेसेस उध्वस्थ केलेत म्हणून. हल्ला केलेला आहे एवढंच सांगितलेले आहे. त्याच प्रेस मध्ये रडार साईट्स चे before -and -after satelite फोटोही दाखवले आहेत.पण त्यावर विश्वास नसेल तर ते सोडून द्या. तर washington post मध्ये त्यांणी स्पष्ट लिहिलाय की भारताने पाकिस्तानी एअर बेसेस च्या तीन हँगर्स वरती हल्ला केला. त्या वेळी किती विमाने तिथं असतील हे पाकीच सांगू शकतील. बाकी रन वेचे नुकसान झाल्याचे फोटो आहेत, जे फार गंभीर नसावे. आपत्कालीन परिस्तिथी मध्ये रन वे वरती मिसाईल टाकणे आणि तो रन वे वापरता न येण्यासारखा करणे हे गंभीर कसं नसेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

उरी आणि बालाकोटच्या वेळी

रात्रीचे चांदणे
गुरुवार, 05/29/2025 - 09:25 नवीन
उरी आणि बालाकोटच्या वेळी भारताने दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाया पाकिस्तानने मान्यच केल्या नव्हत्या. उरीच्या वेळी "कुत्री मारली" आणि बालाकोटमध्ये "कावळे आणि झाडं मारली" असा उपहास केला गेला. आपल्याकडूनच काही विरोधकांनीही "साबूत दिखावो" अशी मागणी केली होती. कदाचित त्या वेळी आपल्याला पुरावे गोळा करण्याची संधी नव्हती किंवा लोकं पुरावे मागतील ही कल्पना नसल्यामुळे फोटो, विडिओ काढले नसतील किंवा असलेच तरीही काही करणामुळे जाहीर केले नसतील. पण यावेळी चित्र वेगळं होतं. एक तर पाकिस्तानने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या हल्ला झाल्याचं मान्य केलं. ७ मेच्या रात्री भारताने केवळ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले नाहीत, तर त्याचं चित्रीकरण ड्रोन किंवा तत्सम माध्यमांद्वारे मुद्दामहून केलं. काही दिवसांतच त्याचे सॅटेलाईट प्रतिमा आणि before-after फोटोही सार्वजनिक केले गेले. यावेळी कारवाई इतकी मोठी आणि अचूक होती की पाकिस्तानकडून नकाराची शक्यताच उरली नाही. तर १० मेच्या हल्ल्यांचे बिफोर एन आफ्टर सॅटॅलाइट इमेजेसही दाखवल्या. मग आत्ता हे एखाद्या त्रयस्थ संस्थेकडूनच आलं पाहिजेची मागणी चालू केली. त्रयस्थ संस्थेने दाखवलं तर हा हल्ला जबरीच आहे हे एखाद्या expert कडूनच आलं पाहिजे आणि समजा उद्या एखाद्या भारतीय expert ने सांगितलंच तर तो त्रयस्थ असला पाहिजे ही मागणी होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

आपले समर्थन करण्याच्या फंदात

सुबोध खरे
Mon, 06/02/2025 - 09:36 नवीन
आपले समर्थन करण्याच्या फंदात पडू नका. ज्यांचा तुमच्यावर विश्वास आहे ते पुरावा मागणार नाहीत आणि ज्यांना तुमच्यावर विश्वास ठेवायचाच नाही ते आलेला पुरावा सुद्धा सबळ नाही किंवा संदिग्ध आहे म्हणून नाकारतील. भारतात दुर्दैवाची गोष्ट अशी आहे कि मोदींना त्याचे श्रेय मिळेल म्हणून कित्येक मोदी द्वेष्टे लष्कराने केलेल्या मर्दुमकीबद्दल सुद्धा संशय व्यक्त करत राहतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

इतरांना दोष देण्यापेक्षा

स्वधर्म
Mon, 06/02/2025 - 17:07 नवीन
>> 'पाकिस्तानची अमेरिकेने दिलेली TPS ७७ हि किमान तीन रडार प्रणाली ध्वस्त केली. शिवाय चीनने दिलेली HQ ९ या क्षेपणास्त्र प्रणाली नष्ट केल्या.' या दाव्याला त्रयस्थ स्त्रोताकडून आधार काही आहे का ते सांगा. हे असा आधार मागावा लागतोय कारण रफालबाबत लष्कराने व संरक्षण मंत्रालयाने घेतलेली नरो वा कुंजरो ही भूमिका. बाकी मोदींच्या पुष्पवृष्टी आणि भक्तिरसात तुम्ही डुंबत राहिलात तर आमची काही हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

https://idrw.org/satellite

सुबोध खरे
Mon, 06/02/2025 - 20:30 नवीन
https://idrw.org/satellite-images-reveals-destruction-of-american-an-tps-77-radars-and-hit-on-seven-paf-airbase-radars/ https://www.ssbcrack.com/2025/05/indian-air-force-dismantled-three-pakistani-lockheed-martin-radars.html मी तुम्हाला खरं तर एकही दुवा देणार नव्हतो कारण लष्करात एक तत्व पाळले जाते. ज्याला आवश्यकता आहे आणि त्याचंही संबंध आहे असलाच माहिती पुरवावी. (नीड टू नो बेसिस). बाकी मोदींच्या पुष्पवृष्टी आणि भक्तिरसात तुम्ही डुंबत राहिलात याची आवश्यकता नव्हती असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

त्रयस्थ? आणि मान्यताप्राप्त?

स्वधर्म
Tue, 06/03/2025 - 19:28 नवीन
डॉ. तुंम्ही दिलेले दोन्ही दुवे भारतातीलच संस्थांचे आहेत. त्यातील www.ssbcrack.com ही तर सैन्यात जाण्यासाठी परिक्षांची तयारी करून घेणारी कोचिंग संस्था आहे. ती कितपत बातम्या देणारी संस्था आहे? की नुसती परिक्षार्थींना काय माहित असावे यादृष्टीने बातम्यांचे संकलन करणारी संस्था आहे? दुसरी संस्था: https://idrw.org/about-us/ ही कोणाच्या मालकीची आहे किंवा ए एफ आय हा कोणता स्त्रोत आहे, इ. काही माहिती दिसली नाही. ज्या प्रकारे ती वेबसाईट चालते किंवा तुंम्ही दिलेल्या दुव्यावरील बातमी उघडते, ते पाहता... अधिक न बोललेलेच बरे. दोन्ही स्त्रोत हे संपूर्णपणे भारतातील आहेत पण आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त आहेत का? जसे आपल्या सीडीएस यांनी भारतातील कोणत्याच संस्थेला मुलाखत न देता रफालबाबत ब्लूमबर्ग या आंतरराष्ट्रीय संस्थेला मुलाखत दिली, तसा काही स्त्रोत आहे का हे विचारत होतो. असो. बाकी तुंम्ही... >> कित्येक मोदी द्वेष्टे लष्कराने केलेल्या... असे लिहिल्यामुळे... >> पुष्पवृष्टी आणि भक्तिरसात - हे आले ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

कदाचित ह्या मुळेच आपल्या

रात्रीचे चांदणे
Tue, 06/03/2025 - 21:42 नवीन
कदाचित ह्या मुळेच आपल्या सेनेने ह्या वेळेस जास्त काळजी घेतली होती. पहिल्या दिवशी फक्त हल्लाच केला नाही तर त्याच चित्रीकरण ही केलं. पुरावे दाखवावे लागतील म्हणूनच हे केलं असण्याची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

ज्यांना तुमच्यावर विश्वास

सुबोध खरे
Wed, 06/04/2025 - 10:33 नवीन
ज्यांना तुमच्यावर विश्वास ठेवायचाच नाही ते आलेला पुरावा सुद्धा सबळ नाही किंवा संदिग्ध आहे म्हणून नाकारतील. तेंव्हा तुम्ही हे स्वीकारा किंवा नाकारा. Pakistan's deployment of the AN/TPS-77 Multi-Role Radar (MRR) near the border with India is a strategic move to enhance air surveillance and situational awareness. This US-made radar system, capable of detecting targets up to 470 km away, is part of a broader effort by Pakistan to bolster its defense capabilities along the border, particularly in the wake of recent cross-border tensions. The TPS-77 is known for its portability and ultra-low power consumption, making it suitable for deployment in various locations. पण ज्याचा लष्करी संरक्षणाच्या डावपेचांचा अभ्यास आहे त्याला हि रडार नादुरुस्त केल्याशिवाय पाकिस्तानवर हवाई हल्ला करणे किती धोक्याचे आहे ते समजते. बाकिच्यांसाठी उत्तरदायित्वास नकार तुमचं चालू द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

https://defence.in/threads

सुबोध खरे
Wed, 06/04/2025 - 10:36 नवीन
https://defence.in/threads/satellite-imagery-reveals-iaf-completely-destroyed-pakistans-an-tps-77-radars-acquired-from-lockheed-martin.14089/#google_vignette न्यूयॉर्क टाइम्स किंवा वॉशिंग्टन पोस्ट ने दुजोरा दिल्यावरच विश्वास बसणार असेल तर तुमचं दुर्दैव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

कणीक आणि साखरेच्या अभूतपूर्व

रामचंद्र
Sun, 05/25/2025 - 11:19 नवीन
कणीक आणि साखरेच्या अभूतपूर्व टंचाईने नागरिक हवालदिल झाल्याच्या बातम्या पाकिस्तानी वृत्तपत्रांत गेली चारपाच वर्षं येत होत्या. करोनाकाळात सरकारजवळ पुरेसा निधी नसल्याने जनतेनेच आपली स्वतःची काळजी घ्यावी, जमावबंदी वगैरे प्रकार लागू केले तर आमची आधीच कमकुवत अर्थव्यवस्था मोडूनच पडेल असं तिथल्या सरकारने जाहीर केलं होतं. बलुचिस्तान आणि अन्य दोन प्रांतातल्या सरकार वा सेनाविरोधी हल्ल्यांच्या बातम्या वरचेवर वाचायला मिळतात. बलुचिस्तानात तर १९४८ पासूनच दडपशाही सुरू आहे. सिंध तर मधल्या काळात हातातून गेल्यातच जमा होता. जगातून येणारा बहुतेक सर्व निधी पाक सैन्य बांडगुळासारखा खाऊन बसते हे जनतेलाही समजते. आता तर भारताच्या हवाई हल्ल्यांमुळे पाकची हवाईदल ताकद बऱ्यापैकी ठेचली गेली आहे. इतकं होऊनही जनता सरकार/सेनादलांविरुद्ध उठाव करत नाही याचं नवल वाटतं.
  • Log in or register to post comments

पाकिस्तानी लोकांच्या मते ही

रात्रीचे चांदणे
Sun, 05/25/2025 - 15:43 नवीन
पाकिस्तानी लोकांच्या मते ही लढाई ते जिंकलेले आहेत. पाकिस्तानी फौजने त्यांना भरता पासून वाचवलेले आहे. त्यांनी आपली तीन/चार/पाच / सहा विमाने पाडली आहेत. एक S-400 उध्वस्थ केल आहे, ब्रह्मस्त्र चा स्टोरेज डेपो उडीवला आहे. उधमपूर आणि इतर दोन, तीन हवाई अड्डे बेचीरख केलेलं आहेत. आणखी एक महत्वाचा दावा म्हणजे त्यांनी आपले एक ब्रिग्रेड headquarter सुद्धा बेचीरख केलेलं आहे. Chatgpt नुसार एका ब्रिग्रेड headquarter मध्ये कमीत कमी ३००० सैनिक असतात. त्यामुळे उठाव करण्याचा प्रश्नच नाही.त्यात आपण भारतीय म्हणजे हिंदू. हिंदूंना मारणाऱ्या सेने विरुद्ध उठाव शक्यच नाही. एक वेळ उपाशी राहतील पण काफीरांना मारणाऱ्याना समर्थन करतील. पाकिस्तान चे जुने दावे कसाब सुरवातीला भारतीय होता तर कारगिल मध्ये मुजाहीद्दीनच होते. पण नंतर पाकी सैनिक होते हे मुशर्रफ ने मान्य केलेलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामचंद्र

खरं आहे पण किमान

रामचंद्र
Sun, 05/25/2025 - 16:49 नवीन
खरं आहे पण किमान पाकिस्तानातलेच बलुची नागरिक तरी याच्याशी सहमत नसावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

काही नवीन अपडेट्स

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 06/03/2025 - 10:59 नवीन
बलूच वगैरे मुक्त होऊन आणि पाकव्याप्त काश्मीर ताब्यात येईल का कसे ? काही रणनिती ? -दिलीप बिरुटॅ
  • Log in or register to post comments

बलुचिस्तानला लागून पश्चिमेला

रामचंद्र
Tue, 06/03/2025 - 18:02 नवीन
बलुचिस्तानला लागून पश्चिमेला इराणची सीमा आहे तर पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तानात अन्य प्रांत आहेत. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरशी त्याचा थेट काही संबंध येत नाही. पण पाकिस्तानातील बहुतेक सर्वच महत्त्वाचे खनिजसाठे तिथं असल्याने तो महत्त्वाचा आहे. आणि १९४८ मध्ये तिथल्या जनमताच्या विरोधात प्रचंड दडपशाही करून तो पाकिस्तानात सामील करून घेतला गेला. तेव्हापासून आजतागायत दडपशाही, विरोधक रातोरात गायब करणे इ. प्रकारच्या बातम्या वरचेवर वाचायला मिळत असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मात्र सिंधू जल करार अनिश्चित

रामचंद्र
Tue, 06/03/2025 - 18:10 नवीन
मात्र सिंधू जल करार अनिश्चित काळासाठी स्थगित ठेवण्याची भारत सरकारची अभूतपूर्व कृती चांगलीच परिणामकारक ठरताना दिसते.
  • Log in or register to post comments

न्यायमुर्ती रामशास्त्री प्रभुणे...

कर्नलतपस्वी
Wed, 06/04/2025 - 07:11 नवीन
शोधण्यासाठी दिवसा कंदिल घेऊन फिरावे लागेल. कितीही मान्यताप्राप्त संस्था असली तरी प्रत्यक्षात प्रत्येक संस्था आपले हित ,हितसंबंध जपते. असल्या परिस्थितीत कुठलाही देश,सरकार आपल्या त्रुटी उजागर न करता जे यश संपादन केले आहे त्याची तुतारी वाजवते. पाकिस्तान कधीच खरे चित्र जगापुढे मांडणार नाही तर तसेच भारत सुद्धा. तरीसुद्धा लोक पुरावे मागतात म्हणून सैन्याने पर्यायाने सरकार ने बरीच खबरदारी घेतली. शत्रू कितीही कमजोर असला तरी प्रतिपक्षाला थोडेफार नुकसान पोहचवतो. हे त्रिवार सत्य आहे. प्रपोगंडा हे एक प्रभावी अस्त्र सर्वच वापरतात. जसे ऋषीचे कुळ आणी नदीचे मुळ शोधू नये म्हणतात तसेच इथे पण आहे.
  • Log in or register to post comments

युद्धात झालेलं नुकसान

रात्रीचे चांदणे
Wed, 06/04/2025 - 08:02 नवीन
युद्धात झालेलं नुकसान लपवण्यात काहीही फायदा वाटतं नाही. चकमकी चालू असताना सांगितलं गेलं नाही ते एक वेळ ठीक आहे, कारण पाकिस्तान ला अजून मोठा धडा शिकवायला पाहिजे चा दबाव वाढला असता किंवा अजून काही कारण असतील. पण अजून ६ दिवसात शास्त्रसंधी होऊन महिना होईल तर अजुनही आपण नुकसान महत्वाचं नाही म्हणतं आकडे देणे टाळतोय. जर आपणच आपले आकडे सांगितले नाहीत तर दुसर्यांनी दिलेले आकडे खरे वाटायला लागतील. दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे, आपल्या मीडियाने दिलेल्या खोट्या बातम्या. ड्रोन पाडलं असताना विमान पाडलं समजून एखादी बातमी दिली असेल तर एक वेळ समजू शकतो. पण कराची पोर्ट बेचिराख, इस्लामबाद वर तिरंगा, मुनीरला अटक सारख्या खोट्या बातम्या देऊन आपण आपलंच हंस करून घेतलंय.त्यामुळे कोणाला युद्धच्या बातम्या एखाद्या त्रयस्थ संस्थेकडूनच आल्या पाहिजेत असं वाटत असेल तर त्यात काहीही चूक नाही.ह्याला जबाबदार आपणच म्हणजे आपलं सरकारच आहे. आपल्याला विश्वगुरू का कांय ते व्हयचं असेल तर खोट्या बातम्या देऊन होता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

१००% सहमत

स्वधर्म
Wed, 06/04/2025 - 15:37 नवीन
आपल्या खालील मतांशी १००% सहमत. >>शास्त्रसंधी होऊन महिना होईल तर अजुनही आपण नुकसान महत्वाचं नाही म्हणतं आकडे देणे टाळतोय. जर आपणच आपले आकडे सांगितले नाहीत तर दुसर्यांनी दिलेले आकडे खरे वाटायला लागतील. >>>> त्यामुळे कोणाला युद्धच्या बातम्या एखाद्या त्रयस्थ संस्थेकडूनच आल्या पाहिजेत असं वाटत असेल तर त्यात काहीही चूक नाही.ह्याला जबाबदार आपणच म्हणजे आपलं सरकारच आहे. परंतु त्रयस्थ संस्थांकडून माहिती विचारली, तर तुंम्ही मोदीद्वेष्टे असा दृष्टीकोन असेल तर अवघड आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रात्रीचे चांदणे

दुसऱ्यांचे खरे आकडे आता समोर

सुबोध खरे
Wed, 06/04/2025 - 19:34 नवीन
दुसऱ्यांचे खरे आकडे आता समोर यायला लागले आहेत. त्याकडे लक्ष द्या. https://timesofindia.indiatimes.com/india/operation-sindoor-pakistan-dossier-reveals-7-more-targets-india-hit/articleshow/121607330.cms From Jyoti Malhotra to Devender Singh: 11 'Pak spies' caught in India over 3 days https://www.indiatoday.in/india/story/india-espionage-crackdown-pakistani-spies-isi-arrested-pahalgam-terror-attack-aftermath-2727078-2025-05-19 जोवर सरकार ऑपरेशन सिंदूर संपले असे जाहीर करत नाही नाही तोवर लष्कर आपली माहिती जाहीर करणारच नाही. आपली विमाने किती आणि का पडली हे सांगून शत्रूला त्यांचे डावपेच कसे आणि कुठे बरोबर आले हे सांगण्याची काय आवश्यकता आहे? शत्रूला अधिक सबळ करण्याची आवश्यकता कशासाठी ? ताज वरील हल्ल्याचे थेट प्रक्षेपण पाहून दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील नेते त्यांना येथे मार्गदर्शन करत होते हा इतिहास बरेच लोक विसरतात ज्याला काही आवश्यकता नाही त्याला उगाच माहिती कशासाठी हवी आहे? आणि हि माहिती घेऊन आपण काय क्रांती करणार आहोत याची विरोधकानी नक्की माहिती द्यावी. चीनचे PL -१५ हे क्षेपणास्त्र पडल्यावर आपलयाला जवळजवळ सुस्थितीत हाती लागले आहे. याची विस्तृत माहिती घेऊन आपण काय करणार? त्याचे सखोल परीक्षण लष्करी तज्ज्ञ करतील उगाच सामान्य माणसाला त्याची माहिती देण्याची काय गरज आहे? युद्धात झालेलं नुकसान लपवण्यात काहीही फायदा वाटतं नाही युद्धात झालेलं नुकसान ताबडतोब जाहीर करून शत्रूचा फायदा करून देण्यात काय हशील आहे ? कालौघात हि सर्व माहिती आपल्यालाच काय जगातील सर्व लोकांना उपलब्ध होईलच.
  • Log in or register to post comments

आपल्याला ऑपरेशन सिंदूर म्हणजे

सुबोध खरे
Wed, 06/04/2025 - 20:06 नवीन
आपल्याला ऑपरेशन सिंदूर म्हणजे फक्त लषकरी कार्यवाही वाटते का? पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अनेक कर्मचारयांची हकालपट्टी कशासाठी केली असावी? India expels Pakistani official, asked to leave country in 24 hours https://indianexpress.com/article/india/india-expels-pakistani-diplomat-10001439/ https://timesofindia.indiatimes.com/india/india-expels-pakistani-official-at-mission-given-24-hours-to-leave-country/articleshow/121144215.cms India expels another official of Pakistan High Commission The Ministry of External Affairs (MEA) said the official has been given 24 hours to leave the country. Read more at: https://www.deccanherald.com/india/india-expels-another-pakistani-official-gives-24-hours-to-leave-3551235 Pakistani spy held in Punjab for sharing sensitive information during Operation Sindoor. https://economictimes.indiatimes.com/news/india/man-held-in-punjab-for-sharing-sensitive-information-with-pakistan/articleshow/121587304.cms?from=mdr पाकिस्तानी उच्चायुक्तालयातून हाकलून दिलेल्या कर्मचाऱ्यांशी संपर्कात आलेल्या लोकांची कसून तपासणी चालू आहे. त्यातील कोण कोण दहशतवाद्यांच्या संपर्कात आले? पहलगाम मध्ये त्यांचा हात आहे का? आणि स्लीपर सेल्स कुठे आणि कसे कार्यरत आहेत? यात लश्कराचे लोक सामील आहेत का हि सर्व माहिती आताच लोकांना सांगायची आहे का? ज्यामुळे असे लोक अधिक सावध होतील? आपलेच उपराष्ट्रपती अन्सारी यांनी एके काळी इराण मध्ये असताना आपल्या रॉ संघटनेची माहिती तेथल्या सरकारला देऊन आपले गुप्तहेर यमसदनी पाठवले होते आणि वर भारतात मुसलमान लोकांना असुरक्षित वाटते हि हि टिप्पणी केली होती हे विसरून चालणार नाही. माहिती उघड केली कि ती कुणाच्या हाती लागेल यावर आपले कोणतेही नियंत्रण राहत नाही हे स्वीकारा
  • Log in or register to post comments

युद्धात झालेलं नुकसान लपवण्यात काहीही फायदा वाटतं नाही

कर्नलतपस्वी
गुरुवार, 06/05/2025 - 05:37 नवीन
डाॅ खरे यांच्याशी सहमत. सर्व खरी परिस्थिती सांगीतली तर शत्रूपक्षाला याचा फायदा होतो. युक्रेन रशियन युद्धात परस्परांवर असेच दावे होत आहे. त्या ठिकाणी खास करून युक्रेनच्या भुमीवरून भारतीय रिपोर्टर ग्राऊंड रिपोर्टींग करत आहेत. पाकिस्तान मधे कोणी भारतीय पत्रकार गेले होते का?आणी व्हाईस अ वर्सा. विदेशी पत्रकार कशावरून निष्पक्ष आसतील असे मानायचे? परंतु त्रयस्थ संस्थांकडून माहिती विचारली, तर तुंम्ही मोदीद्वेष्टे असा दृष्टीकोन असेल तर अवघड आहे. कुठली मिडीया तटस्थ राहून रिपोर्टींग करते? कुणावर विश्वास ठेवायचा? शास्त्रसंधी होऊन महिना होईल तर अजुनही आपण नुकसान महत्वाचं नाही म्हणतं आकडे देणे टाळतोय. जर आपणच आपले आकडे सांगितले नाहीत तर दुसर्यांनी दिलेले आकडे खरे वाटायला लागतील. दुसरा देश हरिश्चंद्र आहे आणी कशावरून खरे बोलतोय? स्क्वाड्रन लिडर अभिनंदन पकडला नसता गेला तर पाकिस्तानने सुद्धा आमचे एफ 16 विमान पाडलेच नाही असेच दावे केले असते. संसद हल्ल्यात संसदेतील विज गेली नसती तर वेगळे चित्र दिसले असते. ट्वीन टाॅवर हल्ल्या बद्दल सुद्धा वेगळेच नॅरेटिव्ह ऐकायला मिळाले. ब्ल्यू स्टार मधे किंवा पवन सारख्या ऑपरेशन मधे किती नुकसान झाले हे सांगीतले ते खरे मानायचे का? प्रपोगंडा सामरिक नीतीचा एक भाग आहे. देशांतर्गत देश विरोधी ताकते व प्रतीपक्ष यांना सुद्धा फावते. युद्धात झालेलं नुकसान लपवण्यात काहीही फायदा वाटतं नाही. सांगून फायदा काय? लष्करी तज्ञ आणी सरकारी यंत्रणा आपले काम करणार. निड टो नो हा गोपनीयतेचा मुलमंत्र आहे. झालेले नुकसान सांगण्यात सामान्य जनतेच्या,सैन्याच्या मनोबलावर होणारा परिणाम, देशविघातक, विरोधी तत्त्वांना होणारा फायदा लक्षात घेता बंद मुठ्ठी सवा लाख की खुल गयी तो खाक की असेच म्हणावे लागेल. युद्धात दोन्ही बाजुचे नुकसान होणारच. कुणाचे कमी कुणाचे जास्त यात शंकाच नाही तरीही प्रस्थापित सरकार ते थोडेच सांगणार आहे? झालेले नुकसान जरी सांगीतले तरी ते देशहिता साठी कसे अनिवार्य होते त्याचे जस्टिफिकेशन पण बरोबर देणार. सरकार समर्थक ते मानणार व विरोधक विरोध करणार. या चर्चा अशाच चालू राहाणार. सरकार कुणाचे ही असो अशा परिस्थितीत त्याच्यावर विश्वास ठेवणे हेच खरे.
  • Log in or register to post comments

सहमत. जनता ईतकी सुजाण /

सुक्या
गुरुवार, 06/05/2025 - 05:59 नवीन
सहमत. जनता ईतकी सुजाण / प्रगल्भ झाली तो दिन सोनियाचा (आज सोनियाचा दिनु) समजावा. बाकी सगळे आपापले पत्ते लपवुनच खेळतात. आपण काय , पाक काय किंवा अमेरिका काय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा