Skip to main content

चालू घडामोडी - जून २०२१ (भाग २)

लेखक मदनबाण यांनी शनिवार, 05/06/2021 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
गांधी भाऊ आणि बहिण यांना इतक्या वर्षां नंतर लक्षद्वीप या छोट्याश्या बेटाची अचानक आठवण येउन, अचानक काळजी उत्पन्न होउन त्यांनी टिवटिवाट केला, इतर संबंधीत मिडिया देखील चाटुकारितेची संधी दवडणार कसा ? पण अचानक कुठेतरी गडबड झाली... कारण याच लक्षद्वीप बेटावर त्यांच्या तिर्थरुपांनी [ या सहलीत राहुल आणि प्रिया़का देखील अर्थातच होते. ] कशी सहल केली होती आणि त्या सहलीसाठी इंडियन नेव्हीला कसे दावणीला लावण्यात आले होते याची माहिती बाहेर येउ लागली ! ती माहिती खालील व्हिडियोत आपणास पाहता येइल. मग अचानक या दोघांना त्या ट्रीपची आठवण न येता त्या लक्षद्वीप बेटाची काळजी का वाटली असेल ? त्याचे उत्तर तुम्हाला खाली मिळाले तर पहा !

मदनबाण.....


वाचने 71340
प्रतिक्रिया 216

प्रतिक्रिया

In reply to by कॉमी

बरेच आउट ऑफ कंटेक्सट घेतलेले वाक्य आहे.
हे माहीत न्हवते... ही रुपेरी किनार खरोखर स्वागतार्ह.
बाकी धर्म म्हणजे गरिबांना आपले अन्याय सहन करायला लावण्यासाठी बनवलेली आणि पसर्वलेली गोष्ट
नक्किच, गरीबच का श्रीमंतही धर्माच्या दबावाखाली दबलेच जातात अशी सुधारणा हवी.

In reply to by गॉडजिला

नाही, दाबले तर सगळेच जातात. पण आपल्यावर होणारे अन्याय विसरण्यासाठी धर्म मदत करतो, असं मार्क्स म्हणतो. स्पेसिफिकली, क्रान्ती करणारा वर्ग, प्रोल्स (proletariat) यांना तात्पुरती शांती देऊन क्रान्ती करण्यापासून रोखतो. मार्क्स या शांततेला illusory happiness म्हणतो- भ्रामक शांती. त्यामुळे मला ही भ्रामक शांती काढून घ्यायची आहे, जेणेकरून त्यांना खरी शांतता मिळेल- असे तो म्हणतो. त्यापलीकडे मार्क्स ला अध्यात्म आणि धार्मिकतेबद्दल काहीही द्वेष नव्हता, उलट आयुष्यात ह्या गोष्टी गरजेच्या आहेत असे तो म्हणे. फक्त ह्या गोष्टी करायच्या असतील तर आधी शारीरिक आणि मटेरियल गरजा भागवणे आवश्यक आहे असे त्याचे म्हणणे होते. ओपियम रुपकात बसवायचे झाले तर-ओपियम मुळे वेदना विसरून व्याधी कडे न बघणाऱ्या माणसाला ओपियम सोडण्यास वळवावे, जेणेकरून व्याधींकडे पहिले जाईल, निराकरण होईल . त्यानंतर व्याधी निराकरण झाल्यावरसुद्धा ओपियमचा आनंद आनंदासाठी घेण्यास कोणाची हरकत असायचे कारण नाही.

In reply to by कॉमी

त्यानंतर व्याधी निराकरण झाल्यावरसुद्धा ओपियमचा आनंद आनंदासाठी घेण्यास कोणाची हरकत असायचे कारण नाही.
खूपच आशादायी व सुंदर वाक्य आहे. आवडले. . पण ओपिअम शिल्लक राहील अशी तुम्हाला आशा वाटते? कदाचित ओपिअम औषधालाही शिल्लक राहणार नाही अशीही अवस्था येऊ शकते. खरतर सगळ्या व्याधी व अन्याय संपल्यावर ओपिअमची गरजच का भासावी? किंवा खरतर मार्कस् वाद एवढ्या सर्वोच्च उंचीवर गेल्यावर ओपिअमच्या बाजूने कोणितरी बोलायची शक्यता तुम्हाला वाटते? शिवाय त्याला अजिबात विरोध न होता सगळे जण स्वखुषीने ती वक्तव्ये आनंदाने ऐकतील असं तुम्हाला खरोखरीच वाटते? का मार्कस् वाद एवढ्या सर्वोच्च उंचीवर गेल्यावर, ओपियमच्या बाजूने बोलायची कोणाची हिंम्मत होणार नाही अशी परिस्थिती असायची शक्यता असेल? असो. तुमच्या विचारांचा आदर आहेच. पण जगातील कम्युनिस्ट, हुकुमशाही, एक पक्ष पध्दती व विरोधी विचारांचा केला जाणारा बिमोड वगैरे बद्दल आत्तापर्यंत जे काही थोडसं आकलन झालंय त्यावर आधारित मनात शंका आल्या व त्या मांडल्या इतकेच. 🙏

In reply to by शाम भागवत

मी एक सोशालिस्ट डेमोक्रॅट आहे. सोशालिस्ट हा शब्द खरेतर चुकीचाच, कारण आम्ही वेल्फेअर स्टेट पुरस्कर्ते आहोत. सोशालिस्ट हा शब्द अमेरिकन राजकारणातल्या अति उजव्या निओ लिबरल लोकांनी आम्हाला घ्यायला लावला, ते असो. वेल्फेअर स्टेट म्हणजे सोशलिझम पासून मैलोन मैल दूर आहे, आणि खऱ्या सोशलिझमच्या वाटेतला अडसर आहे. मार्क्स मी ज्याचा पुरस्कार करतो त्याला बुरज्वा ओपीएट म्हणला असता, धर्मासारखंच ! तर, मी डेमोक्रॅट सुद्धा आहे. म्हणजे लोकशाही चा पुरस्कर्ता. कोणत्याही धर्म/विचारांवर जबरदस्तीने बंदी आणणे हे मला पटणार नाहीच. पण हे मी नक्की सांगीन, जर धर्मामुळे स्वतःच्या आयुष्यातील दुःखांचा स्वीकार करून, मोक्ष/स्वर्ग/आफ्टरलाईफ वर लक्ष लागत असेल तर त्यातली आतार्किकता दाखवून देणे क्रमप्राप्त आहे. तार्किक प्रश्न विचारणे ह्यात काही गैर नाही. जर त्यातून धर्म नैसर्गिकरित्या संपून गेले तर मला अश्रू ढाळायचे कारण दिसणार नाही हे खरे. मात्र, दंडुका दाखवून धर्म पालन थांबवणे हे तिरस्करणीय वाटतेच. त्यासोबत हेही समजणे आवश्यक आहे की मार्क्स जेव्हा धर्म म्हणतो, त्याच्या डोळ्यासमोर प्रिडोमिनंटली ख्रिश्चन धर्म असतो. मार्क्स काय म्हणत होता याचे एक उदाहरण म्हणून व्हिन्सेंट व्हॅन गॉग या माधुरी पुरंदरे अनुवादित पुस्तकातील घटना सांगतो. (पुस्तक हाताशी नाहीये, कदाचित काही पैलू निसटले सुद्धा असू शकतात.) व्हिन्सेंट कोळसा खाणकामगारांच्या वस्तीत प्रिचर/प्रवचनकार म्हणून नेमला गेला होता. तिथे त्यांचे भयंकर आयुष्य पाहून तो मुळापासून हादरून गेला. अत्यंत हलाखीत ते जगत होते. त्यामुळे त्यांच्या सेवेत व्हिन्सेंटने स्वतःला झोकून दिले. त्याच्या पगाराचे सर्व पैसे तो त्यांच्यासाठी खर्च करू लागला, स्वतःचे आरामातले भाड्याचे घर सोडून भाडे वाचवण्यासाठी कामगारांच्या सारख्या खोपट्यात तो राहू लागला. घरी वापरण्यासाठी कोळसा मिळावा म्हणून त्यांच्यासारखेच दगडांच्या (कचऱ्याचा) ढिगात हात पाय खरचटवून कोळसा शोधू लागला. थोडक्यात, बायबल मधले अमूर्त विचार कोळसा कामगारांना पोहोचवण्यापेक्षा त्याला कामगारांचे भौतिक आयुष्य बदलणे कित्येक पट जास्त महत्वाचे वाटले. पण प्रिचर पदाची शोभा घालवली म्हणून एव्हनजेलिस्ट कमिटीने त्याचा हुद्दा काढून घेतला. थोडक्यात, व्हिन्सेंट कडून अपेक्षित होते ते इतकेच कि खाण कामगारांना प्रवचने देऊन त्यांना शांत ठेवणे. त्यांना मानसिक समाधान देणे, जमल्यास वैद्यकीय शुश्रूषा देणे. पण त्यांच्या भीषण परिस्थितीला अधोरेखित करणे हे त्याच्याकडून आजिबात अपेक्षित नव्हते. त्याऊलट, त्यांना "धीर" देणे आणि चालू परिस्थिती स्वीकारण्यास मदत करणे हे त्याचे अपेक्षित काम होते. ही घटना ओपीयेट रुपकातून पाहिल्यास तुम्हाला मार्क्सचे मत समजेल अशी आशा करतो. त्याचा आक्षेप धर्मावर नाही, तर त्याच्या ह्या उद्देशयावर आहे. धर्म नष्ट करणे हा त्याचा उद्देश नाही. धर्मामुळे मिळणारी आश्वत्तता भौतिक समाधानाशिवाय कशी पोकळ आहे हे दाखवणे त्याचे उद्दिष्ट आहे. आणि ते मलासुद्धा मनापासून पटते.

In reply to by कॉमी

हीच तर खरी गंम्मत आहे तिकडे तत्ववेत्ते तिकडच्या धर्मावर प्रहार करतात अन इकडले तो हवेतीत तीर अत्यंत आदराने स्व्तःमधे सामावुन घेतात आणी त्याहुन वाइट म्हणजे तो तीर जगातील सर्वधर्मावर सोडला आहे असे इकडचेही तिरासमोर मान तुकवणारे मानतात... फक्त भारताचा विचार केला तर मुळातच इथल्या धार्मीक (?) संस्कृतीतील उत्तमांनी कधीच उजवे डावे बघितले नाही तर फक्त योग्य अयोग्याची फिकीर केली म्हणूनच आर्य चाणक्य चंद्रगुप्ताला सर्व सरकारी अधिकार्‍यांची मालमत्ता ठरावीक वर्षांनी सतत जप्त केली जावी आणी त्यांचे त्यांच्या हुद्यानुसार पुनर्वसन करत रहावे अशीही सुचना देतो आणी ना ती डावी ठरवली जाते

In reply to by गॉडजिला

आपला इतिहास आणि संस्कृती पाश्चात्त्यांपेक्षा अत्यंत वेगळी आहे, त्यामुळे पाश्चात्त्य तत्वज्ञान तोलताना आपल्या परिस्थितीचा विचार होणे गरजेचे आहे.

In reply to by कॉमी

पण प्रोब्लेम हा आहे की जे व्याधीमुक्त आहेत त्यांनाही मार्क्सवादीयांच्या रोषाला सामोरे जावे लागते त्याचे काय ?

In reply to by गॉडजिला

पण प्रोब्लेम हा आहे की जे व्याधीमुक्त आहेत त्यांनाही मार्क्सवादीयांच्या रोषाला सामोरे जावे लागते त्याचे काय ?
आणि मार्क्सवाद हीच व्याधी असेल तर?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

आणि मार्क्सवाद हीच व्याधी असेल तर?
अशक्य कारण ही बाब दैवी (अथवा निसर्ग निर्मीत) नसल्याने तो अपुरा, अप्रगत अथवा प्रसंगी कुचकामीही असु शक्तो... पण व्याधी नक्किच नाही. मानव निर्मीत प्रत्येक गोष्ट ही आधुनीक विज्ञाना इतकीच प्रयोगशील बाब आहे ज्यात सातत्याने सुधारणा करुन प्रगती साधता येउ शकते

In reply to by गॉडजिला

अशक्य कारण ही बाब दैवी (अथवा निसर्ग निर्मीत) नसल्याने तो अपुरा, अप्रगत अथवा प्रसंगी कुचकामीही असु शक्तो... पण व्याधी नक्किच नाही. मानव निर्मीत प्रत्येक गोष्ट ही आधुनीक विज्ञाना इतकीच प्रयोगशील बाब आहे ज्यात सातत्याने सुधारणा करुन प्रगती साधता येउ शकते
सहमत. फक्त यात गोम अशी की मार्क्सवादात सुधारणा केल्यास तो 'मार्क्सवाद' राहणार नाही तर ती सुधारीत आवृत्ती मध्याच्या डावीकडे न राहता उजवीकडे सरकेल. :)

In reply to by गॉडजिला

मर्क्सचे वरील विचार बघता त्याल पध्दतशीर तर डावीकडे लोटले गेले नाही ना याचाही अभ्यास गरजेचा ठरतो

In reply to by श्रीगुरुजी

चिंता थडग्यात जाणार्‍यांची करावी.. विशेषतः त्यांची जे थडग्यात जाण्यापुर्वीच थडग्यातील आयुष्यावर कृतीची सक्ती करत जगतात...

In reply to by श्रीगुरुजी

वरील मते वाचून कार्ल मार्क्स आपल्या थडग्यात अस्वस्थ होऊन कुशीवर वळला असेल.
? कोणत्या कुशीवर वळला असेल ? डाव्या की उजव्या ?

In reply to by गॉडजिला

> मानव निर्मीत प्रत्येक गोष्ट ही आधुनीक विज्ञाना इतकीच प्रयोगशील बाब आहे धर्म किंवा देव इत्यादी गोष्टी सुद्धा मानव निर्मित आहेत असे आम्ही म्हणू शकतो किंवा मार्क्सवाद सुद्धा बायबल प्रमाणे पोथीनिष्ठ आहे असेही म्हणू शकतो. पोथीनिष्टता हि हल्ली मार्क्सवादाचा पाया आहे अगदी इस्कॉन प्रमाणे.

In reply to by साहना

काय म्हणू शकता ते सांगून तुम्ही माझ्या मनात गोंधळ निर्माण करत आहात कि फक्त मती गुंग करणारे प्रतिसाद लिहून माझा गोंधळच वाढवायचाय ? मानव निर्मित काय आहे आणि काय नाही हे जरा विभागून स्पष्ट कराल का ?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

इथे साम्यवादी किंवा काँग्रेस ला दोष देऊन फायदा नाही. सोनिआ गांधी ह्यांनी केंद्रीय स्तरावर अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती आणल्या आणि ह्या लोकसंख्येच्या प्रमाणे विभागून देण्यात येतील असा नियम आणला म्हणजे साधारण ७०% इस्लामला आणि बाकी इतरांना. प्रधान सेवकांनी निवडून आल्यानंतर स्कीम बंद तरी करायला पाहिजे होती किंवा किमान दलित , आणि SC/ST चा अंतर्भाव करून त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना शिष्यवृत्ती द्यायला पाहिजे होत्या. प्रत्यक्षांत मुख्यमंत्री असताना ह्या स्कीम च्या विरोधांत शड्डू ठोकलेले ते एकमेव नेते होते आणि गुजरात ने कोट्यवधी रुपये धुडकावून लावून ह्या स्कीम्स इम्पलिमेन्ट करायला साफ नकार दिला होता. पण केंद्रांत पोचतांत कोलांटी उडी त्यांनी मारली आणि ह्या शिष्यवृत्तीची एकूण रक्कम वाढवली आणि त्याशिवाय पढो परदेस आणि हुनर हात असल्या तद्दन धार्मिक स्कीम्स उभ्या करण्यात हातभार लावला. (खरे तर मुख्तार अब्बास नक्वी ह्यांच्या इतका प्रभावी मिनिस्टर त्यांच्या कॅबिनेट मध्ये नाही) सध्या बजेट काय आहे ते ठाऊक नाही पण काही वर्षे मागे मेरिट कम मीन्स शिष्यवृत्ती जी सर्व भारतीयांना उपलब्ध आहे त्याचे बजेट होते २५० कोटी आणि अल्पसंख्यांक स्कीम चे बजेट होते ६०० कोटी. ह्यावर भर सभेंत सार्वजनिक रित्या एका विद्यार्थिनीने राहुल गांधी ह्यांना प्रश्न विचारला तेंव्हा त्यांची बोबडी वळाली आणि सिद्धरामय्या ह्यांनी ध्वनिक्षेपक हातांत घेऊन काही तरी भलतेच उत्तर दिले ज्याचा प्रश्नाशी काहीही संबंध नव्हता .

दैनिक मृत्युसंख्या निम्म्यावर आलीये तर दैनिक नवीन रूग्णसंख्येत जवळपास ८० टक्के घट आहे.

अमेरिकेतील काही राज्यांनी विमान तिकिटे, क्रीडा स्पर्धांची तिकिटे देण्याची योजना जाहीर केली आहे. या विविध ऑफरचा अपेक्षित परिणाम दिसत असल्याचे समोर आले आहे. अनेक लसीकरण केंद्रावर गर्दी वाढली आहे. गांजा मोफत देण्याची सुरुवात एरिजोना राज्याने केली. https://maharashtratimes.com/international/international-news/washingto…

सरकारच्या नियमांचे पालन करायचे सगळे प्रयत्न आपल्याकडून केले जात आहेत असे ट्विटरने सांगितले आहे. भारतासारखी मोठी बाजारपेठ गमावणे कोणालाही परवडणार नाही. ट्विटरसारख्यांनी न ऐकल्यास सरळ त्यांना हाकलून द्यावे. एकेकाळी ऑर्कूटवर लोक पडलेले असायचे. नंतर फेसबुक लोकप्रिय झाल्यावर ऑर्कूटचे महत्व जवळपास संपलेच आणि नंतर ऑर्कूटच संपले. हल्ली फेसबुकही पूर्वीइतके लोकप्रिय राहिलेले नाही. सांगायचा मुद्दा हा की अशा कोणत्याही प्लॅटफॉर्मला सोने लागलेले नाही. एक नाहीतर दुसरा प्लॅटफॉर्म. हा नाहीतर तो. असे प्लॅटफॉर्म चालवणारी कंपनी जर आपले ऐकत नसेल तर त्यांना सरळ लाथ घालून हाकलून द्यावे. भारत हा मोठा ग्राहक आहे आणि ग्राहक हाच राजा असतो. त्याची पुरेपूर किंमत प्रत्येक ठिकाणी आपण वसूल करायला हवी. https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/making-ever…

In reply to by चंद्रसूर्यकुमार

भारत सरकार ग्राहक नाही.लोकांची गुप्त माहिती,त्यांनी केलेले संभाषण गुप्त राहणार नसेल तर ऍप कोणी वापरणार नाही.

समजा महाराष्ट्र जर वेगळा देश असला असता तर त्याची करोना रुग्णसंख्येबाबत तुलना करणारा लेख टाईम्स मध्ये आला आहे. सध्या महाराष्ट्र दुसऱ्या देशांबरोबर तुलना करता चौथ्या नंबर वरती आहे. https://m.timesofindia.com/india/if-maharashtra-were-a-country-how-stat…

In reply to by रात्रीचे चांदणे

बाकी राज्यांनी सरळ आकडेवारी लपवली. Antigen test करून फक्त टेस्ट ची संख्या वाढवली. Corona ग्रस्त लोकांची चुकीची माहिती दिली. Corona नी झालेले मृत्यू लपवले. 50 लोक मेली असतील तर पाच च मेले असे देशाला सांगितले. उत्तरेच्या राज्यांनी त्यांच्या नेहमीच्या सवयी प्रमाणे 420 गीरी केलेली आहे. महाराष्ट्र ,केरळ,तामिळनाडू ह्या राज्यांनी लपावलापवी केली नाही. उत्तम राज्यकर्ते,असलेल्या ह्या राज्यात सर्व पारदर्शक आकडे आहेत.

“आता तुंबलेल्या मुंबईला मुख्यमंत्री जबाबदार की मुंबई मनपा?”; दरेकरांचा अनिल परब यांना सवाल! --------- https://www.loksatta.com/mumbai-news/is-cm-responsible-for-water-storag… -------- बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी, हे शिवसेनेने करून दाखवलं .....

In reply to by मुक्त विहारि

“महापालिकेचा ५ वर्षांत १००० कोटींचा घोटाळा”, नालेसफाईवरून आशिष शेलारांचा गंभीर आरोप! ------- https://www.loksatta.com/mumbai-news/rain-in-mumbai-today-updates-bjp-a… --------- मुंबईची झाली तुंबई, आता ही पण चुकी केंद्राचीच बरं का ... असेही काही टक्के जनता म्हणणारच ....

In reply to by मुक्त विहारि

मुंबई ची अतिप्रचंड लोकसंख्या मुंबई च्या समस्या वाढवत आहे. उत्तर भारत आणि उत्तर पूर्व भारत मुंबई वर च नोकरी ,व्यवसाय साठी अवलंबून आहे. त्या मुळे अती प्रचंड संख्येने त्या राज्यातून लोक इथे आली आहेत.आणि मुंबई ची अक्षरशः वाट लावली आहे त्या लोकांनी. जगातील कोणत्या अती उत्तम देशातील अती उत्तम प्रशासन ला मुंबई चालवायला दिली तरी मुंबई मध्ये पावसाचे पाणी भरणार च . Bjp वाल्यांनी नाकानी वांगी सोलू नयेत.

In reply to by सुबोध खरे

नाकानी वांगी सोलू नयेत.
अहो, कानाने लसूण सोलू नये असा मूळ वाक्प्रचार त्यांच्याकडून थोडासा चुकला तर त्याचा इतका काय गहजब करायचा? चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्राची जिम्मेदारी तीन खांद्यावर आहे, त्याच्या समर्थनार्थ प्रतिसादांचा रतीब घालताना अशा किरकोळ चुका व्हायच्याच. मुद्दा समजून घ्यायला हवा.

अनेकदा, केरळ राज्याने कोव्हिडचे व्यवस्थापन इतर राज्यांच्या तुलनेत कसे उत्तम केले आहे, असे वाचनांत आलेले आहे- इथेही कॉमींनी त्याविषयी वेळोवेळी लिहीलेले आहे. तेव्हा ह्याविषयी राज्यांतील तुलनात्मक अभ्यास करतां यावा, म्हणून मी आज माहिती काढली. ती व तिच्यावरून केलेले कॅल्क्युलेशन खालील तक्त्यांत मांडले आहे. . इथे फक्त, सर्वांत जास्त कोव्हिडच्या टोटल केसेस आतापर्यंत झालेल्या आहेत, अशा ९ राज्यांचाच विचार केलेला आहे. ह्या तुलनात्मक अभ्यासाकरता, केवळ आतापर्यंतच्या राज्यवार अ‍ॅग्रीगेट कोव्हिड केसेसची अ‍ॅब्सोल्यूट संख्या न वापरता, ती दर राज्याच्या एकंदरीत लोकसंख्येच्या किती टक्के आहे, हे पहाणे अधिक रास्त ठरावे. तसेच, राज्यवार लोकसंख्येच्या किती टक्के जनता, शहरी भागांत राहते, हेही लक्षांत घेणे आवश्यक आहे. हे शहरी व ग्रामीण विभागीकरण मी तक्त्यांत मांडले आहे खरे, पण त्यावरून कसलाही संख्यात्मक निष्कर्ष मला काढता आलेला नाही. मात्र ती माहिती समोर असावी, ह्या हेतूने तिचा समावेश केला आहे. कोव्हिडची वगळता, सर्वच माहिती एकाच ठिकाणावर उपलब्ध नव्हती. ती इतर चार संस्थळांवरून मिळवावी लागली. सर्व संदर्भ चित्रांत आहेतच, पण ते खाली दुव्यांच्या स्वरूपांतही दिलेले आहेत. (1-5). ह्या अभ्यासांत एक गृहितक आहे. २०११-२१ सालांतील प्रत्येक राज्याच्या संपूर्ण लोकसंख्येचा वाढदर मिळाला. तो ग्रामीण व शहरी भागांसाठी एकसारखाच असेल, असे गृहित धरून सध्या प्रत्येक राज्याच्या लोकसंख्येच्या किती टक्के जनता २०२१ साली शहरी भागांत राहते, ते काढले आहे. ह्या तक्त्यावरून असे दिसते की: * केरळमध्ये कोव्हिडग्रस्तांची, राज्याच्या लोकसंख्येच्या हिशेबांतील टक्केवारी देशांत सर्वात अधिक आहे. (७.३८%) * दिल्ली १००% शहरी धरली आहे. आणि तिची कोव्हिडग्रस्तांची, लोकसंख्येची टक्केवारी, ४.५९% आहे. * तामिळनाडूची शहरी लोकसंख्या त्या राज्याच्या ४८.८ % आहे-- म्हणजे सुमारे केरळ इतकीच. पण तेथील कोव्हिडग्रस्तांची, लोकसंख्येची टक्केवारी, २.९२ % आहे. * महाराष्ट्रांतील ह्याच टक्केवार्‍या, (शहरी जनता: ४५.७%) व (एकंदरीत कोव्हिडग्रस्त : ४.७१%) इतक्या आहेत. दुवे इथे: 1 2 3 4 5

In reply to by प्रदीप

अभ्यासपूर्वक मांडणीबद्दल धन्यवाद. १. तुलना करायची झाल्यास तामीळनाडू, केरळ व महाराष्ट्राची करावी लागेल. ग्रामीण व शहरी टक्केवारी सारखी वाटते. रोगाची लागण ही लोकांची स्वयंशिस्त तसेच परदेश गमन यावर अवलंबून असेल. २. मृत्यूदर पण तपासायला लागेल. एकूण रुग्णांच्या संख्येबरोबर मृत्यू किती झाले हे दिलेले नाहीये का? मात्र वैद्यकीय सुविधा कशा आहेत यावर मृत्यूदर अवलबून असेल असे वाटते. हे थेट सरकारशी संबंधीत असावे.

In reply to by शाम भागवत

मला वाटत मृत्यू दर सुद्धा थेट तुलनेसाठी उपयोगी नाही. माझे सजेशन- किती रुग्णांचा मृत्यू सुविधेअभावी झाला ? हा निकष राज्यांच्या कामगिरीवर प्रकाश पाडू शकतो. पण तशी माहिती उपलब्ध होईल का कल्पना नाही.

In reply to by शाम भागवत

आपल्या सूचनांबद्दल धन्यवाद. मृत्यूदर इथे घातले आहेत - कॉलम्स, J आणि K. ह्यांपैकी J करोनाग्रस्त झालेल्यांतील किती मृत्यू पावले ह्याची टक्केवारी दर्शवतो आणि K, करोनामुळे मृत्यू पावलेल्यांची राज्याच्या लोकसंख्येतील टक्केवारी. अगोदरच्या तक्त्यांतील काही कॉलम्स येथे सादरीकरणाच्या सोयीसाठी लपवले आहेत. तसेच आपण म्हटल्याप्रमाणे, शहरी लोकसंख्येची टक्केवारी ४०+ % आहे, अशा केरळ, महाराष्ट्र व तामिळनाडू ह्यांना हायलाईट केले आहे. (खरे तर त्यांत दिल्लीही यावे. पण मला दिल्लीतील ग्रामीण व शहरी लोकसंख्येची विभागणी कोठेही मिळू शकली नाही. तेव्हा मुळांत मी तेथील सर्व जनता शहरी विभागांत ढकलली. तेव्हा सध्या ह्या तुलनेसाठी दिल्ली विचारांत न घेतलेली बरी). . आता, कॉलम J (करोनाग्रस्तांतील मृत्यूंची टक्केवारी) पाहिला तर केरळची कामगिरी, महाराष्ट्र व तामिळनाडूंच्या तुलनेत बरीच चमकदार वाटते. पण कॉलम K- करोनाने मृत्यू पावलेल्यांची राज्याच्या एकूण लोकसंख्येतील टक्केवारी, तर ती तितकीशी चमकदार राहत नाही-- विशेषतः तामिळनाडूच्या तुलनेत.

In reply to by प्रदीप

हा बेस मुळात कोव्हिड केसेस जास्त आहेत हीच माहीती पुन्हा सांगतो. कोव्हीड इन्फेक्शन संख्येशी तुलना जास्त योग्य वाटते.

In reply to by प्रदीप

आपण कितीही अभ्यासपुर्ण मांडणी केली तरी येथील बहुतांश सभासदांची / प्रतिसादकर्त्यांची एक सोयीस्कर भुमिका अगोदरच ठरुन गेलेली असते. दुवाबाजी अथवा अभ्यासाचा त्यावर काही परिणाम होणे अवघड आहे. अर्थात तटस्थ वाचकांसाठी अभ्यासपुर्ण प्रतिसादांचे महत्त्व असावेच असे वाटते.

In reply to by धर्मराजमुटके

असले अभ्यासपुर्ण प्रतीसाद मिपा ची खासियत आहे. बर्‍याच गोष्टींचे दुध का दुध ; पाणी का पाणी होते यामुळे. बाकी अजेंडायुक्त प्रतीसादाला फाट्यावर मारले जाते हे वेगळे सांगणे नको :-)

In reply to by प्रदीप

राज्याचा परफॉर्मन्स बघताना थेट केसेस बघून कसा ठरवला जाऊ शकतो ? अर्थात तुम्ही तसे मत कुठे मांडले नाहीये. केसेस कमी ठेवायला लॉकडाऊन लावणे, मोठ्या गर्दीच्या प्रकारांना परवानगी न देणे हे उपाय आहेत. त्या पलीकडे सरकारने काय करावे ? माझ्या माहितीप्रमाणे केरळ ने ह्या गोष्टी केल्या होत्या. त्या पुढे ऑक्सिजन उपलब्धता, आरोग्य सुविधा यांचे व्यवस्थापन सुद्धा केरळ मध्ये चांगले झाले आहे.

In reply to by कॉमी

वर श्याम भागवतांना दिलेल्या आताच प्रतिसादात मी, करोनामुळे झालेल्या मृत्यूंचाही समावेश केला आहे, तो कृपया पहावा.
राज्याचा परफॉर्मन्स बघताना थेट केसेस बघून कसा ठरवला जाऊ शकतो ?
'थेट केसेस' म्हणजे काय?

In reply to by कॉमी

कोव्हिड इन्फेक्शन संख्या, किती लोकांना कोव्हिड झाला ती संख्या.
--- माझ्या तक्त्यांत ती G ह्या कॉलममधे आहे. त्यावरूनच मी लोकसंख्येच्या किती टक्क्यांना कोव्हिड झाला, हे H कॉलममधे मांडले आहे (H = G/A where A is the aggregate population of the state in 2021). जाता जाता, केरळमधे परिस्थिती कशी वाईट आहे, असे दर्शवण्यासाठी मी हा उद्योग सुरू केला नाही. पण कोव्हिड१९इंडिया.ऑर्गच्या साईटीवर, जेव्हा 'कन्फर्मड' ह्या कॉलमवर सॉर्ट केले, (जास्त ते कमी) तेव्हा त्यांत महाराष्ट्र व कर्नाटकाच्या खाली तिसरा क्रमांक केरळचा होता. तेव्हा जरा आश्चर्य वाटले, व म्हणून हा सर्व उद्योग आरंभला.

In reply to by प्रदीप

संपूर्ण प्रतिसाद टंकूनही तो अर्धवटच गेला. तेव्हा पुन्हा एकदा...
थेट केसेस म्हणजे कोव्हिड इन्फेक्शन संख्या, किती लोकांना कोव्हिड झाला ती संख्या.
माझ्या तक्त्यांतील कॉलम 'Total Cases until Date, G' ही संख्या देतो. ह्यावरूनच नंतर मी "% age of Population (infected by Covid), H=G/A" व पुढे "Fatalities of Covid Infected, %, J=I/G" हे कॉलम कॅल्क्युलेट केलेले आहेत. इथे A is 'Estimated Population, 2021' व I= (Covid related fatalities).

In reply to by कॉमी

मृत्युदराची खालुन वर (कमीपासून जास्त कडे वर्गवारी केली) तर केरळ ३र्या क्रमांकावर येते. पहीले आहे दादरा नगर हवेली. टोटल केसेस- १०,४३७ दुसरे आहेत- ओडिसा- टोटल केसेस- ८,३१,१२९ तिसरे- केरळा- केसेस-२६,७४,१६६(स्त्रोत इथे)

तसेच, जर निव्वळ केस संख्या पाहायची असेल तर सोबत टेस्ट किती झाल्या हे सुद्धा महत्वाचे ठरते. टेस्ट्स पर मिलियन ची चालू आकडेवारी मला सहजपणे मिळाली नाही. सापडली तर प्लिज द्या.

In reply to by कॉमी

मृत्युदराची खालुन वर (कमीपासून जास्त कडे वर्गवारी केली) तर केरळ ३र्या क्रमांकावर येते
केरळसाठी हाच आकडा माझ्या तक्त्यांतही आहेच की "Fatalities of Covid Infected, %, J=I/G". पण ही कोव्हिड झालेल्यांपैकींची टक्केवारी आहे. ह्यापुढला कॉलम "Fatalities of Total Population %, K=I/A" जिथे A is the total state population. केरळांत कोव्हिड्चा संसर्ग झालेल्यांची लोकसंख्येतील टक्केवारी, इतर राज्यांपेक्षा अधिक आहे "% age of Population, H=G/A". टेस्ट्स पर मि. सरळ कुठे उपलब्ध नाही. पण https://www.covid19india.org/ वर, Tested ह्या कॉलमचा व माझ्या तक्त्यांतील "Estimated Population, 2021, A" कॉलमचा वापर करून हे काढता यावे.

In reply to by प्रदीप

केरळचे टेस्ट तिथे २.१ करोड दिसत आहेत. लोकसंख्या ३.६ करोड. टेस्ट्स पर मिलियन ५,८३,३३३, किंवा ५८%

In reply to by कॉमी



तुम्ही घेतलेल्या राज्यात दिल्ली सर्वात जास्त टेस्ट करणारे, केरळ दुसरा.

In reply to by कॉमी

ही महत्वाची बाब नजरेत आणून दिल्याबद्दल. ह्यावरून हे समजते की केरळांत टेस्ट्स पर मि., दिल्ली सोडून, इतर राज्यांच्या मानाने बर्‍याच अधिक होत्या. त्यामुळे केसेस्/मि. ऑफ पॉप्युलेशनही जास्त आहे.

In reply to by कॉमी

महाराष्ट्रात सर्वात जास्त केसेस मुंबईत होत्या याचे एक महत्त्वाचे कारण मुंबईत दर चौरस किमी ला लोकसंख्या सर्वात जास्त आहे. याच्या तुलनेत केरळ हा त्यामानाने कमी गर्दीचे राज्य आहे आणि सामाजिक अंतर पाळणे जास्त सहज शक्य आहे. असे असूनही तेथे रुग्ण संख्या आणि मृत्यू दर सर्वात जास्तच्या गटात आहे याचे कारण सोयीस्करपणे टाळले गेले आहे. केवळ मोदी सरकारचे अपयश दाखवण्यासाठी केरळ मॉडेल चा इतका उदो उदो केला गेला होता आणि नंतर हेच लोक तोंडावर आपटले आहेत. त्यामुळे वेगवेगळे फाटे फोडून आपलेच खरे दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे. हि वाममार्गी लोकांची खासियतच आहे

In reply to by सुबोध खरे

मृत्यु दर सर्वात कमीच्या गटात आहे ! नीट बघा ! केरळ ची लोकसंख्येची घनता भारतात वरुन ३ नंबरवर आहे ! रुग्ण दर जास्त असण्याचे एक कारण आहे टेस्ट जास्त असणे ! तोंडावर आपटले कुठे हो मग ? का तुम्ही पण १८८ स्टाईल आहात, काही आधार न देता बोलत सुटायच ? तुम्ही टिका करा काही प्रॉब्लेम नाही, पण हे वाममार्गी वैगेरे रडगाणे गाऊ नका उगाच. रुग्ण दर कमी करायला लॉकडाऊन लावले होते, त्यापुढे काय करायचे ? आहे का काही ऊत्तर ???

Covid काळात देशात झालेल्या प्रतेक मृत्यू पावलेल्या व्यक्ती ची कोरोना टेस्ट केली होती का? ह्याचे उत्तर सरळ नाही येईल. किती लोकांच्या कसल्याच टेस्ट झाल्या नाही त त्या मुळे कोरोना नी किती लोक मेली आणि बाकी कारणाने किती लोक मेली ह्याचा रेकॉर्ड नाही. फक्त आकडेवारी जी अस्तित्वात आहे ती साफ चुकीची आहे.

In reply to by प्रदीप

प्रदीपभौ, मी मागच्या वेळेस पण तुम्हाला सांगितले होते की असे अभ्यासपूर्ण प्रतिसाद द्यायचा असेल तर वेगळा धागा काढा. चालू घडामोडी हे सदर यासाठी योग्य नाही. असो.

In reply to by श्रीगुरुजी

वेगळा धागा काढला की फक्त तेवढ्याच विषयावर प्रतिसाद येतात. रेल्वेरुळावर पाणी वगैरे विषय येत नाहीत. त्यामुळे चर्चा करायला सोपे जाते. ज्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष करावयाचे असते त्या प्रतिसादांची संख्या कमी होते. इतरांबद्दल खात्री देता येत नाही यास्तव, चर्चा अर्थपूर्ण व्हावी यासाठी मला जे वाटते व जे आपल्या हातात आहे ते सुचवले. असो.

In reply to by प्रदीप

मागच्या वेळेसही मी अभ्यास करत होतो. पण शेवटी टंकाळा आला. तुमच्या दोन प्रतिसादांवरही तासभर अभ्यास करत होतो. पण चालू घडामोडीत मांडायचे म्हणजे टंकाळा येतो. शिवाय पुढे संदर्भ म्हणून आपणच लिहिलेला प्रतिसाद आपल्यालाच सापडत नाही. असो.

In reply to by श्रीगुरुजी

कोणतीच कमेंट न करणे उत्तम.केंद्रीय सरकार कसे उत्तम आहे असेच कमेंट आली की कमेंट अभ्यासू आणि रिअल स्थिती काय आहे हे व्यक्त करणाऱ्या कमेंट आल्या की त्या मूर्ख पणाच्या. सरळ विभागणी आहे.

"esakal | Latest & Breaking Marathi News | Live Marathi News Maharashtra, Mumbai & Pune | Marathi Newspaper | ताज्या मराठी बातम्या" https://www.esakal.com/amp/mumbai/mumbai-rains-mayor-kishori-pednekar-v… ---------- आता काय बोलणार? ढकलंपंची तरी किती करायची? अर्थात रेल्वेला देखील, एखाद्या पक्षाचे लेबल लावायला, काही टक्के जनता तयार होणारच...

In reply to by मुक्त विहारि

स्वतःचा मोबाईल स्वतः जबाबदारीने कसा वापरावा हेही ज्यांना ठाऊक नसते, त्यांच्याकडे महत्वाचे पद दिले तर असे प्रसंग येणारच..