राष्ट्रीय नास्तिक परिषद पुणे
राष्ट्रीय नास्तिक परिषद पुणे
स्थळ काळे हॉल, गोखले इन्स्टिट्यूट, बीएमसीसी आरडी, एफसी कॅम्पस. डेक्कन जिमखारा, पुणे-411004 तारीख: रविवार, 18 डिसेंबर 2022 वेळ: सकाळी 9 ते संध्याकाळी 6
परिषदेचे वेळापत्रक: सकाळचे सत्र 9:00-9:30- चहा आणि नाश्ता 9:30-9:40 शिवप्रसाद महाजन (ब्राइट्स सोसायटी) यांचे स्वागत भाषण 8:40-10:00 सोसायटीच्या मुख्य सदस्यांचा संक्षिप्त परिचय आणि पाहुण्यांसाठी स्मृतिचिन्ह सादरीकरण-कुमार नागे भाषणे 10:00-10:20 प्रसन्न जोशी (साम टीव्ही) 10:20-10:40 अविनाश पाटील (MANS) 10:40-11:20 असीम सरोदे (संविधान आणि मानवाधिकार विश्लेषक). 11:20-11:35 उत्तम निरौला यांच्या हस्ते चार्वाक आणि मधुरजग पुरस्कार 11:35 12:15 नरेंद्र नायक (अध्यक्ष FIRA, मंगलोर) १२:१५-१२:४५ उत्तम निरौला (सोच नेपाळचे कार्यकारी संचालक) १२:४५-१:०० प्रमोद सहस्रबुद्धे (ब्राइट्स सोसायटी) यांचे आभार 1:00-2:00 लंच ब्रेक 2:00-5:00 दुपारचे सत्र ट्रॅक 1 (विश्वासाचा सिद्धांत) होस्ट: सुकृत कुलकर्णी 2:00-2:30 Speech by Aniket Sule 2:30-3:30 Thoughts by Abhijit Chanda, Ajit Abhyankar, Prajakta Atul, Vandana Shinde, Y N Walavalka 3:30-5:00-Audience open house and QnA with panel ट्रॅक २ (विश्वासाचे व्यावहारिक परिणाम) निमंत्रक: समीर शिंदे 2:00-2:30 अलका धुपकर यांचे भाषण 2:30-3:30 प्रदीप पाटील, विश्वंभर चौधरी, आनंद करंदीकर, जगदीश काबरे यांचे विचार 3:30-5:00-प्रेक्षकांसाठी खुले घर आणि पॅनेलसह QnA 5:00-5:30 विश्वंभर चौधरी यांची विधानसभा आणि सारांश 5:30 पुढे चहा आणि नाश्ता टीप: वेळापत्रक समायोजित करण्याचा किंवा बदलण्याचा अधिकार आयोजकांनी राखून ठेवला आहे.
आपल्या पैकी कोणी सहभागी होतील तर त्यांनी अहवाल सादर करावा ही विनंती.In reply to अरे वाह ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धर्मप्रसारासाठी तलवार हाती धरा, खुशाल नरसंहार करा, असे मुळी कनवाळू देवाचे स्पष्ट आदेशच आहेत.
कोणत्या देवाचे? हिंदू, बौद्ध, शीख, जैन या धर्मातील एकाही देवाने असा आदेश दिलेला नाही. फक्त एकाच पंथातील तथाकथित देवाने हा आदेश दिलाय. मग सरसकटीकरण का?
नास्तिक बिचारे मवाळ आणि पापभीरू असतात. त्यांनी कुणाला पाव देऊन, शाळा-दवाखान्याच्या व्यूहात भुलवून बाटवलेले नाही.
हास्यास्पद दावा. चीन, कोरिया, बल्गेरिया, रूमेनिया अश्या साम्यवादी देशातील नास्तिक सत्ताधाऱ्यांनी किती कोटी माणसे मारली याची मोजदादच नाही. नास्तिक चळवळीतल्या एका आघाडीच्या दिवंगत नेत्याच्या पत्नीच्या संशयास्पद मृत्युची कहाणी जनता विसरलेली नाही. जसे सर्वच आस्तिक पापभीरू, मवाळ असे नसतात तसेच सर्व नास्तिकही बिचारे मवाळ पापभीरू नसतात.
खरं तर आसपासच्या बहुसंख्य, आग्रही आस्तिक समाजात नास्तिकांची कुचंबणाच होत असते. घरगुती अथवा सार्वजनिक धार्मिक कार्यात त्यांना बऱ्याचदा मन मारून सामील व्हावे लागते. पण लक्षात कोण घेतो?
नास्तिक सुद्धा आग्रही असतात. एका कार्यक्रमात तर पाहुण्यांनी साधे दीपप्रज्वलन केले म्हणून नास्तिकांनी टीका केली होती. पुण्यातील सरस्वती मंदिर शाळेने कोणत्या तरी समारंभापूर्वी सत्यनारायण पूजा करणार असे सांगितल्यानंतर ना. ग. गोरे व काही इतर नास्तिकांनी आंदोलन वगैरे केले होते. कोणत्याही सरकारी कार्यक्रमात किंवा मंत्री वगैरे असलेल्या कार्यक्रमात एखाद्या भगवा वेषधारी असला किंवा काही पूजा वगैरे धार्मिक कृत्य केले की लगेच यांचा विरोध असतो.
आता मला सांगा, ज्ञानाच्या या शाखेत, ‘मला सर्व सत्य समजलं आहे, सर्व ज्ञान झालं आहे,’ असं म्हणणारी उद्दाम; का ‘मला सर्व समजलेलं नाही’ असं म्हणणारी? अर्थातच अज्ञानाची शक्यता मान्य असणारी विनम्र आहे हे उघड आहे. मग सृष्टीच्या रीतीपासून ते समाजाच्या नीतीपर्यंत अंतिम सत्य गवसल्याचा दावा करणारे उर्मट? का हा दावा धाडसाचा आहे असं म्हणणारे?
कोणते आस्तिक मला सर्व समजले आहे असा दावा करतात?
नास्तिकांना नीतिमूल्यांची चाड नसते असाही एक गोड गैरसमज आहे. नास्तिकता दुराचार शिकवत नाही. नास्तिकता हाच दुराचार अशी बहुतेक धर्मात मांडणी असते ती गोष्ट वेगळी. तशी ती परधर्म हा दुराचार अशीही असते. पण नास्तिकांची नीतिमूल्ये सद्सद्विवेकातून आणि कायद्यातून येतात.
अत्यंत हास्यास्पद दावे. चतुर्थी किंवा अश्याच एखाद्या दिवशी मुद्दाम गोमांस चेपणारे, मद्यप्राशन करणारे नास्तिक आहेत. नास्तिकता हा दुराचार अशी मांडणी हिंदू धर्मात तरी नाही.
धर्म आणि धर्मग्रंथ आपल्याला असल्या भाकडकथांवर आंधळा विश्वास ठेवायला शिकवतात.
स्वतः अनुभव घ्या असे हिंदूधर्म सांगतो.
खरं तर आपला देव वगळता जगातल्या इतर देवांवर आपली श्रद्धा नसतेच. म्हणजे अल्लाच्या बाबतीत हिंदू माणूस नास्तिक असतो आणि इन्का लोकांच्या देवाचा भारतातल्या सिरियन ख्रिश्चनांस पत्ता नसतो. इन्कांच्या देवाला तरी यांचा पत्ता आहे का ते त्यालाच ठाऊक! ‘इतर सर्व देवांवर आपण का बरं विश्वास ठेवत नाही?’
आपल्या धर्माची तत्वे व या इतर धर्मांची तत्वे परस्परविरोधी असल्यावर इतर धर्मांवर कशी श्रद्धा ठेवणार?
तेव्हा असला कोणी नास्तिक तर बिघडलं कुठं? बरी असतात ही मंडळी!
तेव्हा असला कोणी आस्तिक तर बिघडलं कुठं? ही मंडळी सुद्धा बरी असतात!
In reply to असला कोणी आस्तिक तर बिघडलं by श्रीगुरुजी
In reply to असला कोणी आस्तिक तर बिघडलं by श्रीगुरुजी
In reply to १००% सहमत by कर्नलतपस्वी
In reply to असला कोणी आस्तिक तर बिघडलं by श्रीगुरुजी
In reply to असला कोणी आस्तिक तर बिघडलं by श्रीगुरुजी
In reply to प्रसन्न जोशी, असीम सरोदे, by प्रचेतस
In reply to प्रसन्न जोशी, असीम सरोदे, by प्रचेतस
In reply to अलका धुपकर, यनावाला, अजित by श्रीगुरुजी
In reply to यनावाला यांबद्दल आदर आहे, by प्रचेतस
In reply to प्रसन्न जोशी, असीम सरोदे, by प्रचेतस
In reply to प्रसन्न जोशी, असीम सरोदे, by प्रचेतस
In reply to + १०० by सुबोध खरे
In reply to प्रसन्न जोशी, असीम सरोदे, by प्रचेतस
In reply to प्रतिसाद वाचल्यावर. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to विरोध by कपिलमुनी
In reply to समर्थक, परीषदेत जाऊन समर्थक by श्रीगुरुजी
In reply to काय लॉजिक? by कपिलमुनी
In reply to भिन्न / विरोधी मतांच्या आदरासहित माझं निरीक्षणाधारित मत - by वामन देशमुख
In reply to नास्तिकांना ते आस्तिक by आग्या१९९०
In reply to हो, पण श्रावणात हॉटेल मधून by आनन्दा
In reply to हो, पण श्रावणात हॉटेल मधून by आग्या१९९०
In reply to नास्तिकांना ते आस्तिक by आग्या१९९०
कार्यकारणभाव समजावून देऊ शकत नसल्याने ते असल्या फंदात पडत नाही, सरळ मॉर्निंग वॉकला विषय संपवून टाकतात.
हो का?
मग राष्ट्रीय नास्तिक परीषद, देवाला रिटायर करा या शीर्षकाचे अनेक परिसंवाद, यनावालांनी मिपावर पाडलेले डझनभर लेख व नंतर त्या लेखांचे पुस्तक, लोकसत्तात वाचकांच्या पत्रात लिहिलेली पत्र . . . विषय संपविण्यासाठी होते का? हे प्रकार मॉर्निंग वॉकलाच करायचे का? In reply to कार्यकारणभाव समजावून देऊ शकत by श्रीगुरुजी
In reply to तुम्ही नका लोड घेऊ. by आग्या१९९०
In reply to निरूत्तर करणारा प्रतिसाद by श्रीगुरुजी
In reply to निरर्थक प्रतिसादांना निरुत्तर by आग्या१९९०
In reply to निरर्थक ! ! ! तुमचा नॉटी संजय by श्रीगुरुजी
In reply to नास्तिकांची महती वर्णन करताना by आग्या१९९०
In reply to राष्ट्रीय नास्तिक परिषद वार्षिक सम्मेलन by शशिकांत ओक
In reply to वृत्तांत by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Article 25 Constitution of India -
(1) Subject to public order, morality and health and to the other provisions of this Part, all persons are equally entitled to freedom of conscience and the right freely to profess, practise and propagate religion. (2) Nothing in this article shall affect the operation of any existing law or prevent the State from making any law— (a) regulating or restricting any economic, financial, political or other secular activity which may be associated with religious practice; (b) providing for social welfare and reform or the throwing open of Hindu religious institutions of a public character to all classes and sections of Hindus. Explanation I.—The wearing and carrying of kirpans shall be deemed to be included in the profession of the Sikh religion. Explanation II.—In sub-clause (b) of clause (2), the reference to Hindus shall be construed as including a reference to persons professing the Sikh, Jaina or Buddhist religion, and the reference to Hindu religious institutions shall be construed accordingly. येथे स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे हे स्वा . सावरकरांचे अजरामर वाक्य नेहमी आठवते. देवी सरस्वतीचे नग्न चित्र काढण्याबद्दल दातखीळ बसून गप्प असणारे निधर्मांध मात्र प्रेषित महंमदाच्या चित्र काढणाऱ्या चार्ल्स हेब्दोवर टीका करताना किंवा याच घटनेतील "४४ वे तत्व" सरकारने समान नागरी कायदा आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे "The State shall endeavour to secure for citizens a uniform civil code throughout the territory of India.हे मात्र विसरतात. आपण दुटप्पी आहोत हे सोयीस्कररीत्या विसरतात.In reply to वृत्तांत by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to ओक काका by श्रिपाद पणशिकर
In reply to झाकीर नाईकच्या एका युटुब by कानडाऊ योगेशु
In reply to झाकीर नाईकच्या एका युटुब by कानडाऊ योगेशु
In reply to हिंदु धर्माने नास्तिकतेला by प्रकाश घाटपांडे
In reply to झाकीर नाईकच्या एका युटुब by कानडाऊ योगेशु
In reply to मजा वाटली धागा पळताना वाचून by शशिकांत ओक
In reply to मनुष्य प्राण्याचा मेंदू आणि तल्लख असल्याचे परिणाम by कंजूस
नास्तिक परिषदेविषयीची चर्चा करुन वाचून उत्सुकता आणि ओढ वाढत चालली आहे.मन वढाळ वढाळ त्याचा थांग लागेना....
In reply to नास्तिक वा आस्तिक असणे नितांत वैयक्तिक बाब by चित्रगुप्त
In reply to धंदेवाईकपणा, दुकानदारी म्हणजे आपल्या 'माला' चा प्रचार. by चित्रगुप्त
गीता, बायबल, कुराण, वेद-पुराणे वगैरेंमधे तथाकथित 'नास्तिक' व्यक्तींची रूचि आणि अभ्यास असू शकतो.माझ्या बाबतीत नाडी ग्रंथांबद्दल असेच काही घडले.
In reply to अगदी खरे आहे... by शशिकांत ओक
आत्ताशी कुठे 'काथ्याकूट' मुख्य वळणावर उभा राहून गालातल्या गालात हसत आहे, असे वाटले. मस्त हं !अगदी खरे. एकदाची नाडी सुटली की हायसे वाटते.
In reply to नास्तिकता, परिषद आणि प्रतिसाद by तर्कवादी
In reply to मस्त प्रतिसाद by सर टोबी
मस्त प्रतिसादधन्यवाद सर
फक्त आस्तिक सदगदित होऊन तुमचं म्हणणं मान्य करतील अशी अपेक्षा ठेऊ नकाअशी अपेक्षा नाहीच पण फक्त मुद्देसूद चर्चा /वाद व्हावा ही माफक अपेक्षा. राजकीय परिप्रेक्ष्यातुन गुद्देसूद चर्चा नसावी :)
खरे तर गिरीश कुबेरांचाच लेख पुरेसा होतानाही ओ सर, लोकसत्तेतला सदर लेख डॉ. शंतनु अभ्यंकर यांचा पण लोकसत्तेत प्रसिद्ध झाल्यामुळे सरते शेवटी कुबेरांनाच शिव्या पडाव्यात हे मी समजू शकतो.. ते नाही का भारत पाकिस्तान क्रिकेटच्या निमित्ताने शाहिद आफ्रिदीच्या मातोश्रींची खूप आठवण केली जाते (मग भले आफ्रिदी सामन्यात असो वा नसो.. ) तसेच काहीसे. चालायचेच. कुबेरांच्या शैलीचा मी ही चाहता नाहीच
मिपाकर आस्तिकांनी नास्तिक आणि निधर्मी यांची गल्लत का केली ते कळायला मार्ग नाहीहा थोडा गंभीर मुद्दा.. मलाही नास्तिक हे निधर्मीच असावेत असे वाटते. तसं म्हंटलं तर नास्तिकांना धर्माची गरजच काय ? हे मान्य की ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांताशिवायही धर्माचे महत्व होते. माणसाच्या जगण्याला , वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि अगदी राजकीय देखील नीतिनियमांची चौकट देण्याचे काम धर्माने केले. आणि ही चौकट देण्याच्या कार्यामुळेच कदाचित जैन व बौद्ध यांसारख्या निरिश्वरवादी (वरील प्रतिसादात म्हंटल्याप्रमाणे माझ्या अल्पज्ञानानुसार - चुभूदेघे) धर्मांनाही महत्व प्राप्त झाले. पण आता काळ बदलला आहे. आता सर्वात प्रथम घटना, कायदे यांनी समाजजीवनाला , राज्यसंस्थेला कायदेशीर चौकट दिली आहे. अगदी कुटुंब व्यवस्थेसाठीही कायदे आहेत. मग एखाद्या बाबतीत काय चुक वा काय बरोबर, किंवा काय करायला हवे हे ठरवताना धार्मिक ग्रंथ नाही तर कायद्याची पुस्तके , नियम पुस्तिका यांचा आधार घ्यावा लागतो. मग असे असताना धर्माचे महत्व हे मुलतः ईश्वर उपासनेच्या निमित्ताने राहते. बाकी फक्त समजातील वा कुटुंबातील उत्सव व मनोरंजन. मग एखाद्या नास्तिकाने "मी अमूक धर्मातला नास्तिक" असा टॅग लावायला हवा काय ? मला तरी हे निरर्थक वाटते. पण ज्याचा त्याचा प्रश्न आहे. म्हणजे जैन , बौद्ध हे धर्म निरिश्वरवादी आहेत आणि हिंदू धर्म चार्वाक दर्शनाच्या निमित्ताने नास्तिकांना सामावून घेतो त्यामुळे या तीन धर्मात नास्तिकांची सोय होवून जाईलही पण तशी खरेच गरज आहे का ? मी परिषदेला गेलो असतो तर त्या निमित्ताने इतर नास्तिकांचे याबद्दलचे विचार जाणून घेता आले असते.
निधर्मी अथवा पुरोगामी असण्याची आजकाल एक अग्निपरीक्षा असते - मुस्लिमांवर टीका करणे - ती टाळण्यासाठी नास्तिकतेचा मार्ग निवडला जातो असा समज असावापुरोगामीबद्दल फारच बरेच हेटाळणीजनक उद्गार काढले जातात आणि हिंदू विरुद्ध मुस्लिम या मांडणीशी संबंध जोडलेला दिसतो. पण निधर्मी व पुरोगामी या वेगळ्या बाबी आहेत निधर्मी हे पुरोगामी असतील. पण सगळे पुरोगामी हे निधर्मी असतीलच असे नाही. एकुणात निधर्मी हा शब्द काहीसा चुकीच्या अर्थाने वापरला जातो असे मला वाटते "निधर्मी = सहिष्णू वृत्तीचा धार्मिक किंवा सर्व धर्म समभाव जपणारा व्यक्ती" असा अर्थ योग्य नाही. शब्दशः विचार केला तर निधर्मी = धर्म न मानणारा. प्रत्येक पुरोगामी हा "धर्म न मानणारा" असा असेल असे नाही तर पुरोगामी हे बहुधा सर्व धर्म समभाव जपणारे व परिवर्तनशील आणि सुधारणावादी धार्मिक होत. जसे राजा राममोहन रॉय , स्वामी विवेकानंद. तर निधर्मी म्हणजे सरळ सरळ "मला धर्माची गरजच काय ?"असे म्हणणारे (माझ्यासारखे :) - इतर सगळे नास्तिकही निधर्मीच असावेत बहूधा असा माझा कयास आहे...
In reply to मस्त प्रतिसाद by तर्कवादी
In reply to नास्तिकता, परिषद आणि प्रतिसाद by तर्कवादी
In reply to उत्तम प्रतिसाद. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उत्तम प्रतिसाद.धन्यवाद डॉ बिरुटे सर
In reply to उत्तम प्रतिसाद by हणमंतअण्णा शंक…
उत्तम प्रतिसादधन्यवाद हणमंतअण्णा जी. आणि तुमच्या प्रतिसादामुळे आता खर्या अर्थाने चर्चेला सुरुवात झाली.
तुम्ही ज्यांना प्रतिसाद दिले आहेत ते मूळ मुद्दे दखल घेण्यासारखेसुद्धा नव्हते कारण त्यांचा उद्देश परिषदेची किंवा परिषदेच्या हेतूंची चिकित्सा करण्याचा नव्हताचबरोबर आहे. पण चर्चेच्या ठिकाणी दखल चर्चा करण्यापेक्षा गोंधळ करणार्याच्या हेतुने आलेल्यांकडे आधी लक्ष द्यावे लागते. एकतर त्यांच्या मुद्द्यांची (ते अदखलपात्र असलेत तरी) दखल घेवून त्यांना संयमाने पण ठामपणे उत्तर देवून शांत करणे किंवा हाताला धरुन बाहेर काढणे याशिवाय पर्याय नसतो. ..त्या शिवाय मुख्य चर्चा होवूच शकत नाही. हेच बघा ना धागा निघाल्यानंतर जवळपास एक महिन्यानंतर तुम्ही प्रतिसाद दिलात .. याचाच अर्थ आधीच्या गोंधळात तुम्ही तुमचे विचार मांडू इच्छित नव्हता असे दिसते. असो. तुम्ही मांडलेले विचार बरेच गहन आहेत. सगळ्याच मुद्द्यांवर नाही तरी काही मुद्यांवर माझ्या प्रतिक्रिया देत चर्चा सुरु ठेवतो.
मला वाटते पर्यायाने प्राथमिक पातळीवरचे नास्तिक किंवा अॅग्नोस्टिक आहेतप्राथमिक पातळीवरचे नास्तिक ही संज्ञा तितकीशी स्पष्ट होत नाहीये. कृपया उदाहरणासहित स्पष्ट कराल काय ?
सांस्कृतिक नास्तिक असा प्रकार नसतो पण सांस्कृतिक धार्मिक पण नास्तिक असा प्रकार जरूर असतोसांस्कृतिक नास्तिक म्हणजे काय ? सांस्कृतिक धार्मिक पण नास्तिक - म्हणजे कुटूंबात किंवा समाजजीवनात धार्मिक कार्यात वा उत्स्वात सहभागी होणारा पण मनाने नास्तिक असे काय ? धार्मिक सण वा उत्सव हे कुटुंबाला समाजाला एकत्र आणणारी असतात त्यामुळे हे साहजिकच असू शकते. चित्रपटात दाखवला जातो तसा एखादा कडव्या मनाचा नास्तिक बनण्याची गरज नाहीच. तसेही धार्मिक सण वा उत्सव यात खर्या अर्थाने धार्मिक विधीचा भाग अगदी थोडा असतो बाकी इतर अनेक गोष्टी असतात ज्यांचा अस्तिक वा नास्तिक असण्याशी संबंध नसतो तर फक्त मनाला आनंद देणार्या त्या बाबी असतात. उदा. दिवाळीचे उदाहरण घेतले तर लक्ष्मीपूजन वा दिवाळीतल्या इतर दिवशी केल्या गेलेल्या बाकी पुजा मिळून फारतर दोन-तीन तासाच्या होत असतील. पण दिवाळी निमित्ताने खरेदी, फराळ बनवले जाणे, मित्र आप्तेष्टांनी एकत्र येवून तो खाणे, फटाके वाजवणे (आता प्रदुषणाचा मुद्दा वेगळा- पण फटाके वाजवण्यात अनोखी गंमत आहे हे मान्यच) , रांगोळी काढणे , घराला रोषणाई करणे वगैरे अनेक गोष्टी आहेत ज्या मनाला आनंद देतात. मी नास्तिक असलो तरी यांतील बहुतेक गोष्टी मला आवडतात .. प्रत्यक्ष पुजेच्या वेळी मात्र माझी पत्नी पुजा करते तर मी जवळपास असतो आणि फोटोग्राफी करतो.
त्यामुळे श्रद्धेवर घाला घालणे आणि अश्रद्ध नास्तिकतेकडे वाटचाल करणे हे खूप अशक्य आहे.ज्या मनात "ईश्वर आहे व तो जगाचे नियंत्रण करतो" ही श्रद्धा अतिशय घट्टपणे रुजली आहे तेथून ती दूर करणे खूप जास्त कठीण असते, कारण श्रद्धा एकटी येत नाही ती सोबत आशा आणि भिती अशा भावनांनाही घेवून येते. आणि खासकरुन भितीच्या भावनेवर विजय मिळवणे हे कठीण असते. त्यामुळे बुद्धी आणि भावनेच्या संघर्षात बुद्धी भावनेपुढे पराजित होते. मी व माझ्या पत्नीने "कॉसमॉस" नावाची हिंदी रुपांतरित एक माहितीपट वेबसिरीज आवडीने पाहिली. त्यात महास्फोट, विश्वाची निर्मिती, पृथ्वीचा इतिहास, डार्विनच्या सिध्दांतानुसार झालेली उत्क्रांती ई सर्व खूप विस्ताराने व छान पद्धतीने दाखवले आहे. माझ्या पत्नीलाही मालिका आवडली, आणि त्यातल्या कोणत्याच सिद्धांताबद्दल तिचा आक्षेपही नव्हता - किंवा तिला ते सर्व पटले होतेच. तेव्हा मी तिला विचारले की "या मालिकेत ईश्वराच्या अस्तित्वाचा उल्लेखही नाही. मग तरी अजून अस्तिक आहेस का ? असशील तर तु मालिका फक्त मनोरंजन म्हणून बघितलीस काय ?" यावर तिचे उत्तर की "दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत" मला वाटते या विरोधाभासाचे उत्तर म्हणजे तुमचे वरील विधान होय. पण "घाला घालणे" हा शब्दप्रयोग नकारात्मक वाटतो. आणि श्रद्धा म्हणण्यापेक्षा कल्पनाविश्व म्हणणे अधिक योग्य होईल.. त्यामुळे श्रद्धेवर घाला घालणे असे म्हणण्यापेक्षा मी कल्पनाविश्वातुन बाहेर येणे असे म्हणेन. या कल्पनाविश्वात काही काळ रमणे हे मनाला समाधान देणारे असू शकते पण मनाचा 'डिफॉल्ट मोड' हा वास्तवाशी जुळलेला हवा, कल्पनेशी नको असे मला वाटते. याचे दुसरे सोपे उदाहरण मी असे देईन की मी जेव्हा शोले चित्रपट (किंवा कोणताही चित्रपट) बघतो तेव्हा जय, वीरु, ठाकूर, गब्बर ई पात्रे मला त्यावेळी खरी - जिवंत वाटतात, मी काही वेळ त्यांच्या सुख दु:खाशी समरुप होतो. ठाकूरचे कुटूंबा मारले जाते तेव्हा मलाही दु:ख होते. एखाद्या प्रसंगात जय ने असे करायला पाहिजे होते , वीरु ने तसे करायला हवे होते वगैरे वाटते.. खरेतर हा सगळा केवळ एक खेळ आहे जो सलीम-जावेद आणि रमेश भाऊंनी आपल्यापुढे उभा केला आहे हे माहित असतेच पण तरीही या कल्पनेच्या भावविश्वात स्वतःला झोकून दिल्याशिवाय त्या चित्रपटाचा आनंद मी घेवू शकत नाही. चित्रपट संपल्यानंतरही काहीवेळ त्यातली पात्रं माझ्या मनात रुंजी घालतात. क्वचित एखाद्या चित्रपटातील एखादे पात्र मनात अगदी घर करते, पुन्हा पुन्हा आठवत रहाते. पण तरी ते सर्व केवळ कल्पनेचे विश्व. मनाच्या डिफॉल्ट मोडमध्ये त्याला स्थान नाही. एखाद्या पात्राने मांडलेले काही विचार अगदी छान असू शकतात आणि ते मी आठवून माझ्या आयुष्यात त्यावर अंमलही करु शकतो ...नव्हे ते माझ्या जीवनाचे तत्वज्ञानही बनू शकते पण त्याचे श्रेय त्या काल्पनिक पात्राला नाही तर ते पात्र चितारणार्या खर्याखुर्या लेखक-दिग्दर्शकाला नाही का ? पण तुम्ही म्हणता तसे अश्रद्ध नास्तिकतेकडे वाटचाल करणे हे खूप
अधार्मिकतेने प्रश्न सुटतात, नास्तिक्याने नाहीत .... सामान्य लोकांकरिता अस्तिकता आणि धार्मिकता या वेगळ्या गोष्टी नाहीतच. अस्तिकता हा धार्मिकतेचाच एक भाग आहे. अस्तिक राहून अधार्मिक असणे हे तत्वतः शक्य वाटत असले तरी वास्तववादी नाही. कारण अस्तिकतेचा सिद्धांत कोणत्या ना कोणत्या धर्मातुन येतो तो सिद्धांत मानायचा आणि धर्म नाकारायचा असे कसे होवू शकेल. मग त्याकरिता ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत मान्य करणारा पण इतर कोणतीही धार्मिक पथ्ये, नीति नियम न सांगणारा असा एक नवीनच धर्म वा पंथ निर्माण करावा लागेल. इतर कोणतेही नियम नकोत म्हणजे असा ईश्वर निराकारच असला पाहिजे, कारण त्याला आकार दिला की नियम आलेत.. म्हणजे गणपतीचा आकार असला की त्याला नैवेद्यात मोदक आवडतो.. शंकराचा आकार असला की त्याची आराधना सोमवारी करायला हवी वगैरे.. पण मग तो ईश्वर निराकार असायला पाहिजे हा देखील नियम. मुळात सगळाच डोलारा काल्पनिक पण त्यातले नियम मात्र वास्तवात येवून मानवापेक्षा वरचढ ठरु लागतात.
श्रद्धा आणि मानवी मन यांचा सांधा तुटणे काही फारसे लाभदायक नाहीबहुतांशी असहमत. "आपल्या पाठिशी कुणीतरी आहे" ही भावना श्रद्धेतुन जन्म घेते आणि ती बहुतकरुन कमकुवत मनाला आधार देणारी आहे हे मान्य. आणि श्रद्धेचा संस्कार अशी भावना माणसाच्या मनात निर्माण करायचा प्रयत्न करतो हे खरे, पण त्याबरोबर इतर अनेक भावनाही जन्म घेतात. म्हणजे "देव सुद्धा माझ्या मदतीला नाही येत" आणि तत्सम भावना. देव आहे या श्रद्धेचा व्यत्यास "दानव आहे" असाही होतो. मग जादुदोणा, नजर लागणे , करणी वगैरे अंधश्रद्धांवरही सहजच विश्वास ठेवला जातो. माझी पत्नी रोज देवापुढे दिवा लावते आणि असे केल्याने "मनाला बरे वाटते".. इथपर्यंत ठीक आहे पण मग एखादे दिवशी घाई गडबडीत दिवा लावायचा राहून गेला आणि ती तशीच घराबाहेर पडली की "आज देवापुढे दिवाही नाही लावला" ही चुटपूट तिला दिवसभर त्रास देते. तिला नवरात्रीत नऊ दिवस अखंड दिवा तेवत ठेवायचा असतो.. त्याने तिला बरे वाटणार म्हणून माझी अर्थातच काही हरकत नसते (किती तेल वाय गेले वगैरे फालतु शंका मी काढत नाही बरं) पण मग चुकून एखादे वेळा तो दिवा विझला की त्याने तिच्या मनाला होणारा त्रास मला बघवत नाही. मग सांगा श्रद्धा आणि मानवी मन यांचा सांधा तुटणे लाभदायक का ठरु नये ?
त्यामुळे नास्तिकांनी अशा गोष्टींना टूल म्हणून वापरणे कितपत फायद्याचे आहे?मुद्दा क्र ६ नीटसा कळाला नाही. नास्तिक कोणत्या गोष्टींना टूल म्हणून वापरत आहेत ?
नास्तिकांनी नव्या परंपरा तयार केल्या पाहिजेत- अग्नि आणि पुरोहितांच्या साक्षीने लग्न नाही करायचे. ओक्के! मग त्याला पर्याय कोर्ट मॅरेज हे होऊ शकत नाही. नास्तिकांना अशा परंपरा तयार करता येतील का?पण सध्यातरी धार्मिक पद्धतीने लग्न वा कोर्ट मॅरेज असेच पर्याय कायद्यानुसार उपलब्ध आहे. तसेही लग्नाचे महत्व आता फारसे धार्मिक स्वरुपाचे राहिले नसून ते कौटुंबिक, सामाजिक व कायदेशीर आहे अन्यथा नास्तिकांसाठी लग्न काय आणि लिव्ह ईन काय सारखेच की. लग्नाकडे फक्त धार्मिक परिप्रेक्ष्यातुन पाहिले तर विवाहाविच्छेदाचा पर्याय राहणारच नाही (अपवाद मुस्लिम धर्म -त्यात तलाकची सोय आहे. इतर धर्मांत - जसे हिंदू , जैन, बौद्ध , ख्रिश्चन , शीख ई धर्मात विवाहविच्छेदाची सोय आहे असे ऐकण्यात नाही - चुभुदेघे)
नास्तिकांना अशा परंपरा तयार करता येतील का?नास्तिकांची संख्या ती किती ? नास्तिक व्यक्तीला नास्तिक जोडीदार मिळण्याची मारामारी आणि परंपरा कुठल्या तयार करणार .. उलट बहुधा नास्तिक लोकांना जोडीदाराच्या वा कुटूंबाच्या इच्छेखातर धार्मिक विधिवत लग्न करावे लागते.. मी ही तसेच केले :( असो. कोर्ट मॅरेज करणारे फक्त नास्तिकच असतात असे नाही.
उलट ते १० रुपयांचा फॉर्म भरून आम्ही लग्न केले वगैरे नीरस गोष्टींनाच कौतुकाने सांगतात. त्यात काय बोडक्याचे कौतुक?अरसिक असणे आणि नास्तिक असणे या दोन वेगळ्या गोष्टी. फॉर्म भरुन लग्न केला ती झाली कायदेशीर औपचारिकता. पण लग्न केले, आयुष्याचा जोडीदार मिळाला या गोष्टीचा आनंद (झाला असल्यास) साजरा करण्यास ना कायद्याचा अडसर आहे ना नास्तिकतेचा.. जंगी पार्टी केली जावू शकते.. बाकी ज्याची त्याची आवड. कुणी अरसिक असल्यास त्यात नास्तिकतेचा काय दोष ? आणि विधिवत केलेला विवाह थाटामाटात झाला तरी त्यातल्या फक्त सात फेरे, मंगलाष्टक ई धार्मिक विधींचे श्रेय धर्माचे (ज्यांत आजकाल फारसा रसही कुणाला नसतो- पण औपचारिकता म्हणून केले जातात) बाकीचा थाटमाट, उंची कपडे, महागडा मेक अप, रोषणाई, भरगच्च जेवण, बूट चोरणे वगैरेंचा धर्माशी वा अस्तिकतेशी काय संबंध ? धार्मिक विधींत वधू-वरांचे आईवडील , मामा ईत्यादिंची उपस्थिती लग्नात अपेक्षित आहेत मग चुलत नणंदेच्या जाऊच्या भावाच्या सासर्यांना निमंत्रण देण्यात आणि स्थानिक आमदाराचा सत्कार करण्यात अस्तिकतेचा काय विषय ? फार काय हळद लावणे देखील धार्मिक नाही.. लग्नात व लग्नानंतर वधू वरांनी छान दिसावे यासाठिची 'स्किन केअर' ट्रीटमेंट आहे ती. शेतात किंवा मनरेगात उन्हात काम करुन त्वचा रापली असल्याने नास्तिक असला तरी हळद लावायला हवी यामुळे मधुचंद्र रोमांचक होईल. एसीत बसून काम करणार्यांनी नाही लावली हळद तरी चालू शकेल :)
अरे वाह !