Skip to main content

चित्रपट; चित्रपट परीक्षण; चर्चा; ताज्या घडामोडी; समाजकारण; धर्म; देश; दहशतवाद; धर्मांतरण

चित्रपट - स्वातंत्र्यवीर सावरकर

लेखक निनाद यांनी गुरुवार, 28/03/2024 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर: चित्रपट 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा क्रांतिकारी विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट पाहण्याचा योग आला. रणदीप हुड्डा यांनी दिग्दर्शन आणि मुख्य भूमिका साकारली आहे. प्लेगची साथ त्यात ब्रिटिश शिपायांची क्रूरता दाखवत चित्रपट सुरुवातीलाच पकड घेतो. चित्रपट सावरकरांच्या बालपणापासून ते अंदमानच्या सेल्युलर जेलमधील क्रूर कैदेपर्यंतच्या प्रवासाचे चित्रण यात आहे. सावरकरांच्या क्रांतिकारी कारवाया, साहित्यिक योगदान, सामाजिक सुधारणा आणि हिंदुत्वाचा विचार यांचा समावेश आहे. सुटके नंतर रत्नागिरीमध्ये राहून त्यांनी दलितांसाठी कार्य दाखवले आहे.

द केरल स्टोरी: परीक्षण व चर्चा

लेखक जावा फुल स्टॅक यांनी शुक्रवार, 05/05/2023 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच द केरल स्टोरी हा बहुप्रतीक्षित, बहुचर्चित चित्रपट पाहून आलो आणि थेट लिहायला बसलोय. चित्रपट परीक्षण पहिल्यांदाच लिहितोय, मिपावरही पहिल्यांदाच लिहितोय; मायबाप मिपाकर वाचक सांभाळून घेतील ही अपेक्षा. पॅरामेडिक कॉलेजात शिकण्यासाठी हॉस्टेलच्या एका खोलीत असलेल्या इतर तीन तरुणींसोबत राहायला आलेली शालिनी उन्नीकृष्णन ही चित्रपटाचे मुख्य पात्र आहे. केरळी हिंदू कुटुंबात वाढलेली निरागस शालिनी इसिस दहशतवादाच्या सापळ्यात सापडते आणि मग तिच्या आयुष्याची कशी फरफट होते ही या चित्रपटाची कथा आहे.