मिपाकरांच्या माहितीसाठी
अनेक नास्तिकवादींना या कार्यक्रमाची कल्पना जरूर असेल. पण अन्य शहरातील लोकांना माहितीसाठी गूगलवरून मराठी भाषांतर सादर केले आहे. चुकभूल माफ करणे..
ब्राइट्स सोसायटी
सोसायटी क्षेत्र क्रमांक: मेलनारा/185/2021/रोसगोड डीड 04-08-2024
P M:
९१-२२-२५३७ ७३९६
103, समोर. पंकर्स क्लिनिक गोखले रोडच्या बाजूला कावार्ड पथ. नापड्स
ठाणे (w)-100602, भारत
राष्ट्रीय नास्तिक परिषद पुणे
स्थळ काळे हॉल, गोखले इन्स्टिट्यूट, बीएमसीसी आरडी, एफसी कॅम्पस. डेक्कन जिमखारा, पुणे-411004 तारीख: रविवार, 18 डिसेंबर 2022 वेळ: सकाळी 9 ते संध्याकाळी 6
परिषदेचे वेळापत्रक: सकाळचे सत्र 9:00-9:30- चहा आणि नाश्ता 9:30-9:40 शिवप्रसाद महाजन (ब्राइट्स सोसायटी) यांचे स्वागत भाषण 8:40-10:00 सोसायटीच्या मुख्य सदस्यांचा संक्षिप्त परिचय आणि पाहुण्यांसाठी स्मृतिचिन्ह सादरीकरण-कुमार नागे भाषणे 10:00-10:20 प्रसन्न जोशी (साम टीव्ही) 10:20-10:40 अविनाश पाटील (MANS) 10:40-11:20 असीम सरोदे (संविधान आणि मानवाधिकार विश्लेषक). 11:20-11:35 उत्तम निरौला यांच्या हस्ते चार्वाक आणि मधुरजग पुरस्कार 11:35 12:15 नरेंद्र नायक (अध्यक्ष FIRA, मंगलोर) १२:१५-१२:४५ उत्तम निरौला (सोच नेपाळचे कार्यकारी संचालक) १२:४५-१:०० प्रमोद सहस्रबुद्धे (ब्राइट्स सोसायटी) यांचे आभार 1:00-2:00 लंच ब्रेक 2:00-5:00 दुपारचे सत्र ट्रॅक 1 (विश्वासाचा सिद्धांत) होस्ट: सुकृत कुलकर्णी 2:00-2:30 Speech by Aniket Sule 2:30-3:30 Thoughts by Abhijit Chanda, Ajit Abhyankar, Prajakta Atul, Vandana Shinde, Y N Walavalka 3:30-5:00-Audience open house and QnA with panel ट्रॅक २ (विश्वासाचे व्यावहारिक परिणाम) निमंत्रक: समीर शिंदे 2:00-2:30 अलका धुपकर यांचे भाषण 2:30-3:30 प्रदीप पाटील, विश्वंभर चौधरी, आनंद करंदीकर, जगदीश काबरे यांचे विचार 3:30-5:00-प्रेक्षकांसाठी खुले घर आणि पॅनेलसह QnA 5:00-5:30 विश्वंभर चौधरी यांची विधानसभा आणि सारांश 5:30 पुढे चहा आणि नाश्ता टीप: वेळापत्रक समायोजित करण्याचा किंवा बदलण्याचा अधिकार आयोजकांनी राखून ठेवला आहे.
आपल्या पैकी कोणी सहभागी होतील तर त्यांनी अहवाल सादर करावा ही विनंती.वर्गीकरण
वाचने
17336
प्रतिक्रिया
73
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक मोठा लेखच झाला हा प्रतिसाद.
उत्तम प्रतिसाद
धन्यवाद ..आता झाली चर्चेला सुरुवात !!
In reply to उत्तम प्रतिसाद by हणमंतअण्णा शंक…
अशक्यअवघड आहे.. फक्त मी आधीच्या प्र्तिसादात म्हंटले त्याप्रमाणे संस्कारक्षम वयात योग्य वेळी नास्तिकतेचा परिचय आणि निवडीचे स्वातंत्र्य मिळायला हवे. ज्या अस्तिकांना निदान समजत आहे की "बुद्धी आणि भावनेच्या संघर्षात माझ्या भावनांचे पारडे जड असल्याने मी नास्तिक होवू शकत नाहीये" त्यांनी निदान आपल्या मुलांना तरी "तुला अस्तिक व्हायेचे की नास्तिक याचा निर्णय तुच विचारांती घ्यायचा आहे" इतके स्वातंत्र्य अगदी नि:संदिग्धपणे द्यायला काय हरकत आहे ? . सामान्य लोकांकरिता अस्तिकता आणि धार्मिकता या वेगळ्या गोष्टी नाहीतच. अस्तिकता हा धार्मिकतेचाच एक भाग आहे. अस्तिक राहून अधार्मिक असणे हे तत्वतः शक्य वाटत असले तरी वास्तववादी नाही. कारण अस्तिकतेचा सिद्धांत कोणत्या ना कोणत्या धर्मातुन येतो तो सिद्धांत मानायचा आणि धर्म नाकारायचा असे कसे होवू शकेल. मग त्याकरिता ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत मान्य करणारा पण इतर कोणतीही धार्मिक पथ्ये, नीति नियम न सांगणारा असा एक नवीनच धर्म वा पंथ निर्माण करावा लागेल. इतर कोणतेही नियम नकोत म्हणजे असा ईश्वर निराकारच असला पाहिजे, कारण त्याला आकार दिला की नियम आलेत.. म्हणजे गणपतीचा आकार असला की त्याला नैवेद्यात मोदक आवडतो.. शंकराचा आकार असला की त्याची आराधना सोमवारी करायला हवी वगैरे.. पण मग तो ईश्वर निराकार असायला पाहिजे हा देखील नियम. मुळात सगळाच डोलारा काल्पनिक पण त्यातले नियम मात्र वास्तवात येवून मानवापेक्षा वरचढ ठरु लागतात. बहुतांशी असहमत. "आपल्या पाठिशी कुणीतरी आहे" ही भावना श्रद्धेतुन जन्म घेते आणि ती बहुतकरुन कमकुवत मनाला आधार देणारी आहे हे मान्य. आणि श्रद्धेचा संस्कार अशी भावना माणसाच्या मनात निर्माण करायचा प्रयत्न करतो हे खरे, पण त्याबरोबर इतर अनेक भावनाही जन्म घेतात. म्हणजे "देव सुद्धा माझ्या मदतीला नाही येत" आणि तत्सम भावना. देव आहे या श्रद्धेचा व्यत्यास "दानव आहे" असाही होतो. मग जादुदोणा, नजर लागणे , करणी वगैरे अंधश्रद्धांवरही सहजच विश्वास ठेवला जातो. माझी पत्नी रोज देवापुढे दिवा लावते आणि असे केल्याने "मनाला बरे वाटते".. इथपर्यंत ठीक आहे पण मग एखादे दिवशी घाई गडबडीत दिवा लावायचा राहून गेला आणि ती तशीच घराबाहेर पडली की "आज देवापुढे दिवाही नाही लावला" ही चुटपूट तिला दिवसभर त्रास देते. तिला नवरात्रीत नऊ दिवस अखंड दिवा तेवत ठेवायचा असतो.. त्याने तिला बरे वाटणार म्हणून माझी अर्थातच काही हरकत नसते (किती तेल वाय गेले वगैरे फालतु शंका मी काढत नाही बरं) पण मग चुकून एखादे वेळा तो दिवा विझला की त्याने तिच्या मनाला होणारा त्रास मला बघवत नाही. मग सांगा श्रद्धा आणि मानवी मन यांचा सांधा तुटणे लाभदायक का ठरु नये ? मुद्दा क्र ६ नीटसा कळाला नाही. नास्तिक कोणत्या गोष्टींना टूल म्हणून वापरत आहेत ? पण सध्यातरी धार्मिक पद्धतीने लग्न वा कोर्ट मॅरेज असेच पर्याय कायद्यानुसार उपलब्ध आहे. तसेही लग्नाचे महत्व आता फारसे धार्मिक स्वरुपाचे राहिले नसून ते कौटुंबिक, सामाजिक व कायदेशीर आहे अन्यथा नास्तिकांसाठी लग्न काय आणि लिव्ह ईन काय सारखेच की. लग्नाकडे फक्त धार्मिक परिप्रेक्ष्यातुन पाहिले तर विवाहाविच्छेदाचा पर्याय राहणारच नाही (अपवाद मुस्लिम धर्म -त्यात तलाकची सोय आहे. इतर धर्मांत - जसे हिंदू , जैन, बौद्ध , ख्रिश्चन , शीख ई धर्मात विवाहविच्छेदाची सोय आहे असे ऐकण्यात नाही - चुभुदेघे) नास्तिकांची संख्या ती किती ? नास्तिक व्यक्तीला नास्तिक जोडीदार मिळण्याची मारामारी आणि परंपरा कुठल्या तयार करणार .. उलट बहुधा नास्तिक लोकांना जोडीदाराच्या वा कुटूंबाच्या इच्छेखातर धार्मिक विधिवत लग्न करावे लागते.. मी ही तसेच केले :( असो. कोर्ट मॅरेज करणारे फक्त नास्तिकच असतात असे नाही. अरसिक असणे आणि नास्तिक असणे या दोन वेगळ्या गोष्टी. फॉर्म भरुन लग्न केला ती झाली कायदेशीर औपचारिकता. पण लग्न केले, आयुष्याचा जोडीदार मिळाला या गोष्टीचा आनंद (झाला असल्यास) साजरा करण्यास ना कायद्याचा अडसर आहे ना नास्तिकतेचा.. जंगी पार्टी केली जावू शकते.. बाकी ज्याची त्याची आवड. कुणी अरसिक असल्यास त्यात नास्तिकतेचा काय दोष ? आणि विधिवत केलेला विवाह थाटामाटात झाला तरी त्यातल्या फक्त सात फेरे, मंगलाष्टक ई धार्मिक विधींचे श्रेय धर्माचे (ज्यांत आजकाल फारसा रसही कुणाला नसतो- पण औपचारिकता म्हणून केले जातात) बाकीचा थाटमाट, उंची कपडे, महागडा मेक अप, रोषणाई, भरगच्च जेवण, बूट चोरणे वगैरेंचा धर्माशी वा अस्तिकतेशी काय संबंध ? धार्मिक विधींत वधू-वरांचे आईवडील , मामा ईत्यादिंची उपस्थिती लग्नात अपेक्षित आहेत मग चुलत नणंदेच्या जाऊच्या भावाच्या सासर्यांना निमंत्रण देण्यात आणि स्थानिक आमदाराचा सत्कार करण्यात अस्तिकतेचा काय विषय ? फार काय हळद लावणे देखील धार्मिक नाही.. लग्नात व लग्नानंतर वधू वरांनी छान दिसावे यासाठिची 'स्किन केअर' ट्रीटमेंट आहे ती. शेतात किंवा मनरेगात उन्हात काम करुन त्वचा रापली असल्याने नास्तिक असला तरी हळद लावायला हवी यामुळे मधुचंद्र रोमांचक होईल. एसीत बसून काम करणार्यांनी नाही लावली हळद तरी चालू शकेल :)