Skip to main content

द केरल स्टोरी: परीक्षण व चर्चा

लेखक जावा फुल स्टॅक यांनी शुक्रवार, 05/05/2023 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच द केरल स्टोरी हा बहुप्रतीक्षित, बहुचर्चित चित्रपट पाहून आलो आणि थेट लिहायला बसलोय. चित्रपट परीक्षण पहिल्यांदाच लिहितोय, मिपावरही पहिल्यांदाच लिहितोय; मायबाप मिपाकर वाचक सांभाळून घेतील ही अपेक्षा. पॅरामेडिक कॉलेजात शिकण्यासाठी हॉस्टेलच्या एका खोलीत असलेल्या इतर तीन तरुणींसोबत राहायला आलेली शालिनी उन्नीकृष्णन ही चित्रपटाचे मुख्य पात्र आहे. केरळी हिंदू कुटुंबात वाढलेली निरागस शालिनी इसिस दहशतवादाच्या सापळ्यात सापडते आणि मग तिच्या आयुष्याची कशी फरफट होते ही या चित्रपटाची कथा आहे. चित्रपट भारतातील आणि भारताबाहेरील दहशतवादाचे वास्तव बटबटीत स्वरूपात प्रेक्षकांपुढे ठेवतो. चित्रपटाचे चित्रीकरण अप्रतिम आहे. सुरुवातीचा केरळातील सुंदर हिरवा निसर्ग आणि नंतरच्या अफगाणिस्तानातील रखरखीत करड्या पर्वतरांगा शालिनीच्या जीवनप्रवासाचा मार्ग दाखवतात. अदा शर्मा (शालिनी) आणि सोनिया बालानी (आसिफा बा) यांचा आणि इतर कलाकारांचा अभिनय उत्कृष्ट आहे. दोन काळातले फ्लॅशबॅक वापरून कथा सादर करण्याचे तंत्र चांगले जमून आले आहे. वेगवान कथानक प्रेक्षकाला खिळवून ठेवते. एक तरुणी आणि तिचा नवरा यांना त्या तरुणीने लिपस्टिक लावले या कारणामुळे क्रूर शिक्षा देण्यात येते. असे प्रसंग बीभत्स वाटले तरी परिणामकारक आहेत. धर्मांतरणाचे भीषण रूप आणि त्याचे त्याहूनही भीषण परिणाम सादर करण्याचा सुदिप्तो सेनचा (दिग्दर्शक) प्रयत्न चांगला आहे. पण काही ठिकाणी ते प्रयत्न कमी पडतात. शालिनीला चित्रपटात दहशतवादी सिद्ध करण्यात येते. प्रत्यक्षात ती केवळ दहशतवाद्यांसोबत (स्वतःच्या इच्छेविरुद्ध) राहत असते, ती स्वतः कोणत्याही गुन्ह्यात सामील होत नाही. हा विरोधाभास जाणवण्यासारखा आहे. बलात्काराचे स्पष्ट आणि दीर्घ चित्रीकरण दाखविण्याची गरज नव्हती. काही ठिकाणचे पार्श्वसंगीतही टाळता आले असते. चित्रपटातून प्रेक्षकांना काही दिशादर्शन मिळावे, मार्ग मिळावा ही अपेक्षा चित्रपट पूर्ण करत नाही. "ज्या देवाचा पुत्र सुळावर चढविला जातो आणि त्या पुत्राला देव वाचवत नाही असा देव तुम्हाला काय वाचवेल?", "जो देव आपल्या मृत पत्नीचे कलेवर घेऊन मदतीच्या शोधात वणवण भटकतो तो देव तुमची काय मदत करेल?" असे प्रश्न हा चित्रपट विचारतो पण त्यांच्या उत्तरांची जबाबदारी प्रेक्षकांवर सोडून देतो. अश्या प्रश्नांची उत्तरे सर्वसामान्य प्रेक्षकांना सापडतीलच असे नाही. --- रेटिंग : ४.२/५
  • चित्रीकरण *****
  • अभिनय *****
  • दिग्दर्शन ****
  • पटकथा ****
  • परिणामकारता ****
--- द केरल स्टोरी चित्रपटाचे युट्यूब टीजर --- हा चित्रपट आणि त्यातील संदेश यांपुरती मर्यादित चर्चा करण्याची; धाग्याला राजकीय वळण लागू न देण्याची मिपाकरांकडून अपेक्षा. - जावा फुल स्टॅक

वाचने 24477
प्रतिक्रिया 125

प्रतिक्रिया

In reply to by चौकस२१२

इथेच आपल्यात फरक आहे. विदा आणि आकडेवारी शिवाय तोंड उघडण्यात माझ्या दृष्टीने शून्य अर्थ आहे. कारण जर anecdotes वरून जायचे असेल तर माझा निष्कर्ष खूप वेगळा येईल तुमच्यापेक्षा. द्या बघू तुम्ही आकडेवारी.
मूळ फूस लावून आणि धाक वापरून हिंदूंचे धर्मातर होते हे मात्र या उदारमतवादी लोकांना दिसत नाही किंवा त्यावर बोलायला वेळ नाही... दुर्दैव

In reply to by चौकस२१२

कुरतडत कुरतडत हे दोन अब्राहमीक धर्म हिंदूंचे दमन करणार ... आणि आपण असेच मारामाऱ्या करीत राहणार इन्शाअल्लाह , जशी प्रभूची इच्छा
ते धर्म नसुन पंथ (किवा जात ) आहेत. धर्माची शिकवण वेगळी असते आणि पंथाची वेगळी असते.

चला, खरया विदा कडे बघू. वर वामनजी विचारत होते म्हणून गुगल करून पाहिला आणि चटकन सापडला. मिसिंग पर्सन रिपोर्ट २०२०. (होम पेज लिंक, pdf लिंक) प्रकाशक - नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो, भारत सरकार. तक्त्यामध्ये किती लोकं बेपत्ता झाले आणि किती लोक सापडले ह्याची थेट आकडेवारी आणि किती लोक सापडले ह्याची टक्केवारी दिली आहे. केरळमध्ये २०२० शेवटी बेपत्ता असणारे एकूण लोक - १६२४ (त्यातील केवळ ४७८ स्त्रिया आहेत.) केरळचा बेपत्ता व्यक्तींना शोधण्याचा दर - एकूण ८५%, स्त्रियांसाठी ९४% - दोन्ही दर भारतामध्ये सर्वोच्च दर. भारताचा सरासरी दर - ५०%.

In reply to by कॉमी

म्हणजे केरळ हे हरवलेल्या लोकांना शोधण्यात भारतातले सर्वोत्कृष्ट राज्य आहे. असे असताना सिनेमा बनवणाऱ्या माणसाने हे ३०००० ५०००० आकडे आणले कुठून ? जर मुद्दामून सत्ताधारी पक्षाला न मिळवता येणाऱ्या राज्याला बदनाम करण्यासाठी वाट्टेल ते दावे करणारा सिनेमा बनवला जात असेल तर I am sorry, मी त्या दाव्यांना दुर्लक्षित करून नुसते दिग्दर्शन कसे आहे आणि संगीत कसे आहे ह्यावर चर्चा नाही करू शकत.

In reply to by कॉमी

तक्त्यामध्ये किती लोकं बेपत्ता झाले आणि किती लोक सापडले ह्याची थेट आकडेवारी आणि किती लोक सापडले ह्याची टक्केवारी दिली आहे.
या आकडेवारीचा नक्की रेलेव्हन्स काय? लव्ह जिहादला बळी पडणार्‍या मुली वेगळ्या आणि बेपत्ता व्यक्ती वेगळ्या. नाही म्हणजे दोनमध्ये थोडासा ओव्हरलॅप असू शकेल म्हणजे लव्ह जिहादला बळी पडलेली मुलगीच बेपत्ता होणे अशाप्रकारचा (त्याचा आणखी लहान सबसेट म्हणजे लव्ह जिहादला बळी पडून अफगाणिस्तान/सिरीया किंवा अन्य कुठे गेलेल्या मुली). अन्यथा लव्ह जिहादला बळी पडणार्‍या मुली बेपत्ता व्यक्तींमध्ये कुठे शोधायला गेलात? लव्ह जिहादला बळी पडलेल्या मुली 'बघा मी कित्ती कित्ती उदारमतवादी. मी कि नै दुसर्‍या धर्मातील मुलाशी लग्न केले' असे म्हणत जन्मापासून ज्या घरी वाढली ते घर, ज्यांनी आपल्याला लहानाचे मोठे केले ते आईवडील, त्यांचे संस्कार, त्यांचा धर्म कसा टाकाऊ, ते लोकं कित्ती कित्ती चांगले आणि तुम्ही कित्ती कित्ती वाईट असे तत्वज्ञान पाजळत समाजाताच राहत असतात. त्यांना बेपत्ता लोकांमध्ये कुठे शोधायला गेलात?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

पण बेपत्ता असणे हा सुद्धा दावा आहे ना ? तो अड्रेस केलाय. बर. तुमच्याकडे विदा असेल लव जिहाद ला बळी पडणाऱ्या मुलींबद्दल तर जरूर द्या. ते सोडा, लव जिहाद दूर. निव्वळ किती हिंदू मुलींनी मुस्लिम मुलांशी लग्न केले हा विदा असला तरी चालेल, त्यातल्या १००% केसेस लव जिहादच्या नाहीत हे खरेतर तुम्हाला पण मान्य असायला हवे, पण तरी, काय विंडो मध्ये खरा विदा असणार हे तरी समजेल.

एक था टायगर, दोन्ही पार्ट फॅमिली मॅन, सर्व सीझन्स १६ डिसेंबर चित्रपट स्पेशल ops सर्व सीझन्स इतर असंख्य चित्रपट, मालिका यामधे पाकिस्तानी लष्कर किंवा त्यांची गुप्तचर संघटना, किंवा अगदी आयासिसच्या नावाने कोणत्याही स्टोरीज, कारस्थाने दाखवली गेली. कितीतरी तरुणांना कट्टर बनवून भरती करणे, त्यांना वापरून भयंकर मिषन्स, अगदी देशातील मुख्य ठिकाणे, शहरे उडवून देणे, गॅस गळती करण्याचे कारस्थान, ओलीस ठेवलेल्या नर्सेस, ....,...., सर्व कथा मनोरंजन म्हणून लोकांनी बघितल्या. त्यातही विशिष्ट धर्माकडे, संघटनांकडे स्पष्ट रोख होता. हे काल्पनिक आहे किंवा तत्सम declare देखील केले होते. Regardless of whether Kerala stories is a propaganda or not (which it very well can be, not even denying that possibility), कोणत्याही इतर तत्सम चित्रपटाच्या वेळी नेमके आकडे, सत्यता पुरावे अशी चर्चा का झडली नसावी? काश्मीर फाईल्स, केरळ यात मात्र झडते आहे. काश्मीर फाईल्स सुद्धा भारतातला अंतर्गत विषय असेल तर तो बाजूला ठेवता येईल. तूर्त केरळ बद्दल हा प्रश्न येतो. या प्रश्नांत whataboutery उर्फ तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म, हा दोष आहे हे मान्य करतो.

In reply to by गवि

एखाद्या दुसऱ्या पात्राची गोष्ट म्हणून दाखवलेले वेगळे, आणि ब्रॉड सांख्यिकी दावा वेगळा. खेरीज, जसे तुम्ही म्हणता, की त्या गोष्टी काल्पनिक म्हणूनच लिहिल्या आहेत. आणि पिकिंग योर बॅटलस हे सुध्दा आले. उघड उघड प्रोपोगंडा होतो तिथे जोरात ओरडणे महत्वाचे.

In reply to by कॉमी

एखाद्या दुसऱ्या पात्राची गोष्ट म्हणून दाखवलेले नव्हे. एक संघटना, आख्खी दिल्ली- वायुगळती , अणुबाँब. दुल्हन की बिदाई का वक्त बदलना है इ इ. नेमक्या किती लोकांना ठार करायचा बेत होता? केरळ स्टोरी बाबत देखील काल्पनिक असे जाहीर केले आहे असे कुठेतरी वाचले आणि ते गृहितक धरून वरील प्रश्न होता. तसे नसेल तर बाद. इन फॅक्ट फॅमिली man वगैरे तर चक्क inspired by true stories / events किंवा तत्सम दाखवत असे.

In reply to by कॉमी

उघड उघड प्रोपोगंडा होतो तिथे जोरात ओरडणे महत्वाचे.
Lol... चला वादासाठी आपण मान्य करू कि हा प्रोपगंडा चित्रपट आहे! मग आजपर्यंत एकाबाजूने चालवलया जाणाऱ्या प्रोपगंडाला अशा 'काउंटर प्रोपगंडाने' दिले जाणारे उत्तर सहन होत नसल्याने ह्या खेळातल्या जुन्या खेळाडूंकडून चित्रपटावरील बंदीची मागणी, आकडेवारी वगैरे निरर्थक गोष्टींवरून वरून आरडा-ओरडा आणि रडारड चालू आहे असे मानण्यास काही वाव आहे का? 😂 😂 😂 अवांतरः बाकी चित्रपटच्या बॉक्स ऑफिस वरील कमाईची आकडेवारी मात्र चांगली वाढत आहे हे कशाचे द्योतक असावे?

मग आजपर्यंत एकाबाजूने चालवलया जाणाऱ्या प्रोपगंडाला अशा 'काउंटर प्रोपगंडाने' दिले जाणारे उत्तर सहन होत नसल्याने ह्या खेळातल्या जुन्या खेळाडूंकडून चित्रपटावरील बंदीची मागणी
बंदी वैगरे आणावी असे मला आजिबात वाटत नाही. मी जनरली फ्री स्पीच समर्थक असतो. BBC डॉक्युमेंट्री, इतर सिनेमे यांवर बंदी आणली की गप्प बसणारे लोक वेगळे.
आकडेवारी वगैरे निरर्थक गोष्टींवरून वरून आरडा-ओरडा आणि रडारड चालू आहे
हाहाहाहा. आकडेवारी निरर्थक गोष्ट ? कोपरापासून नमस्कार.
अवांतरः बाकी चित्रपटच्या बॉक्स ऑफिस वरील कमाईची आकडेवारी मात्र चांगली वाढत आहे हे कशाचे द्योतक असावे?
कशाचे द्योतक मानायचे ? पठाण ने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली हे कशाचे द्योतक मानायचे ?

In reply to by कॉमी

आकडेवारी निरर्थक गोष्ट ? कोपरापासून नमस्कार.
विषय एका चित्रपटाचा असल्याने सिनेमॅटीक लिबर्टी विचारात घेतल्यास इथे आकडेवारी ही गोष्ट मलातरी निरर्थक वाटत असल्याने कोपरापासूनच्या नमस्काराचा आनंदाने स्विकार करतो 😀
पठाण ने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली हे कशाचे द्योतक मानायचे
मी पठाण पाहीला नसल्याने काही कल्पना नाही बुवा! आणि तुम्हीही द केरला स्टोरी पाहीला नसल्याने त्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीत तरी काही हरकत नाही, अन्य कोणाकडुन ते मिळाले तरी चालेल...

In reply to by कॉमी

आकडेवारी ही नक्कीच निरर्थक गोष्ट नसते. मात्र आकडेवारी परिपूर्ण आहे का, लोकं दहशतीमुळे किंवा अन्य कोणत्या कारणाने झालेल्या गोष्टी रिपोर्ट करायला पुढे येत नाहीयेत अशी परिस्थिती नाही का, पोलिसांनी तक्रारच नोंदवून घेतली नाही अशी परिस्थिती आहे का वगैरे गोष्टी पण बघायला लागतात. तेव्हा हातात असलेली आकडेवारी विश्वासार्ह आणि परिपूर्ण आहे का हे तपासून बघायला नको? त्या गोष्टी बघायला गेले नाही तर मग पूर्ण दिशाभूल करणारी अनुमाने निघतात. आता हेच बघा ना. आज केरळच्या उत्तरेकडील मलबार विभागात (तोच कासारगोड, मलापुरम, वायनाड वगैरे भाग) इतक्या मोठ्या प्रमाणावर मुस्लिम संख्या कशी आणि कुठून आली? दोन वर्षांपूर्वी चिकमंगळूरला फिरायला गेलो होतो. तिथे आमच्या रिसॉर्टचा मालक सोडला तर जो बघावा तो मुसलमान होता. हे कुठून झाले? तर टिपू सुलतानने हिंदूंच्या मोठ्या प्रमाणावर कत्तली आणि सक्तीची धर्मांतरे त्या भागात केली. नेहमीप्रमाणे नंतरच्या काळातले हिंदू मुलखाचे बावळट निघाले आणि त्यांनी सक्तीने धर्मांतरीत झालेल्यांना परत हिंदू करून घेतले नाही. आज केरळमध्ये मलबार आणि कर्नाटकात चिकमंगळूर वगैरे भागात इतके मुस्लिम दिसतात ते तेव्हा धर्मांतरीत झालेल्यांचेच वंशज आहेत. पण टिपू सुलतानने नक्की किती लोकांच्या कत्तली आणि धर्मांतरे केली? याविषयी फार तर अंदाज उपलब्ध असतील. नक्की आकडा उपलब्ध असणे जवळपास अशक्य आहे. आता त्याने जे काही केले त्याचे परिणाम समोर दिसत असूनही केवळ आकडेवारी नाही म्हणून टिपू सुलतान कित्ती कित्ती चांगला होता (किमान वाईट नव्हता) असे अनुमान विचारवंत लोक काढतातच ना? की सक्तीची धर्मांतरे करणे वाईट हेच मुळात मान्य नसते? तसे असेल तर मग अशा लोकांना हिंदूद्वेष्टे म्हटले जाणारच. इलाज नाही. या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार न करता नुसते आकडेवारीवर विसंबून राहिले की दुसरे काय होणार? केवळ हातात उपलब्ध असलेल्या आकड्यांवरच अवलंबून राहून निष्कर्ष काढायला गेले तर माणसाचा रघुराम राजन होतो.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

सक्तीची धर्मांतरे करणे वाईट हेच मुळात मान्य नसते? तसे असेल तर मग अशा लोकांना हिंदूद्वेष्टे म्हटले जाणारच. इलाज नाही. मुद्याचे बोललात १००%

In reply to by चंद्रसूर्यकुमार

आकडेवारी ही नक्कीच निरर्थक गोष्ट नसते. मात्र आकडेवारी परिपूर्ण आहे का, लोकं दहशतीमुळे किंवा अन्य कोणत्या कारणाने झालेल्या गोष्टी रिपोर्ट करायला पुढे येत नाहीयेत अशी परिस्थिती नाही का, पोलिसांनी तक्रारच नोंदवून घेतली नाही अशी परिस्थिती आहे का वगैरे गोष्टी पण बघायला लागतात.
नक्की मान्य आहे. पण असे म्हणायला सुध्दा पुरावा नको का ? का सिलेक्टिव्हली न आवडणाऱ्या किंवा आपले म्हणणे न रेटणाऱ्या आकडेवारीच्या वेळीसच आकडेवारी कशी विसंबाण्याजोगी गोष्ट नाही असे म्हणायचे?
आता हेच बघा ना. आज केरळच्या उत्तरेकडील मलबार विभागात (तोच कासारगोड, मलापुरम, वायनाड वगैरे भाग) इतक्या मोठ्या प्रमाणावर मुस्लिम संख्या कशी आणि कुठून आली?
ह्याची कितीतरी करणे असू शकतात. कम ऑन. मायग्रेशन, आजवर आर्थिक परिस्थिती नसलेले लोक उद्योगात पैसे गुंतवण्याक्षम झाले इती. लगेच हिंदूंना जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करायला लावले असा कसा निष्कर्ष निघेल ?
टिपू सुलतानने नक्की किती लोकांच्या कत्तली आणि धर्मांतरे केली? याविषयी फार तर अंदाज उपलब्ध असतील. नक्की आकडा उपलब्ध असणे जवळपास अशक्य आहे
ऐतिहासिक बाबी आणि अध्याच्या बाबी ह्यांमध्ये बराच फरक नाही का ? ऐतिहासिक बाबींमध्ये आकडे मिळवणे अवघड असणार. बाकी, टिपू सुलतानने नक्की किती लोकांवर अन्याय केला हे माहीत नसले तरी बऱ्याच लोकांवर अन्याय केला हे जरूर माहिती आहे.
सक्तीची धर्मांतरे करणे वाईट हेच मुळात मान्य नसते? तसे असेल तर मग अशा लोकांना हिंदूद्वेष्टे म्हटले जाणारच. इलाज नाही.
????? हे अतिशय वाईट strawman आहे बुवा तुमचे. अर्थातच वाईट आहे. आकडेवारी वर न विसंबाण्याचे कारण असेल तरी जर आपण ब्रॉड सांख्यिकी दावे करणार असू तर बेस म्हणून तरी आकडेवारी हवीच.नाहीतर सगळे मनाचे खेळ.

In reply to by कॉमी

पण असे म्हणायला सुध्दा पुरावा नको का ? का सिलेक्टिव्हली न आवडणाऱ्या किंवा आपले म्हणणे न रेटणाऱ्या आकडेवारीच्या वेळीसच आकडेवारी कशी विसंबाण्याजोगी गोष्ट नाही असे म्हणायचे?
मग तो आकडा २१ आहे हे वर म्हटले आहेत ते नक्की कोणत्या आधारावर? २१ हा आकडा कुठून आला मला माहित नाही. पण तुमच्या इतर आकडेवारीला प्रचंड महत्व द्यायच्या आग्रहावरून वाटते की तो आकडा कुठेतरी कागदोपत्री असावा. त्यावरच अवलंबून राहावे हा आग्रह हा पण सिलेक्टिव्ह पणा झाला नाही का?१८ च्या वरील वयाच्या मुली लव्ह जिहादला बळी पडल्या तरी त्याची तक्रार पोलिस दाखल करून घेऊ शकणार नाहीत त्यामुळे कागदोपत्री खरा आकडा कळणे अशक्य आहे हे पण मान्य नाही का? तो आकडा ३२ हजार आहे की किती मलाही माहित नाही. म्हणूनच अगदी सुरवातीला- तो आकडा किती आहे असा दावा केला असता तर तो मान्य केला असता हा प्रश्न विचारला होता. तरीही २१ हाच आकडा आहे या आग्रहाला नक्की काय म्हणावे?
ह्याची कितीतरी करणे असू शकतात. कम ऑन. मायग्रेशन, आजवर आर्थिक परिस्थिती नसलेले लोक उद्योगात पैसे गुंतवण्याक्षम झाले इती.
मायग्रेशन कुठून होणार? आजूबाजूच्या प्रदेशातून. तिथे इतक्या मोठ्या प्रमाणावर मुस्लिम लोक नव्हते पण एकदम मलबार आणि कर्नाटकच्या काही भागात आहेत याचे कारण मायग्रेशन? वा वा. आर्थिक परिस्थिती नसलेले लोक उद्योगात पैसे गुंतवायला सक्षम झाले असतील तर नक्की कोणते उद्योग त्या भागात होते/आहेत?
लगेच हिंदूंना जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करायला लावले असा कसा निष्कर्ष निघेल ?
हे असले प्रश्न डाव्यांना पडतात म्हणूनच त्यांना सरसकट हिंदूद्वेष्टेच म्हणावेसे वाटते. नुसता मलबारच नाही तर सध्याचा भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या मोठ्या प्रदेशात तो आकडा वाढला तो थायलंड, श्रीलंका वगैरे देशात बौध्द धर्मियांचा आकडा वाढला त्याप्रमाणे म्हणजे आध्यात्मिक प्रेरणेने वाढला असे म्हणायचे आहे की अरबस्तानातून मायग्रेशन झाले? केरळमध्ये टिप्याच्या आधी काही शतके एक राजाने स्वतःहून तसे धर्मांतर केले होते पण तो पूर्ण प्रदेशाचा विचार करता अपवाद होता.
ऐतिहासिक बाबींमध्ये आकडे मिळवणे अवघड असणार.
समजा टिपू सुलतानच्या वेळेस कोणी विचारवंत असते तरी समोर दिसत असलेल्या गोष्टी नाकारल्या असत्या आणि आज नक्की आकडे मिळणे शक्य नाही म्हणून त्याच लोकांचे वैचारीक वंशज टिपूला चांगला म्हणतात की काय समजत नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

जगभर "वहाबी करण" कसे चालू आहे हे उदारमतवाद्यांन बघायचे असले तर मलेशिया च्या जवळील एक छोटा आणि प्रचंड श्रीमंत देश म्हणे "ब्रुनेई" तो आधीच मुस्लिम आहे , पण त्याना जसे इंडोनेशिया ला धर्म जरी मुस्लिम असला तरी आपली सॅन्कृती काही अरब नाही / वर्नानें आपण अरब नाही याची पुरेपूर कल्पना आहे पण ब्रुनेई चा सुलतान जसा धार्मिक होऊ लागलला तसे त्याने काढलेली फर्मान प्रमाणे ठेवील पाट्या अरेबिक लिपी ( आणि बहुतेक भाष पण अरबी ) मध्ये आहेत ! काही मोजके लोक सोडणे तर ब्रुनेई मध्ये बहुतेक लोकांना अरबी येत नाही .. घाई हे उदाहरण,, तर जर अगादरच मुस्लिम असलेल्या देशाचे हे अंतर्गत वहाबीकरण होत आहे तर भारतासारख्या हिंदू देशाचे काय घेऊन बसलात

पठाण ने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली हे कशाचे द्योतक मानायचे ? बेशरम रंग लोकांना आवडला असेच म्हणावे लागेल. पंतप्रधानांनीं काश्मीर फाईल आणि केरला स्टोरी ची स्तुती केली. OTT वरील अशा प्रकारच्या मालिकांवर त्यांनी कधी भाष्य केल्याचे आठवत नाही. अर्थात नाही करत तेच बरे आहे.

आत्मपरीक्षण करण्याची नितांत गरज आहे हिंदूंना. १. आपल्या मुळीच दूधखुळ्या आहेत का? आपले सो कॉल्ड संस्कार कमी पडत आहेत का? २. भाजपभक्ती करताना आपण आपल्या घरातच लक्ष देत नाही आहोत का? ३. चित्रपटात दाखवलेल्या गोष्टी खऱ्या असतील तर आपले ५६ इंची सरकार काय करत आहे? आपण त्यांना निवडून देऊन चूक केली आहे का? ४. सदानकदा आपणच मुस्लिमांना दुजाभावाची वागवत आलोय, त्यांच्याकडून होणाऱ्या ह्या कृती आपल्याच वागण्याची प्रतिक्रिया नसेल हे कश्यावरुन?

In reply to by अजिंक्यराव पाटील

सदानकदा आपणच मुस्लिमांना दुजाभावाची वागवत आलोय, त्यांच्याकडून होणाऱ्या ह्या कृती आपल्याच वागण्याची प्रतिक्रिया नसेल हे कश्यावरुन? १. मुस्लिमांचा राष्ट्रीय संपत्तीवर अधिकार पहिला असे म्हणणारे पंतप्रधान २. त्यांना मिळणार सोयी सवलती. ३. वाटेल तिथे नमाझ पढणार, मजारी बांधणार, बेकायदेशीर मशीदी बांधणार एवढे करुन परत दहशतवादी कृत्ये करणार आणि दहशत्वादाला धर्म नसतो हे म्हणणार ! पण तरीही दुजाभावाची ओरड करणार ! एकदा ईस्लाम काय आहे हे समजुन घ्या. कुठेही काफिर दिसला की त्याला मारुन टाका हे शिकवणारा धर्म आहे हा !

तामिळनाडू पाठोपाठ बंगालमध्येही केरळ स्टोरी या चित्रपटावर बंदी जाहीर झाली आहे. चित्रपट नियामक मंडळाने मान्यता दिलेल्या चित्रपटावर राज्यांनी प्रतिबंध घालणे कायदेशीर आहे का?

In reply to by श्रीगुरुजी

मुळात केरळ उच्च न्यायालयाने या चित्रपटावर प्रतिबंध आणण्यास नकार दिलाय. पण ही बाहेरची राज्येच प्रतिबंध आणताहेत.

In reply to by श्रीगुरुजी

चित्रपट नियामक मंडळाने मान्यता दिलेल्या चित्रपटावर राज्यांनी प्रतिबंध घालणे कायदेशीर आहे का?
तसे करता येत असावे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी भिती वाटून १९९२-९३ च्या दंगलींवरील बॉम्बे या चित्रपटाला १९९५ मध्ये मुंबईत तत्कालीन पोलिस आयुक्तांनी (नाव विसरलो) एक आठवड्यासाठी दाखवायला बंदी आणली होती.

अतिशय संयत परीक्षण, अजेंडा प्रतिसादकांचे अपेक्षित प्रतिसाद आणि त्यांना ठोकून काढणाऱ्यांचे रट्टे. लगे राहो. चित्रपट बघण्याची उत्सुकता मात्र नक्की वाढली.

एक प्रयत्न करतो उत्तर केरळ किंवा आपण ज्याला मलबार रिजन म्हणतो तिथल्या मुस्लिम लोकसंख्येविषयी स्पष्टीकरण द्यायचा. केरळ हे साधारण साडेतीन कोटी लोकसंख्येचे तुलनेने छोटे राज्य आहे, परंतु त्यात मुस्लिमांचे प्रमाण (27%, बहुतेक सुन्नी) संपूर्ण भारतापेक्षा (14%) जास्त आहे; उत्तर मलबार जिल्ह्यातील अनेक गावे आणि शहरांमध्ये मुस्लिम बहुसंख्य आहेत .याच मूळ दडलंय ते मसाल्याच्या व्यापारामध्ये .अगदी ७व्य ८ व्या शतकापासून अरब व्यापारी मलबार प्रांतात व्यापारासाठी येत होते आणि अनेक अरब व्यापारी केरळमध्ये स्थायिक झाल्यामुळे ते या प्रदेशाच्या संस्कृतीचा आणि समाजाचा अविभाज्य भाग बनले.स्थानिक लोकांमध्ये रोटीबेटी व्यवहार वाढले आणि बहुतांश लोकांनी मुस्लिम धर्म स्वीकारायला सुरुवात केली ,पूर्ण हिंदुस्थानात विशेषतः उत्तर हिंदुस्तानात जशी सक्तीची धर्मांतर झाली तशी सगळीकडे झाली असं नाही बरीच वेळेला लोकांनी सामाजिक विषमता किंवा आर्थिक परिस्थिती किंवा मुस्लिम धर्मातली तत्व आवडल्यामुळे इस्लाम स्वीकारला (जस आपण पौर्वात्य देशातल्या नागरिकांनी हिंदू धर्म स्वीकारल्याची बातम्या ऐकून खुश होतो किंवा इस्कॉन मध्ये गोरे लोक बघून अभिमान वाटतो तसाच काही झालंही असेल ) तोपर्यंत इस्लाम बऱ्यापैकी एस्टॅब्लिश'झाला होता ,आणि त्यानंतर १७६६ मध्ये मलबार वर हैदर अलीच्या नेतृत्वाखाली कुप्रसिद्ध आक्रमण झालं आणि त्यानंतर टिपूच्या सैन्याने हत्याकांड आणि धर्मांतर आणि जबरदस्ती ने हिंदू बायकांबरोवर लग्न लावून दिली . आणि हा इतिहास नाकारायचं काही कारण नाहीय .टिपूने तेव्हा हे कांड केलं म्हणून आता स्वतंत्र भारतात पूर्ण भारतच इस्लामीकरण होईल याची लोकांना भीती दाखवणं हा शुद्ध संघी हलकटपणा आहे, आता येऊ आकडेवारीकडे .तर 1991-2001 या कालावधीत मुस्लिम लोकसंख्या 15.8% वाढली जी 2001-2011 या कालावधीत 12.83% पर्यंत घसरली. केरळमधील ख्रिश्चन लोकसंख्या 1991-2001 या कालावधीत 7.7% दराने वाढली, तर 2001-2011 या कालावधीत त्यांची लोकसंख्या 1.38% च्या अल्प दराने वाढली.आणि मुस्लिम टक्का एवढा असून पण केरळ शिक्षण ,आरोग्यसेवा,कायदा सुव्यवस्था ,बालमृत्यू निवारण ,कुपोषण निवारण यात देशातल्या बर्याच राज्यांपेक्षा प्रगतिशील आहे उच्च मानवी विकास निर्देशांक (0.79) उच्च आयुर्मान (७४ वर्षे) कमी दारिद्र्य दर (7.05%) सुरक्षित पिण्याचे पाणी असलेल्या कुटुंबांची उच्च टक्केवारी (94%) इष्टतम लिंग गुणोत्तर (1000 पुरुषांमागे 1084 महिला) उच्च साक्षरता अत्यंत कमी बालमृत्यू दर. स्वच्छ राज्य यात युपी सारखी बीजेपी शासित राज्य जवळपास देखील नाहीत . सध्या आपल्याकडे रोजच्या जगण्यासाठी लागणाऱ्या गोष्टीपेक्षा भीतीचा बागुलबोवा दाखून राजकारणी फायदा घेताहेतभ आणि लोक डोळे मिटून पाठीमागे जयजयकार करत चाललेत ,पुराण इतिहास म्हणून दाखवली जाताहेत आणि इतिहासाला वास्तुनिष्ठरित्या न बघता जिंगोईजम आणि ऐतिहासिक पात्रांचे दैवतीकरण चालय .आणि इतिहास अगदी अभ्यासपूर्ण इतिहास देखील व्यर्थ आहे जर तो मांडणाऱ्याचा हेतू कलुषित असेल आणि इथे तर सिनेमा आहे जो सत्य घटनेवर आधारित म्हणून ज्याचं प्रमोशन केलं गेलं\आणि मग कोर्टात फिक्शन आहे असं सांगावं लागलं कारण सत्यघटना म्हंटल्यावर पुरावे ,सोर्स द्यावे लागतात ते देऊ शकले नाहीत निर्माते .आणि आता प्रेक्षक ती सत्यघटना आहे असं बाकीच्यांना सांगताहेत हे सगळं थोर आहे .

In reply to by स्वप्निल रेडकर

धन्यवाद. फिरायला/कामानिमित्त गेल्यावर हॉटेल्स वैगरे मध्ये जास्त मुस्लिम दिसले ह्यावरून जबरदस्तीने धर्मांतर झाले असणार ह्या निष्कर्षावर काय बोलावे असे माझे झालेले, शब्दशः बोलती बंद झाली.

In reply to by कॉमी

शब्दशः बोलती बंद झाली.
काहीही वाईट झाले नाही. अगदी उत्तम झाले. तुमची अज्ञानमूलक गोष्टी पसरवणारी बोलती अशीच बंद झालेली असू दे.

In reply to by स्वप्निल रेडकर

याच मूळ दडलंय ते मसाल्याच्या व्यापारामध्ये .अगदी ७व्य ८ व्या शतकापासून अरब व्यापारी मलबार प्रांतात व्यापारासाठी येत होते आणि अनेक अरब व्यापारी केरळमध्ये स्थायिक झाल्यामुळे ते या प्रदेशाच्या संस्कृतीचा आणि समाजाचा अविभाज्य भाग बनले.
बोंबला. कुठे शिकलात हो असले काही? भारताकडे ब्रिटिश आणि इतर युरोपियन लोक आकर्षित झाले त्यामागे एक कारण भारतात होणारे मसाले हे एक होते असे मी तरी शाळेत असताना शिकलो आहे बुवा. मसाले काय फक्त केरळमध्ये होत होते का? मग इतर ठिकाणी ते अरब व्यापारी का नाही गेले? केरळविषयीच बोलायचे झाले तर ते व्यापारी फक्त मलबारमध्ये स्थायिक झाले बरं का. कोचीन आणि त्रावणकोरमध्ये नाही का? याची तर्कसंगती कशी लावायची?

In reply to by कॉमी

अच्छा. तेच का ते मोपल्यांचे बंड वाले? टिपूच्या अनेक शतके आधी एका राजाने स्वतःहून इस्लाम धर्म स्विकारला होता हे मी पण वरच्या एका प्रतिसादात लिहिले आहे. त्याच्या बरोबर सामान्य लोकांपैकी अनेकांनीही धर्मांतर केले असायची शक्यता आहेच. बादवे, दरवेळेस तुमचा आकड्यांवर भर असतो म्हणून विचारतो. तुम्ही दिलेल्या लिंकमध्ये केरळमध्ये साधारण २६% मुस्लिम आहेत ही पब्लिक डोमेनमध्ये असलेली माहिती आहे. त्यात विशेष काही नाही. पण त्या विकीपिडीयावरील लेखाचे शीर्षक आहे- मोपले. त्यावरून कोणाला वाटायचे की सगळे २६% मोपले आहेत. पण तसे नाही. त्याच लेखात दिले आहे की केरळी मुस्लिमांमध्ये मोपले किती आणि इतर किती याची वर्गवारी उपलब्ध नाही. मग सध्याचे लोक स्वयंप्रेरणेने धर्मांतर केलेल्यांचे वंशज आहेत (म्हणजेच टिपूने सक्तीच्या धर्मांतर केलेल्यांचे वंशज फार प्रमाणात नाहीत) हे म्हणण्यासाठी नक्की कोणती आकडेवारी उपलब्ध आहे? तुम्हीच दिलेल्या त्या लेखात दिलेल्या टेबलवरून कळते की केरळमधील मुस्लिमांपैकी ६०% पेक्षा जास्त मलबारमध्ये आहेत (मलापुरम- ३२.५६%, कोईकोडे- १३.६५%, कन्नूर- ८.३७%, कासारगोड- ५.४९% आणि वायनाड- २.६४%). नेमका हाच भाग टिपूच्या टाचेखाली आला होता. तेव्हा सध्याचे लोक टिपूने सक्तीने केलेल्या धर्मांतरीत लोकांचे वंशज आहेत ही शक्यता जास्त नाही का?

In reply to by स्वप्निल रेडकर

काहीच वर्षापूर्वी आपल्या देशाची मुस्लिम धर्मामुळे फाळणी झाली. देशातले एकमेव मुस्लिम बहुल राज्यातून हिंदूंना हाकलून देण्यात आले आजूनही तिथे हिंदूंना वेचून ठार केलं जातं. केरळमध्ये ही हिंदुपेक्षा 5 पटीने मुस्लिम लोकसंख्या वाढत आहे. पण तरीही islamikrnacha धोका दिसत नाही?

In reply to by स्वप्निल रेडकर

टिपूने तेव्हा हे कांड केलं म्हणून आता स्वतंत्र भारतात पूर्ण भारतच इस्लामीकरण होईल याची लोकांना भीती दाखवणं हा शुद्ध संघी हलकटपणा आहे, १००० वर्षात झाले नाही पण कुरतडून कुरतडून धर्मांतर ( फक्त इस्लामी नाही कमी भेदक वाटणारे पण तेवधच धर्मांध ख्रिस्ती धर्मांतर ) होतंय आणि त्या यासाठी ही व्यस्थित कार्यक्रम आहे / असतो यावर विश्वास दिसत नाहीये,,, बर हा "लबे रेस का घोडा " प्रकार चा दूरपल्याचाच कार्यक्रम आहे हे हि कळत नसावे ) प्रत्यक्ष धर्मांतर कर्णायाधी , ज्यांचे धर्मांतर करा यचे आहे ( हिंदू) त्यांना आधी बोथट करणे , मग त्यात शिक्षण, त्यांचायतील वाईट प्रथानचा वापर करून त्यांच्यात फूट पाडणे ..( हिंदूंना जातीवरून ) हि अनेक शस्त्रे असतात बाकी "संघ हलकटपणा" वैगरे चालू द्या ... तो हि "लबे रेस का घोडा " आहे त्यामुळे हलकटपणा वैगरे बिरुदे लावून काय फरक पडणार नाही लोकआता एवढे "त्याचू" राहिले नाहीत

In reply to by चौकस२१२

टिपूच्या काळात तलवारीच्या धाकाने धर्मांतर होत होतं. आताच्या काळात तसे होणे बरेच अवघड आहे. म्हणून तर आर्थिक मदत, ओळख लपवून फशी पाडणे असे प्रकार सुरू झाले व ख्रिश्चन आणि मुस्लिम हे दोघेही या प्रकारातून टाळकी वाढवित आहेत. याविषयी लोकांना जागृत करणे हा हलकटपणा नसून ही जागृती करणाऱ्यांना हलकट म्हणणे हाच खरा हलकटपणा आहे. भारताचं वाटोळं झालं तरी चालेल पण आम्ही संघद्वेषाची पिचकारी टाकणारच.

In reply to by स्वप्निल रेडकर

लोक डोळे मिटून पाठीमागे जयजयकार करत चाललेत , हायला हे बरं आहे तुमचं " भाजप ची जरा जरी पाठराखण केली कि लगेच "डोळे मिटून पाठीमागे जयजयकार" आणि ६० वर्षे नेहरू डोक्यावर घेऊन जे काय केले ते काय? लोकशाहीत दावे उजवे दोघांना हि अधिका र आहे ना रिंगणात उतरण्याचा.. ? का हेच मूळ मान्य नाही ? असही असु शकत का हो? काही लोक जागे झाले असतील सुद्धा ? ६० वर्षे काँग्रेस एके काँग्रेस च्या राज्यात "जी काही" विचारसरणी राबवली गेली तिचायतील चुका कळल्या असतील आणि दुसरी विचारसरणी असू शकते ? का सगळेच अंध भक्त याचा गठ्ठा घेऊन फिरताय लोकांना लावायला ?

In reply to by स्वप्निल रेडकर

पुरोगामी विचार सोडला आणि वस्तुस्थिती लक्षात घेतली तर केरळ चे उत्तरेकडचे जिल्हे ( कासारगोड, मल्लापुरम, वायनाड कन्नूर, कोढीकोडे) हे लोकसंख्या वाढीत अग्रेसर असले तरी दरडोई उत्पन्न, सकल उत्पन्न, मानवाधिकार यात केरळच्या इतर जिल्ह्याच्या मानाने मागासलेले आहेत. अर्थात योगायोगाने याच जिल्ह्यात मुसलमान लोकांची संख्या जास्त असल्याचे आढळते. केरळच्या जिल्ह्यांची तुलना उत्तर प्रदेश किंवा बिहारशी करणे म्हणजे आमची पपई तुमच्या हापूसच्या आंब्यापेक्षा जास्त गडद केशरी रंगाची आहे म्हणून स्वतः ची पाठ थोपटण्यासारखे आहे.

In reply to by सुबोध खरे

त्यातही आम्ही आरोग्यव्यवस्थेत कित्ती कित्ती क्रांती केली अशी स्वतःचीच पाठ थोपटून घेणारे लोक कितपत विश्वासार्ह असतात हा प्रश्नच आहे. फिडेल कॅस्ट्रोने क्युबात अशीच आरोग्यव्यवस्थेत मोठ्ठी क्रांती केली होती असे ढोल नेहमी पिटले जातात. मग त्याच्यावर उपचार करायला स्पेनहून डॉक्टर का बोलावावा लागला होता? क्युबात डॉक्टर नव्हते का? https://www.nbcnews.com/id/wbna16346039 . तीच गोष्ट खुद्द केरळचे मुख्यमंत्री विजयन यांची. जर केरळमध्ये आरोग्यसेवा इतकी उत्तम असेल तर केरळचे मुख्यमंत्री स्वतः उपचार घ्यायला अमेरिकेला का गेले होते? https://www.thehindu.com/news/national/kerala/cm-leaves-for-treatment-i… आणि हो. कम्युनिस्टांना इतर वेळेस अमेरिकेच्या नावाने खडे फोडल्याशिवाय जेवण घशाखाली उतरत नाही पण उपचार घ्यायला मात्र त्याच अमेरिकेला गेलेले चालते का? अमेरिकेच्या जवळच फिडेल कॅस्ट्रोने आरोग्यव्यवस्थेत मोठ्ठी क्रांती आणलेला तोच क्युबा देश आहे. मग तिथे का नाही त्यांना जावेसे वाटले? असो.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

काय पातळीवरची आधुनिक वैद्यकीय सोय उपलब्ध आहेत हा एक निकष झाला. सर्वसामान्य लोकांना सेवा परवडतात का हा सुध्दा महत्वाचा निकष आहे. अमेरिकेत पैसे असतील तर जगातले सर्वोत्तम वैज्ञकिय उपचार मिळतात. पैसे नसतील तर मात्र खरे नाही.

मुख्तार अब्बास नक्वी आणि शाहनवाज हुसैन या आद्य लव्ह जिहादि लोकांचे काय करायचे ??

In reply to by कपिलमुनी

>>>मुख्तार अब्बास नक्वी आणि शाहनवाज हुसैन या आद्य लव्ह जिहादि लोकांचे काय करायचे ?? लव्ह जिहाद मधला महत्वाचा आणि आक्षेपार्ह भाग "कसाब" ने "कपिल" हे नाव धारण करून मुलींना फसवणे.. हा आहे. मुख्तार अब्बास नक्वी किंवा शाहनवाजने असे नाव बदलून फसवाफसवी केल्याचे पुरावे आहेत का..? असल्यास पुरावे द्या अन्यथा विधान बिनशर्त मागे घ्या.

In reply to by मोदक

हे बघा आपटार्ड लोकांना कोणताही कसलाही पुरावा देण्याची गरज नसते हे त्यांच्या युगपुरुष गुरु यांची शिकवण आहे. मग भले युगपुरुष यांनी तीन वेळेस न्यायालयात बिनशर्त माफी मागितली असली तरीही. त्यांचं एकच पालुपद मोदी यांनी काहीही केलं तरी ते चूकच असतं. पुरावा कसला मागताय?

२ प्रकारचे लव्ह जिहाद असतात हे तुम्हाला माहित नाही का ? १) फसवून म्हणजे "कसाब" ने "कपिल" हे नाव धारण करून मुलींना फसवणे २) त्यातील त्यात सरळमार्गी! म्हणजे आपण मुस्लिम आहोत हे ना लपविता आपल्याला हिंदू मुलगी पटवता येतीय का बघणे आणि तिचे धर्मांतर करणे आणी या २) पद्धतीत धार्मिक संस्थेची होणारी प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष मदत ... आता तुमच्या वीच।रसरणीला जर क्रमांक २ हे आजीबाबत आक्षेपार्ह वाटत नसेल तर काय बोलणार कपाळ .. कदाचित क्रमानं १ हे अस्तित्वातच नसेल असेहि म्हणणे असेल आपले .. मूळ प्रश्न समजून घ्य्याचा नाही का? हिंदू शकत्यो इटारसानेच धर्मांतर करून आपलं धर्म वाढवण्याचं फंदात पडत नाहीत ( शक्यतो म्हणतंय ,, नाहीतर इस्कॉन चे घोडे पुढे कराल - आणि तसेही इस्कॉन येते स्वतःला हिंदू म्हणून घेत नाहीत हा वेगळा भाग ) त्यामुळे हिंदूंना बाकिच्यांनी आपले धर्मांतर केलेलं आवडत नाही ... पण झापड लावयाचीच ठरवली असतील तर राहू तसेच... सर्व तथाकथित उदारमतवाद्यांचा मुख प्रश्न आणि जळफळाट हा आहे की .. भारतातात हिंदूंवर झालेल्या अन्याय किंवा अत्याचाराचे असे उघड प्रदर्शन कसे करू देताय सरकार? काँग्रेस काळात असल काही खपवून घेतले जात नवहते दिवस चांगले होते,, अल्पसंख्यांकांनाच फक्त भावना असायच्या.. बहुसंख्याकच्या भावनांना कोण विचारतो.. गेले उडत .... हे बहुसंख्याक एकदम जागे कसे काय झाले...

श्री कॉमी, तुमचा ३२ हजार आकड्याला असलेला आक्षेप वरकरणी तरी योग्य दिसत आहे. अधिकृत विदा उपलब्ध नसल्याने मतांतरे अपेक्षित आहेत. पण त्या चित्रपटातील मुख्य मुद्दा प्रेमजिहाद ह्याबद्दल तुमचे मत काय? तुमचा त्याला पाठींबा आहे की विरोध आहे? तलवारीच्या जोरावर जी भारतात धर्मांतरे गोवा आणि इतस्ततः झाली त्यांना न्याय मिळायला नको का? ---

In reply to by Trump

जबरदस्तीने किंवा फसवून केलेले लग्न आणि धर्मांतर वाईटच. त्याचा पाठींबा कोण करेल ? तलवारीच्या जोरावर>>> न्याय म्हणजे तुमची काय कल्पना आहे इथे ?

In reply to by कॉमी

जबरदस्तीने किंवा फसवून केलेले लग्न आणि धर्मांतर वाईटच. त्याचा पाठींबा कोण करेल ?
म्हणजे तुमचा केरळ स्टोरीचा मुद्दा मान्य आहे, फक्त तपशीलात मतभेद आहे.
न्याय म्हणजे तुमची काय कल्पना आहे इथे ?
त्या समुदायाने गुन्हा कबुल करवा, बिनशर्त माफी मागावी, नुकसान भरपाई द्यावी, त्यांची घरवापसी व्हावी.

In reply to by कॉमी

न्याय म्हणजे भविष्यात हे प्रकार होऊ नये यासाठी धर्मांतर प्रतिबंध कायदा आणणे, धर्मप्रसारास कायदेशीर प्रतिबंध आणणे, धर्मप्रसारास भारतात येण्याऱ्या मिशनऱ्यांना प्रवेश परवाना न देणे इ.

In reply to by श्रीगुरुजी

श्रीगुरुजी सहमत .. आणि वाहत्या गंगेत हात धुवून घ्यावेत ... सर्वधर्माना समान कायदा .. म्हणजे सर्व नागरिकांना समान कायदा कॉमन सिविल कोड

The Kerala Story : चित्रपटातील कथानक माझ्याही आयुष्याशी जुळणारे, हिंदू धर्माबद्दल अज्ञानामुळे केले धर्मांतर; सांगतेय अनघा… https://www.marathi.hindusthanpost.com/social/thrissur-anagha-converted…

In reply to by मुक्त विहारि

मुविकाका प्रतिसादाचे शीर्षक वाचून त्यात तुमचे मध्यपूर्वेतले स्वानुभव लिहिले असावेत असे वाटले होते, पण त्यात लिंक दिलेली बघून भ्रमनिरास झाला 😀

'द केरला ष्टोरी'च्या निमित्ताने 'धृव राठी' -दिलीप बिरुटे